राज्यातून अधिकाधिक मराठी आयएएस अधिकारी घडवण्यासाठी ......

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5170453.cms

सर्व सुविधांनी सुसज्ज वर्ग आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण... इंटरेनट, आवश्यक असलेल्या सर्व पुस्तकांची उपलब्धता... र्व्हच्युअल क्लासरूमद्वारे देशभरातील तज्ज्ञांचे मिळणारे मार्गदर्शन... सूचना आणि तक्रारींसाठी ड्रॉप बॉक्स... आधुनिक जीम, अद्ययावत लेक्चर हॉल... जेवणापासून ते राहण्यापर्यंत उत्तम सोय... आणि हे सारे मोफत!

राज्यातून अधिकाधिक मराठी आयएएस अधिकारी घडवण्यासाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेने (एसआयएसी) कात टाकण्यास सुरुवात केली आहे. देशभरात विविध प्रशासकीय पदांवर कार्यरत असलेल्या हजारो अधिकाऱ्यांची पंढरी असलेल्या या संस्थेला राज्य सरकारकडून मिळालेल्या २ कोटींच्या निधीतून तिचा कायपालट सुरू झाला आहे!

'आयएएस होण्याची स्वप्ने पाहत राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्याथीर् आमच्याकडे येतात. सर्वाधिक प्रशासकीय अधिकारी घडवणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक निर्माण करण्याच्या उद्देशानेच विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्याचा संकल्प आम्ही केला. महिनाभरातच संस्थेचे बदललेले रूप पाहायला मिळेल', असे संस्थेचे संचालक एस. जी. गुप्ता यांनी 'मटा'ला सांगितले. विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी जीमसारख्या सुविधाही संस्थेतच उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे गुप्ता म्हणाले.

अद्ययावत सुविधा असलेली संस्था, असा लौकिक मिळवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करत असल्याचे उच्च शिक्षण संचालक किर्दक यांनी सांगितले.
..........

प्रस्तावित सुविधा

* संस्थेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महिना हजारऐवजी तीन हजार रु. विद्यावेतन
* तज्ज्ञ शिक्षकांना लेक्चरमागे ७०० रु.
* संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना देणे
* अधिक सुविधांसाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर करणे
* जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संस्थेचा फायदा होण्यासाठी विस्तार करणे

जागा १००, विद्याथीर् ३,५००

यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी एसआयएसीतफेर् विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेतली जाते. त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेतफेर् मार्गदर्शन केले जाते. १ नोव्हेंबरला संस्थेची प्रवेश परीक्षा होणार असून १०० जागांसाठी ३,५०० विद्याथीर् परीक्षा देणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले नसेल त्यांनी www.siac.net.in या वेबसाइटवर नाव पाहावे. परीक्षेवेळी इतर कोणतेही ओळखपत्र आणावे, असे संस्थेचे अधिक्षक यशवंत ओव्हाळ यांनी सांगितले

प्रकार: 

चंपक चांगली माहीती शेअर केल्याबद्दल धन्यवाद .
आशा करुयात की जास्तीत जास्त होतकरु विद्यार्थी ह्या सेवेचा लाभ घेतील व राजकारणी मंड्ळी ह्यात ढवळाढवळ करणार नाहीत.