सदू आणि दादू
(सदू आणि दादू नेहेमी प्रमाणेच गोदू ची वाट पहाताहेत. पण ह्यावेळी ते प्रत्यक्ष भेटत नसून माय बोलीवर भेटताहेत अश्याच कुठल्याश्या बी बी वर)
सदू : नमस्कार मंडळी. कोणी आहे का इथे (हसणारी बाहुली)
दादू : नमस्कार सदू. मी आहे (हसणारी बाहुली)
सदू : तू आहेस का मला वाटल कुणीच नसणारै (मनात : कशाला उगवलास रे अवेळी. चांगला एकांतात भेटणार होतो गोदूला)
दादू : अरे पण तू ह्या वेळी कसा काय (मनात: चल कट बर लवकर)
सदू : अरे थोड कंपनीच काम करत होतो. आता आटोपल. म्हटल कुणी आहे का पहाव?(समाधानी बाहुली)
दादू : छान. तू पण माझ्यासारख मन लावून काम करतोस वाटत (अतीव समाधानी बाहुली) (मनात: लेका दिवसभर घरीच तर असतोस. मला काय माहीती नाही काय बच्चमजी. पॉलीसी विकतो म्हणे)
सदू : बर सध्या काय वाचतोहेस चांगल ?
दादू : सध्या विशेष अस काही नाही रे. जमल तर लोकसत्ता वाचतो वेळ मिळेल तेंव्हा. का रे ? (एक शंकेखोर बाहुली)
सदू : नाही जमलच तर मी नूकतीच गूलमोहर वर एक प्रेम कविता टाकलीये. वाच वाच (आनंदी बाहुली)
दादू : बर. वेळ मिळेल तेंव्हा वाचेन (एक आनंदी बाहुली) (मनात: वाट बघ)
सदू : बर तू जेवलास का रे (आनंदी बाहुली)
दादू : का म्हणजे? भूक लागली म्हणून (खुळचट बाहुली)
सदू : तस नव्हे. म्हणजे आता जेवण झाल का (बावळट बाहुली)
दादू : अस्स होय (यूरेका यूरेका बाहुली) हो जेवलो. तू? (मनात जा की गूमान गिळायला)
सदू : नाही अजून. थोड्या वेळाने जेवणार. छोले, पुरी आणि विजय स्टोअर्स ची बासूंदी. (आनंदी बाहुली)
दादू : अरे अरे. मेनू नको टाकू लगेच. मेनू टाकायला हा तूला पार्ल्याचा बी बी वाटला का काय? (हसणारी बाहुली)
सदू : हो रे बी बी चूकला (खजील बाहुली)
दादू : (पेटलेली बाहुली) अस काय लिहीशील तर तूझ्यावर कुजबूज लीहीतील बर का मंडळी
सदू : बर ते जाउ दे. मला एक सांग ह्या वेळी तू इथे काय करतोहेस (एक संशयी बाहुली)
दादू : टी पी करतोय. बर तू इथे काय करतोहेस (दोन संशयी बाहुल्या)
सदू : मी वाट बघतोय ( एक आनंदी बाहुली)
दादू : अस्स का. मग तूला सांगायला हरकत नाही. मी पण वाट बघतोय (दोन आनंदी बाहुल्या)
सदू : कोणाची ? (चौकस बाहुली)
दादू : तूला का रे चौकश्या (वैतागलेली बाहुली)
सदू : अरे मी तूझा मित्र ना म्हणून विचारल (हिरमूसलेली बाहुली)
दादू : ठीक ठीक. मी गोदूची वाट बघतोय (आनंदी बाहुली)
सदू : काय (आश्चर्य कारक बाहुली) तू पण (चरफडणारी बाहुली)
दादू : तू पण म्हणजे? तू पण (विस्मय कारक बाहुली)
सदू : म्हणजे गोदूने तूला पण बोलवलय (संगम चित्रपटातली राज कपूर शी साधर्म्य दाखवणारी बाहुली)
दादू : हो मला पण (अंदाज चित्रपटातली दिलीप कूमारशी साधर्म्य दाखवणारी बाहुली)
सदू : पण ती नक्की येइल का रे
दादू : येइलच. तूला काय वाटत (एक बेसावध बाहुली)
सदू : नाही आली तरी मी वाट बघेन. मूसळधार पावसात सूर्य विझेल तोपर्यंत. पौर्णिमेचा चंद्र सागरात बूडेल तोपर्यंत. आकाशातल्या तारका खेळताहेत तोपर्यंत
दादू : नको नको (पस्तावलेली बाहुली)
सदू : काय नको (गोंधळलेली बाहुली)
दादू : कविता नको रे. नपेक्षा पानावर जाऊन टाक. नाहीच धीर धरवत तर ' मनातल्या भावनांवर' टाक (मनात ' मनातल्या भावना' बी बी वरील मायबोलीकरांची क्षमा मागतो)
सदू : बर बर (दूखावलेली बाहुली)
दादू : अरे ती खरो खर असेल का कुणी ड्युप्लीकेट आय डी (संशयी बाहुली)
सदू : गप रे. ती ओरिजीनल असणारै. ती नक्की येणारै. वाट बघ (आनंदी बाहुली)
दादू : पण ती नाही आली तर
सदू : शूभ बोल रे दाद्या (आनंदी बाहुली)
दादू : तिने कुठले कपडे घातले असतील रे (स्वप्नाळू बाहुली)
सदू : तिला किनै आकाशी रंग खूलून दिसेल अस माझ मन मला सांगतय (हरवलेली बाहुली)
दादू : तू पाहील आहेस का तिला (संशयी बाहुली)
सदू : माझ्या नजरेन बघ म्हणजे दिसेल तूला (जास्तीच हरवलेली बाहुली)
दादू : (पूढचा धोका ओळखून) हो रे दिसली दिसली.
सदू : तिचे स्वैर केस बघ कसे वार्यावर उडताहेत. आपल्या नाजूक बोटांनी ती कपाळावरील बट मागे सरकवतेय.
(दादू चपापून एकदा बी बी चेक करओ. बी बी बरोबर असतो)
इतक्यात .....
गोदू : हाय सदू हाय दादू. कसे आहात? (स्मित करणारी बाहुली)
दादू : गोदू तू आलीस (आनंदी बाहुली)
सदू : गोदू तू आलीस (आनंदी बाहुली)
गोदू : आले म्हणजे? येणारच होते
सदू : नाही म्हणजे आजून पर्यंत कधी आली नव्हतीस म्हणून (उत्साही बाहुली)
गोदू : हो पण लगेच जाणारै. (आनंदी बाहुली)
दादू : जाणार लगेच (दुख्खी बाहुली) कुठे?
गोदू : श्याम ला भेटायला (आनंदी बाहुली)
सदू : हा श्याम म्हणजे तो टे टे खेळतो तो (भकास बाहुली)
गोदू : हो तोच तो.त्याच्याबरोबर माझ लग्न ठरलय. येत्या मे महिन्यात (आनंदी बाहुली) चला मी येते बाय
दादू : (फूटकी बाहुली) अभिनंदन. बाय. शुभ रात्री.
सदू : त्रिवार अभिनंदन (भग्न बाहुली)
(गोदू जाते आणि सदू आणि दादू भग्न हृदयी बाहुल्या शोधत रहातात)
समाप्त.
खतरा एकदम!
एका फटक्यात किती ( बी बी) ठार? ह ह पु वा. घरूनच वाचत होते म्हणून बरंय!
खिदळणारी बाहुली
जबरा लिहिलेयस
सदू अन दादू + मायबोली हा विषय निवडलास तिथेच निम्मे काम झाले तुझे 
जबरी!
मस्त लिहिलं आहेस.. एकदम खास.. 'विविध बाहुल्या' जबरा आहेत..
जबरी
सही लिहिले आहेस रे खतरनाक... (लोळत हसणारी बाहुली)
कुजबुजचीही खेचणारा तू पहिलाच (दात विचकणारी बाहुली)
केदार तूला पण एक बाहुली शोधायची गरज आहे रे... (हसणारी बाहुली)
पण इथे मायबोलीवर नको (कवळी घातलेली वॄद्ध बाहुली)
इथली शोधलीस तर तुझे तिच्या हातचे बाहुले व्हायला वेळ लागणार नाही (पुरुषजन्मा तुझी कहाणीवर जाउन आलेली बाहुली)
visit http://milindchhatre.blogspot.com
आवडले!!
ए, भावल्या........ मस्त लिहिलंस रे!!
झकास..
केदार, नंबर १ लिहिलस रे..
अरे
काय चालवलंय काय आँ? किती हसणार एकदम? (हसता हसता एका हाताने पोट धरून दुसर्या हाताने लेखकाला गुद्दे मारणारी बाहुली
)
फुल्ल टू टिपी
केदार, lol lol lol
आता मायबोलीवर सदू दादू आणि गोदू शोधायला हवेत............ हो आणि श्यामसुद्धा...
धन्यवाद
धन्यवाद मंडळी (एक विनम्रतासे बोलणारी बाहूली) :))
हा हा .. हा हा..
केदारचं पोस्ट जबरी आणि मिल्याची प्रतिक्रियाही जबरीच (दोन हसत जमिनीवर रोलणार्या मोरपिशी बाहुल्या)
खी खी खी
छान लिहिलयस केदार. (एक खुप हसणारी बाहुली)
एकदम फर्मास.
केदार मस्त जमलय रे.
परत एकदा
परत एकदा धन्यवाद मंडळी
मिल्याची
*** जगात तीन प्रकारचे लोक असतात... मोजू शकणारे आणि मोजू न शकणारे. ***
केद्या
केद्या पेटलायस लेका ! तुझ रंगी बेरंगीचे पान उघडायची घाई केली रे ( बिल वाढतय कॅफेचं ,म्हणुन भोकाड पसरणारी भावली )
तु चहुबाजुने फटकेबाजी करतोयस त्यामुळे तुला एखाद बक्षीसच द्यावस बाटतय ( ती नेहमी फिल्लम अवॉर्ड मधे असते ती भावली )
खुप
खुप धन्यवाद
केदार ...
केदार ... केदार (हंसा "खिचडी" वली बाहुली)
(डोळ्यात हसून पाणी आलेली बाहुली)
लई मस्त..
लई मस्त.. मजा आली. आता सर्व बाहुल्या वापरून झाल्याच आहेत तत्यामुळे



--------------
नंदिनी
--------------