पिसे

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

कविता हरवली
सापडेचना!

इथेच तर होती
उन्मनीचे भाव आलापत-
अजून उमलतच होती..

विचारून आल्ये-
कळीच्या उसाश्याला,
पेंगुळल्या पानातून ठिबकणार्‍या-
पागोळ्यांच्या माळेला...

नकळत उश्याशी शोधता शोधता
सापडली एक आर्त सुरावट,
आणि ती पांघरूनही थरथरणारी एक उत्कट रात्र!
एका कोपर्‍यात चिंब काही सुगंधीत श्वास...
झांजझांज न्यासनक्षीचे-
वेड्या पावसाचे ठसे..

-अन क्षणात उमगले मजला, हे कोणाचे पिसे!

विषय: 
प्रकार: 

खूप खूप धन्यवाद शर्मिला, माणिक Happy
हो बर्‍याच दिवसांपासून मनात घोळत होती ही कविता.. आज मुहुर्त लागला!