नुतनवर्षास....

Submitted by अभय आर्वीकर on 26 December, 2009 - 08:56

.. रे नववर्षा

रे नववर्षा ये नेमाने
वल्हवित अंकुर नवजोमाने
एक कवडसा चैतन्याचा
जा फुलवीत ही उदास राने ....!

ना अस्त्राने वा शस्त्राने
उकलन व्हावी सद्भभावाने
मत्सर-हेका ना गर्जन-केका
बाहुबलीचे नको भूजाने .....!

दानवाने ना देवाने
राज्य करावे बळीराजाने
आत्मग्लानी क्लेश त्यजुनी
जगावा पोशिंदा सन्मानाने ...!

रे नववर्षा दे अभयाने
दे भरुनी दुरडी भगोणे
वित्तपातल्या लक्तरांना
भरव मुक्तीचे चार दाणे ...!

.. गंगाधर मुटे
......................................................................
Greeting - MB1111d.jpg
......................................................................

गुलमोहर: 

आत्मग्लानी क्लेश त्यजुनी,
जगावा पोशिंदा सन्मानाने ...!.......... क्या बात है.....आमेन !!!

>>कवडसा चैतन्याचा, मत्सर-हेका ना गर्जन-केका,
आत्मग्लानी क्लेश त्यजुनी,
जगावा पोशिंदा सन्मानाने ...!

रे नववर्षा दे नेमाने ,
दे भरुनी दुरडी भगोणे,
वित्तपातल्या लक्तरांना,
भरव मुक्तीचे चार दाणे ...!

काय काय वर्णावे.. सुंदर कविता!

रे नववर्षा दे नेमाने ,
दे भरुनी दुरडी भगोणे,
वित्तपातल्या लक्तरांना,
भरव मुक्तीचे चार दाणे ...!
---------

वाह!

सुंदर कविता.

उमेशजी,अक्षरीजी,
प्रतिसादाबद्दल आभार....!!!
........................................
<< सुंदर स्वप्नवाद! 'वो सुबह कभी तो आयेगी'.... >>
तुमच्या तोंडात साखर पडो,
(विदर्भातील बंद पडलेल्या साखर कारखान्यातली. :स्मित:)
अरे पुन्हा हा स्वप्नवादच झाला... Lol Lol Lol

दानवाने ना देवाने,
राज्य करावे बळीराजाने,
आत्मग्लानी क्लेश त्यजुनी,
जगावा पोशिंदा सन्मानाने ...!
>>>>>>>
छान Happy

नवीन वर्ष २०११ की १९११?
इतके (१०० वर्षापुर्वीचे) नवकाव्य पहिल्यांदाच वाचले!
सुधरा हो, सुधरा!
जग बदलले, १०० वर्षांपुर्वीची भाषा कुठे वापरता हो??

असो,
नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!!

जग बदलले, १०० वर्षांपुर्वीची भाषा कुठे वापरता हो??

अहो संदीपसमीप (समीप हा शब्दसुद्धा १३ व्या शतकातला बरं का!) वरील कवितेत जी भाषा वापरलीय ना, ती ३१ व्या शतकाची भाषा आहे.

कमरेखालची किंवा चोळीखालची भाषा ही २०११ ची भाषा ठरू शकत नाही. ती जंगली स्वरूपी आदीमानवाची भाषा होती.
आणि आम्हाला बदललेले जग पाहायचे म्हणजे जनतेला पुन्हा एकदा आदीमानवाच्या रुपात पाहायची इच्छा नाहीये. Happy

येणारे हे नवीन वर्ष ....
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियाना सुखाचे, समाधानाचे आणि भरभराटीचे जावो !
(या नवीन वर्षात...
महागाईचा त्रास थोडा कमी होवो !
शेतकरी-ग्राहका(दरां)मधलं अंतर थोडं कमी होवो !
निदान हवा,पाणी आणखी प्रदूषित न होवो !
तुमच्या-आमच्या मनात असणारी पण अपूर्ण राहिलेली सर्व कामे पूर्ण होवो !
Happy

Pages