
१२ लिंबं ,
१ किलो साखर (४ मोठ्या वाट्या वरपर्यंत भरून),
मिठ,
३/४ वाटी लाल तिखट,
२ टिस्पून जिरेपूड,
१) लिंबं धुवून घ्यावीत. व्यवस्थित पुसून घ्यावी, पाणी राहू देवू नये. मध्यम आकाराच्या फोडी करून त्यातील बिया काढून टाकाव्यात. एका लिंबाच्या साधारण ८ ते १० फोडी कराव्यात.
२) फोडींना मिठ, तिखट, जिरेपूड लावून साधारण ८ दिवस स्वच्छ काचेच्या कोरड्या बरणीत भरून ठेवावे.
साखरेचा १ तारी पाक करावा (१ किलो साखरेला दिड वाटी पाणी). पाक गार करावा. त्या पातेल्यात ८ दिवस मुरवलेल्या लिंबाच्या फोडी घालव्यात. ढवळून बरणीत भरावे.
सर्व लोणचे बरणीत भरले कि बरणीच्या तोंडाशी १ मुठभर साखर घालून झाकण बंद करावे. लोणचे चांगले मुरायला ४-५ महिने लागतात.
लिंबं पातळ सालीची घ्यावी. जर लिंब जड़ सलीची असतील तर पाणी एकदम चांगले उकळवावे. गॅस बंद करून त्यात आख्खी लिंबं घालावीत आणि वर झाकण ठेवावे. पाणी गार झाले कि लिंबं व्यवस्थित पुसून घ्यावी आणि एकदोन तास वार्यावर ठेवावी म्हणजे पाणी पूर्ण निघून जाईल. मग वरच्या कृतीनेच लोणचे करावे.
limbache lonche recipe in marathi language
लिंबाचं गोड लोणचं म्हणजे मला
लिंबाचं गोड लोणचं म्हणजे मला जीव की प्राण. अतिशय आवडतं. रोज रोज खाऊ शकते.
धन्स ग दक्षे इतक्या पटकन
धन्स ग दक्षे इतक्या पटकन प्रतिसाद दिल्या बद्दल
तोपासु. मी कालच आवळ्याच लोणच
तोपासु.
मी कालच आवळ्याच लोणच केल.
अरे वाह आवळ्याच लोणच.....
अरे वाह आवळ्याच लोणच..... पा.कृ दे ना
मस्त.. तों पा सू......
मस्त.. तों पा सू......
लिंबाचं गोड लोणचं आवडीचचं पण
लिंबाचं गोड लोणचं आवडीचचं पण लोणचे चांगले मुरायला ४-५ महिने लागतात.
हे वाक्य फारच डिप्रेसिंग आहे. एवढा धीर कोणाला धरवणार.
लिंबाचं लोणचं फारच आवडीचं
लिंबाचं लोणचं फारच आवडीचं आहे. फोटो बघूनच तोंपासु!
मी पण आज केले. पण मी वाफवून
मी पण आज केले. पण मी वाफवून करते . ४-५ दिवसात रेडी.
तोपासु.
तोपासु.
मी पण एक सोप्पी रेसिपी सांगू
मी पण एक सोप्पी रेसिपी सांगू का लिंगोलो ची?
सांग दक्षे
सांग दक्षे
तो.पा.सु. लोणच बघून, मी पण
तो.पा.सु. लोणच बघून, मी पण भाजी इतक गोड लोणच खाते.
दक्षिणा, प्लीज दे. मला उपयोगी होईल.
२५ लिंबं धुवून पुसून चांगली
२५ लिंबं धुवून पुसून चांगली कोरडी करून त्याच्या नेहमीप्रमाणे फोडी करायच्या. निघतील तितक्या बिया काढायच्या, राहतील त्या राहू देत. साधारण अर्धी बरणी फोडी झाल्या तर बरणीचा तळ झाकला जाईल इतकं मीठ अंदाजे (साधारण पाव/अर्धा वाटी) घेऊन ते त्या फोडींवर टाकायचं. घराला गच्ची असेल आणि तिथे ऊन्ह येत असतील तर तिथे नाहीतर ती बरणी घट्ट झाकण लावून घरात आत ठेवायची. रोज सकाळी उलटी पालटी करायची. म्हणजे हलवायची. मिठाच्या पाण्यात त्या फोडी ४ दिवसात चांगल्या मूरतात. चौथ्या दिवशी एक किलो साखरेचा एक तारी पाक करायचा.... आणि त्यात एक वाटी (छोटी) लाल तिखट घालायचं आणि हलवायचं. पाक किंचित घट्ट झाला आणि तिखट त्यात नीट मिक्स झालं की त्यात लगेच त्या फोडी घालून भराभर हलवायचं. पातेलं झाकून तसंच ठेवायाच. थंड झालं की बरणीत भरायचं... खायला तयार.
थोडी चव घेऊन पहायचं मीठ लागलं
थोडी चव घेऊन पहायचं मीठ लागलं तर अजून घालायचं वरून.
>>> लोणचे चांगले मुरायला ४-५
>>> लोणचे चांगले मुरायला ४-५ महिने लागतात.
नाय नाय.. जास्तीत जास्त ७ दिवसांत हे लोणचे तयार होते. हा स्वानुभव..
तोंपासू अगदी
तोंपासू अगदी
फोटो भारी आहे. ज्यांना धीर
फोटो भारी आहे.
ज्यांना धीर धरवत नाही त्यांनी बेडेकरांचं तयार लोणचं आणा. चांगलं लागतं ते पण.
पण पातळ सालीचे लिंब कुठे
पण पातळ सालीचे लिंब कुठे मिळणार....सगळे हायब्रिड जाड सालीचेच मिळतात..
सोपं आहे करायला. फोटोही छान
सोपं आहे करायला. फोटोही छान आलाय.
केप्र च्या लिंबू लोणच्याला पर्याय नाही. ते जोवर मिळतेय तोवर माझ्याकडून काही लोणचं करणं होणार नाही
मस्त दिसतय लोणचं !
मस्त दिसतय लोणचं !
मी योजकच्या गोलिंबू लोणच्याची
मी योजकच्या गोलिंबू लोणच्याची फॅन.
केप्रेचा लोणच मसाला चांगला आहे.
दक्षिणा धन्यवाद.
मस्त दिसतंय !
मस्त दिसतंय !
वॉव. वरची आणि दक्षिणाची
वॉव. वरची आणि दक्षिणाची दोन्ही रेसिप्या एकदम लाळगाळू आहेत.
मी झटपट लिंबाचं लोणचं करते. लिंबं चिरून बिया काढून टाकायच्या आणि पाणी न घालता कूकरला शिजवून घ्यायच्या. शिजून गार झाल्यावर मिक्सरमधून लगदा
करून घ्यायचा. जितका लगदा असेल त्याच्या दुप्पट साखर आणि चवीपुरतं मीठ मिक्स करून गॅसवर दोन चटके द्यायचे.
उपासाला हवं असेल तर त्यात आलं किसून, जिरं आणि तिखट घालायचं.
उपासाला नको असेल तर लोणचं मसाला घालायचा.
निम्मा गूळ आणि निम्मी साखरही घालू शकतो. त्यामुळे लोणच्याला वेगळीच चव येते. मला आवडते
हे झटपट लोणचं चिकार टिकतं. मी एकावेळी डझन लिंबांचं करते. संपलं की परत करते. काहीच खटपट नाही. त्यामुळे लोड घ्यायची गरज नसते
आजच केलंय. जमलं तर फोटो टाकते.
पौर्णिमा, भारी वर्णन आहे!
पौर्णिमा, भारी वर्णन आहे! फोटू टाकच प्लीज!
मस्तच पण मला वाटले आप्ल्या
मस्तच
पण मला वाटले आप्ल्या लिंबाजीचे लोंणचेच आहे काय?
पौणिमा तुम्ही दिलेली वाफवुन
पौणिमा तुम्ही दिलेली वाफवुन वाली रेसिपि केली आणि मस्त लोणचे झाले. मनापासून धन्यवाद!
पौर्णिमा तिखट कधी घालायचं?
पौर्णिमा तिखट कधी घालायचं?
उद्या करून पाहिन, पटकन सांग प्लिज.
Dakshina I mixed sugar first
Dakshina I mixed sugar first and then tikhat, jeere ani aale mixer madhe firavun add kele ani sagale ektra shijavale. Sorry mobile varun marathi kasa type kartat mahit nahi
पौर्णिमा, मी तुझ्या रेसिपीनं
पौर्णिमा, मी तुझ्या रेसिपीनं लोणचं केलं पण जरा कडसर चव आली आहे.. काय चुकलं असेल माझं
चिवा, लिंबाची बी चुकून वाटली
चिवा, लिंबाची बी चुकून वाटली गेली असेल तर कडसर लागेल.
लोणचं बाहेर ठेव, फ्रीजमध्ये नको. मुरेल तसतसा हा कडसरपणा जाईल.
दक्षिणे, उशीर झाला हे सांगायला
पण चटका देतानाच त्यात तिखट/ आलं/ जिरेपुड/ लोणचं मसाला वगैरे घालायचं.
Pages