आभास सुख-दुखाचा......

Submitted by kalpana_053 on 9 February, 2008 - 19:56

माफ कर दुखा मला
ठेवले तुला हदयातच....
येऊ न दिले कधी ओठावरी
कारण दुख असते एकट्याचे
जसे रडके मूल फक्त आईचे....
पण तुझ्यामुळेच कळली
सुखाची किमत...
पण सुखही असते अपुलेच फक्त...
नयनाच दिसते कधी कधी कुणाच्या
अपुल्या सुखाच्या असुयेची झलक....
परमेश्वरा तुही खट्याळ...
एकाच्या सुखास केले
दुस-याचे दुख.....
कशाचे सुख..... अन् कशाचे दुख....
आयुष्याच्या सध्याकाळी ....
कळले मला....
होते दोन्ही आभास.....
शारीरिक सपत्ती स्वताची
हेच खरे खुप मोठे सुख.....
दुस-याच्या दुखात
आले नयनी अश्रू
तेच खरे आहे खुप मोठे दुख....
कल्पना धर्माधिकारी.....

गुलमोहर: 

दुख असते एकट्याचे
जसे रडके मूल फक्त आईचे....
निराशेचे उत्तम चित्रिकरण.

निराशेचे म्हणणे योग्य नाही. सत्य सांगणारी कविता. पुर्वी चुकुन दिलेल्या अभिप्रायाबद्दल क्षमा. चांगली कविता.

पल्लवी.....लगेचच वाचून दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद..... कल्पना.....

दुस-याच्या दुखात
आले नयनी अश्रू
तेच खरे आहे खुप मोठे दुख....

शेवट चुकला आहे की? कुछ तो लोचा है.... की मला कळत नाही आहे..