
१२ लिंबं ,
१ किलो साखर (४ मोठ्या वाट्या वरपर्यंत भरून),
मिठ,
३/४ वाटी लाल तिखट,
२ टिस्पून जिरेपूड,
१) लिंबं धुवून घ्यावीत. व्यवस्थित पुसून घ्यावी, पाणी राहू देवू नये. मध्यम आकाराच्या फोडी करून त्यातील बिया काढून टाकाव्यात. एका लिंबाच्या साधारण ८ ते १० फोडी कराव्यात.
२) फोडींना मिठ, तिखट, जिरेपूड लावून साधारण ८ दिवस स्वच्छ काचेच्या कोरड्या बरणीत भरून ठेवावे.
साखरेचा १ तारी पाक करावा (१ किलो साखरेला दिड वाटी पाणी). पाक गार करावा. त्या पातेल्यात ८ दिवस मुरवलेल्या लिंबाच्या फोडी घालव्यात. ढवळून बरणीत भरावे.
सर्व लोणचे बरणीत भरले कि बरणीच्या तोंडाशी १ मुठभर साखर घालून झाकण बंद करावे. लोणचे चांगले मुरायला ४-५ महिने लागतात.
लिंबं पातळ सालीची घ्यावी. जर लिंब जड़ सलीची असतील तर पाणी एकदम चांगले उकळवावे. गॅस बंद करून त्यात आख्खी लिंबं घालावीत आणि वर झाकण ठेवावे. पाणी गार झाले कि लिंबं व्यवस्थित पुसून घ्यावी आणि एकदोन तास वार्यावर ठेवावी म्हणजे पाणी पूर्ण निघून जाईल. मग वरच्या कृतीनेच लोणचे करावे.
limbache lonche recipe in marathi language
एक शन्का - साली सकट करयचा
एक शन्का
- साली सकट करयचा लगदा? आणि किती बारीक लगदा?
ओके.. थँक्स पौर्णिमा
ओके.. थँक्स पौर्णिमा
स्नेहमयी, हो सालीसकट
स्नेहमयी, हो सालीसकट करायचा.


लगदा हा बारिकच असतो
मिक्सरवर जितका स्मूथ होऊ शकेल तितका करायचा
Pages