Submitted by हसरी on 12 November, 2009 - 00:08
दातांचा खुप त्रास होतो आहे कोणती ही ट्णक पदाथ खाता येत नाही (उदा.खारीक) शिवाय दोन वेळा ब्रश करुन दातांची व तोंडाची स्वच्छता राखुन हा त्रास होतो दंतवौदयांकडे जाउन काही उपयोग नाहि तसेच मिठ आणि लिंबु हा घरचा प्रयोग चालु आहे आणि मध्येच सगळया दातांतुन कळा येतात(थंड व गरम खात नाही) दांत कश्यामुंळे कळा मारतात कळत नाहि पण कधी (बदाम सारखा वस्तु पण खाता येत नाही ) खुप त्रास होतो आहे कोणि उपाय सुचवा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१) Dentist कडे जाऊन एकदा दात
१) Dentist कडे जाऊन एकदा दात स्वच्छ करुन घे.
२) आंबट, थंड, अति गरम आणि गोड पदार्थ खाऊ नकोस. चहा देखील फार गोड करू नकोस.
३) नास्ता आणि जेवणानंतर दात घासत जा. अगदी दुपारच्या जेवणानतर देखील.
४) जर कडूनिंबाच्या काडीचा ब्रश करता येत असेल तर तोही वापर. काडी नुसती चावायची त्यामुळे दाताला किड लागत नाही.
धन्यवाद bee दातांचा त्रास
धन्यवाद bee
दातांचा त्रास वाढल्यामुळे मी Dentist गेले होते त्यांनी दात साफ केले व किड्लेल्या दातामध्ये चांदि भरली पण माझा दात कळ मारण्याचा त्रास बंद झाला नाहि
मि गोड कमी खाते आणि चहा/कोफी पित नाही दुपारच्या जेवणानंतर दात घासन शक्य नाहि पण मि रात्रि घासते (झोपण्याअगोदर)
कडूनिंबाचा उपयोग करुन बघते
माझा २ वर्षाचा मुलगा आहे.
माझा २ वर्षाचा मुलगा आहे. त्याचे पुढचे दात थोडे काळसर झाले आहे.
मी त्याच्यासाठि कोलगेट्चा लहान मुलांचा ब्रश आणि पेस्ट आणली , पण तो ब्रश करत नाही, फक्त पेस्ट यला आवडते. मी त्याचे दात फिंगर ब्रशने घासते जबरदस्तीने. काही उपाय आहे का? की डेन्टीस्टकडे घेउन जाऊ
हसरी, आधि तुला नेमकं कारण
हसरी, आधि तुला नेमकं कारण जाणुन घ्यावं लागेल की दातात कळा नेमक्या कशामुळे येत आहेत....कधितरी दात घासण्याची पध्हत चुकिची असल्याने दातांवरचे इनॅमल वीक होते त्यामुळे पण अशा कळा जातत, डॉक ह्याबद्दल तुला काही म्हनाले का? इनॅमल्बद्दल?....मला तुझ्या बाबतीत तिच शक्याता वाटते आहे....आणि त्यासाठी काही सेन्सिटीव्हीटीच्या टुथ्पेस्ट मिळातात केमिस्ट ला विचारुन घे आणि त्यानेच दात घास....बघ फरक पदतो क ते....सेन्सोडाइन, सिन्क्य्विल ह्या काही टुथ्पेस्ट आहेत त्यासाठी.....जुई तु त्याला डेन्टीस्ट कडे घेउन जा....म्हण्जे नक्की काय ते कारण कळेल.....दात खुप जोरात घासत नाहिस न त्याचे?.....त्यानेच ईनॅमल वीक होतं दातांवरचं.
जुयी ,तुझ्या मुलाला काही
जुयी ,तुझ्या मुलाला काही आयर्न सप्लीमेन्ट्स चालू आहेत का?त्यामुळे दातान्चा रन्ग तपकीरी /काळपट होउ शकतो.
जाणकार खुलासा करतीलच, पण मला
जाणकार खुलासा करतीलच, पण मला अस वाटत की
१) दातात कळ मारते ती दरवेळेस दात किडलेत म्हणूनच नव्हे तर हिरड्या कमकुवत झाल्याने/हिरड्यातील इन्फेक्शन वगैरे मुळे देखिल कळ मारते. सॉफ्ट ब्रश वापरणे व बोटाने हिरड्यान्ना हळूवार मालिश करणे हे तत्कालिक उपाय सुचविता येतिल
२) त्रिफळाचूर्ण हिरड्यान्ना लावुन ठेवुन पन्धरावीस मिनिटान्नी कोमट पाण्याने चूळा भरणे हा दीर्घकालिक खात्रीशीर इलाज समजला जातो
३) बाळन्तपण वा तत्सम बाबीनन्तर आलेल्या अशक्तपणाचा परिणाम दातान्च्या ठिकाणीही दिसुन येतो असे ऐकण्यात आहे (आईकडून), याबाबत जाणकारान्कडूनच खुलासा हवा
४) आयुर्वेदीक डॉक्टरच्या सल्ल्याने "आहारातील" घटकातील बदल महत्वपूर्ण ठरतो. बाह्य स्वरुपात न जाणवणारी पण तरीही पचनक्रिया बिघडलेली असल्यास साईड इफेक्ट म्हणूनही दातान्वर परिणाम होऊ शकतो
५) घाईघाईत जेवणे, लाळ पूर्ण सुटू न देणे इत्यादी इतर कारणे आहेत
वरील बाबीन्चा विचार, जाणकार्/तज्ञान्च्या सल्ल्याने करावा!
लिंबू, त्रिफळा चुर्णाचा हा
लिंबू, त्रिफळा चुर्णाचा हा उपयोग माहिती नव्हता. धन्यवाद!
बी, आयुर्वेदात, विशिष्ट औषधी
बी, आयुर्वेदात, विशिष्ट औषधी वनस्पतीन्च्या लाकडाचा उगाळून लेप लावुन "ओढा" बसविणे हा प्रकार आहे, रक्तचन्दन त्यातिल प्रमुख एक लाकुड.
मात्र तोन्डात हिरड्यान्ना हा असा ओढा बसविणे त्रिफळाचूर्णाने शक्य होते
"ओढा" याचा अर्थ सम़जण्यास, फेशियल लेप मिळतात ते लावुन सुकवुन बघ चेहर्यावर, सुकत जाताना श्रिन्केजमुळे त्वचेला ओढ बसते, त्यास ओढा म्हणतात
त्यातिल औषधी द्रव्याचे परिणाम होत असतात ते वेगळेच
नॉर्मली मुक्या माराच्या सुजेवर हा प्रयोग हमखास करतात
उगाळलेली तुरटी व हळकुण्ड, तेलात परतुन तयार केलेल पातळसर मलमही मुक्यामारावर लावतात!
निरनिराळ्या वनस्पतिन्ची पाने व पिठे वापरुन केलेली "पोटीस" हा स्वतन्त्र विषय आहे
हे सर्व उपाय "गावठी" वा "देशी" म्हणून दुर्लक्षिले जात शहरी जीवनातून हद्दपार झाले असले तरी ग्रामिणभागात अजुनही सर्रास वापरले जातात
(शहरी जीवन अन ग्रामिण जीवनातील रुन्दावणारी दरी याबाबत स्वतन्त्र धागा सुरु करावा काय?)
असो
अर्थात याकरता जाणकारान्चा सल्ला घ्यावाच घ्यावा
त्याला सर्दि, खोकला सतत चालू
त्याला सर्दि, खोकला सतत चालू असतो.. आणि मग ताप देखील.
त्याच हिमोग्लोबीन , कॅल्शियम कमी आहे. म्हणून त्याला सध्या कॅल्शियमचे सिरप, बिकोझिंक चालू आहे.
हसरी, thermoseal नावाची
हसरी, thermoseal नावाची टूथपेस्ट मिळते संवेदन्शील दातांकरता, ती वपरुन बघ.
लिम्बु चान्गली माहिती
लिम्बु चान्गली माहिती दिलीत.
पुण्यासारख्या शहरात आयुर्वेदीक पद्धतीने बनवलेले दन्तमन्जन मिळते, माझ्या घरचे गेली ७-८ वर्षे वापरत आहेत, सगळ्या दाताच्या तक्रारी या दन्त्मन्जनच्या नियमित वापराने कमी झालेल्या आहेत. घरी टुथ्पेस्ट आणलीही जात नाही. ( हवी अस्ल्यास कुठे मिळते ती माहिती देईन.)
( हवी अस्ल्यास कुठे मिळते ती
( हवी अस्ल्यास कुठे मिळते ती माहिती देईन.) >>>>>>>> नक्की द्या .... पुन्यात मिळत असेल तर पत्ता पण द्या
मन्जिरी, पुण्यात वैद्य मनोज
मन्जिरी, पुण्यात वैद्य मनोज पत्की अप्रतिम दर्जाचे दन्तमन्जन तयार करतात. आम्ही गेले खुप वर्षे वापरतोय. अप्पा बळवन्त चौकात आहे दवाखाना त्यांचा. मी विचारपुशीत फोन नं टाकते.
.
.
वि़को खुपच चांगली आहे.
वि़को खुपच चांगली आहे. दंतमंजन हे पेस्ट पेक्षा प्रभावी आहे.
मला दात सळसळण्याचा त्रास
मला दात सळसळण्याचा त्रास बर्याचदा होतो. पूर्वीच्या dentist ने सेन्सिट्रॉन नावाची पावडर suggest केली होती. ती हिरड्यांवर तसेच दातांवर बोटाने घासायची. त्याने थोडाफार आराम पडायचा, पण नंतरच्या dentist ने ती पावडर चुकूनही वापरू नका असे सांगितले. असे घासल्याने म्हणे दातांवरील एनॅमल badly affect होते. कुणाला उपाय किंवा औषधयोजना माहीत असल्यास लवकर सांगा. आज अगदी uneasy झालंय दात सळसळण्यामुळे
माझ्या या पोस्ट वर दुसर्या
माझ्या या पोस्ट वर दुसर्या एका बीबी वर माबोकरांनी दिलेली उत्तरे इथे डकवत आहे.
अश्विनीमामी | 29 June, 2010 - 12:26
एक पूर्ण ओरल कॅविटीचा एक्स रे घ्यायचा, मग डेंटिस्ट ला भेटायचे. अॅक्ट फास्ट.
भरत मयेकर | 29 June, 2010 - 12:30
मी गेली १५ वर्षे दातांचे प्रॉब्लेम्स डेंटिस्ट न दाखवता सहन केले होते, भीती आळस वेळ नसणे , भरलेल्या वेटिंग रूमचा कंटाळा इ.इ.स्बबींच्य नावाखाली.
पण आमच्या समोरच नवीन देंटल क्लिनिक झाली आणि मी गेलो. अगदी सुखद धक्का बसला.
नव्या मशीन्स मधे अजिबात दुखत नाही....
डॉक्टरांनी संगितलेली महत्त्वाची गोष्ट : दर ६ महिने ते १ वर्षात डेंटिस्ट कडे जाउन क्लिनिंग करुन घेणे जरूरीचे. (क्लिनिंग करुन घेतल्यावर स्वच्छ दात कसा असतो ते कळले). आपल्या तोंडात ब्रश सगळीकडे पोचत नाही हा गैरसमज दूर झाला. डेमो इथे शक्य नाही. सॉफ्ट तंतूंचा ब्रशच वापरावा.
निंबुडा | 29 June, 2010 - 13:12
मामी, अॅक्ट फास्ट असे का म्हटलेतं सीवीयर problem आहे का हा "दात सळसळणे" म्हणजे? :भीती:
अश्विनी के | 29 June, 2010 - 13:17
कितीही ग्रेट टुथपेस्ट वापरली तरी तोंडात रात्रभरात निर्माण झालेले जंतू मारु शकत नाही. त्यामुळे सकाळी नेहमीप्रमाणे दात घासल्यावर ताबडतोब अर्धं भांडं पाण्यात पाव चमचा मीठ घालून त्याने खळखळून चुळा भराव्यात. याने खूप फरक पडतो आणि घशाच्या विकारांना आळा बसतो.
निंबे, सळसळता म्हणजे दुखतात का? मीठाच्या पाण्याने खळखळून चुळा भरुन बघ दिवसातून २ दा.
निंबुडा | 29 June, 2010 - 13:17
चुळा भराव्यात ..... >> घशाच्या विकारांना की दातांच्या?
अश्विनी के | 29 June, 2010 - 13:19
दातांच्या आणि घशाच्या, दोन्हीच्या विकारांसाठी गं. साधासा पण हमखास उपाय आहे. डॉक्टरना दाखवच पण हे लगेच करुन बघ. आत्ता ऑफिसमधे कुणाजवळ मीठ असेल तरी घेऊन करुन टाक.
लवंगेचं तेल असेल घरी तर हिरड्या आणि दातांना हलकेच जरासं लाव.
limbutimbu | 29 June, 2010 - 13:34
चूळा तोन्डातल्या तोन्डात करतात, तर गुळण्या धशात खोलवर नेऊन पण पोटात न घेता करतात!
दात सळसळत असतील, तर आम्ही त्रिफळाचूर्ण बोटाने चोळून पाचेक मिनिटे ठेवायचो व नन्तर चूळा भरायचो. त्याने फरक पडतो.
आई सान्गायची त्यानुसार, बर्याचदा बाळन्तपणानन्तर (किन्वा अन्य दीर्घमुदतीच्या आजारानन्तर, अशक्तपणा वगैरेमुळे) "दात सळसळण्याचा" विकार होऊ शकतो. बाकी कवळी/जबडा चान्गला असेल, कीड वगैरेचा पूर्वेतिहास नसेल तर आयुर्वेदीक वैद्याच्या औषधान्चा जास्त चान्गला उपयोग होईल असे वाटते!
(दात हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे पहिल्यापासूनच!)
प्रतिसाद निंबुडा | 29 June, 2010 - 13:41
अर्धं भांडं पाण्यात पाव चमचा मीठ घालून त्याने खळखळून चुळा भराव्यात. >> माझ्या dentist ने मला दात अति दुखत असल्यास तात्पुरता आरामदायक म्हणून हा उपाय सांगितला होता. आणि खरंच उपयोगी आहे.
बाकी दंतसमस्यांचा माझा अनुभव दांडगा आहे अति झालं आणि हसू आलं त्यातली गत आहे.
२ वेळा रूट कॅनॉल करून झालेलं आहे. उजवीकडची अक्कल दाढ खूप त्रास देत असल्याने ती काढून टाकण्यासाठे सर्जरी करावी लागलेली आहे. आई गं! आठवून सुद्धा दातात कळ आली
मला च्युइंग गम, एक्लेअर्स वगैरे चिकट चॉकलेट्स खाऊ नकोस, म्हणून सल्ला दिलाय माझ्या dentist ने. तो मात्र मी तंतोतंत पाळते. तसं ही मला गोड आवडत नाही. त्यामुळे डेरिमिल्क वगैरे बघून tempting नाही वाटत मला.
आणि रात्री झोपतानाही ब्रश करते मी.
दाढ कीडल्यामुळे दुखत असल्यास कापूर्+वावडींग्+लवंग्+मीठ बत्त्याने कुटून त्याची पावडर करून नरम सुती कापडाच्या अगदी छोट्या पुड्यांत भरून ठेवाव्यात. दुखर्या दाढेखाली रात्रभर ठेवाव्यात. आराम पडतो. बाकी दात्/दाढ क्लीन करून घेण्यासाठी dentist कडे जावेच, पण तात्पुरता हा उपाय उपयुक्त आहे.
संपादन प्रतिसाद अनिल७६ | 29 June, 2010 - 13:50 नवीन
निंबुडा,
गेल्या ३५ वर्षात "डेंटीस्ट" हा काय प्रकार असतो मला माहीत नाही...
आमच्या घरात गेल्या १०० वर्षात कुणाच्याही दाताचे काही प्रॉब्लेम झाले नाहीत किंवा कुणाचे
दात पडले नाहीत,अगदी म्हातारपणी देखिल ..
माझे आजोबा वयाच्या ७५ वर्षी ऊस(पुर्ण वाढलेला) दातानी फोडुन खात होते ..
प्रतिसाद निंबुडा | 29 June, 2010 - 13:56 नवीन
सेम बीबी आधीच "योग आणि आयुर्वेद" गृप मध्ये हसरी या आयडीने चालू केल्याचे आत्ताच समजलेय. तस्मात अस्मादीक हा बीबी उडवत आहोत
त्या गृप ची मी सभासद नसल्याने आणि तो बीबी सार्वजनिक नसल्याने दिसला नव्हता मला.
इथल्या उपयोगी पोस्ट्स त्या बीबी वर डकवतेय
नानबा | 29 June, 2010 -
नानबा | 29 June, 2010 - 14:17
मला च्युइंग गम, एक्लेअर्स वगैरे चिकट चॉकलेट्स खाऊ नकोस, म्हणून सल्ला दिलाय माझ्या dentist ने
>> निंबुडा, मला मागे एका डेन्टिस्टनी सांगितलं की चिप्स आणि तत्सम गटातल्या गोष्टी दातांकरता चॉकलेटस पेक्षाही वाईट..
बघ तुला काही उपयोग झाला तर..
बाकी त्या सळसळण्या करता एक टूथपेस्टपण मिळते.. पण ती कन्टिन्युअसली वापरायची नसते
मि गोड कमी खाते. दुपारच्या
मि गोड कमी खाते. दुपारच्या जेवणानंतर दात घासन शक्य नाहि पण मि रात्रि घासते (झोपण्याअगोदर) >>>
मी पण. लहान वयातच दंत क्लिनिक च्या खूप वार्या कराव्या लागल्याने मी फार केअर घेते दातांची.
बाकी त्या सळसळण्या करता एक टूथपेस्टपण मिळते.. पण ती कन्टिन्युअसली वापरायची नसते >> हो. अशी कोणतीतरी टूथपेस्ट मागे dentist ने मला prescribe केल्याचं आठवतंय खरं. पण एक तर ती regular टूथपेस्ट एव्हढी मोठी असते. लहान साईझ मध्ये मिळत नाही. एकदा घेतली की hardly 4-5 दिवस वापरावी लागते. sesnitive teeth चा prob solve झाला की ही टूथपेस्ट राहते कोपर्यात पडून. आणि पुढे परत वापरायची वेळ आली की एक तर सापडत तरी नाही किंवा सापडली तरी expiry date गेलेली असते.
कधितरी दात घासण्याची पध्हत चुकिची असल्याने दातांवरचे इनॅमल वीक होते त्यामुळे पण अशा कळा जातत >>
माझ्या dentist ने मला योग्य पद्धत दाखवलीये. बरेच जण दातांवर ब्रश आडवा फिरवतात. ते माझ्या dentist च्या मते चुकिचे आहे. तिच्या म्हणण्या प्रमाणे वरून खाली आणि खालून वर असा ब्रश फिरवला पाहिजे. बरोबर आहे का?
त्रिफळाचूर्ण हिरड्यान्ना लावुन ठेवुन पन्धरावीस मिनिटान्नी कोमट पाण्याने चूळा भरणे हा दीर्घकालिक खात्रीशीर इलाज समजला जातो >>>
लिंबुकाका, हे घरी गेल्यावर करून बघते. बाकी तुम्ही दिलेला तात्पुरता उपाय लगेच करून पहावा लागेल.
बाळन्तपण वा तत्सम बाबीनन्तर आलेल्या अशक्तपणाचा परिणाम दातान्च्या ठिकाणीही दिसुन येतो >>>
ही पण एक शक्यता असू शकेल माझ्या बाबतीत. मला खूप वर्षांपासून रात्री झोपण्यापूर्वीही ब्रश करण्याची सवय आहे. पण बाळंतपणात मला असे न करण्याचा सल्ला वडिलधार्या बायकांनी दिला. delivery च्या दरम्यान कॅल्शियम ची झीज बर्याच प्रमाणात झाल्याने हाडे आणि दात ठिसूळ झालेले असतात म्हणे. त्यामुळे जोर लावून दात घासणे टाळावे असे म्हणतात. पहिले काही दिवस तर मला ब्रश सुद्धा वापरू दिला नाही.
मला काहीही खाल्ले किंवा
मला काहीही खाल्ले किंवा प्यायले (जेवण/चहा/कॉफि/सरबत) की लगेच जाऊन चूळ भरण्याची सवय आहे. ते योग्य आहे का? अगदी मुखवासाकरीता बडिशोप खाल्ली तरीही मी चूळ भरते. मला सासरकडचे ओरडतात या सवयीमुळे. गरम खाल्ल्या किंवा प्यायल्यानंतर गार पाण्याने चूळ भरल्यामुळे म्हणे दात शिळकतात. पण मला तोंडात रेंगाळणारी चव अजिबात आवडत नाही.
मी माझ्या dentist ला विचारले तर ती उलट म्हणाली की ही चांगली सवय आहे. कुणी मार्गदर्शन करेल का?
माझ्या एका आयुर्वेदिक "वैद्य"
माझ्या एका आयुर्वेदिक "वैद्य" (तो कटाक्षाने डॉक्टर म्हणवुन घेणे टाळतो) मित्र म्हणतो की अॅसिडिटीचा पण दातान्वर परिणाम होतो म्हणुन...... ???
मझ्या डेंटंस्टने मला दिलेले
मझ्या डेंटंस्टने मला दिलेले सल्ले तुम्हाला पण उपयोगी असावेत :
१) तुमचे दात सणसणतात तर तुम्ही कोलगेट सेन्सिटिव्ह वापरायला हवी.
२) मिठाच्या पाण्याने चूळ मारणे हा पण उपाय तिने सांगितलेला. जेव्हा वेदना असतील तेव्हा.
३) कॅव्हिटी आटोक्यात राहण्यासाठी ज्यात फ्लोराइड आहे अशी पेस्ट हवी. मला RA Thermoseal ही सांगितलीय. विको, हिमालया या पेस्ट्स मधे सर्व नैसर्गिक घटक असल्याने त्यात बहुधा फ्लोराइड नाही.
४) दात घासल्यावर ओल्या बोटाने हिरड्यांना हलकेच मालिश करावे.
५)माझ्या dentist ने मला योग्य पद्धत दाखवलीये. बरेच जण दातांवर ब्रश आडवा फिरवतात. ते माझ्या dentist च्या मते चुकिचे आहे. तिच्या म्हणण्या प्रमाणे वरून खाली आणि खालून वर असा ब्रश फिरवला पाहिजे. बरोबर आहे का? अगदी बरोबर. दात आतल्या बाजूने पण असेच स्वच्छ केले पाहिजेत. आणि ब्रश अगदी शेवटपर्यंत पोचतो, अक्कलदाढेपर्यंत. सॉफ्ट तंतूंचा ब्रश वापरावा, त्याचे धागे सरळ असेपर्यंतच , नंतर बदलावा (दर ३ महिन्यांनी )
जर उपलब्ध असेल, तर
जर उपलब्ध असेल, तर कडूनिम्बाची (दुसरी झाडे पण आहेत, मला नावे माहित नाहीत) कोवळी करन्गळीच्या जाडीची फान्दी घेऊन दाताखाली रगडत बसावे, रस थुन्कून टाकावा!

थोडा कण्टाळवाणा प्रयोग आहे, पण जरुर करावा. नन्तर खळखळून चूळा भराव्यात.
पन्धरावीस मिनिटान्नी पाणी प्यायला गेल्यास ते गोड लागेल, तसे लागले तर जीभेची चवीची स्पर्षेन्द्रिये (की घ्राणेन्द्रिये? की अजुन काही) देखिल शाबुत आहेत असे समजावे
माझ्या एका आयुर्वेदिक "वैद्य"
माझ्या एका आयुर्वेदिक "वैद्य" (तो कटाक्षाने डॉक्टर म्हणवुन घेणे टाळतो) मित्र म्हणतो की अॅसिडिटीचा पण दातान्वर परिणाम होतो म्हणुन...... ???
>> होय.. म्हणून म्हणतात की जे लोक कायम उलटी काढतात (जेवण जास्त झालं म्हणून वगैरे) त्यांचे दात रहाणार नाहीत आणखीन थोड्याच वर्षात..
जे लोक कायम उलटी काढतात (जेवण
जे लोक कायम उलटी काढतात (जेवण जास्त झालं म्हणून वगैरे) >> जलधौती म्हणतात ना त्याला??
लिंबुकाका, काल तुम्ही
लिंबुकाका, काल तुम्ही सांगितलेला तात्पुरता उपाय करून पाहिला (बोटाने हिरड्यान्ना हळूवार मालिश करणे). थोडा आराम पडला.
ऑफिसमधून घरी पोचल्या पोचल्या माझ्या dentist ने presribe केलेली ती toothpaste शोधून काढली. sensodent-KF असं नाव आहे. ती वापरायला चालू केली आहे.
निंबुडा, मलाही असाच त्रास
निंबुडा, मलाही असाच त्रास होतो. बघुया वरच्या सगळ्या उपायांचा काहि उपयोग होतो का ते.
जे लोक कायम उलटी काढतात (जेवण
जे लोक कायम उलटी काढतात (जेवण जास्त झालं म्हणून वगैरे) >> जलधौती म्हणतात ना त्याला??
निम्बे, जलधौती वेगळी ग....... तो अॅसिडिटी कन्ट्रोल करायचा उपाय आहे..... नानबा म्हणाले ते म्हणजे एखद्याला जेवल्यावर अति खालल्ले असे वाटुन अन्न वर येते किन्वा उलट्या होतात ते... ते पित्त वाढल्याचे लक्षण आहे....... बरोबर ना नानबा???
जलधौतीमध्ये काही ग्लास पाणी पोटात घेउन (पिऊन) ते पुन्हा उलटी सारखे करुन बाहेर कढायचे असते.... रिलीफ मिळतो आणि अॅसीडीटी पण कन्ट्रोल्मध्ये......
अॅसिडिटीचा पण दातान्वर
अॅसिडिटीचा पण दातान्वर परिणाम होतो म्हणुन..>> हो हो. मला हल्लीच कळले हे. पुर्वी पित्ताचा खुपच त्रास व्हायचा. मागे रुटीन क्लीनअपला गेले होते तेव्हा त्यांनी हा प्रश्ण विचारला होता.
माल कधी कधी दाढेतुन खुप कळा
माल कधी कधी दाढेतुन खुप कळा येतात. इतक्या की मी मग त्या बाजुने २ -२ दिवस जेवु शकत अनहि. हा सगळा त्रास मला बाळंतपणानंतरच चालु झाला आहे.. कोणि काही उपाय सुचवाल का?
Pages