Submitted by हर्ट on 21 October, 2009 - 05:11
नमस्कार!
ज्यांनी २००९ चे दिवाळी विकत घेतलेत आणि वाचलेत त्यांना विंनती की त्यांनी त्या त्या दिवाळी अंकातील चांगले साहित्य आणि साहित्यकार याबद्दल लिहावे. म्हणजे एखाद्या दिवाळी अंकातील चांगला लेख सुटणार नाही.
आभारी आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद. केले रजिस्टर. तिथले
धन्यवाद. केले रजिस्टर. तिथले सगळे अंक मागच्या वर्षीचे आहेत. पण न वाचलेले आहेत तेव्हा ते वाचता येतील.
आजच्या सकाळमधे "शब्द" या
आजच्या सकाळमधे "शब्द" या दिवाळीअंकाबद्दल चांगलं लिहीलंय. मी आणणारे. कुणी वाचलाय का ?
कथाश्रीचा दिवाळी अंक मस्त
कथाश्रीचा दिवाळी अंक मस्त आहे. कथा ठिक आहेत पण जाहिरात विश्वाची भरपूर माहिती देणारे लेख आहेत.
'मेनका' दिवाळी अंक ठिक आहे...
'मेनका' दिवाळी अंक ठिक आहे... कथा दर्जेदार वाटल्या नाहीत.
'भटकंती' चाही दिवाळी अंक आहे
'भटकंती' चाही दिवाळी अंक आहे असे वाचनात आले. वाचला का कोणी?
मी सध्या विपुलश्री वाचते आहे.
मी सध्या विपुलश्री वाचते आहे. चांगला आहे. बिल गेट्सबद्दल अगदी छान माहिती लिहिली आहे. मंगला गोडबोलेंची कथाही चांगली आहे.
सा.स. चा.ग्नला आहे. मी अजून
सा.स. चा.ग्नला आहे. मी अजून कथा नाही वाचल्या. पण लेख मस्त आहीत. खास करून किइटकावरचा अवचटाचा लेख.
दीपावलीचा अंकही चांगला आहे
दीपावलीचा अंकही चांगला आहे (शुद्धलेखन सोडून. माझ्यासारखीलाही शुद्धलेखनाच्या चुका सापडाव्यात म्हणजे यु कॅन इमॅजीन. त्यांच्या प्रुफतपासणा-यांनी झोपा काढल्यात).
चिमुलकरांवरील सुहास बहूलकरांचा लेख चांगलाय पण van gogh शी तुलना? निम्मे कलावंत नॉर्मल असतात असं नक्की म्हणता येणार नाहीच. असो.
अनिल अवचटांचा राज्यश्रीची भाषा हा लेख सेमी बुंदी. तरीपण बाईंचे कौतुक वाटले. त्यांचे प्रमाण भाषेवरील विचार आवडले.
सुबोध जावडेकरांची कथा प्रेडिक्टेबल तरी इतर दिवाळी अंकाच्या मानाने भारी.
बाकी वाचते आहे. नंतर टाकते.
इथे सगळ्यांनी लिहीलेलं वाचून तो कीटकांवरचा लेख वाचणारच.
सा. सकाळचा अंक बरा आहे.
सा. सकाळचा अंक बरा आहे. रोहिणी निलेकण्यांची मुलाखत बंडल. डॉ. प्रयाग, संजय भास्कर जोशी यांचे लेख चांगले आहेत.
मौजेच्या अंकातही शुद्धलेखनाच्या भन्नाट चुका आहे. संपादकीयातच दोन ठिकाणी 'मोज' असं लिहिलं आहे. सुलभा ब्रह्मनाळकरांच्या लेखातले फ्रेंच उच्चार वाचवत नाहीत. गरे, कार्टे (गार, कार्ट यांच्याऐवजी) वाचून झीट आली. याच अंकात अवचटांनी राम पटवर्धनांच्या संपादनावर लिहिलं आहे. मोठ्ठा विरोधाभास.
मिळून सार्याजणीचा अंक फार नाही आवडला. वृद्धत्वावरील लेखांत नावीन्य वाटलं नाही. प्रज्ञा पवारांची कथाही आवडली नाही.
अंतर्नादचा अंकही फारसा आवडला नाही. मिरासदारांची मुलाखत आणि मंगला गोडबोल्यांची कथा आवडली.
ख्ररच आवाज २००९ अन्क अजिबात
ख्ररच आवाज २००९ अन्क अजिबात चान्गला नाहि
वर्शा
सा सकाळमधे विशेषत: जे इंग्रजी
सा सकाळमधे विशेषत: जे इंग्रजी शब्द देवनागरीत छापलेत ते बर्याच ठिकाणी (skill - स्कील इ.) चुकीचे आहेत. अवचटांचा लेख माहितीपूर्ण आहे पण त्याची भाषा irritating वाटली. तसेच काही ठिकाणी संदर्भ, माहिती अर्धवट सोडुन दिली आहे. महानगर कथा ओढुन ताणुन लिहिल्यासारखी वाटते. संपादकीय विस्कळीत वाटले. परत एकदा वाचते. बाकी वाचून व्हायचा आहे.
'ऋतुरंग'चा दिवाळी अंक आवडला.
'ऋतुरंग'चा दिवाळी अंक आवडला. डॉ. तात्याराव लहाने, शंकर महादेवन, शबाना आझमी, पं. हरिप्रसाद चौरसिया यांची मनोगतं मस्त आहेत.
'अंतर्नाद'चा विशेष विभाग यंदा विनोदी साहित्याला वाहिलेला आहे. दिलीप प्रभावळकर व मंगला गोडबोल्यांच्या कथा ठीक आहेत. पद्मजा फाटक व दीपा गोवारीकरांनी लिहिलेला स्त्रियांनी केलेल्या विनोदी लेखनावरचा लेख मस्त आहे.
माहेरच्या अंकात पहिलीच कथा
माहेरच्या अंकात पहिलीच कथा विजया राजाध्यक्ष यांची स्पेस या नावाची आहे. यात दोन स्त्री पात्रे आहेत; त्यांची नावे भारती आणि सुवर्णा. कथेच्या प्रारंभात त्यांच्या नवर्यांची नावे अनुक्रमे सुभाष आणि दिलीप आहेत. एका परिछेदात भारती स्वतःच्या नवरयाचा उल्लेख पण सुभाष म्हणून करते आणि अचानक पुढ्च्या परिच्छेदात सुवर्णाच्या नवर्याचे नाव सुभाष होते. आणि मग सर्व कथेत सुवर्णाचा नवरा सुभाष आणि भारतीचा नवरा दिलीप असे उल्लेख आहेत. गेल्या वर्षीच्या पण माहेरच्या दिवाळी अंकातल्या एका कथेत असेच नायिकेच्या नवर्याचे नाव अधून मधून बदलत होते. जर वाचकांना ही बाब वाचतानाच खटकते; तर कथा प्रकाशित होईपर्यंत कोणाच्याही लक्षात कसे येत नाही? मग संपादन, संपादन म्हणजे नक्की काय करायचे असते?
आता एक देवनागरीत लिहिण्याबद्दल शंका - अर्धा र कसा लिहायचा?
नवर्यांची असे लिहा
नवर्यांची असे लिहा navaRyaaMchI
दीपावलीच्या अंकातील २ कथा
दीपावलीच्या अंकातील २ कथा आवडल्या. मिलींद बोकील यांची "रण" आणि मोनिका गजेंद्रगडकर यांची "व्रण ". नक्की वाचा.
जर वाचकांना ही बाब वाचतानाच खटकते; तर कथा प्रकाशित होईपर्यंत कोणाच्याही लक्षात कसे येत नाही? मग संपादन, संपादन म्हणजे नक्की काय करायचे असते? >> आर्वी. हजारो अनुमोदक. काय वैताग असतात लोकं. व्यावसायिक अंक म्हणायचं, पण लायकी महाविद्यालयीन अंकाएवढी पण नसते.
'अनुभव'च्या दिवाळी अंकातला
'अनुभव'च्या दिवाळी अंकातला अनिल अवचटांचा लेख भीषण वाईट आहे. 'मी काळाला काळू म्हणतो, तो दोस्त आहे आपला', किंवा 'मी ओम्कार केला, तेव्हा पाखराचं पिल्लू आईला म्हणालं, अरे, हा माणसाचा खरा आवाज' अशी काहीही अचाट वाक्यं त्यात आहेत. शब्द इकडचे तिकडे झाले असतील माझ्या हातून. पण वाक्यं इतकीच विनोदी आहेत. बाकी काही नाही, तर विनोदी म्हणून वाचा. झालंच तर लेखात, 'समीक्षक माझ्यावर टीका करतात, मी कशावरही लिहितो म्हणून. मी लाजरा आहे, त्यामुळे मला संकोच वाटतो', अशीही एक मखलाशी आहे.
'अक्षर' नेहमीप्रमाणेच खास. वारीवरचा लेख, आनंद नाडकर्णींचा संस्था चालवताना येणार्या अडचणींवरचा लेख, मोबाईलवरचा लेख, व्यंगचित्रांवरचा लेख, किरण यज्ञोपवीत आणि अभिराम भडकमकर यांच्या कथा, गणेश मतकरींचा गरीब जगाच्या सिनेमावरचा लेख हे सगळंच भारी आहे. पण मला इरावती कर्णिकची कथा कळलीच नाही. याही अंकात अवचटांचा लेख आहे, पण तो तितका वाईट नाहीये.
'शब्द'मधली समर खडसची कथा सुरेख. कुठेही भडक, बटबटीत, उगाच दु:खी-बि:खी न होता लिहिलेली मिश्कील आणि भेदक गोष्ट आहे ती.
'मौज'मधला लतावरचा लेख प्रचंड बोअर आहे.
'सा.स्.'चा सगळा अंक आवडला. अवचटांच्या कीटकांवरच्या लेखापासून, नाडकर्णींच्या टाइम मॅनेजमेंटवरच्या लेखापर्यंत, संजय जोशींच्या इच्छामरणावरच्या लेखापासून वैशाली करमरकरांच्या जर्मनीतल्या वैद्यकीय विश्वातला अनुभव दाखवणार्या (हा करमरकरांचा लेख 'लोकसत्ते'त आहे असं मला आता वाटतंय. चूकभूल देणे-घेणे) लेखापर्यंत.
'अंतर्नाद'मधला दीपा गोवारीकर-पद्मजा फाटक यांचा स्त्रियांनी केलेल्या विनोदी लेखनाचा आढावा घेणारा लेख चांगला आहे. पण मंगला गोडबोलेंची अगदी थोडक्यात केलेली बोळवण खटकली. मंगला गोडबोलेंची अंकातली कथा छानच आहे. शिवाय प्रभावळकरांच्या पु.ल. शैलीची आठवण करून देणार्या, पण तोडीस तोड प्रसन्न आणि मिश्कील अशा प्रवासी वासर्या मस्तच.
'लोकसत्ता'मधला सचिन कुंडलकरचा 'अभयारण्य' नावाचा लेख खास आहे. शालेय आयुष्यावरचा लेख. पण त्यात आठवणींचे कढ काढलेले नाहीत. त्याहून पुष्कळ जास्त काही आहे. मुळातून वाचावं असं.
सा स मधला दोन
सा स मधला दोन बागडबिल्ल्यांच्या शोधकथा लेख interesting (माफ करा, ह्याला मराठी शब्द काय ?) आहे. त्यात उल्लेखलेले द ग्रेट हेज ऑफ इंडिया वाचले पाहिजे.
वैशाली करमरकरांचा लेख सासमधेच आहे.
रच्याकने, तनिष्कचा नेकलेस लै भारी तर डस्केंनी (बस्केच्या चालीवर
) फारच बादरायण संबंध लावलाय 
किस्त्रीम मधे बरेच चांगले लेख
किस्त्रीम मधे बरेच चांगले लेख आहेत असे वाटले.
राम शेवाळकरांची (अखेरची) निखील वागळे यांनी घेतलेली मुलाखत चांगली वाटली.
ज्योतिष्य एक थोतांड ह्या अनुषंगाने लिहलेला अभ्यासात्मक लेख पण ठीक वाटला. अजुन बरेच काही आहे वाचण्यासारखे.
बाकी मौज , ललित बद्दल वर इतरांनी लिहलेलेच आहे. ठिक ठाक आहेत. एखादे दोन लेख वगळता फार काही विशेष नाही.
मेघना छान माहिती मिळाली
मेघना छान माहिती मिळाली तुझ्याकडून.
तृप्ती, मराठीत या शब्दाला मनोरंजक असा शब्द.
अवचटाचा एकही लेख नसणारा कुठला
अवचटाचा एकही लेख नसणारा कुठला दिवाळी अंक आहे का??
'अक्षर' मधली 'राजकन्या
'अक्षर' मधली 'राजकन्या रसगंधा' वाली गोष्ट वाचली का कोणी?
पाठवलास कि वाचेन
पाठवलास कि वाचेन
काल मटाचा दिवाळी अंक वाचून
काल मटाचा दिवाळी अंक वाचून काढला.
पंडितजीच्या लेखाबद्दल फार उत्सुकता होती पण मला खास वाटला नाही. "महाराष्ट्र माझा" या विभागातील सर्व लेख उत्कृष्ट आहेत.
तेंडुलकरांचा आणि निळू दामलेंचा लेख "द बेस्ट"
परेश मोकाशीचा "हरिश्चंद्रावरचा" लेख मस्त जमलाय. राहुल गांधी आणि सायना वरचा लेख माहितीपूर्ण आहेत.
मला सर्वात जास्त आवडलेला भाग म्हणजे कविताचा.. महाराष्ट्रातल्या काही प्रमुख बोली घेऊन त्यातल्या कविता आहेत. उदा. वर्हाडी, मालवणी, वाडवळी, आगरी.. आणि सर्व कविता सुंदर आहेत!!
रच्याकने "शीमॅन" हा शब्द हिंदी फिल्मी हीरोच्या शीर्षकात वापरलाय.. अर्थ माहित नसावा की मुद्दम केलय???
'ललित'चा दिवाळी अंक सुंदर
'ललित'चा दिवाळी अंक सुंदर आहे. अंकानं आपलं साहित्यिक स्वरूप राखलं आहे. 'आजही तुमची आठवण येते' हा खास विभाग अफलातून आहे. श्री. विलास खोले यांनी या विभागाचं संपादन केलं आहे. २००९-२०१० ही वा. रा. ढवळे, श्री. रा. ना. दांडेकर, तुकडोजी महाराज, ना. मा. संत, ग. ल. ठोकळ, बाबूराव अर्नाळकर, ना. घ. देशपांडे, दत्तू बांदेकर, बा. सी. मर्ढेकर, ना. गो. कालेलकर, दुर्गाबाई भागवत, पु. भा. भावे, अरविंद मंगरुळकर, भा. रा. भागवत, पु. शि. रेगे, बा. भ. बोरकर, शांताराम आठवले, दि. के. बेडेकर, सेतुमाधवराव पगडी यांची जन्मशताब्दी वर्षे आहेत. या निमित्तानं या साहित्यिकांचं स्मरण दिवाळी अंकात केले आहेत. या विभागातले मर्ढेकर, बोरकर, दुर्गाबाई, ना. घ, देशपांडे, भा. रा. भागवत यांच्यावरचे लेख अप्रतिम आहेत.
याशिवाय अंकातले विद्युल्लेखा अकलुजकर, नंदिनी आत्मसिद्ध, वसंत सरवटे, मीना वैशंपायन, संजीवनी खेर, विजय पाडळकर यांचे लेख मस्त आहेत. अंकात शुद्धलेखनाच्या व व्याकरणाच्या चुका नाहीत, हे अजून एक विशेष.
एकूणात 'ललित'चा दिवाळी अंक संग्राह्य आहे.
आनंद झाला ललितबद्दल वाचून
आनंद झाला ललितबद्दल वाचून
धन्यवाद!!!!
>>जर वाचकांना ही बाब वाचतानाच
>>जर वाचकांना ही बाब वाचतानाच खटकते; तर कथा प्रकाशित होईपर्यंत कोणाच्याही लक्षात कसे येत नाही? मग संपादन, संपादन म्हणजे नक्की काय करायचे असते?>>
रत्ना.. अगदी पटलं मनापासून! पु.वि.बेहेरे होते तो पर्यंत एक दर्जा होता मासिकाला. त्यांच्या नंतर सगळाच आनंद असतो संपादनात!
अक्षर चा अंक वाचते आहे.
अक्षर चा अंक वाचते आहे. वैचारिक खाद्य भरपूर आहे. मेघनाशी सहमत.
वारी वरचा लेख यथोचित परखड आहे.
सास चा बहूचर्चित अंक वाचला. किटकांचा लेख सोडून मला अंक ब-यापैकी आवडला.
उत्तम अनुवाद हा पद्मगंधा
उत्तम अनुवाद हा पद्मगंधा प्रकाशनचा दिवाळी अंक वाचला. मराठी सोडून इतर भाषामधल्या उत्तम कथाचा अनुवाद यामधे आहे.. अंक जबरदस्त आहे... काही काही कथा आणि कविता खरोखर सुंदर आणि प्रतिम आहे. काही वेळा अनुवाद एकदम सही झालाय तर कधी कधी मूळ कथाच इतकी सशक्त आहे की अनुवादापेक्षा ते कथाबीजच जास्त भावतं...
गाओ झिंग जिआनच्या नोब्बेल स्विकारतानाच्या भाषणाचा अनुवाद आहे.. तोदेखील खूप छान जमलाय.
रेखा काखंडकीच्या कन्नड कादंबरीचा अनुवाद खूप सुंदर झालाय. इतका की आपण अनुवाद वाचतोय असे वाटतच नाही.. (आता मी मूळ कादंबरीपण मिळते का ते बघतेय)
Pages