हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

"महाराष्ट्राच्या बाबतीतील दुटप्पीपणा स्पष्ट करणारे एक साधे उदाहरण घेऊ. उत्तरेकडून येणारा प्रत्येक राजकारणी महाराष्ट्रात आल्यावर ‘हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, म्हणून आपण हिंदी शिकायलाच पाहिजे, तिचा आदर करायलाच पाहिजे.’ इत्यादी (असत्य) पुन:पुन्हा घोकून दाखवतो. पण हेच राजकारणी इतर कुठल्याही अहिंदी राज्यात गेले की त्यांची ही सर्व तत्त्वे अचानक पालटतात. ही मंडळी तिथे जाऊन त्या राज्याच्या भाषेच्या व संस्कृतीच्या आरत्या म्हणतात; तसेच केंद्र सरकार, किंवा त्यांचा पक्ष (जो असेल तो) त्या राज्याच्या भाषिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी कशी आटोकाट मदत करतो आहे याचे रसभरीत वर्णन करतात. महाराष्ट्रात सर्व राष्ट्रीयीकृत बँका, केंद्र सरकारी विभाग, टपाल खाते, रेल्वे, सार्वजनिक क्षेत्रातील (सरकारी) कंपन्यांमध्ये कार्यालयांत येणाऱ्या सामान्यजनांनी वाचण्यासाठी सर्वत्र लावलेल्या पाटय़ा, सर्व फॉर्म व सूचना-फलक मराठीला डच्चू देऊन हिंदीत व इंग्रजीत असतात. पण इतर राज्यांत याच विविध संस्था स्थानिक राज्यभाषेलाच सर्वाधिक महत्त्व देतात. बऱ्याच वेळा हिंदीलाच डच्चू दिला जातो. हा दुटप्पीपणा का म्हणून? कायद्याने नेमून दिलेले आणि इतर राज्यभाषांना दिले जाणारे सर्व कायदेशीर अधिकार, मान, महत्त्व आमच्या मराठी भाषेला द्यायलाच पाहिजेत-त्याहून जास्त नको; पण किंचितही कमी नको. हे आमचं म्हणणं अयोग्य, बेकायदेशीर, अनैतिक म्हणता येईल का?"

अमृतमंथन अनुदिनीवर पूर्वी प्रकाशित झालेला हा लेख अधिक सविस्तर स्वरूपात लोकसत्तेमध्ये १५ नोव्हेंबर २००९ रोजी प्रसिद्ध झाला. त्यासाठी खालील दुवा पहा.

http://amrutmanthan.wordpress.com/2009/11/15/हिंदी-ही-राष्ट्रभाषा-एक-च/

विषय: 
प्रकार: 

आपणच परधार्जिणे आहोत त्याचा फायदा बाहेरचे लोक घेणारच ना. उदा: माझे २ गुजराती colleagues नेहमी गुजरातीतच बोलतात. पण माझी १ colleague मराठी असूनही hindi त बोलते. मी तीला सुधरव्नण्याचा खुप प्रयत्न केला पण ....... शेपूट वाकडच. Sad

ह्यावर भरपूर चर्चा झाली आहे. कुत्र्याची शेपटे वाकडे असल्यास ती सरळ होणार नाहीत. आता हा पुन्हा शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रकार होईल...

धन्यवाद अमृतयात्री! लोकसत्तेत त्यानंतरच्या लोकरंगात छापून आलेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया वाचल्या. त्यावरून हा विषय महत्त्वाचा असूनही आजवर (मराठीच्या न् महाराष्ट्राच्या हितशत्रूंनी) महाराष्ट्रात कसा दाबून ठेवला होता हे पुन्हा एकदा जाणवले.

पोटतिडकीने हा विषय लोकांपुढे मांडल्याबद्दल शतशः धन्यवाद! Happy

धन्यवाद, अमृतयात्री. लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही वाचल्या. अतिशय माहितीपूर्ण लेख आहे खरंच.

पोटतिडकीने हा विषय लोकांपुढे मांडल्याबद्दल शतशः धन्यवाद!
>> अक्षरशः अनुमोदन. माझाच अनुभव सांगतो. माझा एक मित्र त्याच्या एका मित्राचे "गंमतीशीर" किस्से म्हणून सांगायचा आणि आम्ही 'काय वेडा आहे हा' अशा आविर्भावात हसायचो. हा त्याचा मित्र खरेदीला गेला आणि तिथे कोणी हिंदी बोललं तर त्यांना मराठी बोलायची विनंती करायचा. मराठी येत नाही असे कोणी म्हणाले तर हा सरळ दुकानातून चालता व्हायचा आणि दुसर्‍या दुकानात जायचा. तिथेही तोच प्रकार करायचा.

तेव्हा मराठी-हिंदी असा काही प्रकार आहे हे कळलेसुध्दा नव्हते. पुढे मग शिकायला परदेशात आल्यावर थोडेफार जाणवले की लोक मराठी लोकांशीही मराठीत बोलत नाहीत. नंतर मायबोलीशी संबंध आला. इथेही थोडेसे असे जाणवले की मराठी लेख/कथा/ललित लिहितानाही लोक साध्या साध्या भावना व्यक्त करण्यासाठी इंग्रजीचा आधार घेतात.

मग मायबोलीवरच्या मराठी/हिंदी/इंग्रजी वरच्या चर्चा वाचल्या. बापू करंदीकरांनी वृत्तपत्रे आणि इतर माध्यमांमधील हिंदी/इंग्रजी चा गैरवापर ह्यावर दोनतीन लेख लिहिले आहेत. तुम्ही स्वतः मायबोलीवर आणि इतरत्र मराठी/हिंदी ह्या विषयावर लिहिलेले लेख वाचले. तेव्हा कुठे असे जाणवले की ही खरीच एक समस्या आहे आणि आपण स्वतः त्यासाठी जमेल तितके प्रयत्न केले पाहिजेत.

माझ्यासारख्या चांगल्या सुशिक्षित आणि चार देश फिरायची संधी लाभलेल्या माणसाला हे कळण्यासाठी एवढा वेळ लागला, तर बाकीच्यांना पटायला पुष्कळ वेळ लागणार (अर्थात सगळे माझ्याइतके गाढव नसतात हेही खरे). त्यामुळे शिळ्या कढीला उत आणण्याचा हा प्रकार जरी वाटत असला तरी असे कानीकपाळी ओरडल्याशिवाय त्याचं गांभीर्य लक्षात येणार नाही. तुम्ही केलेले अभ्यासपूर्ण लेखन खरंच कौतुकास्पद आहे. Happy

हांगास्सं.......... आणावं वर याला.... Wink

>>माझ्यासारख्या चांगल्या सुशिक्षित आणि चार देश फिरायची संधी लाभलेल्या माणसाला हे कळण्यासाठी एवढा वेळ लागला, तर बाकीच्यांना पटायला पुष्कळ वेळ लागणार (अर्थात सगळे माझ्याइतके गाढव नसतात हेही खरे). त्यामुळे शिळ्या कढीला उत आणण्याचा हा प्रकार जरी वाटत असला तरी असे कानीकपाळी ओरडल्याशिवाय त्याचं गांभीर्य लक्षात येणार नाही. तुम्ही केलेले अभ्यासपूर्ण लेखन खरंच कौतुकास्पद आहे. >>
अनुमोदन.

* हिंदीवर माझा बिल्कुल राग नाही. पण मराठीवर प्रेम आहेच्च!

पण,विविध भाषा असलेल्या आपल्या भारताची १ सामाईक भाषा हवीच्.

बॉलीवूडची भाषा बहुधा सर्व भारतात कळते. ती हिंदीहि नाही, उर्दूहि नाही, इंग्रजीहि नाही, मराठी किंवा इतर हि कुठली एक भाषा नाही. सर्वांचे कडबोळे. निदान बॉलीवूड मधे सर्व संवाद, गाणी यात तशी भाषा वापरतात. मग त्याच भाषेला भारतीय भाषा म्हंटले तर? भाषा शास्त्रज्ञ याचा विचार करतील का?

अशी भाषा कधी जुनी होणार नाही, तीत सतत नवीन शब्दांची भर पडून ती अधिकाधिक समृद्ध होईल. सर्वांना शिकायला पण सोपी. व्यवहारात पण प्रॅक्टिकल. निदान भारतात तरी.

त्या मित्राच्या मित्राच कौतुके Happy

झक्की..... इकडच्याच काय, कुठल्याही लोकान्ना फक्त पैशाची भाषा कळते, अन म्हणूनच मातृभाषेकडे दुर्लक्ष होते असे माझे मत!
पण म्हणून काय पैशाची भाषा सर्वदूर कळते तर तुम्ही माझ्याशीही "डॉलरमधे" बोलाल का? Wink
जसे की, लिम्ब्या मी तुझे कौतुक करतो हे घे शम्बर डॉलर.... नन्तर कधीतरी लिम्ब्या, मी तुझा अनुल्लेख करतो..... काढ सव्वाशे डॉलर! Biggrin