अभ्यासाचं ओझं

Submitted by स्मितागद्रे on 20 September, 2009 - 05:49

सगळी तुम्ही मोठी माणसं, आम्हाला सतत सांगत असता
लंगडी, लगोरी, विटीदांडु, तुम्ही किती खेळत होतात

हल्ली म्हणे मुलांना हे खेळच महिती नाहीत
कॉम्प्युटर,व्हिडीयो शिवाय दुसरे गेमच येत नाहीत

पण तुम्हीच सांगा ह्याला आम्ही काय करणार ?
अभ्यासाचा डोंगर सोडुन कधी खेळायला जाणार ?

सुट्टीच्या दिवशी सुद्धा असतो आमच्या मागे त्रास
शनीवारी असतो ड्रॉईंगचा तर रविवारी डान्सचा क्लास

क्लासला गेल्या शिवाय आमचा एक दिवस ही जात नाही
मनात असुन सुद्धा मनसोक्त खेळता येत नाही

आज काय स्कॉलरशीप तर उद्या सायबर ऑलिंपियाड
हे ही पडत कमी म्हणून त्यात सायन्स क्विझ च फॅड

स्वप्न सुद्धा आम्हाला फक्त परिक्षेचीच पडतात
परी ऐवजी स्वप्नात सुद्धा परिक्षाच सगळ्या दिसतात

तुमच्या वेळी सांगा,होती का इतकी काँम्पीटीशन ?
झेलायला लागत होतं का तुम्हाला अभ्यासाच टेंन्शन ?

मी च आता ह्यावर एक उपाय शोधून काढणार
सगळ्या मोठ्या माणसांना आमच्या परिक्षा द्यायला लावणार

मग बघा तुम्हाला नक्की पटेलं म्हणणं माझं
थोडस तरी कमी होईल तुमच्या अपेक्षांच ओझं

गुलमोहर: 

स्मिते, आज वाचली कविता... स्वत: समजून उमजून लिहिली असलीस तर तुझं अभिनंदन, पण तुझ्या मुलिने जर का तुला हे साम्गितलं असेल आणि मग तु लिहिलं असशील तर तुझं डबल अभिनंदन...
एक तुझ्या कवितेसाठी आणि एक तुझ्या आणि तुझ्या मुलिमधल्या नात्यासाठी... Happy

अरे , लोक्स धन्यवाद पुन्हा एकदा,
दक्षे धन्यवाद गो, मी समजुन उमजुन लिहीण्यापेक्षा मुलांच्या मनातल सम्जुन उमजुन मांडायचा प्रयत्न केलाय.

स्मिता, लहान मुलांच्या अजुनही कविता वाचायला आवडतील !! त्यांच्या मनातल नेमक तुमच्या कवितेत उतरत. ही कविता खरच मोठ्यांना ही विचार करायला लावणारी आहे. अजुन कवितेच्या प्रतिक्षेत !!!

Pages