एक गाव.....

Submitted by पल्ली on 6 February, 2008 - 05:47

काही दिवसांपुर्वी
एक गाव बातम्यातुन पाहिलं...
घाटावरचं सारं सारं
पाण्यामधुन वाहिलं...
कुणाची दुधाची बाटली
कुणाचं तांब्याचं पातेलं
झाडावर लटकताना दिसलं
तिचं पातळ फाटलेलं....
सगळ्याची भाषणं झाली
विमानातुन त्यानी भेट दिली
गावाच्या विकासासाठी
एक्मेकाना नोट दिली....
रस्ते गेले भिंती उतरल्या
माती झाली कुबट आणि
वडाच्या पारावर
गिधाडांचा गलका झाला...
नकाशातुन गायब झालं गाव
बातम्यातुनही तुरळकच दिसतंय
गाव जुनं झालं आणि
सिने ऍवॉर्ड गाजत आहे.

गुलमोहर: 

सुरेख चित्रण. सुंदर आणि वास्तववादी कविता.
Irony छान जमली आहे.

अतिशय छान कविता आहे....
गाव जुनं झालं आणि
सिने ऍवॉर्ड गाजत आहे.

सही !!!!
कविता आवडली
Happy

"रस्ते गेले भिंती उतरल्या
माती झाली कुबट आणि
वडाच्या पारावर
गिधाडांचा गलका झाला..."

छान चित्रण. मनाच्या तळगाभ्यातून आलेलं. अस्वस्थ काळजात उमटलेलं.

.................................अज्ञात

छान चित्रण. मनाच्या तळगाभ्यातून आलेलं. अस्वस्थ काळजात उमटलेलं >>> असंच म्हणतो !

पुन्हा एकदा........................................ . Sad