ड्रीम नेवासा
ऑर्कुट कम्युनिटी: ड्रीम नेवासा
http://www.orkut.com/Main#Community.aspx?rl=cpp&cmm=93413726
कुबेराची राजधानी असलेली निधी निवास ही पुरातन नगरी पुढे १३ व्या शतकात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली. याच पवित्र भुमीत, मायबोली ने अमृतातेही पैजा जिंकल्या! नेवासा नगरी मराठी साहित्याच्या अन वारकरी व संत संप्रदायाच्या मनात एक वेगळॆ स्थान मिळवुन आहे.
पण ही नगरी काळाच्या ऒघात विकासाच्या बाबतीत फ़ार मागे पडली. समकालीन अन नंतर स्थापण झालेल्या शहरांपे़क्शा बकाल अन भेसुर असे रुप घेउण आज नेवासा शहर अन तालुक्याची अवस्था (कुसुमाग्रजांनी मराठी राजभाषेचे वर्णन केल्याप्रमाणे, मंत्रालयाच्या दारात कटोरे घेउन उभे असलेल्या) भिकारणी प्रमाणे झालेली आहे.
प्रवरामाई च्या कुशीत निद्रीस्त असलेल्या ह्या नगरीला पुन्हा एक स्वप्न दाखवायचे आहे.......
नेवासा नगरीला तिचे गत वैभव पुन्हा प्राप्त करुण देण्याची मनात जिद्द अन मनगटात जोर असणा-या सर्वांसाठी ही मांदिआळी..........
छान!!!!! आताच्या तरुण पिढीने
छान!!!!!
आताच्या तरुण पिढीने सर्वांनी जिद्द ठेवली तर शिर्डी ,शिगणापुर ,नंतर नेवासा .............असेल.
नेवासानगरी काळाच्या ऒघात विकासाच्या बाबतीत फ़ार मागे पडली होती पण आता त्यामध्ये सुधारणा होत आहे.दोन वर्षा पुर्वी शासनाने ५ कोटी रु. मंजुर केले होते ते ज्ञानेश्वर मंदिर सुधारणेसाठी पण आजुनपर्यत ते कुणाच्या खिशात आहे ते समजले नाही.नेवासासारख्या पावन भुमीत ज्ञानेश्वारानी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला ती भुमी
पावनमय बनवने हे सत्येवर असणार्या नेते मंड्ळीच्या हातात आहे.:अओ: