आशा

Submitted by ShantanuG on 20 January, 2008 - 02:04

बघ लोकांना किती महत्त्वकांक्षा त्यांच्या .
मग तुच का रे असा ?
का रे जगाला कंटाळला ?
नको सोडूस आशा माणसा , नको सोडूस आशा .

बघ या लहान चिमणीच्या पिलांना ,
आकाशी झेप घेण्याचा ध्यास त्यांचा.
प्रयत्न ते करतात पण सोडत नाही न आशा.
नको सोडूस आशा माणसा , नको सोडूस आशा .

बघ या तहानलेल्या प्रण्याला ,
पाण्याच्या शोधात तो भिरभिरतो कसा .
पण तो नाही न सोडत आशा.
नको सोडूस आशा माणसा , नको सोडूस आशा .

ऐक रे ऐक ,
नको सोडूस प्रयत्न पुढे जाण्याचा.
नको रे कंटाळू जगाला.
नको सोडूस आशा माणसा , नको सोडूस आशा .

-शंतनु घारपुरे

गुलमोहर: