विनोद मना गाव ना

Submitted by छावा on 17 August, 2009 - 09:56

विनोद मना गाव ना.
रामराम मंडळी,
हाऊ बी बी मुद्दामच चालु करि र्‍हायनु. काय शे आहिराणी भाषाना वापर, प्रचार आणि प्रसार बठ्ठी कडे व्हवो आणि बठ्ठा खान्देशी त्या निमित्त खाल आठे इतिन. आखो इतर कितला लोके आठे येतस ते बी दखाई. हाऊ बीबी नविन लेखन मा पडत र्‍हावो म्हणिन हाऊ कथ्याकुट.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<इनोद ना बाफ शे अन आठे भलत्याच गोष्टि व्हई र्‍हायनात>हाच तर मोठा ईनोद शे.:हाहा:

Rofl Rofl

हर्षे... चिखल्या म्हणजे वरणफळं / चिकोल्या! नि बट्टं म्हणजे पातळ पिठल्यानातत प्रकार शे. घरमां रातले कव्हयमव्हय काही भाजी नै कराले र्‍हास तव्हय बट्टं बनाडतस.

@हर्षदा, वरण फळं २ प्रकारे करतात. वरण करायचं फोडणीचं. त्यात कच्च्या पोळ्या (न भाजता), चौकोनी तुकडे करून घालायच्या अन वाफवून ते मिश्रण तयार करायचं. दुसरा प्रकार म्हणजे शिळी पोळी अन वरण एकत्र शिजविणे. पहिल्या प्रकारच्या ऑफिशिअल वरणफळं / डाळ फळं.

आर्या, हर्षा,
बट्ट म्हन्जे पातळ भाजी इस्पेली कडधान्य नी पातळ भाजी ले बट्ट म्हनतस. आणि नुस्त बट्ट म्हण्जे पातळ मसालेदार सार. म्हण्जे लसुनन बट्ट. Happy

हाउ भी एक समस शे, वाची दखा.

माय म्हणे लेकराले जोजो बाळा जोजो
सार काही होजो पण मास्तर नको होजो...

प्रशिक्षण जाते तर,निवडणुका होते
जणगनणेच्या कामावरुन दबावही येते,
अंगाचा सारा खकाना होते

तुप रोटी नाही बाळा
चटनी भाकर खाजो,
सार काही होजो पण मास्तर नको होजो...

मन्हा बी एक इनोद ,
बायको -कावं ,तुम्हनं मन्हा वर खरच पिरेम से का ?
नवरा -आया, हई का सांगणं जाया का ?
बायको -हा ,तरी पण कित्ल पिरेम से ?
नवरा -काय बाई से भो हई !पिरेमनं काइ माप र्हास का ?पिरेम गंजच से .
बायको -कावं ,मी मरी गौ त ?
नवरा -मी एडा व्है जासू .
बायको -आया माय इत्ल पिरेम ?काव ,मंग एडापन मा तुम्ही दुसरं लगीन करी ल्हिशात का ?
नवरा -एडाना काय भरोसा ?

बायको -कावं ,लाज नै वाटत .मारी टेकमा चस्मा लाइ गावभर डवरतस.आवढा मोठा भिंग ना! .माले फुटकी ले आजाबात द्खावत नै .माले बजार कराले जानं से .द्या बरं तुमना चस्मा .

नवराना मोठा भिंग ना चस्मा लाई बाई बाजारमा गै ॰बाजारमा टमाटाना दुकानपुढे बसीसन .हातमा टमाटा ल्हिसण ,बाईंनी दुकानदारले पुसं .

बाई -कार भो ,टरबूज काय भाव दिनं ?

{हा हा ही ही हू हू }

मिने ,खरच एडाना काय भरोसा.पारवरली हई बाकीनी मंडई गई कथी इतला दिनपासून ?

diwali6.jpg

नमस्कार मायबोलीकर!
जssssरा इकडेही लक्ष द्या...

तुम्हाल माहितेय का? - हितगुज दिवाळी अंक २०११ साठी साहित्य यायला सुरूवातही झाली आहे! तुम्ही कधी पाठवताय? कथा-कविता-ललित-स्फुट-रेखाटने-व्यंगचित्रे-विनोदीलेखन-प्रवासवर्णन-....... आणि अजूनही बरेच काही...

यासगळ्याबरोबरच यावर्षीच्या अंकात "थांग-अथांग" हा नातेसंबंधांवर आधारित विशेष विभाग असणार आहे. आपल्या आयुष्यातील एखाद्या ऋणानुबंधांबद्दल किंवा कुठल्याही नात्याबद्दल तुम्हाला मनापासून जे वाटतं ते कागदावर उतरू द्या.

तुमच्या अधिक माहितीसाठी हितगुज दिवाळी अंक २०११ ची घोषणा. कसलीही मदत लागली तर आम्ही आहोतच!

तुमच्याइतकीच आम्हीही वाट पाहतोय - एका दर्जेदार अंकाची! Happy

सस्नेह,
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक २०११

आया हर्षदा ,तू त सुद्द आहीरानीमा बोलाले (लिव्हाले )लागी गई .तुन कवतीक करो तवडं थोडं से .
एडाना काय भरोसा ?

मॅडम : पाडुं ,समज तूले मि १० लाडु दिनात
पांडु : माले ?????????
मॅडम : समजिले ना भो तु ना काय बापन जाइ ह्रायन.
त्यामातला ५ मि लिदात ते मंग तुनाफा कितला ह्रायनात
पांडु : २०
मॅड्म : ओ मनि माय ओ, कस काय ?
पांडु : समजिलेना माय ,तुना बाप न काय जाइ ह्राय न...............

तुमी सगळा हसाडी रहाइनात थांबा आते मना नंबर
सायब्या : गयब्या दारु पिउ नको दारु पी पी मानुस हळुहळु मरस .
गयब्या: मग आठे मरानी जल्दी कोनले शे........