तुळस

Submitted by पल्ली on 4 February, 2008 - 06:36

कुठल्याशा एका डब्यात
मुठ्भर काळ्या मातीत
तिनं छोटंसं रोपटं लावलं
तुळशीचं.
आठवणीनं पाणी घालुन
रुजवलं...जोपासलं..
कधी गंधाचं बोट
कधी उदबत्तीचा गंध...
तिनं तुळस सजवली,
श्री क्रुष्णा सोबत उजवली...
आताशा
तिचे हात आशिर्वादालाही उठत नाहीत
जीभ कोरडी पडली तरी पाणीसुधा
स्वतःच्या हातानं घेता येत नाही.
कुणीतरी बोललं...
शेवटच्या क्षणी तरी
तिच्या सगळ्या लेकराना बोलवा.
तिनं नेमकं ऐकलं....
म्हणाली,
माझी तुळस आता कामी येइल,
माझ्या सोबत जाइल..................

(चिनुची कवीता वाचल्यानंतर सुचलं)

गुलमोहर: 

खरोखर शेवटी आपले कर्मच आपल्या बरोबर....
छान आहे कवीता.

व्वा!क्या बात है!
बापू

बढिया, एकदमच

कृ असा लिही>>>kRu

पल्ली,
तुळस पेक्षा सोबत शिर्षक योग्य वाटेल का गं?
खालची कमेंट काढून टाक बाई. तुझी कविता ती तुझीच Happy

मलाही 'सोबत' शिर्षक योग्य वाटलं. परंतू कविता तुळशीवर म्हणून कदाचित कवितेचे नाव तुळस.

छानच कविता ग पल्ली.

तुळस नाव योग्य वाटतय.

सगळ्याना धन्यवाद!
श्यामली "कृष्ण" जमलं गं. थॅंक्स!
खुप दिवस ट ला ट आणि णे ला णे जुळवण्यात घालवले. तुम्हा सार्‍यांचं लिखाण वाचुन सुधारले.
आता मनातलं लिहिते, मग छान जमतं Happy
सोबत कुणाचीही असु शकते मात्र तुळशीची पवित्र आणि निरपेक्ष वाटली, म्हणुन तुळस ठेवलं.
चु.भु.द्या.घ्या.

छान कल्पना, सुरेख मांडणी आणि उत्तम कविता. लिहीत रहा.

छान मस्त!!!

छानच गं.....!!

पल्ली,
अप्रतीम !! बस्स. दुसरा शब्द नाही.

"तिनं तुळस सजवली,
श्री क्रुष्णा सोबत उजवली..." मस्त !!!

............................अज्ञात

अतिशय छान!!!!!! Happy