जुलै महिन्यात या २ कविता सर्वोत्तम म्हणून निवडल्या आहेत.
http://www.maayboli.com/node/9618 [सलीम : गिरीश कुलकर्णी] मोजक्या, नेटक्या शब्दांत भीषण वास्तवाची जाण करून देणारी अंतर्मुख करणारी, अस्वस्थ करणारी कविता. वास्तवातून उलगडून दाखविलेलं त्रिवार सत्य. अॅब्स्ट्रॅक्ट पण सुबोध मांडणी. त्यांच्या ईतरही कविता वाचनीय आणि विचारांना मनाचा एक वेगळाच कोपरा दाखवीत मोजक्या शब्दांत आशय व्यक्त करणार्या आहेत.
http://www.maayboli.com/node/9416 [इथे तर पानगळ बहरात आहे : जयंता५२] तंत्रशुद्ध गझल, प्रत्येक द्विपदी स्वतंत्र कविता. निरागसाला दिसलेलं वास्तव सुयोग्य शब्दात मांडलंय. परदेशात वास्तव्य करून आलेल्या कुठल्याही माणसाला परत आल्यावर स्तंभित करणारं सत्य.
बाकी उल्लेखनीय कविता अशा--------
१) http://www.maayboli.com/node/9570 [आंदण : कौतुक शिरोडकर] अष्टाक्षरी छंदातली सुरेख लय असणारी हळुवार कविता. कौतुक यांच्या कविता छंदबद्ध असो की मुक्तछंदातल्या, त्या नेहमीच आवडतात. अतिशय तरल, भावपूर्ण अनुभूती देणारी सुरेख कविता.
२) http://www.maayboli.com/node/9550 [परतफेड: वैद्य] मोजक्या शब्दात सामावलेला आशयघन सुसंस्कृत विचार.
३) http://www.maayboli.com/node/9528 [नाळ : झाड ] सहज, सुबक आणि सुबोध मांडणी. आवश्यक तेवढाच आकार. आशयघन विषय आणि शब्द.
४) http://www.maayboli.com/node/9479 [वंशवृक्ष : उमेश कोठीकर] पिकल्या, गळल्या पानाच्या जागी येणार्या नव्या पालवीचं स्वागत करताना मानवी आयुष्याशी त्याचं साधर्म्य कवीनं खूप समर्थपणे दर्शविलं आहे.
५) http://www.maayboli.com/node/9638 [धूमकेतू : प्रकाश खलेल] नाविन्याची ओढ, त्यातला "दुरून डोंगर साजरे" हा अनुभव आणि मग पुन्हा जुन्याचा आसरा! "जुनं ते सोनं." नाविन्याची ओढ चुकीची नाही, पण बरेचदा ती नवी अनुभूती अशी फसवी देखिल असते, हे सत्य सुबकपणे धूमकेतूच्या प्रतिकातून चित्रित केलं आहे.
६) http://www.maayboli.com/node/9114 [हर शाम - उनके नाम : मी आनंदयात्री] निखळ, नितळ मैत्रीवर आधारलेली, नेटक्या शब्दांत मांडलेली कविता. "आषाढातलं वादळ सहज पेलल्यामुळे श्रावणासारखं टवटवीत झालेलं नातं" ही अतिशय सुरेख कल्पना. सहजसाध्या प्रतिमा आणि मुक्तछंदातलं मोकळेपण आवडलं.
७) http://www.maayboli.com/node/9357 [फैसला : शरद पाटील] अतिशय तंत्रशुद्ध आणि अर्थपूर्ण गझल. मतला कमालीचा दर्जेदार. प्रत्येक द्विपदी समर्थपणे गझल पेलते आहे.
८) http://www.maayboli.com/node/9268 [फौज आहे-सतीश वाघमारे]
*****************************************************
जुलै महिन्यातील कविता निवडीचे काम गेल्या २ महिन्यातील सर्वोत्तम कवी श्रीश्रीकांत, अज्ञात आणि क्रांती यांनी पाहिले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
वर उल्लेखलेल्या कवींचे
वर उल्लेखलेल्या कवींचे मनःपुर्वक अभिनंदन
अश्वीनीला अनुमोदन , निवड
अश्वीनीला अनुमोदन ,
निवड समितीचेही आभार , कारण काही काही सुरेख कविता, निसटुन जातात, वाचायच्या रहातात. त्या आता वाचल्या गेल्या.
धनु.
सलीम या कवितेला प्रथम क्रमांक
सलीम या कवितेला प्रथम क्रमांक देऊन निवड समितीने चूक केली असे मला वाटते. कारण कविता ही अशुद्धलेखनात असूच शकत नाही असे माझे मत आहे. अर्थात माझ्या ग़ज़लेला कुठेतरी स्थान मिळाले याचा मला आनंद आहेच.
शरद
निवड समितीचे आभार आणि वर
निवड समितीचे आभार आणि वर उल्लेख केलेल्या सर्व कवि मित्रांचे मनापासून अभिनंदन!
गिरीश आणि जयंता यांचे, तसेच
गिरीश आणि जयंता यांचे, तसेच सर्व उल्लेखनिय कवि मित्रांचेही हार्दीक अभिनंदन आणि शुभेच्छा !
निवड समितीचे खास आभार. माझ्या कवितेस उल्लेखनिय कवितांच्या यादीत स्थान दिल्याबद्दल, सर्वांचा आभारी आहे.
प्रकाश काळेल
प्रिय मित्रांनो : निवड समिती
प्रिय मित्रांनो :
निवड समिती आणि मी मायबोलीवर आल्यापासून माझ्या लिखाणाला प्रोत्साहीत करणार्या, माझ्या लिखाणाच्या तांत्रीक अंगांवर वेळोवेळी मार्गदर्शन करणार्या सगळयांचेच सविनय अन हार्दीक आभार!
मी लिखाण माझी कवाड मोकळी करण्यासाठी करतो...दुसर काही अपेक्षीत नसत् -नव्हत. या प्रोत्साहनामुळे म्हणूनच भारावलो आहे. या ऋणांत कायमचाच राहीन्..आनंदाने!
जयंतराव,कौतुक्,वैद्य,झाड,उमेश्,प्रकाश,आनंदयात्री,पाटील,प्रा.वाघमारे: आपणा सगळ्यांच हार्दीक अभिनंदन !!!!
सस्नेह ,
गिरीश
"मैने इस डरसे लगाये नही थे ख्वाबोंके दरख्त....
की कौन जंगलमे उगे पेडोंको पानी देगा.."
जयंतराव आणि गिरीशजी यांचे
जयंतराव आणि गिरीशजी यांचे विशेष अभिनंदन! निवड समितीचे व मला वेळोवेळी प्रोत्साहित करणार्या सर्व मित्रमंडळींचे आभार. तसेच वैद्यसाहेब,कौतुक, झाड,आनंदयात्री, शरदजी, सतीशजी, प्रकाश यांचेही अभिनंदन.