तुझं जाणं..

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

आजही आठवतं;
ते तुझे कसमसुन भेटणं,
..जसं कधी भेटलोच नाही..

मग थोडे ऊन,
थोडा पाउस..
ती थेंब थेंब पाण्यावरची गाणी..

पण शेवटल्या वळणावर अशी काही वळलीस
जणु कधी काही घडलेच नाही..
अजूनही अडकली आहे ती कागदाची होडी..

काय करणार ती तरी,
हल्ली पाउसही पडत नाही...

विषय: 
प्रकार: