वारली चित्र - तारपा नृत्य

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

tarapa.jpg

तारपा नृत्य
वारली समाज उत्सवप्रिय आहे तसेच या समाजात नृत्यालाही फार मोठे स्थान आहे.
नवीन आलेल पीक, नवीन भाताची लागवड, पुजा, ई. सामान्य प्रसंग.. त्याचाही उत्सव साजरा करण्यासाठी हे नृत्य केले जाते.
रात्री चंद्र दिसल्यावर नृत्य चालु होते आणि मग मध्यरात्री पर्यंत ते चालू असते.
रिंगण, ताल, लय आणि सुरावटीवर होणारे हे नृत्य म्हणजे सामूहिकनृत्याचा उत्कृष्ठ उदाहरण आहे.
'तारपा' हे एक प्रकारचे वाद्य (wind instrument) आहे. सुकलेला भोपळा आतून कोरून, पोकळ बनवून
हे वाद्य तयार करतात. नृत्य स्थानाच्या मध्यभागी एकजण तारपा वाजवत असतो. एक स्त्री आणि एक पुरुष
असे एकानंतर एक गोलाकार हातात हात गुंफून नृत्य करतात. नृत्याच्या वेळी तारपा वाजवणार्‍याच्या दिशेने सर्वजण
पाठमोरे असतात. आणि हे पुर्ण नृत्य असेच पाठमोरे पुढे जातच करतात. नृत्य करताना वारली स्त्रिया केसांचा अंबाडा घालतात. तारपा नृत्यात वारली आदिवासी हातात हात गुंफून गोलाकार नृत्य करीत असल्याने हे नृत्य म्हणजे त्यांच्या
सहकार्याचे प्रतिबिंबच आहे.

प्रकार: 

सुंदर आहे चित्र. या नृत्याच्यावेळी मधे एखादा देव वगैरे नसतो का ?

नीलूताय, किती सुंदर काढलसय गो तू ह्या चित्र!! छानच Happy माहिती पण नेहमीसारखीच छान लिवलसय Happy

आहे चित्र.
तारपा नृत्य खर म्हणजे दिवाळी च्या दिवसात करतात. प्रत्येक गावची तारपा टिम असते आणि गावो गाव जाऊन ते नाचतात. दिवाळी चे दिवस असल्याने लोक पैसे ही चांगले देतात. हे मी दिवसाच नाचताना बघितलेय
होळि ला टिपर्‍या नाचल्या जातात, हा साधारण गरबा/ बाल्या डान्स मिक्स केला तर कसे वाटेल तसे असते, यात बायका नाचताना नाही दिसल्या कधी. यात "राम लक्ष्मण हे दोघे बंधु..जेवीत होते दहिभात लिंबु .. ह्ल्ल्लो हे..." अस टिपर्‍यांच्या ठेक्यावर गाणंही म्हटले जाते.

शेतीच कांम संपली की पावसाळा संपता संपता "कामड्या" नाच होतो. हा रात्री ढोलकि च्या तालावर गोल फेर धरुन नाचतात

पाऊस पडत नसेल तर काळमेघ (डोंगरात जाउन) येक नाच करतात

मृत्यू समई येक खास सनई सारखे वाद्य वाजवले जाई.. हल्ली ते वाजवणारे दिसत नाहित त्यामूळे ते वाद्य ही लुप्त झालेय.
वारल्यांची बरीच नृत्य आहेत पण तारपा जास्त प्रसिद्ध झालेय.
तसच वारली चित्रांबद्दल, हे वारली खास करुन लग्नाचा चौक काढायला करतात आणि लग्नाच्या रात्री भगत "देव" खेळवतो
भिंती सजवायला ही काढतात पण क्वचीत.
कुडाच्या भींती लाल मातीने कींवा गेरूने सारवून तांदळाच्या पिठाने कढतात. त्यात पार्श्वभाग लालसरच असतो.
हल्ली खुप कमर्शलायझेशन झालेय आणि अनेक आकृती वारली म्हणुन घुसडल्या जातात

अरे वा अजय तू अजुन छान माहिती दिलीस. तू प्रत्यक्ष तारपा नृत्य पाहिलेले दिसतय. तुझा अभ्यास यात जास्त दिसतोय.:)
मी दिलेली माहिती सर्व पुस्तकात वाचलेली आहे. या चित्रांची पार्श्वभूमी लालसरच असतो हे मात्र बरोबर आहे. Happy मी चित्र काढताना
हिरवी पार्श्वभूमी हा बदल केलाय.
बहुतेक तारपा नृत्याच्या चित्रांमध्ये मी एक स्त्री आणि एक पुरुष असेच चित्रण पाहिलय. कदाचित चित्र काढताना हे त्यांनी visualize केले असावे. मात्र ते नाच करताना काय गाणं म्हणतात हे तुझ्याकडून कळले. Happy
तुझ्याकडे अजून माहिती असेल तर नक्की सांग.

नीलू मस्त चित्र........ पार्श्वभूमी हिरवी असली तरी खुलून दिसते आहे.

तारपा नाचताना येक बाई येक पुरूष असे कमेरे भोवती हात घालुन रांग बनवुन नाचतात आणि त्या रांगेच्या सुरुवातीला जो पुरुष असतो त्याच्या हातात घुंगरू लावलेली काठि असते , ती ही ठे का धरायला आणि नाचाची दिशा ठरवाय्ला वापरतात. ते गाणं आणि फक्त पुरूष "कामड्या" नाचाला असते.

सुरेख चित्र नीलू. आणि माहितीसाठी तुझे आणि अजय चे धन्यवाद..
हिरवा रंगही खुलतोय या चित्राला.
पण मला असं वाटलं की नाचणारे लोक खूप जास्त झाले आहेत.. म्हणजे एक विळखा कमी चालला असता का? Happy

निलू एकदम मस्त ग, आणि माहितीही देतीयेस त्याबरोबर ते जास्ती छान,
ते कसं काढतात हे पण दाखवता, सांगता आलं तर बघ ना, म्हणजे ज्यांना अजिबातच माहित नाही तेही प्रयत्न करू शकतील.

निलगे,
चित्र मस्तच हां.. Happy

दिनेशदा, अजय, शैलु, मंजु, पूनम, श्यामली, महेश अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
अजय तू अजून माहिती दिल्याबद्द्ल तुझे मनापासून आभार!!
पूनम असे वाटतय खरं:)
श्यामली करायच आहे ग ते. पण राहुन गेलय.. बघते लवकरच.

छान आलंय गं हे पण खूप!!
तू आणि अजै मिळून का नाही शिकवायचा उपक्रम सुरू करत्?:-)त्यामुळे माहिती आणि चित्रं असं दोन्ही एकत्र शिकाय्/वाचायला मिळेल.मी सुचवायचं काम केलं:-),पण मनावर घे नक्कि,आम्ही वाट बघतोयः-)

कुठला कागद आणि कलर वापरले आहेत? खुपच सुन्दर ||||

या चित्राना हिरव्या रंगाचीदेखील पार्श्वभुमि असते. पावसाळ्यात खुपदा अश्या रंगाचे शेण असते. त्याने सारवलेल्या भिंतींवर अशी चित्रे काढतात. वरच्या चित्रात तर तो रंग आणि पोत छानच जमून आलाय.

वारली चित्र सुरेख, सुरेख आलय.. काढायचे कसे हे देखील सांग ग ,
अजय ने आणि तुही माहिती पण दिली चित्रा सोबत हे खुप आवडले.. असेच चित्र काढत जा आणि इथे टाक्त जा..:)

एकदम सही!!!!
चित्राला पार्श्वभुमी हिरव्या ऐवजी भडक रंगाची असती तर अजुन उठुन दिसले असते...
(हे माझे मत आहे हं.... तसे मला painting मधील जास्त कळत नाही...)
Happy