ऍब्स्ट्रॅक्ट

Submitted by पल्ली on 4 February, 2008 - 06:43

रिकामं रिकामं
एकटेपण भरुन जातं..
जेव्हा तुझ्या आठवणींचं कोडाळं होतं...
मग मी अपुरी रहात नाही....
सगळ्या सुंदर क्षणांची माळ लेवुन
मी श्रीमंत होते.
माझ्या अंगणात मी उभी
सुर्याचं तेज पांघरुन.
कुंपणाबाहेर दूर उभी दिसते
एक निर्वस्त्र आठवण.....
दारापल्याड जोगी उभा,
माझ्या उंबरठ्याला
सोनेरी कोंदण.

गुलमोहर: 

पल्ले मस्त कविता त्यातल्या त्यात पहिल्या पाच ओळी जास्त आवडल्या

मी श्रीमंत होते >>> हे तर झकासच

>>सगळ्या सुंदर क्षणांची माळ लेवुन
मी श्रीमंत होते.

सुंदर लिहितेस गं. फक्त आठवणीची उपमा खटकली.

(c, c++, java का? Abstract लिहिलस ते! :))

आवडली कविता.. छान लिहिली आहे..

माझ्या अंगणात मी उभी
सुर्याचं तेज पांघरुन.>>. सुंदर

सगळ्याना धन्यवाद!
मला ही कवीता पोस्ट्ताना भीति वाटत होती...टाकु की नको म्हणुन्...माझ्या मोस्टली अश्याच असतात.
चिनु,
c, c++, java हे सगळं कश्याशी खातात तेवढं सुद्धा मला कळत नाहे गं.
ती आठवण निर्वस्त्र आहे म्हणजे जीला समाजदत्त बंधन नाहीत, जीला कशाचा मोह नाही की आड्पडदा नाही...ती फक्त येते सोबत काही न आणता न काही घेउन जाता. जी वस्त्रावीणा बघ्णं फार असहनीय, आहे, पण तीही स्वतःची मर्यादा जाणुन दुर उभी आहे, तरी ती लपु शकत नाही...इ..इ..
पुन्हा एकदा आभार...
चुकल्यास दुरुस्ती सुचवा. सुधरणा जरुर करेन..

खुलास्याबद्दल धन्यवाद पल्ली.
दुरुस्तीची गरज नाही. अशीच छान आहे कविता.

सगळ्या सुंदर क्षणांची माळ लेवुन
मी श्रीमंत होते.
.......... क्या बात है.......खूप मस्त !!

छान आहे कविता.

"रिकामं रिकामं
एकटेपण भरुन जातं..
जेव्हा तुझ्या आठवणींचं कोडाळं होतं..."

हे छान. पण.........

"कुंपणाबाहेर दूर उभी दिसते
एक निर्वस्त्र आठवण.....
दारापल्याड जोगी उभा,
माझ्या उंबरठ्याला
सोनेरी कोंदण." ............... ही उपमा मस्त पण संदर्भ नाही लागला.

.............................अज्ञात

पल्ले, दोन चार शब्द अजून वापरले असतेस तर मला शेवटच्या चार ओळी समजून घ्यायला डोकं खाजवायची वेळ आली नसती.

निर्वस्त्र आठवणीचं विश्लेषण मी वर केलंच आहे, 'जोगी' बाबत बोलायचं तर जोगी म्हणजे तपस्वी, पावित्र्य, पण हा भिक्षेकरी आहे. वैयक्तीक स्वरुपात बोलायचं तर तो माझ्याकडुन / माझ्या आयुष्याकडुन काही ना काही मागत आहे, जे मी नाकारु शकत नाही.
अरेरे, इतकं विश्लेषीत करायला लागणं म्हणजे माझी कविता हरली नाही ना? म्हणुनच अ‍ॅब्स्ट्रॅक्ट हे नाव दिलं होतं. पण सगळ्यांना आवडली हेच समाधान.

उशीरा वाचली. खुप छान आहे. कौतुकसारखे माझेही झाले होते. माझ्या कविता मोस्टली अशाच असतात>>> माते तू चक्क ग्रेससारखे बोलायला लागलीस्..:D:-D

सुहास, म्हणुन तर नाव 'ऍब्स्ट्रॅक्ट'' दिलं आहे.
उमेशपंत, थोरामोठ्यांचे डायलॉग असे साळसूदपणे मारले ना की बरं असतं, इंप्रेशन पडता है ना.
जोक अपार्ट, ग्रेस थोर आहेत, तुलना अशक्य आहे.

Pages