शनिवारी (२६डिसें) कंपनीच्या अॅन्युअल पार्टी वरून घरी जाताना रूपेशने (ऑफिसमधला मित्र)विचारले "उद्या तेलबैला 'क्लायंबिंग- व्हॅली क्रॉसिंग- रॅपलींग' आहे, येतोयस ना? माझा लगेच होकार. तिथे सकाळी ७:३०- ८:०० वा पोहचायचे होते..

ग्रुप तर अगोदरच रात्री गेला होता. आमचे सकाळी ६:०० वा. चिंचवडहून निघायचे ठरले. त्याप्रमाणे सकाळी थोडं लवकर उठून निघालो. पण गाडी चालवताना गाडीचा कसलातरी आवाज येत होता काही कळत नव्हते. एक्सप्रेस हायवेला जायच्या अगोदर मी खाली उतरलो रूपेशने हळूहळू गाडी चालवायला सूरू केले मी बघायला लागलो, पुढच्या चाकातून आवाज येत होता पण काहीच कळत नव्हते. आता तोच खाली उतरला त्यांने बघायला चालू केले. चाक बदलय पण आवाज कसला कळत नाही रे... असं म्हणत सहज त्याने चाकाच्या बोल्टला हात लावला तर चारपैकी तीन बोल्ट तसेच फिट न करता बसवले होते. आमचे दोघांचेही डोक्यावर हात. रात्री त्याच्या कुटूंबासहीत पार्टीला जावून आलो.. त्या पुढच्या चाकाच्या एका बोल्टवरच... (तुम्हीच विचार करा पार्टीवरून येताना किंवा एक्सप्रेस हायवेला गेल्यानंतर काय झाले असते ते...)
सुरवातच अशी थ्रिलींग झाली त्यामूळे आता तेलबैलावरच्या अॅक्टीव्हीटीसाठी पुर्ण तयार झालो.
चिंचवडवरून लोणावळा- भुशी धरण - आय. एन. एस. शिवाजी तिथून तेलबैला गावत जावून पोहचलो. तिथून एका बाजुला 'धनगड' कडचा देखावा.. डाव्या बाजूला दिसंणार्या तिन दगडांच्या रचनेला काहीजण 'नवरा-नवरी आणि भटजी' तर काहीजण 'ताजमहाल' म्हणतात...

सकाळची थंडी चांगलीच जाणवत होती ; त्यामुळे वातावरण खुपच प्रसन्न वाटत होतं. दुसर्या बाजूला तेलबैलाची भिंत....
ग्रुप पुढे गेला होता. त्यातील एकजण (हे रुपेशचे मित्र) वर जायला निघत होते त्यांच्याबरोबर आम्ही निघालो. वाटेत त्यांनी अॅक्टीव्हिटीबद्दल बरीच माहीती दिली...
२० ते २५ मिनीटांत त्या भिंतीच्या एका बाजूला जाउन पोहचलो. तिथून दिसणारा भिंतीचा साईड व्ह्यू आश्चर्यकारक आहे. भिंत पायथ्याशी ७ -८ फूट रुंद तर माथ्यावर रुंदी वाढत जात गेली आहे..
त्या भिंतीच्या कडेकडेनेच पुढे जायला वाट आहे.
इथून घेतलेला सुधागडचा फोटो..
या पठारावरून सहज उडी मारून पलीकडे सुधागदावर जाता येईल असेच वाटते...
दोन्ही भितींचा मधल्या खाचेतून डाव्या बाजूच्या भिंतीवरून रोपच्या सहाय्याने वर चढायचे होते (क्लायंबिंग). वर पोहचल्यावर मधली खाच रोपने पार करून (व्हॅली क्रॉसिंग) पलीकडच्या भिंतीवरून खाली उतरायचे (रॅपलींग). अशी ती पुर्ण अॅक्टीव्हिटी पुर्ण करायची होती. बापरे.... ! 
खाली फोटोत दिसणार्या वरच्या बोल्टचा वापर रोप फिक्स करण्यासाठी करतात.
वर चढताना एका पॅचपर शिडी लटकवलेली होती त्याच्यावरून चढताना वजनदार किंवा नवख्या लोकांची तारांबळ उडते. एकतर एवढ्या वर येवून तिथून खाली उतरता येत नाही आणि दुसर म्हणजे शिडीवर पाय ठेवला की शिडीचा झोका होतो, परत मागच्या बजूला खोल दरी.. 
तिथून थोडे वर गेल्यावर एक मोठा रॉक पॅच आहे. तो चढल्यावर माथ्यावर पोहचता येते. वर गेल्यावर बराच वेळ बसून रहावे लागले. तिथे थांबायलाही मोकळी जागा नव्हती. भिंतच ती , दोन्ही बाजुला कडा !

फोटोत रूपेश! आणि मागच्या बाजूला काहीजण दिसतात तिथून ग्रूपचे लोक आम्हाला रोप ला बांधून सोडून देत होते...
रोपने पलिकडे जाताना खुप मजा(?) आली.
मला वरून खाली बघायचे होते पण उलटा टांगलेला असल्यामुळे ते शक्य झाले नाही.
तरी मी मान इकडे-तिकडे फिरवून थोडी मजा घेतली.. भारीच वाटत होते. 
मधेच माझा एक पाय आधारासाठी असणार्या दोरीतून बाहेर आला तसं आणखी मी रोपमधून बाहेर (शक्यच नसते) यायच्या आत घाईघाईत पलिकडे गेलो.
तिथून खाली उतरायचे होते..
इथे त्या लोकांनी लटकलेल्या रोपवरून काढून परत त्या खाली जाणार्या रोपला अडकवले म्हणजे लटकवले. सुरवातीपासून ते खाली उतरेपर्यंत आपण रोपला लटकलेलेच असतो 
फोटोत दिसत असलेल्या रोपने खाली यायचे तिथून येताना खाली बघता येत होते...
कड्यावर आपण लटकलेलो असतो आणि सगळेजण आपली मजा बघत असतात... 
***या सगळ्या अॅक्टीव्हिटी मधे सगळ्यात महत्वाची असतात ती त्या ग्रूपची माणसे..
संपूर्ण मार्गावर मधेमधे ते थांबलेले असतात. ज्याला भिती वाटत असेल तर त्याला धीर देतात आणि न घाबरता पुढे जाण्यासाठी तयार करतात. कोणताही प्रसंग आला तरी त्यासाठी ते तयार आसतात.
आपल्या सुरक्षेची पुर्ण काळजी घेतात. आपण कुठूनही घसरलो तरी खाली पडणार नसतो कारण सुरवातीपासून शेवटी खाली उतरेपर्यंत आपण रोपला अडकवलेले/लटकलेलोच असतो. 
सकाळी ८:०० वाजता चालू केलीली अॅक्टिव्हीटी संध्याकाळी ६:०० वाजता संपवून आम्ही परत घरचा रस्ता धरला....
मस्तच रे सुन्या!
मस्तच रे सुन्या!
आई शप्पथ! अफलातून !!
आई शप्पथ! अफलातून !!
बापरे जबरीच अनुभव, फोटो आणी
बापरे जबरीच अनुभव, फोटो आणी वर्णन पण सह्हीच
सुन्या, जबराटच आहे रे हे
सुन्या, जबराटच आहे रे हे प्रकरण . हॅट्स ऑफ यार
विकु, हे प्रकरण जुने झाले
विकु, हे प्रकरण जुने झाले रे...
पुढचे प्रकरण लेटेश्ट आहे ...
जल्ला काय म्हणावं... हे
जल्ला काय म्हणावं... हे लक्षण ठिकं नव्हं...
जबरा एकदम जबरा...
मस्त थ्रिल मिळत असेल नाही...
मस्त थ्रिल मिळत असेल नाही... छान अनुभव आहे.
>> पुढचे प्रकरण लेटेश्ट आहे
>> पुढचे प्रकरण लेटेश्ट आहे ...
काहीच्या काही प्रकार आहे हा.. मस्तच सुन्या.
लय भारी! सलाम!
लय भारी! सलाम!
जबरी,............... निवेदन
जबरी,............... निवेदन लै भारी............अप्रतिम फ़ोटो
अरे वा.. शॉल्लेट... असला
अरे वा.. शॉल्लेट... असला उद्योग फोटोतच बघितलेला बरा...
पुढचे प्रकरण लेटेश्ट आहे
पुढचे प्रकरण लेटेश्ट आहे ...>>
जल्ला त्यामूळे तू ववि मुकलास नि मला नाईलाजास्तव हे प्रकरण सोडुन डान्स प्रकरणात भाग घ्यावा लागला.. 
जबरी .. पोरांसोबत शिकून
जबरी .. पोरांसोबत शिकून करायला पाहिजे एकदा. .. रॉक क्लैम्बिंग चं स्वप्न अजून ताजं आहे .. मरायच्या आधी .. मध्ये लिष्ट वर आहे अजूनतरी
पाण्यातले फोटो पाहून . जळजळ करून पित्त झालेली बाहुली.
Pages