भुजिंग

Submitted by योडी on 20 August, 2009 - 03:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकन १ किलो

बटाटे पाव किलो

कांदे ३ ते ४

हळद एक छोटा चमचा

जीरं एक चमचा

धणे एक चमचा

काळी मिरी एक चमचा

दालचिनी एक चमचा

हिरव्या मिरच्या ४ ते ५

लसूण पाकळ्या १० ते १५

लवंग ४ ते ५

किसलेलं सुकं खोबरं १ वाटी

मीठ

कढिपत्ता

जाडे पोहे अर्धा किलो

रस एका लिंबाचा

गोडं तेल २०० ग्रॅम

चिकन भाजायला लोखंडी सळई, कोळसा

क्रमवार पाककृती: 

चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे कापून घ्यावेत, बटाटे गोल कापून चिकनच्या तुकड्यांबरोबर मीठ आणि हळद लावून एकाआड एक (चिकनचा एक तुकडा, बटाट्याची एक फोड) असे सळईत ओवून शेगडीवर भाजून घ्यावेत. एका पातेल्यात तेल गरम करुन त्यात कढिपत्त्याची फोडणी देउन कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा.नंतर त्यात भाजलेले चिकन आणि बटाट्याचे तुकडे टाकून मंद आचेवर १० मिनीटे चांगले मिक्स करुन घ्यावे.ह्या मिश्रणात नंतर सुकं खोबरं घालून नंतर मिरच्या, धणे, लवंग, काळी मिरी, लसूण, जीरे आणि दालचिनी वाटून घालावी. वास दरवळेपर्यंत परतावे. वरून भिजवून, निथळून घेतलेले (किंवा सूके) पोहे घालून मिक्स करावे. त्यावर लिंबाचा रस घालून चांगले ढवळावे.

शेगडी, सळया नसल्यास, फ्राय पॅनवर थोडे तेल सोडून भाजले तरी चालते.पाणी न घालता मंद आचेवर शिजवावे.

अधिक टिपा: 

कट्ट्यावर थंडने टाकलेली पाककृती वाहुन जाऊ नये म्हणून इथे टाकत आहे Happy

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक पाकळी, >> ग्लास बरोबर छान सोबत होते.<< असे म्हणावे, त्यात कोणत्याही विशिष्ठ गटाला खास परमिशन देऊ नये.. आणि उर्वरीत ५०% जनतेकडून "ओरडा आरडा" खाऊ नये! Wink

मस्तच लागतो हा पदार्थ.. मला बहिणीचे लग्न होईपर्यंत माहीत नव्हता.. जेंव्हा कळला तेंव्हा पिल्लू पोटात होती सो बाहेरचे खाऊ नये म्हणून तिच्या सा.बांनी छान करून पाठवला.. आता दुकानची भुजिंग खायला हवी एकदा.. अ‍ॅशबेबी तु घरी केलेलस का?

Pages