Submitted by संयोजक on 31 August, 2009 - 01:14
गीत/संगीत: उपासक (मनोज ताम्हनकर)
स्वर: श्री. राहुल देशपांडे
सौजन्यः मनोज ताम्हनकर (उपासक)
अधिक माहिती साठी जय हेरंब पहा.
ही ध्वनीफीत मायबोली खरेदी विभागात उपलब्ध आहे.
विशेष सूचना:
"जय हेरंब" या मालिकेत एकूण नऊ गाणी असून तुम्हाला मायबोली गणेशोत्सवात रोज एक अशी सर्व गाणी ऐकायला मिळतील. प्रत्येक गाणं वेगळ्या रागात आणि तालात बांधलेलं आहे. तुम्हाला सर्व गाण्यांचा ताल आणि राग ओळखून संयोजकांना ईमेल करून कळवायचा आहे. सर्व अचूक उत्तरे देणा-यातील एका भाग्यवान स्पर्धकास उपासक एक ध्वनीफीत बक्षीस देणार आहेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे गाणं. आवडलं.
छान आहे गाणं. आवडलं.
क्या बात है, राहुल. सुंदर
क्या बात है, राहुल. सुंदर गायला आहात. शब्दांची फेक, स्वरावर हुकुमत ठेवत केवळ अप्रतिम. फिरत बद्दल वेगळं बोलायला नको, ती तुमची खासियत.
ढोलकी, हार्मोनियमचा वापर... खूब.
तमाशातल्या गण-गौळणीतला, गण ऐकतेय असं वाटलं. खूप खूप आवडलेलं गाणं.
ही सीडी विकत घेण्याच्या नऊ नव्हे नऊशे कारणांमधलं हे गाणं हे एक मोठ्ठं कारण!
(पं. वसतरावांनी असाच अजरामर केलेला एक गण... कुणाला आठवतोय का?... 'गणपती गुणपती गजवदना' असे काहिसे शब्दं होते का? मी शुद्ध विसरहोळी आहे.. भोळी नाही... होळीच)
छ्छे. परत आले ह्याच पानावर.
छ्छे. परत आले ह्याच पानावर. पुन्हा पुन्हा ऐकला गण. राहुलची फिरत ऐकण्यासाठी, ढोलकीची उठान ऐकायला, हार्मोनियमचा पीस आऐकायला, ढोलकीच्या बरोबर दुगुनीत वाजलेली तुंबडी ऐकायला... अजून शब्दांकडे मी लक्ष दिलेलं नाही.... त्याबद्दल परत कधीतरी.