१९४९ साली बाबांनी आनंदवनाची स्थापना केली. आज आनंदवनात उपचार सुरू असलेले व बरे झालेले ३००० कुष्ठरुग्ण व २००० अपंग, मूकबधिर, अंध व आदिवासी राहतात. मूकबधिर, अंध यांसाठी निवासी शाळा, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, रुग्णालयं, कृत्रिम अवयव केंद्र आनंदवनात आहेत. आनंदवनातला प्रत्येकजण स्वत: श्रम करून आपली उपजीविका करतो. आनंदवनात पॉवरलुम्स, छापखाने आहेत. सुतारकाम, फॅब्रिकेशन, हस्तव्यवसाय यांत पारंगत असलेले अनेकजण इथे कपडे, स्टेशनरी, कपाटं तयार करतात. मीठ, साखर, अमृत अशा काही गोष्टी सोडता बहुतेक सर्व वस्तू आनंदवनातच निर्माण केल्या जातात. आनंदवनातली प्रत्येक इमारत तिथल्या रहिवाशांनीच बांधली आहे. आनंदवनात राहणारा प्रत्येकजण अशाप्रकारे स्वयंपूर्ण आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांत महारोगी सेवा समितीचे पाच प्रकल्प आणि असंख्य सॅटेलाईट प्रोजेक्ट्स आहेत.
यावर्षी आनंदवनात सरासरीच्या केवळ १५% पाऊस झाला आहे. त्यामुळे आनंदवन आणि सोमनाथ येथील परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. ९०% खरीप पिकं नष्ट झाली आहेत. बियाणे, खतं यांवर केलेला २७ लाख रुपयांचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे सुमारे १ कोटी रुपयांचं नुकसान यंदा होणार आहे. आनंदवनात १३० एकर जागेत व सोमनाथला ६० एकर जागेत सोयाबीनची पेरणी केली होती. १२०० क्विंटलचे उत्पादन यावर्षी अपेक्षित होते. त्याऐवजी केवळ ३०० क्विंटलचे उत्पादन हाती येईल. असा अंदाज आहे. अपुर्या पावसामुळे फलोत्पादन, मत्स्योत्पादन, दुग्धव्यवसाय या सार्यांवर विपरित परिणाम झाला आहे. रब्बी पिकांची स्थितीही फारशी उत्साहवर्धक नाही.
परिणामी आनंदवनातील पाच हजार रहिवाशांसाठी बाजारातून अन्नधान्य विकत घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. महारोगी सेवा समिती ही धर्मादाय संस्था असल्यानं शासनाकडून शेतकर्यांना मिळणारी मदत आनंदवनातल्या रहिवाशांना मिळू शकत नाही. रेशनवर होणारा धान्यपुरवठाही अपुरा आहे. गेल्या चार महिन्यात केवळ १०% धान्यपुरवठा झाला आहे. शासनाकडून केवळ १२०० कुष्ठरुग्णांसाठी प्रतिमहिना ४६५ रुपये याप्रमाणे निधी मिळतो. प्रत्यक्षात आनंदवनात ५००० कुष्ठरुग्ण व अपंग व्यक्ती राहतात. वाढती महागाई व अपुरा पाऊस यांमुळे धान्य, औषधं यांसाठी होणार्या खर्चाची तजवीज कशी करायची, हा एक मोठा प्रश्न आहे.
सुमारे २ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च यावर्षी करावा लागणार आहे. आनंदवनातील रहिवासी या संकटाचा सामना धैर्याने करतीलच. पण त्यांना आपल्या मदतीची व पाठिंब्याची गरज आहे.
आनंदवनासाठी आपल्याला देणगी द्यायची असल्यास आपले धनादेश ’Maharogi Sewa Samiti, Warora' या नावाने पाठवावेत. सोबत आपले संपूर्ण नाव, पत्ता आणि PAN यांचा उल्लेख कृपया करावा.
परदेशातून पैसे ऑनलाईन पाठवण्यासाठी -
Account number: 048010100301343
Beneficiary Account Name - Maharogi Sewa Samiti, Warora
Beneficiary Address -
Maharogi Sewa Samiti, Warora
At & Post ANANDWAN - 442 914
Via Warora, Dist. Chandrapur,
Maharashtra State
Pin: 442 914
Phone: 07176 - 282034, 282425
Fax: 07176 - 282134
Beneficiary Bank Name: Axis Bank Limited
Beneficiary Bank Address:
M. G. House, Rabindranath Tagore Road,
Besides Board Office, Civil Lines,
Nagpur - 440 001
Maharashtra State,
India
Phone No.: +91-712-2555647 / 2601699
Beneficiary Bank Swift Code: AXISINBB048
भारतातून पैसे पाठवण्यासाठी -
Domestic contribution can be sent through NEFT / RTGS to our Savings Bank A/c with
Axis Bank Limited, Nagpur.
* Account Name: Maharogi Sewa Samiti, Warora
* Savings Bank Account Number: 048010100297165
* Bank Name: Axis Bank Limited
* Bank Address: M. G. House, Rabindranath Tagore
Road, Besides Board Office, Civil Lines,
Nagpur - 440 001
Maharashtra, (India)
Phone Nos. +91-712-2555647
+91-712-2601699
* MICR Code: 440211002
* IFSC CODE: UTIB0000048
अधिक माहितीसाठी -
Maharogi Sewa Samiti, Warora
At & Post ANANDWAN - 442 914
Via Warora, Dist. Chandrapur,
Maharashtra State
Pin: 442 914
Phone: 07176 - 282034, 282425
Fax: 07176 - 282134
e-mail: anandwan@gmail.com
लेखाची लिंक इथल्या मराठी
लेखाची लिंक इथल्या मराठी मंडळाच्या अध्यक्षांना पाठवते आहे. ते सद्स्यांना फॉरवर्ड करतील. आवाहन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करण्यासाठी ह्या लेखाचं इंग्रजीत भाषांतर व्हावं.
मला जर चेक पाठवायचा असेल तर
मला जर चेक पाठवायचा असेल तर वर दिलेल्या पत्त्यावर private कुरियर जात का ?
माहीती करिता धन्यवाद Axis
माहीती करिता धन्यवाद Axis बँकेच्या कोणत्याही शाखेत पैसे डिपॉझिट करता येतील का वरिल A/C No. स्लिप वर भरुन?
prajaktakv, आपण कुरियरद्वारे
prajaktakv,
आपण कुरियरद्वारे चेक पाठवू शकता.
कविता,
वर मी भारतातून पैसे पाठवण्यासाठीची माहिती दिली आहे. ती वापरून आपण पैसे पाठवू शकता. Axis बँकेच्या कोणत्याही शाखेत आपल्याला पैसे भरता येतील.
मृशी मी अगदी सहमत आहे.
मृशी मी अगदी सहमत आहे. ईंग्रजीत पण एक प्रत हवी या आवाहनाची.
चिन्मय, जमेल तशी मदत करेन.
मला ईन्गर्जी मधे मिळेल का हा
मला ईन्गर्जी मधे मिळेल का हा मेल? मराठीतेर मन्ड्ळीना पन पाठ्वेन.
चिनुक्स एक सुचना आहे. आनंदवना
चिनुक्स एक सुचना आहे. आनंदवना तर्फे एक मदतीसाठी आवाहन करणारे एक ऑफिशियल पत्र इथे टाकता येइल का? संस्थेचे नाव पत्ता असलेल्या ऑफिससाठी वापरतो तश्या कागदावर एक मराठीत आणि एक इंग्रजीत पत्र टाकले तर प्रिंट काढून इथे देवळात तसेच इंडियन ग्रोसरी स्टोअर्स मधे वगैरे लावता येइल. इथल्या इंडियन स्टुडंट असोशिशेनना पण आपापल्या युनिव्हर्सिटीत लावता येइल.
धन्यवाद चिनुक्स
धन्यवाद चिनुक्स
चिनूक्स, खूप आभार!
चिनूक्स, खूप आभार!
तसे पत्र तसेच हि देणगी
तसे पत्र तसेच हि देणगी आयकरातील वजावटीसाठी प्राप्त ठरत असेल तर ती माहिती द्यावी.