Submitted by दक्षिणा on 23 November, 2009 - 05:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
निवडलेली घोळू ची भाजी पाव किलो, लसूण, ३ चिरलेल्या मिरच्या, भिजवलेली तुरीची
डाळ, तांदूळाची कणी अंदाजाने (साधारण अर्धा मूठ), मीठ, फोडणीचे साहित्य.
(दूध, शेंगदाण्याचं कूटसाखर/गूळ हे पर्याय आवडत असल्यास वापरता येतील.)
निवडणी :
घोळूची भाजी झुपका/झुडुपाच्या स्वरूपात असते त्याची मूळं काढून टाकून छोटे छोटे
तुकडे हाताने सारखे करून घ्यावेत.
क्रमवार पाककृती:
घोळूची भाजी नीट धुवून घ्यावी, कढईत तेल तापवून, त्यात जिरे घालून लसूण, मिरच्या टाकाव्यात, हिंग टाकावा, भिजवलेली तुरीची डाळ घालून फोडणी परतावी मग घोळूची भाजी घालून परत एकदा परतावे. १-२ मिनिटात तांदुळाची कणी घालावी, मीठ (गुळ/साखर)घालून झाकून ठेवावी. शिजल्यावर उतरवावी.
वाढणी/प्रमाण:
२ माणसांसाठी
अधिक टिपा:
भाजी वरिल प्रमाणे शिजल्यावर त्यात शेंगदाण्याचं कूट घालता येईल. पातळसर हवी असेल तर पाव वाटी दूध ही घालता येईल. ही भाजी दूध घातल्यावर गोळा भाजीसारखी होते.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तांदूळाची कणी म्हनजे...
तांदूळाची कणी म्हनजे... तांदुळ मिक्सर मधुन काढ्ले तर चालतील ना?
छान रेसिपी दक्षिणा.. घोळूची
छान रेसिपी दक्षिणा..
घोळूची भाजी झुपका/झुडुपाच्या स्वरूपात असते
अगं सगळ्याच पालेभाज्या अशाच असतात.. त्यामुळे घोळूच्या भाजीला काही दुसरे नाव असेल तर सांग किंवा ह्या भाजीचा एखादा फोटू असेल तर टाक ना.. म्हंजे नक्की कशी असते ही भाजी ते कळेल..
@जुये तांदूळाची कणी म्हणजे
@जुये तांदूळाची कणी म्हणजे तांदूळ हलकेच (रवाळ) काढावेत मिक्सरमधून
अगदी पीठ नको.
@ मेधा - सगळ्या पालेभाज्या झुडुपासारख्या असल्या तरिही घोळू ही जमिनीवर पसरत वाढणारी आहे त्यामुळे खुरटी असते इतर पालेभाज्यांइतकी उंच नसते. छोटेसे देठ आणि छोटी छोटी गोल पानं असतात.
घोळू ची भाजी >>> म्हणजे
घोळू ची भाजी >>> म्हणजे भाजीचा घोळ बहुतेक
घोळु म्हणजे घोळ भाजी का?
घोळु म्हणजे घोळ भाजी का? विदर्भात 'घोळ' नावाची पालेभाजी मिळते. तिची ताक घालुन पातळभाजी करतात.
या भाजीला घोळ असे म्हणतात.
या भाजीला घोळ असे म्हणतात. इतर पालेभाज्यांप्रमाणे, खाली मूळ आणि वर पाने असा प्रकार नसतो कारण याचे खोड धावते असते आणि हि भाजी जमिनीवर पसरत जाते. ती तशीच उपटतात म्हणून तिचा गुंता झालेला असतो. लालसर देठ आणि साधारण गव्हाच्या दाण्याएवढीच आणि साधारण त्याच आकाराची हिरवी पाने असतात. हि भाजी सहज कुठेही आपोआप उगवते. पण ओळखता आली पाहिजे.
हि भाजी थोडीशी बुळबुळीत होते, म्हणून थोडा आंबट पदार्थ वा डाळ घालावी लागते. पोटासाठी हि भाजी चांगली, एकदातरी खावी वर्षातून.
याच भाजीची जरा मोठी पाने असलेली जात असते, त्याला म्हणतात, राजघोळ
रेसिपी मस्तच आहे दक्षिणा.
रेसिपी मस्तच आहे दक्षिणा. वाचूनच पाणी सुटलं तोंडाला. पण निव्वळ कृती वाचण्यापलीकडे काही करता येत नाही.
>>> लालसर देठ आणि साधारण गव्हाच्या दाण्याएवढीच आणि साधारण त्याच आकाराची हिरवी पाने असतात.
ती चिवळ. बी ने इथे फोटो टाकलाय बघा त्याचा.
घोळेची भाजी साधारण आपल्या नेहमीच्या पांढर्या बटणाएवढ्या मोठ्या पानांची असते. ह्याला पण देठ लाल असतात.
भाग्याची घोळीची ताकातली भाजी इथे आहे.
फोटु टाका रे बाबानो.. मला
फोटु टाका रे बाबानो.. मला मायाळु आणी घोळू.. सगळा गोंधळ होतो.
डहाणुकरांच्या लेखात ह्या दोन्ही भाज्यांचे खुप कौतुक वाचलेले.
नेहमी घोळ घालणार्यांना ही
नेहमी घोळ घालणार्यांना ही भाजी आवडते का? की भाजी खाल्ल्यावर काही घोळ होतो?
हा फोटो जुन्या माबोवरून ढापून
हा फोटो जुन्या माबोवरून ढापून इथे टाकत आहे. कृपया नंतर कोणी ओरडू नये...
बी यांची माफी मागून....
जय घोळू....
दक्षिणा, ही 'चिवळ' आहे, घोळू
दक्षिणा, ही 'चिवळ' आहे, घोळू नव्हे, असं वाचलं आत्ताच मी त्या बीच्या बाफवर.
याला 'चुई' ची भाजी म्हणतात
याला 'चुई' ची भाजी म्हणतात नागपुर साईड ला.
- सुरुचि
इथे पुण्यात याला घोळूच
इथे पुण्यात याला घोळूच म्हणतात
भारीच मोठा घोळ आहे हा......
भारीच मोठा घोळ आहे हा......
आज बाजारात फेरफटका मारुन पाहते कुठे दिसते का....
ह्याला घोल का झोल असं नाव दे
ह्याला घोल का झोल असं नाव दे ना.
ही भाजी दूध घातल्यावर गोळा
ही भाजी दूध घातल्यावर गोळा भाजीसारखी होते. <<
दूध घातलं की कशी गोळा भाजीसारखी होईल ? आधी तरी असेल किंवा दूध घालून थोडा वेळ शिजवलं की होईल ना ?
हो गं दक्षे! आमच्याकडे पण
हो गं दक्षे! आमच्याकडे पण 'चिव्वळ' च म्हणतात तिला!
आम्ही तिचे मुटकुळे पण करतो!
त्या भाजीत मावेल तेवढे गव्हाचे व ज्वारीचे पीठ घालायचे! भिजवलेली मुगदाळ किंवा हरभरादाळ घालावी, नंतर कोथिंबीर बारीक चिरुन कणकेत टाकावी व कणिक रगडून रगडून भिजवावी...मुटकुळे होतील अशा रितीने! नंतर त्याचे मुटकुळे बांधुन कुकरमधे/ पातेल्यावर चाळणीत घालुन वाफवावे, कोथिंबीरीच्या वड्या करतांना वाफवतात तसे! नंतर काप करुन तळता पण येतात....पण वाफवलेल्या मुटकुळ्यांचा जो वास सुटतो ना ..आणि त्याचा स्वाद ! त्याची चव वड्यांना नाही!
मुटकुळे गरमागरम सर्व्ह करायचे आणि तसेच वरुन कच्चे तेल टाकुन खातो आम्ही!
खान्देशात यांना 'फुनके' असं नाव आहे!
घोळुची भाजी खाल्याने माणुस
घोळुची भाजी खाल्याने माणुस घोळ करतो का. ( वेंधळेपणा) आणि मग वेंधळेपणाचा बाफ भरुन वाहतो का?
मिलिंद, इतकी साधी गोष्ट
मिलिंद, इतकी साधी गोष्ट समजण्याइतके माबोकर सूज्ञ असतील असं वाटलं होतं.
एनीवे, तुम्ही लिहिलंच आहे तर मी पोष्ट एडिट करायचे कष्ट नाही घेत आता....
अहो मॅडम, तसे लोक सुज्ञ
अहो मॅडम, तसे लोक सुज्ञ आहेतच तरीही तुम्ही
घोळूची भाजी नीट धुवून घ्यावी,....
कढईत तेल तापवून, ......
शिजल्यावर उतरवावी.
इत्यादी वाक्यं लिहीली आहेतच ना. आपण जर साध्या साध्या गोष्टी पण इतक्या सोप्या करुन लिहीतो (की ज्यायोगे त्या layman ला कळाव्यात) तर ही गोष्ट तर जास्त महत्वाची आहे.
"
भाजी वरिल प्रमाणे शिजल्यावर त्यात शेंगदाण्याचं कूट घालता येईल. पातळसर हवी असेल तर पाव वाटी दूध ही घालता येईल. ही भाजी दूध घातल्यावर गोळा भाजीसारखी होते.
"
समजा मला गोळाभाजी करायची आहे आणि मी तुमची वरील सूचना वाचून भाजी शिजल्यावर गॅसवरुन उतरवली, त्यात दूध टाकलं तर त्याचा गोळा होईल का ? नाही ना ? मग त्यासाठी अजून थोडा वेळ शिजवा असं लिहावं लागेल की नाही ?
असं माझं सोपं विवेचन आहे. तुम्हांला पटावं असं अजिबात नाही
दक्षे मस्त गं ! मी आजीकडे
दक्षे मस्त गं ! मी आजीकडे खाल्ली आहे ही भाजी. चिवळ म्हणतात हीला. तांदळ्याच्या कण्या घालून रगडा करतात...आंबट चव लागते जरा. शेतात तणासारखी उगवते...खास लागवड करत नाहीत.
आता ही भाजी बाजारातही मिळते काय ?
दक्षिणा, या भाजीने कफ कमी
दक्षिणा, या भाजीने कफ कमी होतो. तसेच ती अतिसारावर पण गुणकारी आहे. संस्कृतमधे लोणी, गुजराथीत लुणी, आणि हिंदीत कुल्का म्हणतात. इंग्रजीत गार्डन पर्सलेन आणि लॅटिनमधे, पोर्टतेका ओलेरसी, असे नाव आहे हिला.
दिनेश, अधिक माहीतीबद्दल
दिनेश,
अधिक माहीतीबद्दल धन्यवाद, आता वारंवार खायला कारण मिळालं.
(No subject)
अरे आमच्या फोटोंना कोणीतरी
अरे आमच्या फोटोंना कोणीतरी प्रतिसाद द्या की?
मस्तच आहेत फोटोज. विदर्भात
मस्तच आहेत फोटोज.
विदर्भात याला चिवळीची/माठाची भाजी म्हणतात. खूप थंड असते ही भाजी गुणधर्मानी असं आजी/पणजीकडून ऐकलेलं आहे. तान्ह्या बाळांना यावर झोपवतात. ऊन बाधत नाही असं केल्यानी.
आई ही भाजी डाळीचं पीठ/ भाजणी पेरून करते.
तेलाच्या नेहेमीच्या फोडणीत कांदा लालसर परतून ही भाजी घालून पुन्हा परतायचं. झाकण घालून वाफेवर भाजी शिजली की डाळीचं पीठ पेरायचं. मस्त खमंग भाजी होते.
या भाजीला निवडणं हे एक लिच्चड अन महावेळखाऊ काम आहे. :p
योकु, धन्यवाद! >>>विदर्भात
योकु,
धन्यवाद!
>>>विदर्भात याला चिवळीची/माठाची भाजी म्हणतात<<< माठाची वेगळी असते ना?
>>>आई ही भाजी डाळीचं पीठ/ भाजणी पेरून करते<<< आम्ही मुगाची डाळ घालून पाहिली
>>>या भाजीला निवडणं हे एक लिच्चड अन महावेळखाऊ काम आहे. <<< लिच्चड
बाकी भाजी मी केलेली नसल्याने पाकृ देणे योग्य नव्हतेच. हलवायाच्या घरावर नुसार नुसते फोटो टाकले. पाकृ इथे आहेच म्हणा!
आंबट लागते पण जरा ही भाजी, त्यामुळे आणखीनच आवडली.
वरच्या सगळ्या भाज्या चिवळी-
वरच्या सगळ्या भाज्या चिवळी- चिव्वयी च्या आहेत. चिवळी आणि घोळ बरिच वेगळी आहे, या दोन्ही भाज्या माझ्या आजोबांच्या केळीच्या बागात यायच्या. या दोन्ही भाज्या एकाच वर्गातल्या असाव्यात पण माठ तर पुर्ण्पणे वेगळीच भाजी आहे, चिवळी आणि घोळीचा मोस्टली झुणका किंवा फुणकेच/ भेंडके होतात जळगावकडे...
अमेरिकेत ही भाजी मेक्सिकन दुकानात मिळते. Verdolaga नावाने. याचे देठ लाल किंवा हीरवे दोन्ही असू शकतात.
या वरुन एक आठवलं...आम्ही एक्दा चेरी पिकिंग ला गेलेलो तेव्हा ही भाजी बॅगा भरभरून आणलेली. आई तर सगळ्यांना अगदी स्वतःच्या शेतातनं आणल्यासारखी वाटत होती. खालील फोटो गूगल्वरुन घेत्लाय.
Purslane.Photo_.jpg (28.07 KB)
मला भाजी विकत देणारा भाजीवाला
मला भाजी विकत देणारा भाजीवाला म्हणाला ह्याला घोळू किंवा चिवळ म्हणतात. आमच्याकडच्या स्वयंपाकवाल्या बाई म्हणाल्या की हे घोळू आहे. त्यामुळे दोन्ही एकच असावे असे वाटले.
हां मग ते इंग्लिश नावाचे
हां मग ते इंग्लिश नावाचे स्पेलिंगच माहीत नव्हते. दक्षिणांनी ते देवनागरीत लिहिलेले होते.
धन्यवाद ह्या माहितीबद्दल!
Pages