महाराष्ट्र राज्य माझे

Submitted by ShantanuG on 20 January, 2008 - 07:54

  • येथेच जन्मले श्री शिवाजी
  • येथेच निसर्ग नाचे ।
  • मला अभिमान आहे या राष्ट्रावर
  • हे आहे महाराष्ट्र राज्य माझे ॥१॥
  • हे राष्ट्र नदिचे सूर
  • हे राष्ट्र वैभवाचे गाणे ।
  • मला अभिमान आहे या राष्ट्रावर
  • हे आहे महाराष्ट्र राज्य माझे ॥२॥
  • हे राष्ट्र देवस्थान
  • येथून क्रुष्णा , गोदावरी वाहे ।
  • मला अभिमान आहे या राष्ट्रावर
  • हे आहे महाराष्ट्र राज्य माझे ॥३॥
  • हे राष्ट्र हिंदुत्त्वाचे
  • हे राष्ट्र मराठ्यांचे ।
  • मला अभिमान आहे या राष्ट्रावर
  • हे आहे महाराष्ट्र राज्य माझे ॥४॥
  • हे राष्ट्र संतांची समाधी
  • हे राष्ट्र जन्मापासून महान आहे ।
  • मला अभिमान आहे या राष्ट्रावर
  • हे आहे महाराष्ट्र राज्य माझे ॥५॥
  • -शंतनु श. घारपुरे
  • गुलमोहर: 

    माझ्या सुंदर देशात
    हीर्‍या माणकांची रास
    कधी नक्षत्र चांदणे
    कधी स्वर्गाचा आभास.......

    स्फुरण चढलं.....:-)