Submitted by दक्षिणा on 23 November, 2009 - 05:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
निवडलेली घोळू ची भाजी पाव किलो, लसूण, ३ चिरलेल्या मिरच्या, भिजवलेली तुरीची
डाळ, तांदूळाची कणी अंदाजाने (साधारण अर्धा मूठ), मीठ, फोडणीचे साहित्य.
(दूध, शेंगदाण्याचं कूटसाखर/गूळ हे पर्याय आवडत असल्यास वापरता येतील.)
निवडणी :
घोळूची भाजी झुपका/झुडुपाच्या स्वरूपात असते त्याची मूळं काढून टाकून छोटे छोटे
तुकडे हाताने सारखे करून घ्यावेत.
क्रमवार पाककृती:
घोळूची भाजी नीट धुवून घ्यावी, कढईत तेल तापवून, त्यात जिरे घालून लसूण, मिरच्या टाकाव्यात, हिंग टाकावा, भिजवलेली तुरीची डाळ घालून फोडणी परतावी मग घोळूची भाजी घालून परत एकदा परतावे. १-२ मिनिटात तांदुळाची कणी घालावी, मीठ (गुळ/साखर)घालून झाकून ठेवावी. शिजल्यावर उतरवावी.
वाढणी/प्रमाण:
२ माणसांसाठी
अधिक टिपा:
भाजी वरिल प्रमाणे शिजल्यावर त्यात शेंगदाण्याचं कूट घालता येईल. पातळसर हवी असेल तर पाव वाटी दूध ही घालता येईल. ही भाजी दूध घातल्यावर गोळा भाजीसारखी होते.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे अमेरीकेत पर्सलेन म्हणजे
इथे अमेरीकेत पर्सलेन म्हणजे तण समजतात. आम्ही याची भाजी करतो सांगितल्यावर माझ्या मैत्रीणीला आधी मी गंमत करतेय असेच वाटले होते.
चिव्वय चा झुणका आणी कढी, भाकर
चिव्वय चा झुणका आणी कढी, भाकर
जिवघेणी आठवण
मनी यांनी दिलेला फोटो घोळ चा
मनी यांनी दिलेला फोटो घोळ चा आहे. आमच्या परसात नेहेमी येते. इथे Australia त सुद्धा याला weed म्हणतात.
मी बरेच वेळा आळुच्या पातळ भाजीत मिळून येण्यासाठी घालते.
प्रिया
Pages