१. अनुस्वार :
नियम १ : स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.
उदाहरणार्थ - गुलकंद, चिंच, तंटा, निबंध, आंबा
तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्पाने पर-सवर्ण लिहिण्यास हरकत नाही.
नियम २ : य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणार्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा.
उदा - सिंह, संयम, मांस.
नियम ३ : नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.
उदा. - लोकांना, मुलांनी, तुम्हांस, आम्हांला, लोकांसमोर, घरांपुढे.
नियम ४ : वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे अनुस्वार देऊ नयेत.
२. र्हस्व-दीर्घ :
नियम ५ : मराठीतील तत्सम इकारान्त आणि उकारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत. उदा. कवी, मती, गती, गुरू. इतर शब्दांच्या अंती येणारा इकार व उकार दीर्घ लिहावा.
उदा. पाटी, जादू, पैलू, विनंती, ही (शब्दयोगी अव्यय).
अपवाद : आणि, नि.
स्पष्टीकरण : परंतु, यथामति, तथापि, इत्यादी तत्सम अव्यये र्हस्वान्त लिहावीत. तसेच सामासिक शब्दांतही तत्सम (र्हस्व) इकारान्त व उकारान्त शब्द पूर्वपदी असताना र्हस्वान्तच लिहावेत.
उदा. - बुद्धिवैभव, कविमन, गतिशील.
व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे र्हस्वान्त तत्सम शब्द मराठीत दीर्घान्त लिहावेत.
उदा. - हरी, भवभूती, मनुस्मृती इ.
मराठी शब्दकोशात मात्र तत्सम (र्हस्व) इकारान्त व उकारान्त शब्द र्हस्वान्त लिहिणे इष्ट ठरेल. जसे - पद्धति, प्रतिकृति, अणु, वायु, हेतु, वगैरे. परंतु असे शब्द कोशाबाहेर वापरताना दीर्घान्त लिहिले पाहिजेत.
नियम ६ : (दीर्घ) ईकारान्त व ऊकारान्त शब्दांतील उपान्त्य इकार व उकार र्हस्व लिहावेत. उदा. - गरिबी, माहिती, हुतुतू.
अपवाद - नीती, भीती, रीती, कीर्ती, उत्यादी दीर्घान्त झालेले तत्सम शब्द.
नियम ७ : अकारान्त शब्दांचे उपान्त्य इकार व उकार दीर्घ लिहावेत.
उदा. - गरीब, वकील, वीट, सून, वसूल.
अपवाद - र्हस्वोपान्त्य अकारान्त तत्सम शब्द.
उदा. - गुण, विष, मधुर, प्रचुर.
नियम ८ : उपान्त्य दीर्घ ई - ऊ असलेल्या शब्दांचा उपान्त्य ईकार-ऊकार उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी र्हस्व लिहावा.
उदा. - गरिबास, वकिलांना, सुनेला, नागपुरास.
अपवाद : दीर्घोपान्त्य तत्सम शब्द.
उदा. - शरीरात, गीतेत, सूत्रास, जीवास.
इतर काही विशेष :
शब्दाचे उपान्त्य अक्षर 'ई' किंवा 'ऊ' असेल तर सामान्यरूपात 'ई'च्या जागी 'य' येतो किंवा 'ऊ'च्या जागी 'व' येतो.
उदा. - फाईल - फायलीत, काईल - कायलीत, देऊळ - देवळात, पाऊस - पावसात
पुल्लिंगी शब्दांच्या शेवटी 'सा' असल्यास सामान्यरूपाच्या वेळी 'शा' होतो. ('श्या' होत नाही.)
उदा. - पैसा - पैशाचा, घसा - घशाचा, ससा - सशाचा.
पुल्लिंगी शब्दांच्या शेवटी असलेला 'जा' सामान्यरूपात तसाच राहतो, त्याचा 'ज्या' होत नाही.
उदा. - मांजा - मांजाने, गांजा - गांजाचे, सांजा - सांजाची
मधल्या अक्षरातील 'क' किंवा 'प'चे द्वित्व सामान्यरूपाच्या वेळी निघून जाते.
उदा. - रक्कम - रकमेचा, तिप्पट - तिपटीने.
मधल्या 'म'पूर्वीचे अनुस्वारसहित अक्षर अनुस्वारविरहित होते.
उदा. - अंमल - अमलात, किंमत - किमतीचा, गंमत - गमतीने, हिंमत - हिमतीने.
ऊकारान्त विशेषनामाचे सामान्यरूप होत नाही.
उदा. - गणू - गणूस, शकू - शकूस
धातूला 'ऊ' किंवा 'ऊन' प्रत्यय लावताना धातूच्या शेवटी 'व' असेल तरच सामान्यरूपात 'वू' किंवा 'वून' होईल.
उदा. - चाव - चावू - चावून, लाव - लावू - लावून.
पण मूळ धातू एकाक्षरी असेल तर फक्त 'ऊन' प्रत्यय लागतो.
उदा. - खा - खाऊ - खाऊन, गा - गाऊ - गाऊन, पी - पिऊ - पिऊन, धू - धुऊ - धुऊन.
किरकोळ :
नियम ९ : 'पूर' हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्रामनामास लावताना दीर्घोपान्त्य लिहावा.
उदा. -नागपूर, तारापूर.
नियम १० : 'कोणता', 'एखादा' ही रूपे लिहावीत. 'कोणचा', 'एकादा' ही रूपे लिहू नयेत.
नियम ११ : हळूहळू, मुळूमुळू, खुटूखुटू या शब्दांतील दुसरा स्वर व चौथा स्वर दीर्घ लिहावा.
वरील शब्दांप्रमाणेच तसूतसू, झुंजूमुंजू, चिरीमिरी यांसारख्या पुनरुक्त शब्दांतील ऊकार व ईकार मूळ घटक शब्दांमध्ये ते दीर्घ असल्याने दीर्घ लिहावेत. परंतु पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील तर ते उच्चाराप्रमाणे र्हस्व लिहावेत. उदा. - लुटुलुटु, दुडुदुडु, रुणुझुणु.
नियम १२ : एकारान्त नामाचे सामान्यरूप याकारान्त करावे. उदा. - करण्यासाठी, फडक्यांना, देशपांड्यांचे, पाहण्याला.
अशा रूपांऐवजी करणेसाठी, फडकेंना, देशपांडेंचे, पाहणेला यांसारखी एकारान्त सामान्यरूपे करू नयेत.यांचेकडे, कळवणेसाठी, करणेबाबत अशी रूपेही वापरू नयेत.
नियम १३ : लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते. त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चारांप्रमाणे असावे. अन्य प्रसंगी तसे लिहू नये.
नियम १४ : क्वचित्, कदाचित्, अर्थात्, अकस्मात्, विद्वान् , इत्यादी मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द अकारान्त लिहावेत.
कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे.
इंग्रजी शब्द, पदव्या किंवा त्यांचे संक्षेप यांच्या शेवटचे अकारान्त अक्षर व्यंजनान्त (म्हणजेच पायमोडके) लिहू नये.
उदा. - वॉटसन, बायरन, पीएच. डी., इत्यादी.
नियम १५ : केशवसूतपूर्वकालीन पद्य व विष्णुशास्त्री चिपळूणकरपूर्वकालीन गद्य यांतील उतारे छापताना ते मुळानुसार छापावेत. तदनंतरचे (केशवसुत व चिपळूणकर यांच्या लेखनासह) लेखन मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखनविषयक नियमांस अनुसरून छापावे.
नियम १६ : राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे वापरावीत. रहाणे - राहाणे, पहाणे - पाहाणे अशी रूपे वापरू नयेत. आज्ञार्थी प्रयोग करताना 'राहा, पाहा, वाहा' यांजबरोबरच 'रहा, पहा, वहा' ही रूपे वापरण्यास हरकत नाही.
नियम १७ : 'इत्यादी' व 'ही' (अव्यय) हे शब्द दीर्घान्त लिहावेत. 'अन्' हा शब्द व्यंजनान्त लिहावा. 'इत्यादी' हे अव्यय नसून विशेषण आहे. त्यामुळे ते दीर्घान्त लिहावे.
नियम १८ : पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना र्हस्वदीर्घाच्या बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यास कवीला तेवढ्यापुरते स्वातंत्र्य असावे.
चिनूक्स, धन्यवाद - माझ्या
चिनूक्स, धन्यवाद - माझ्या लेखनाची शुद्धता करायची थोडी शक्यता निर्माण झाली आहे.
या लेखाची गरज आहेच. वादच
या लेखाची गरज आहेच. वादच नाही. धन्यवाद चिनुक्स
शरद
हे नियम कुठून घेतले? नियम ६:
हे नियम कुठून घेतले? नियम ६: लहानपणापासून कीर्ति, नीति हे शब्द वापरत आलोय. आत्ताच कुठून हा बदल झाला? जरा परत नियम ६ पाहशील का?
शरद, नियम ६ मध्ये कीर्ती,
शरद,
नियम ६ मध्ये कीर्ती, नीती हे शब्द अपवाद आहेत असा उल्लेख आहे.
धन्यवाद अमितव. आता लक्षात
धन्यवाद अमितव. आता लक्षात आले.
आयला
आयला चिनुक्स![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आमच्यासारख्यांच्या दांड्या गुल
बघू प्रयत्न करून बघतो
जम्या तो जम्या
चिनूक्स हे खुपचं छान आहे!
चिनूक्स
)
हे खुपचं छान आहे! संपुर्ण मराठी व्याकरणासाठी एखादे पुस्तक सुचवू शकाल का?
(ह्या वाक्यांत काही चुक असेल तर ते ही सांगा
मस्त धागा. 'ज/ज्य', 'च/च्य'
मस्त धागा.
'ज/ज्य', 'च/च्य' वापरायचे नियम माहीत आहेत का? वर एक दिसला.... मांजा, सांजा वगैरे पण अजुन काही आहेत का? मुलीला शिकवत आहे तिला कसे शिकवावेत त्यातले फरक?
'ष' चा पण कुठेतरी वाचला होता तो इथे दिसत नाहिये. कोणाला आठवतोय का?
अतिशय उपयुक्त
अतिशय उपयुक्त माहिती.
'लिहिल्या गेले', 'म्हटल्या गेले', असे लिहिले जाते. हे बरोबर आहे का ?
मला मराठीचे transliteration
मला मराठीचे transliteration rules हवे आहेत. (म्हणजे मराठी शब्द/वाक्य इंग्रजी स्पेलिंगमध्ये लिहिणे) कुठल्या पुस्तकात असतील कुणी सांगू शकेल का?
मराठीसाठी वेगळे नियम नाहीत.
मराठीसाठी वेगळे नियम नाहीत. इंग्रजी भाषेतील उच्चारांबरहुकूम देवनागरीत लिहिणं अपेक्षित आहे.
@वर्षा १) देवनागरी
@वर्षा
१) देवनागरी ट्रान्सलिटरेशनच्या अनेक नियमावल्या आहेत. प्रत्येक नियमावलीत वेगळे नियम आहेत.
उदा: IAST, ISO 15919, Harvard Kyoto (ITRANS), Velthuis, SLP1, NLP Panini, vedatype.,
२) त्यातल्या सगळ्या नियमावल्या मराठीला लागू पडतात. पण एक नियमावली निवडली तर आपोआप ती दुसर्यात रुपांतरीत होत नाही. नियम वेगळे आहेत.
मायबोलीवर वापरलेली लिप्यंतराची (Transliteration) पद्धत ही ITRANS Transliteration म्हणून ओळखली जाते. ही मूळ Harvard - Kyoto या लिप्यंतर पद्धतीचे Extension म्हणून ओळखली जाते. या पद्धतीचे नियम हवे असतील तर खाली प्रतिसादासाठी असलेल्या खिडकीच्या वर एक प्रश्नचिन्ह आहे त्यावर टिचकी मारा.
3) वेबवर वापरली जाणारी बहुतेक सगळी लिप्यंतर साधने ITRANS शी निगडीत आहेत. त्यातही थोडेफार फरक आहेत. उदा. Google India, Microsoft IME, Baraha, Maayboli etc पण ही साधने ९९% सारखी आहेत (एकमेकांबरोबर). यात मुख्यत्वे करून पोट्फोड्या र (र्) कसा लिहायचा यात फरक होऊ शकतो. इतर काही फार वापरात नसणारी मूळाक्षरे उदा. ङ , ञ , ॡ वेगळी असू शकतात तेवढे तपासावे लागते.
४) नियमावली मराठीला लागू पडली तरी संस्कृतला लागू पडेल असेलच नाही. जुन्या संस्कृतमधे अनुस्वार दहा प्रकाराने देता येतो (हो ते दहाही प्रकार युनीकोडमधे आहेत) पण सगळ्याच लिप्यंतर पद्धतीत हे शक्य नाही.
आधुनिक मराठीचे/मराठीत लिप्यंतर करायचे असेल तर वर ३) मधे उल्लेख केलेली कुठलीही साधने चालतील. जुन्या मराठीबद्दल लेखन असेल तर कुठली लिप्यंतर नियमावली वापरायचे ते विचारलेले योग्य होईल.
अधिक माहितीसाठी
http://en.wikipedia.org/wiki/Devanagari_transliteration
@चिनूक्स
देवनागरीतला एकच उच्चार इंग्रजीत वेगवेगळ्या पद्धतीने लिहता येतो. भाषा रसिकांना चालले तरी भाषा शास्त्रज्ञांना हे इतके स्वातंत्र्य चालत नाही.
मराठीसाठी वेगळे नियम नसले तरी देवनागरीसाठी भरपूर वेगवेगळे नियम आहेत.
धन्यवाद अजय! हा चार्ट
धन्यवाद अजय!
हा चार्ट पाहिला.
मराठी शिकू इच्छिणार्या अमराठी/परदेशी लोकांसाठी असलेल्या बेसिक धड्यांच्या संदर्भात काम चालू आहे.
तर त्या छोट्या/सोप्या वाक्यांचं लिप्यंतर हवं आहे जेणेकरुन देवनागरी स्क्रीप्ट येत नसतानाही हे इ<ग्रजी लिप्यंतर (ध्वनिमुद्रित उच्चारांसकट - ते ऐकण्याची सोय दिलेली असेल) वाचून एखादा माणूस ते मराठी शब्द वाचू शकेल.
म्हणून यात या ट्रान्सलिटरेशनचा मराठी टाइप करणे हा हेतू अजिबातच नाही तर फक्त मराठी वाचता येऊ शकणे हाच आहे.
तर म्हणून आता मला एंड युझरच्या दृष्टीने सोपं काय वाटेल असा प्रश्न पडलाय. म्हणजे उदा. आजही मला 'मिंग्लीश' मध्ये टाइप करायचं असेल तर मी हे रुल्स न वापरता करते. मला या रुल्ससकट लिहिलेलं मिंग्लिश वाचणं जास्त त्रासदायक वाटतं.
उदा. आपण कुठे आहोत?
मी पटकन असं लिहिते: Aapan kuthe ahot?
आणि असं नाही!: AapaNa kuThe Aahota?
आपल्याला काय वाटतं?
Aapan kuthe ahot? हे आपल्याला
Aapan kuthe ahot? हे आपल्याला लिहायला सोपं वाटतं कारण आपल्याला संदर्भावरून "n" उच्चार कधी न तर कधी ण होणार हे माहिती असतं. पण ज्याला भाषा माहिती नसेल त्याला तो कसा कळणार.
या बाबतीत तुम्ही सोपा वाटेल तो कुठलाही नियम वापरायला हरकत नाही पण जो वापराल तो सगळ्या धड्यांमधे तोच ठेवा (Consistency)
या नियमाबद्दल एखादा
या नियमाबद्दल एखादा यु-ट्युबवर व्हिडीओ आहे का? विशेषतः उच्चारांसाठी.
लिहिल्या गेले', 'म्हटल्या
लिहिल्या गेले', 'म्हटल्या गेले', असे लिहिले जाते. हे बरोबर आहे का ?
>>>
नाही. हे टिपिकल खानदेशी आणि वैदर्भीय उच्चारण आहे आहे. दुर्दैवाने ते तसेच लिहितात अगदी माध्यमात देखील. लोक्मत याबाबत कुप्रसिद्दह आहे.
सुंदर धागा!
सुंदर धागा!
मजकुरात बरोबर की मजकूरात
मजकुरात बरोबर की मजकूरात बरोबर?
मजकूर - मजकुरात
मजकूर - मजकुरात
धन्यवाद चिनूक्स. मग
धन्यवाद चिनूक्स.
मग सामान्यरूप - सामान्यरुपात असे हवे ना?
नियम 8 प्रमाणे.
नियम 8 प्रमाणे.
नाही. 'रूप' हा शब्द
नाही. 'रूप' हा शब्द संस्कृतातून आला आहे. त्यामुळे रूपात, स्वरूपात अशीच रूपं होतात.
धन्यवाद, चिनूक्स.
धन्यवाद, चिनूक्स.
चिन्मय मला एक माहिती ह्वी
चिन्मय
मला एक माहिती ह्वी होती.
खालील पैकी कोणता शब्द बरोबर आहे? कृपया सांगाल का? धन्यवाद.
नाविण्य का नाविन्य
प्रिया
नावीन्य
नावीन्य
धन्यवाद चिन्मय. प्रिया
धन्यवाद चिन्मय.
प्रिया
सर्व जुन्यानवीन मेंबरांनी लाभ
सर्व जुन्यानवीन मेंबरांनी लाभ घ्यावा.
नियम ६ : (दीर्घ) ईकारान्त व
नियम ६ : (दीर्घ) ईकारान्त व ऊकारान्त शब्दांतील उपान्त्य इकार व उकार र्हस्व लिहावेत. उदा. - गरिबी, माहिती, हुतुतू.
अपवाद - नीती, भीती, रीती, कीर्ती, उत्यादी दीर्घान्त झालेले तत्सम शब्द.
या नुसार मान वेळावूनी बरोबर की मान वेळावुनी ? पूर्वी बरोबर की पुर्वी?
मूर्ती - अनेकवचन 'मूर्ती'च
मूर्ती - अनेकवचन 'मूर्ती'च होते मूर्त्या नाही. तसेच 'नियमावली'चे सुद्धा आहे का?
शत जन्म शोधिताना | शत आर्ति
शत जन्म शोधिताना | शत आर्ति व्यर्थ झाल्या |
शत सूर्य मालिकांच्या | दीपावली विझाल्या ||
या नुसार दीपावली च अनेकवचन दीपावली होत असेल तर नियमावली चं अनेकवचन सुद्धा नियमावली व्हायला हवं
Pages