Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on 20 January, 2008 - 12:13
सहन होत नाही
कूणाचं झाडाखाली बसणं
झाडासकट उन्मळून पडणं
झाडाखालच्या आठवणींनी
मनात प्रवेश केला अन
झाडावरचा कावळा घाण करुन गेला.
पाउस कधीच थांबलाय
ठींबकताहेत आठवणी
भिजलेल्या झाडातून
तसं काहीच झालं नाही
आठवणींचा पांढरा ढग आला.
सरकत सरकत निघून गेला.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुलमोहर:
शेअर करा
तसं काहीच झालं नाही..
झाडाखालच्या आठवणींनी
मनात प्रवेश केला अन
झाडावरचा कावळा घाण करुन गेला.>>>>> एवढ मात्र कळल नाही,
बाकि ३ आवडले , तसं काहीच झालं नाही एक्दम मस्त
आभार !!!
मायबोली वर आमच्या पहिल्यावाहिल्या लेखनाला आपण प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो.
आठवणींनी प्रवेश करणे आणि कावळ्याच्या पांढ-या /पीवळट ( रंग ही ब-याच दिवसात पाहण्यात नाही ) ठीपक्याने
आठवणींची नासाडी होणे इतकाच अर्थ कवीला माहित आहे !!!
धन्यवाध!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे,
खरंतर आम्ही तुम्हाला धन्यवाद द्यायला हवेत कारण खुप दीवस झाले मी हाय्कुच्या शोधात आहे, ते आज तुम्च्यामुळे वाचयला मिळाले. मराठी हाय्कुचे नियम सांगाल का क्रुपया. सगळंच आवडलं.
१ आणि ३
आवडले चौथ्यामधे
पांढर्या ढगाकडून काय घडण्याची / घडवण्याची अपेक्षा असावी हे नाही कळलं
दुसर्यातला कावळ्याचा संदर्भ इथे चांगला नाही वाटत आहे असं वाटलं. दुसरं काही तरी जास्त चांगलं वापरता आलं असतं का? वाळकं पान वगैरे?