Calling on behalf of...
ठिकाण :-
हिलरी क्लिंटन नॅशनल कँपेन हेड्क्वार्टर्स,
आर्लिन्ग्टन, व्हर्जिनिया.
दिवस :- पोटोमॅक प्रायमरीजचा, १२ फेब्रुवारी २००८.
वेळ :- दुपारी साडेचार ते संध्याकाळी सात.
"Hi, my name is अमूकतमूक and I am a volunteer calling on behalf of Hillary Clinton's campaign... "
आजूबाजूच्या टेबलवर बसलेल्या लोकांच्या तोंडून थोड्याफार वेळाच्या फरकाने हे वाक्य कानावर पडत होतं. मग "ग्रेट", "थँक यू", "ओह, ओके, थँक्स फॉर युअर टाईम" किंवा अर्धवट वाक्यं.
व्हर्जिनिया, मेरीलंड आणि डीसी मधल्या डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन प्रायमरीजचा दिवस. volunteer म्हणून रजिस्टर केल्यापासून हेड्क्वार्टर्स मध्ये काम करायला जाण्याची माझी हा पहिलीच वेळ होती. हिलरीच्या व्हर्जिनिया भेटीच्या वेळी टाऊन हॉल मीटिंगच्या ठिकाणी काही सटरफटर कामे केली होती. इलेक्शनच्या दिवशी सुट्टी घेऊ शकत नाही म्हणून तिथल्या coordinator नी सकाळी ६ ते ९ किंवा संध्याकाळी ४ ते ७ अश्या वेळा दिल्या कारण त्या वेळात जास्त वोटिंग होतं. वाटलं, असेल जवळच्या पोलिंग सेंटरवर काहीतरी काम, तर म्हणे नाही, इकडे या! सकाळी ट्रॅफिकमध्ये जा-ये करण्यापेक्षा संध्याकाळ बरी म्हणून संध्याकाळी जायचं ठरवलं. स्वत: सकाळीच मतदान करुन टाकलं.
दुपारी १२ नंतर पाऊस, स्लीट, फ्रीझिंग रेन असा हवामानाचा अंदाज होता. दुपारी पावसाला सुरुवातही झाली आणि मी ऑफिसमधून निघून हेड्क्वार्टर्स ला जायला निघाले तेव्हा रस्त्यात ट्रॅफिक जॅम आणि अपघातही व्हायला सुरु झाले होते. पोचायला साडेचार होऊन गेले.
फेब्रुवारी पाचच्या 'सुपर ट्युसडे' प्रायमरी नंतरच हिलरीच्या नॉमिनेशन वर शिक्कामोर्तब होऊन जाईल असं आपलं माझं (आशावादी) मत होतं पण तसं काही झालं नाही आणि एरवी formality म्हणून पाहिलं गेलं असतं त्या आमच्या भागातल्या प्रायमरीजना एकदम महत्व आलं. पण इथे ती जिंकण्याची शक्यता कमीच होती.
तिथे पोचल्यावर ज्या रुम मध्ये पाठवलं तिथे बाकी volunteers हे फोनाफोनीचं काम करत होते. एक जण आली आणि मला script दिलं. फोन सुरु करुन दिला. तो फोन automatic नम्बर्स डायल करुन दुसर्या बाजूने उचलला गेला किंवा answering machine वर गेला की एक ठराविक आवाज करायचा, तो आवाज आला की ते script वाचायला सुरवात करायची अशी माहिती तिने दिली. (आणि always be polite असं तिथं लिहिलं होतं. :))
"Hi, my name is .... and I am a volunteer calling on behalf of Hillary Clinton's campaign... "
मग पुढे आजच्या इलेक्शन ची आठवण करुन देणे, मग संध्याकाळची वेळ असल्यामुळं already मतदान केलंय का हे विचारणं, नसेल तर करायला सांगणं आणि "Can Hillary count on you to cast your ballot today?" yaa प्रश्नाच्या उत्तरावर पुढे काय बोलायचं ते ठरवणं. मतदान केलेलं असेल तर "कोणाला मत दिलं हे सांगू शकाल का?" असा पुढचा प्रश्न. कॉल च्या शेवटी रिझल्ट्सची लिस्ट होती. म्हणजे-
१. हिलरीला already मत दिले असेल तर press 1
२. हिलरीला सपोर्ट आहे पण अजून मतदान केलेले नाही. press 2
३. ओबामाला मत दिले. press 3
४. Refusal, early hang up or Republican - press 5
इत्यादी.
पहिले काही कॉल्स ते स्क्रिप्ट अगदी काटेकोरपणे वाचण्यात गेले. मग सवय झाली.
"Hi, I am...... Did you get a chance to vote today?"
"Yes, I did." (उत्साही आवाज) "घरात आम्ही ३ वोटर्स आहोत, सर्वांनी हिलरीला मत दिले!"
"Great! Thanks, Thank you for your time and support."
----
"Hi, I am... did you vote today?"
"Who is this? And what did you ask? Did I 'work' today??
"No mam, vote, v o t e."
"Oh, I am not interested in those kind of things!" (क्लिक!)
"(huh?)"
----
"Hi, I am.. calling on behalf of Hillary Clinton's campaign..."
"Oh, यू फर्गेट अबाउट इट गर्ल, आय डोंट लायक(like) हर"
हेवी ऍक्सेन्ट मधला हा स्त्री चा आवाज. हा कॉल नक्की कुठे टाकावा मला कळले नाही, म्हणजे 'refusal, early hang up' की 'voted for Obama'? पण तसे स्पष्ट न सांगितल्यामुळे 'refusal, early hang up' मध्ये टाकला. रिफ्यूजल काय किंवा 'ओबामाला मत दिले' काय, दोन्ही रिझल्टसचा अर्थ शेवटी एकच होतो, 'हिलरीला मत नाही'. आता ते रिझल्टस interpret करणारे आणि त्यातून आडाखे बांधणारेही तसाच अर्थ लावत असावेत म्हणजे झालं.
---
"Hi, I am calling on behalf of... "
"I do support her, but I am not going to vote today."
"The polls close at 7PM, we still have an hour."
"And voting is the only way you can ensure your voice is heard" (हे अर्थातच स्क्रिप्ट मधले वाक्य.)
"No... the polling center is kind of far. But I support her.."
---
नंतर नंतर 'early hang up' चे प्रमाण वाढले होते. माझ्या शेजारचा मात्र छानपैकी बोलत होता सगळ्यांशी. त्याला म्हटलं, तुला सगळे हिलरीला मत दिलेले भेटतायत की काय? तर तो म्हणाला असं काही नाही. सगळे प्रकार भेटतायत. आत्ताच मी एकाशी बोललो, he was mean!
व्हर्जिनिया मधले मतदान ७ ला बंद होणार होते, मग साडेसहा पासून मी Maryland मधले फोन करायला सुरवात केली. तिथे साडेनऊ पर्यंत मतदान होणार होते. वरच्याप्रमाणेच काही नमुने तिथेही भेटले. जे भेटले ते सगळेच नमुने होते असं नाही, सपोर्ट असला नसला तरी स्पष्टपणे सांगणारे, शुभेच्छा देणारेही बरेच भेटले.
७ नंतर कधीतरी निघावं म्हणून मी फोन बंद केला. बाहेर हवामान खूप खराब झाले होते तरी ऑफिसचे काम संपवून तिथे काम करायला येणारे येतच होते. काही लोक सर्वांसाठी अन्नपदार्थ, पाणी घेऊन येत होते. वेगवेगळ्या वयाचे, रंगाचे, वंशाचे सगळे आपपला खारीचा वाटा उचलत होते. . मी पुन्हा येण्याचं आश्वासन देऊन निघाले.
Icy रोड वरुन जपून पावलं टाकत शेजरच्याच गल्लीत पार्क केलेल्या गाडीपर्यन्त गेल्यावर काचेवर जमलेला आईसचा थर काढून वाईट हवामानात आणि रस्त्यात अपघातांमुळे झालेल्या ट्रॅफिक जॅममुळे घरी पोचायला २ तास लागले. वाटेतच रेडिओवर निवडणुकीचा अपेक्षित निकाल ऐकायला मिळाला. पण लढाई अजून संपलेली नाही...
मतदान
लालू छान आहे लेख. मी सध्या रहात असलेल्या जर्मनीतल्या ब्रौन्स्च्वेइग या परिसरात ३ फेब्रुवारीला निवडणुका झाल्या. परंतु भारतासारखे वातावरण नव्हते तसेच भाषेचा प्रश्न तेव्हा मला तरी काही समजले नाही व मीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तुमच्या calling on behalf of... मुळे थोडीफार कल्पना आली.
इथे आहेस होय..
चांगला उपक्रम आहे. उमेदवार चांगला आहे असं म्हणणार नाही मी.. पण उपक्रम चांगला आहे....
(खरंतर याही वर्षी 'मत कोणाला द्यावं' हे कळू नये एवढा गोंधळ आहे... )
'परदेसाई' विनय देसाई
येह क्या मासला है दोस्तो
ओबामा ६०% delegates जिंकणार पण हिलरी super delegates च्या जोरावर nomination घेऊन जाणार.
तसे नाही..
तसं नाही होणार. पण दोघेही कुठपर्यन्त फाईट चालू ठेवतील त्यावर अवलंबून आहे. मला वाटतंय. Hawaaii, Wisconsin,Texas, Ohio, Rhode Island, PA झाले की त्यानंतर जो कोणी मागे असेल त्या candidate ने माघार घ्यावी. तू म्हणतोयस तसं झालं तर ते लोकमताच्या विरुद्ध गेल्यासारखे होईल. ४ मार्च नंतर ठरेल असं वाटतंय.
-लालू
किशोर..
खरं आहे. इथे आपल्यासारखी रणधुमाळी नसते. इथे सध्या बरेच वारे आहे तरी कोणाला त्यात स्वारस्य नसेल तर अगदीच काही माहिती नसते. भारतात तसे होत नाही. सगळ्या बाजूनी अंगावर येतात निवडणुका. लोक इन्टरेस्टही घेतात असं वाटतं.
-लालू
लेख आवडला!
लालु,
छान लिहलयलस. एकंदर काहि नमुने सगळिकडेच उपलब्ध असतात म्हणायचे! हिलरि ओबामा मध्ये तु हिलरिलाच पाठिंबा द्यायचा निर्णय का घेतलास त्याबद्दल पण लिहि ना. देसाइ काकांनि म्हंटल्याप्रमाणे नक्कि कोण योग्य उमेदवार आहे याबद्दल मलाहि संभ्रम आहे.
ताई माई अक्का...
"ताई माई अक्का,
विचार करा पक्का,
ओबामा ला द्या धक्का,
आणि हिलरी वर मारा शिक्का!!!"
अशा काही घोषणा देतात का तिकडे?
बाकी तू एकदम "धडाडीची कार्यकर्ती " झाली आहेस वाटतं. छान आहे अनुभव!