भारत माझा साठ वर्षांचा

Submitted by ShantanuG on 20 January, 2008 - 11:30

१५ ऑगस्ट २००७ ची गोष्ट . मी शाळेत जायचय होते म्हणुन उठलो . सातला पोहचायचे होते . उठलो तर बघतो काय ! सूर्योदय . किती सुंदर द्रुश्य होते ते . त्या क्षणी वाटले हा उगवता सूर्य आहे प्रतीक नव्या उगवत्या भारत देशाचा . भारताला स्वातंत्र्य मिळुन ६० वर्ष झाली होती . मला तेव्हा कसे वाटले हे मी या कवितेद्वारे सांगू इचितो .

उठताच सकाळी सहा वाजता ,
दिसला सूर्य नव्या युगाचा.
तो होता क्षण भारतीयांचा,
भारत माझा साठ वर्षांचा.

नभात होती काळ्या ढगांची दाटीव.
पण ते हटताच दिसला सूर्य स्वातंत्र्याचा.
तो सुवर्ण सूर्य होता भारतीयांचा,
भारत माझा साठ वर्षांचा.

तेव्हा असे वाटले संपली काळ्या दिवसांची श्रुंखला,
तेव्हा असे वाटले तो सूर्य आहे नव्या उमेदीचा .
तो उमेदीचा सूर्य होता भारतीयांचा ,
भारत माझा साठ वर्षांचा.

तेव्हा माझ्या मनात जाग्रुत झाली बलीदानाची आत्मा ,
तेव्हा असे वाटले हीच थोरांच्या बलीदानाची सफलता.
तो सूर्य होता बलीदानाचा ,
भारत माझा साठ वर्षांचा.

भारत हा देश भारतीयांचा ,
भारत हा देश नव्या उमेदीचा .
भारत हा सूर्य नव्या युगाचा .
भारत माझा साठ वर्षांचा.

-शंतनु श. घारपुरे

गुलमोहर: