फुले

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

धुंद चांदणरात साजणा, शुभ्र भासती फुले
नयनात तुझ्या, हास्यात तुझ्या गोड हासती फुले

मम हृदयाचे पाणी पाणी, जीवघेणी ती खळी
ओठांवरच्या शब्दकळ्यांचे गीत माळती फुले

पुसटता स्पर्श तुझा, निसटते नजर खाली,
गुपित मनाचे तुला सांगता, लाजलाजती फुले

शीळ घाली खट्याळ वारा, गूज सांगते मखमाली
पदरात माझ्या भान हरपोनी डोलडोलती फुले

तू नसता सारे स्तब्ध, खिन्न सार्‍या दिशा
ये प्रिया, रास रचू या, तुझीच वाट पाहती फुले!

विषय: 
प्रकार: 

छान..