चिकन १ किलो
बटाटे पाव किलो
कांदे ३ ते ४
हळद एक छोटा चमचा
जीरं एक चमचा
धणे एक चमचा
काळी मिरी एक चमचा
दालचिनी एक चमचा
हिरव्या मिरच्या ४ ते ५
लसूण पाकळ्या १० ते १५
लवंग ४ ते ५
किसलेलं सुकं खोबरं १ वाटी
मीठ
कढिपत्ता
जाडे पोहे अर्धा किलो
रस एका लिंबाचा
गोडं तेल २०० ग्रॅम
चिकन भाजायला लोखंडी सळई, कोळसा
चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे कापून घ्यावेत, बटाटे गोल कापून चिकनच्या तुकड्यांबरोबर मीठ आणि हळद लावून एकाआड एक (चिकनचा एक तुकडा, बटाट्याची एक फोड) असे सळईत ओवून शेगडीवर भाजून घ्यावेत. एका पातेल्यात तेल गरम करुन त्यात कढिपत्त्याची फोडणी देउन कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा.नंतर त्यात भाजलेले चिकन आणि बटाट्याचे तुकडे टाकून मंद आचेवर १० मिनीटे चांगले मिक्स करुन घ्यावे.ह्या मिश्रणात नंतर सुकं खोबरं घालून नंतर मिरच्या, धणे, लवंग, काळी मिरी, लसूण, जीरे आणि दालचिनी वाटून घालावी. वास दरवळेपर्यंत परतावे. वरून भिजवून, निथळून घेतलेले (किंवा सूके) पोहे घालून मिक्स करावे. त्यावर लिंबाचा रस घालून चांगले ढवळावे.
शेगडी, सळया नसल्यास, फ्राय पॅनवर थोडे तेल सोडून भाजले तरी चालते.पाणी न घालता मंद आचेवर शिजवावे.
कट्ट्यावर थंडने टाकलेली पाककृती वाहुन जाऊ नये म्हणून इथे टाकत आहे
ओहो धन्स ग योडि!
ओहो धन्स ग योडि!
असली पाकृ पहिल्यांदाच वाचली..
असली पाकृ पहिल्यांदाच वाचली.. चिकन विथ पोहे....
गोडं तेल २०० ग्रॅम, किसलेलं सुकं खोबरं १ वाटी, बटाटे पाव किलो, जाडे पोहे अर्धा किलो........ पाकृ चांगलीच हेल्दी आहे.
आणि जवळजवळ दोन किलोचे बनलेले हे चिकन हादडायला मंडळी पण तशीच हेल्दी लागणार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तरीही चेंज म्हणुन ब-याचशा कमी प्रमाणात बनवुन पाहायला पाहिजे.
अॅश बेब्ये, मी थंडचा दोन
अॅश बेब्ये, मी थंडचा दोन महिने पाठपुरावा केलाय या रेसिपीसाठी. माझ्यासारख्या खाबूरावांसाठी ही पाककृती म्हणजे गाथा आहे. मी हा पदार्थ विरारला १३ वर्षांपूर्वी खाल्ला होता. अजून चव विसरलो नाहिये.
हि तिथली स्पेश्यालिटी आहे. काहीही चेंज करु नकोस त्याच्यात. दिलीये तशी बनव. खायला माणसं कमी पडली तर कधीही हाक मार.
भक्तांच्या रक्षणाला (म्हणजे त्यानी बनवलेल्या गोष्टींच्या भक्षणाला) मी सदैव तयार असतो.
ह्म्म्म्म.. १३ वर्षापुर्वीची
ह्म्म्म्म.. १३ वर्षापुर्वीची ओळख अजुन विसरला नाहीस.. म्हणजे नक्कीच काहीतरी असणार... मलाही आता उत्सुकता दाटलीय कशी लागते ते पाहायची...
पण तरीही २ महिने पाठपुरावा?? मधला श्रावण थंड होता म्हणुन की इतका उशिर काय????
भक्तांच्या रक्षणाला (म्हणजे त्यानी बनवलेल्या गोष्टींच्या भक्षणाला) मी सदैव तयार असतो.
ठिकाय ठिकाय्...आता माणसाने स्वतःहुनच संकटात उडी मारायची ठरवली तर मी तरी काय करणार?? पुढच्या रविवारी बनवते (ह्या रविवारी गणपती येताहेत) आणि बोलावते..... (मला ही पाकृ हे संकट वाटत नसुन मी बनवलेली पाकृ हे संकट वाटतेय हे ह्या पाकृच्या भक्तांनी कृपया लक्षात घ्यावे, नाहीतर चिकनच्या जागी मलाच भाजतील)
कोणीही ही रेसिपी बनवली तर मला
कोणीही ही रेसिपी बनवली तर मला बोलवायला विसरू नका..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
विसरलात तर.. काय होईल हे आता सांगत नाही..
थंड आहे ती. तरी दोन महिन्यात
थंड आहे ती. तरी दोन महिन्यात दिलंन नशीब. बदल्यात माझ्याकडच्या सगळ्या रेसिपी दिल्यात मी तीला. तुला पाहिजे असतीलच त्या. http://www.transferbigfiles.com/Get.aspx?id=6d7a46e7-6d66-421b-9ccc-510e... वर क्लिक करा पाहू. २३ पर्यंतच आहे ही ऑफर.
मला अॅक्सेस नाहिय...
मला अॅक्सेस नाहिय...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
विरारजवळ आगाशी गावात [ असेच
विरारजवळ आगाशी गावात [ असेच काही नाव आहे ] मला वाटत ही खास रेसिपी गेली ५० वर्षे मिळते.तेच घराणे त्याचे जनक. मस्त असते. मध्ये एकदा ई-टीव्हीवर सुद्धा त्या खाणावळीत लाईव कृती दाखवली होती जाने.०९ मध्ये. तिथे प्रत्यक्ष अनुभव घ्या खायचा किंवा पार्सल पण मिळते.
गुरुदासजी, विरारजवळ आगाशी
गुरुदासजी,
विरारजवळ आगाशी गांव आहे. पुढे अर्नाळा आहे.
बाकी रेसिपी तिथली आहे हे माहीत नव्हतं.
येश येश, मी पण आगाशीचच भुजिंग
येश येश, मी पण आगाशीचच भुजिंग खाल्लेल. थंड तुला पेशल थॅन्क्स ह्या रेसिपीबद्दल आणि योडे तुलापण (टुकटुक माकड) मी शनिवारी बनवणार (कदाचित)
असच एक पापलेट भाजून
असच एक पापलेट भाजून पोह्याबरोबर करतात. त्यात आ़ख्खे पापलेट चिरा देउन असाच जिरामिर्याचा मसाला भरुन आगीवर भाजतात व पोह्यामध्ये कच्चा कांदा-लिंबू पिळून मस्त चापायचे.
छे जमाना झाला.
मी त्या भागातली असूनही हे कोंबडी-भुजिंग नाही खाल्ले![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
त्या भागातली म्हणजे आगाशीची
त्या भागातली म्हणजे आगाशीची का?
मस्तच पाकृ! असे पोहे करून
मस्तच पाकृ! असे पोहे करून खायला घातले पाहिजेत!
कोणाला???
कोणाला???![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनिलभाई
अनिलभाई![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
फ्लोरिडात आल्यावर आमच्या घरी
फ्लोरिडात आल्यावर आमच्या घरी भेट देणार्यांना! (परस्पर निघून जाणार्यांना नाही!)![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
(No subject)
विरारजवळ आगाशी गावात [ असेच
विरारजवळ आगाशी गावात [ असेच काही नाव आहे ] मला वाटत ही खास रेसिपी गेली ५० वर्षे मिळत>>हो हि तिथलीच खासियत आहे. अफाट प्रकार असतो हा.
भुजिंग आम्ही अजुनही आणतो
भुजिंग आम्ही अजुनही आणतो आगाशीहुन खास.... धन्स योगमहे रेसीपीबद्द्ल !
वाव, तोडाला पाणि पाणि सुटलय
वाव, तोडाला पाणि पाणि सुटलय![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ही रेसिपी वाचून शाकाहारीवरून
ही रेसिपी वाचून शाकाहारीवरून मांसाहारी मोडवर जावे असं वाटायला लागलंय. सही लागत असणार..
:खाऊन तृत्प झालेला बाहुला :
:खाऊन तृत्प झालेला बाहुला :
वॉव, काय तोपासु रेसिपी आहे..
वॉव, काय तोपासु रेसिपी आहे.. फोटो तर जबरीच..
भुजिंग... माझी मनपसंद डिश...
भुजिंग... माझी मनपसंद डिश...
विरार येथील आगाशी आणि उंबरगोठण येथे सर्वोत्कृष्ट भुजिंग मिळते..
आता गावाकडे जावेच लागणार.
ही रेसिपी वाचून शाकाहारीवरून
ही रेसिपी वाचून शाकाहारीवरून मांसाहारी मोडवर जावे असं वाटायला लागलंय. सही लागत असणार.>>>>>>>>>>>> खरच निरजा खुप छान भुजिन्ग, त्यातले पोहे आणि बटाटे तर मस्तच
विरार येथील आगाशी आणि
विरार येथील आगाशी आणि उंबरगोठण येथे सर्वोत्कृष्ट भुजिंग मिळते>>एकदम बरोबर !!!
ही आमच्याकडची सर्वात मनपसंद
ही आमच्याकडची सर्वात मनपसंद चिकन डिश...
भुजिंग.. आईग.. कुठे आलो ह्या पानावर मी..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आगाशी, उंबरगोठण, निर्मळ अश्या
आगाशी, उंबरगोठण, निर्मळ अश्या वेगवेगळ्या ठिकाणी सारख्याच चविची भुजिंग मिळते. पुरुषांना ग्लास बरोबर छान सोबत होते.
अरे मला तर नविनच डिश कळाली...
अरे मला तर नविनच डिश कळाली...
योडी धन्स! १५ दिवसांपूर्वीच
योडी धन्स! १५ दिवसांपूर्वीच भुजिंग खाल्लं. नवर्याला सक्काळी स़क्काळी पाठवलेलं विरारला. रविवार असूनही ट्रेन गिच्च भरलेली. पण पर्याय नव्हता. एक वाजता बंद होतो तो स्टॉल. पहिल्यांदाच खाल्लं... असलं चमचमीत! दालचिनी मिर्यात घोळलेलं पोहे आणि चिकन! गणेशोत्सवातील गोडमिट्ट जीभ चांगलीच खवळली त्या झणझणीत चवीने!
करून बघेन आता घरी!!!
Pages