'आपण या पदावर आलो तेव्हा डॅड निदान जिवंत तरी हवे होते.. निवृत्त असते तरी चालले असते..'
मोनालिसाच्या मनात गेल्या आठ दिवसात येणारा हा विचार आज सकाळी मात्र फारच प्रकर्षाने आला.
एक तर स्त्री असल्याने एक विशिष्ट कॅज्युअल दृष्टिकोन होता सगळ्यांचाच! अगदी गोरेसुद्धा अपवाद नाही. त्यात नवीनच जॉईन झालेली! त्यामुळे 'आम्हाला हे सगळं आधीपासूनच माहीत आहे, तुम्ही आत्ता आलात' वाला अॅप्रोच! आणि त्यात वयाने लहान! केवळ पंचवीस! त्यामुळे तर अगदीच लाईटली घेणे चालू होते. पण हा प्रकार होण्यास सगळे जबाबदार नव्हते. फक्त सहा, सात जण! अर्देशीर सर, लोहिया अंकल, सुबोध, जतीन, गोरे, बिंद्रा आणि जोशी! म्हणजे निदान अजूनपर्यंत तरी! मेहरा का कुणास ठाऊक, मोनापासून लांबच राहात होते. पण मोनाला इंटरेस्ट होता तो दोन गोष्टींमध्ये!
मेहरांचा सल्ला ऐकूनच डॅडनी सुबोधला जपानला जायला सांगीतले असेल का?
आणि..
सुबोध जपानला गेला होता का?
हे शोधणे फारसे अवघड नव्हते. मेहरांना जरी काहीही विचारणे शक्य नसले तरी दुसर्याच दिवशी सकाळी तिने एच आर चा हेड कुमार भसीनला केबीनमध्ये बोलावले होते. आणि कुमारला तिने सांगीतले की कंपनीची ट्रॅव्हलिंगची कॉस्ट किती आहे आणि त्यातील नियम कसे कसे बदलता येतील व कॉस्ट कशी नियंत्रीत करता येईल हे तपासण्यासाठी गेल्या वर्षीच्या प्रत्येक इंटरनॅशनल टूरची डिटेल्स आणि डोमेस्टिक ट्रॅव्हलपैकी जेवढे ट्रॅव्हल ए.जी.एम अॅन्ड अबोव्ह लेव्हलने केले आहे त्याची डिटेल्स ताबडतोब द्या!
खरे तर भसीनने नुसते सिस्टीममधून 'ट्रॅव्हलिंग एक्स्पेन्सेस्'चे स्टेटमेंट दिले असते तरी अंदाज येण्यासारखा होता. पण भसीनला हे समजत नव्हते की परदेश प्रवासाचे सर्व कागद, अॅप्रूव्हल्स आणि अॅक्च्युअल बिल्स मॅडम कशासाठी मागत आहेत.
पण! केवळ पाऊण तासात त्याने सगळी रेकॉर्ड्स पाठवली.
आणि दोन तासांनी मोनालिसाला तो शोध लागला.
सुबोध गुप्ता संपूर्ण वर्षात कोणत्याही परदेश प्रवासाला गेलेला नव्हता. तसेच, जपानला किंवा ओकुहामा या कंपनीला कुणीही गेलेले नव्हते. जर्मनीला मात्र लोहिया, अर्देशीर सर आणि बिंद्रा तिघेही दोन दोन वेळा जाऊन आले होते.
मोनालिसाने भसीनला पुन्हा बोलावले. भसीन तिशीचा असल्यामुळे त्याच्याशी अरे तुरे च्या भाषेत बोलायला तिला काही वावगे वाटत नव्हते आणि त्यात भसीनलाही काही वाटत नव्हते.
मोना - कुमार.. ही डिटेल्स पाहिली मी.. मला वाटते... सध्याच काही नवा नियम नको करायला.. कारण त्याचा कदाचित मानसिकतेवर काहीसा परिणाम होऊ शकतो...
कुमार - येस मॅम...
मोना - फक्त... आणखीन काही करता येईल का हे पाहण्यासाठी मी ही डिटेल्स जरा घरी घेऊन जातीय...
कुमार - शुअर मॅम...
मोना - उद्या किंवा परवा देते...
कुमार - राईट...
कुमार जायला उठला आणि दारात गेला तेव्हा मोनाने पुन्हा हाक मारली.
"कुमार.. ..."
"... येस मॅम??"
"या डिटेल्समध्ये... कॅन्सल झालेल्या ट्रीप्सची डिटेल्स नाही आहेत ना??"
"कॅ...ओह.. नाही नाही.. ती यात नाही आहेत..."
"पण... अशा ट्रीप्सच्या तिकिटांचे कॅन्सलेशन वगैरेही कॉस्टच असणार ना?"
"होय.. ती कॉस्ट आपण स्टेटमेन्टमध्ये पकडतो.. पण ही डिटेल्स तुम्ही म्हणालात तशी दिली मी.. जे ट्रॅव्हलिंग अॅक्च्युअली झाले तेवढ्याचीच दिली..."
"या या.. नॉट अ प्रॉब्लेम.. पण.. जे ट्रॅव्हलिंग नाही झाले त्याची डिटेल्स असतील आपल्याकडे??"
"असायला पाहिजेतच... हवी आहेत का??"
"हं! कारण निदान ती कॉस्ट तरी कंट्रोल करता येईल ना..."
"वेल.. दॅट वोन्ट बी मोर दॅन अबाउट... पॉईन्ट फाईव्ह परसेंट ऑफ द टोटल कॉस्ट..."
"आय नो... बट.. स्टिल.. आय मीन्..इट्स अ कॉस्ट.. सो... काइंडली गेट दोज डिटेल्स.."
"शुअर मॅम..."
मोनालिसाच्या केबीनमधून बाहेर पडणार्या कुमार भसीनला एवढे निश्चीत समजलेले होते की एक अत्यंत मूर्ख स्त्री या पदावर पोचलेली आहे.
आणि बरोब्बर दुपारी चार वाजता मोना पुन्हा एकदा सुन्न झाली होती... हातातून कागद होता तसाच निसटून टेबलवर पडला होता.
कॅन्सल झालेल्या ट्रॅव्हल्सच्या कागदपत्रांमध्ये एक जपानची ट्रीप कॅन्सल झाली होती. ती कॅन्सल होण्याचे कारण होते लोहिया अंकलनी अॅप्रूव्हल न देणे.. ! अॅप्रूव्ह न करण्याचे कारण होते की जपानच्या ओकुहामा कंपनीचे रेप्युट लोहियांच्या मते फारसे चांगले नव्हते. आणि... ती ट्रीप सुबोध गुप्ता करणारच नव्हता.
कंपनीत आणखीन एक सुबोध होता. फक्त त्यांना मोनालिसा ... मिस्टर मेहरा म्हणून ओळखत होती.
पर्चेस अॅन्ड सप्लाय चेन हेड - सुबोध मेहरा...
आणि तो विषय डोक्यात असला तरी चेहर्यावर त्याचा लवलेषही न दाखवता गेले चार दिवस मोना ऑफीसमध्ये नुसतीच येऊन बसत होती आणि विविध फाईल्स उगाचच चाळत असतानाच आज हा आणखीन एक धक्का बसला होता.
हा धक्का बसल्यानंतरच तिला प्रकर्षाने जाणवले होते. की आज डॅड खरच असायला हवे होते.
रिझॉल्युशन प्रमाणे ई.डी. चाळिस लाख, जॉईंट एम्.डी. साठ लाख, ते दोघे मिळून ऐंशी लाख आणि त्या पुढील अमाऊंटसाठी एम्.डी.ची सही लागणे असा नियम होता. एम्.डी. स्वतः एक कोटीपर्यंतची पेमेंट्स करू शकेल असे नोंदवलेले होते. मात्र त्यापुढील पेमेंटसाठी मात्र एम.डी आणि दोघेही डायरेक्टर्स यांच्या सह्या आवश्यक होत्या.
आणि हा नियमच बदलण्याचा अंतर्गत प्रस्ताव अचानक समोर आला होता.
बोलणे नाही, चालणे नाही! असे करुयात का हे विचारणेही नाही. डॅड असते तर असा ड्राफ्ट आला असता अचानक??
अर्थात, आपल्याला बोलावेच लागणार आहे!
तिने गोरेकडून लोहिया अंकलना फोन लावला.. हा तिचा ऑफीसला जोईन झाल्यावर एम्.डी. या भूमिकेतून पहिला फोन होता त्यांना!
"हाय अंकल.. मोना..."
"हाय बेटा.. हाऊ आर यू... हाऊ आर यू फीलिंग इन ऑफीस?"
"या.. इट्स ग्रेट... मिसिंग डॅड दो.."
"वुई ऑल आर मिसिंग हिम बेटा... कीप करेज... "
"शुअर.."
"टेल मी.. "
"अंकल... धिस चेन्ज इन द सायनिंग ऑथोरिटीज.. इज अॅक्च्युअली.. आय मीन.. "
"नो नो.. इट्स जस्ट अ फॉर्मॅलिटी... तू नवीन आहेस... समजा कुठे बाहेर वगैरे गेलीस परदेशात .. किंवा ऑफीसमध्ये नसलीस तर... जस्ट एक कन्व्हिनिअन्स म्हणून आपण ती प्रोव्हिजन करतोय.."
"ओह.. अर्थात.. मी फक्त उत्सुकता म्हणून विचारले..."
"या शुअर... आय मीन.. यू कॅन कॉल मी एनीटाईम बेटा..."
"अंकल... मी तर... कायम इथेच बसणार आहे... आणि... मला वाटते... की.. इतक्या मोठ्या रकमांचे चेक्स बहुधा अचानक रिलीज करायची वेळ फारशी येत नसेल नाही??"
"ओह.. अजिबातच नाही.. इट वॉज जस्ट अ ... प्रोव्हिजन अॅज आय सेड.."
"ओके.. देन.... डोन्ट वरी अंकल... आय अॅम ऑल्वेज इन ऑफीस.. यू कॅन टेक माय साईन ऑन द चेक्स एनीटाईम... ... आय फील.. लेट्स नॉट मेक ऑल दिज चेंजेस... बिकॉझ... "
"....... ..... येस... बिकॉज?????"
"बिकॉज यू आर अॅट मुंबई.. अर्देशीर सर डझन्ट कम टू ऑफीस एव्हरीडे... व्हेअरअॅज.. आय अॅम हिअर ऑल्वेज... इट इज बेटर दॅट द ओरिजिनल सिस्टीम इज मेन्टेन्ड... व्हॉट डू यू फील अंकल???"
"अॅबसोल्यूटली.. माझ्या हे लक्षातच आलं नव्हतं की अर्देशीर हल्ली फारसे येत नाहीत.. बरं झालं.. तू असतेसच ऑफीसमध्ये!.. गूड... आय विल टेल अर्देशीर दॅट हिज आयडिया वॉज नॉट प्रॅक्टिकेबल दॅट मच..."
"ओह... म्हणजे... आय होप आय हॅव्ह नॉट... हर्ट ..."
"छे छे... काय बोलतेस बेटा?? .. डोन्ट वरी... यू हॅव्ह टेकन अ व्हेरी गूड डिसीजन.. आय अॅम प्राउड.."
फोन ठेवून, गोरेला बोलवून, ती फाईल त्याच्याकडे देऊन मोना पुन्हा समोरच्या भिंतीकडे पाहण्यात गुंगली.
ही कल्पना अर्देशीर सरांची होती? का? त्यांना काय प्रॉब्लेम आहे? ते तर स्वतः येतही नाहीत रोज! मग इथे कोण कोणत्या चेकवर सही करतोय हे पाहण्यात त्यांना काय रस? असो! लोहिया अंकलना आपले पटले हेच भरपूर आहे.
त्याच क्षणी गोरेने शहाणपणा केला..
"मॅडम... सह्या केल्याच नाहीत आपण्..ड्राफ्टवर.."
"गोरे... यू जस्ट सेन्ड इट बॅक टू फायनान्स.. डोन्ट वरी अबाऊट अदर थिन्ग्ज..."
"सॉरी मॅडम.."
गोरेला आपण इतक्या कमी कालावधीत असा वाजवायला हवा होता की नाही हे तिला आत्ता ठरवता येत नव्हते. पण जरा तरी जम बसायलाच हवा होता. गोरेला काय घेणे देणे मी सह्या केल्या की नाहीत याच्याशी?
आणि मग तोही विचार तिच्या मनात आला...
गोरे इथे बसून... तिकडची चमचेगिरी तर करत नसेल ना??
मोना अंतर्बाह्य असुरक्षित फील करत होती या क्षणी!
आपण इथे अजिबातच नको असलो तर? काय फरक पडतो? ५१ % शेअर्स आहेत आपले. भरपूर फायदा मिळत राहिला असता. घर आहेच! पैसा तर अफाट आहे. प्लस पगार म्हणून एक लाख पंचाहत्तर हजार महिन्याला घरात पोचले असते. आपण इथे येऊन का बसतो आहोत? आपल्याला काय देणे घेणे गिअर शेव्हिंग मशीन्स का विकत घेतली जुनाट? हा गोरे असा का यावर विचार करण्याच्या पातळीला आपण का यावे? हा गोरे एक पस्तीस हजार मासिक वेतन मिळवणारा माणूस आहे. तेही आपल्याच पैशांमधून! मग याचे आपल्याला टेन्शन का यावे? आपण तर याला झुरळासारखा झटकू शकतो. दुसरा पी ए ठेवू शकतो. आपण ही मानसिक प्रेशर्स नक्की का घेतोय??
डॅड? डॅडसाठी? का? ते तर गेले केव्हाच! आपल्याला का वाटत आहे की डॅडच्या मनाप्रमाणेच हा बिझिनेस चालायला हवा? फायदा मिळतोय ना? मग? आपलं वय काय? आपला अनुभव काय? शिक्षण काय? आपल्यासमोर कितीतरी आयुष्य आहे. नुसते आहेत तेवढे पैसे उधळत बसलो तरी या पूर्ण जन्माला पुरतील इतके पैसे आहेत. आपल्याला या कटकटी का हव्याश्या आहेत?
येस्स! मिस मोनालिसा गुप्ता.. तुमच्या रक्तात तीन गोष्टी वाहतात.. रक्ताच्याच बरोबर.. एक म्हणजे.. डॅडचे रक्त... ज्याला केवळ शुद्धता व धडाडी माहीत आहे.. दुसरे म्हणजे.. यू आर स्मेलिंग समथिंग.. डॅडची निश्चीतच काहीतरी कुचंबणा होत असावी असे तुला कायम वाटू लागले आहे... आणि तिसरे म्हणजे.. ही कंपनी तुझी आहे.. इट इज यूवर्स... नॉट एनीवन एल्सेस... त्यामुळे.. ही तुला चालवायचीच आहे..
तेव्हा आता.. नो लुकिंग बॅक... गेले उडत सगळे विरोधक... मोनालिसा काय चीज आहे ते दखवावेच लागेल..
मग... आता नेमकी काय पॉलिसी अंगिकारायला हवी आपण? प्रेम?? ह्यॅ! प्रेमाने जग जिंकता येतं ते जग वेगळं असतं! ते कुटुंबातील नात्यांमध्ये कदाचित शक्य आहे. तसं असतं तर रामायणे आणि महाभारते झालीच नसती. समजा दुर्योधनावर सर्व पांडवांनी फक्त प्रेमच केलं असतं तर? आयुष्यभर अज्ञातवासातच जगावं लागलं असतं द्रौपदीला हस्तिनापुरात सोडून!
प्रेमाने जिंकता येण्यासारखी माणसे नाही आहेत आपल्या बाजूला! आता आपल्याला लहानपणचीच एक छोटीशी मुलगी समजणारे अर्देशीर अंकल आणि लोहिया अंकल नाही आहेत. आपल्याला चिडवून बेजार करणारा आणि नंतर भरपूर खाऊ देऊन पुन्हा फिरायला नेणारा जतीन तोच जतीन राहिलेला नाही. नाहीतर त्या दिवशी असे वाक्य बोललाच नसता. स्त्री पुरुषाच्या मदतीशिवाय जगू शकत नाही असे! किती झोंबतंय ते वाक्य अजून आपल्याला! एक दिवस येईल.. जेव्हा सगळ्यांना समजेल... मोनालिसा असल्यामुळेच सगळे नीट जगू शकतायत... फक्त... तो दिवस येण्याची स्वप्ने बघत बसणे शक्य नाही आहे.. तो दिवस खेचायला लागणार आहे आपल्याला.. निर्माण करावा लागणार आहे आपल्या आयुष्यात.. तो निर्माण होऊ नये म्हणून संपूर्ण गुप्ता हेलिक्स कदाचित आपल्याला विरोध करेल... डॅड.. वर जिथे असाल तिथून मला आशीर्वाद आणि सपोर्ट करा... एवढंच म्हणते.. ही तुमची कंपनी आहे.. मला असे वाटत आहे .. नक्की माहीत नाही पण नुसतेच वाटत आहे... की इथे काहीतरी शिजत असावे... आणि ते... ते मी मुळापासून नष्ट करणार आहे.....
त्यासाठी.. मला अत्यंत कुटील डाव खेळावे लागले तरी बेहत्तर... काही वेळा.. माणुसकी सोडावी लागली तरी बेहत्तर... मोनालिसा गुप्ता ही स्त्री सगळ्यांना पुरून उरेल.... स्त्रीला इतके कॅज्युअली घेणे पूर्ण चुकीचे आहे हा धडा सगळे शिकतील डॅड... एव्हरीवन विल लर्न द ब्लडी लेसन...
"गोरे... भसीनला बोलवा..."
एका दिवसात तीनदा एम्.डी ने का बोलवावे हे काही केल्या कुमार भसीनला समजेना! तो आत्ताही समोर बसला होता मोनाच्या!
मोना - कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ सोडून.. जे जे आपल्या रोलवर आहेत.. त्यातील प्रत्येकाच एकेक कागद... ज्यावर त्याचे नाव, पत्ता. क्वालिफिकेशन, अनुभव, गुप्ता हेलिक्समधला कालावधी, प्रमोशन्स, इन्क्रिमेंट्स, प्रॉब्लेम्स, सध्याचा रोल... असं ... सगळं मिळी शकेल..
भसीन - वेल... ही माहिती आपल्याकडे आहे हे नक्कीच... पण.. वेगवेगळ्या ठिकाणी आहे...
मोना - किती वेळ लागेल??
भसीन - ... दोन तास..
मोना - संध्याकाळी सात वाजता मिळेल?
भसीन - ओके..
मोना - मी थांबलीय...
भसीन - आपण.. वाटल्यास.. घरी जाऊ शकता.. मी इथे पाठवेन....
मोना - ओके?? मग निघते मी.. पण.. सात वाजता पाठव नक्की...
भसीन - नक्कीच.. तिथे पोचायलाच समजा वीसेक मिनिटे लागली तर तेवढीच..
मोना - शुअर.. साडे सातला मी वाट पाहायला लागेन....
भसीन उठून जायला निघाला...
"आणखीन एक... "
"... येस मॅम..??"
"गेल्या दोन वर्षात... जे सोडून गेले... त्यांची हीच सगळी माहिती..."
आपण एका महामूर्ख बाईकडे बघत आहोत आणि ती महामूर्ख आहे असे आपल्याला जे वाटत आहे ते तिला कळू नये यासाठी आपल्याला प्रयत्नपुर्वक आपला चेहरा सरळ ठेवावा लागत आहे इतकेच भसीनला समजले.
आणि बरोब्बर आठ वाजता सायराने दिलेल्या शिवास रीगलचा पहिला पेग जीभेवर अलगद सोडताना... मोनालिसाने घरात आलेली संपूर्ण डिटेल्स चाळायला घेतली होती.
आज तिने मनातच ठरवले. उद्या ऑफीसला जायचेच नाही. थेट परवा सकाळी जायचे. आणि उद्या रात्रीपर्यंत, आपल्या स्टाफमध्ये जे एकंदर २५७ लोक आहेत, त्यांची शक्य तितकी माहिती आपल्याला पाठ व्हायला हवी. क्वालिफिकेशन आणि पत्ते तर नाही होणार! पण.. निदान गुप्ता हेलिक्समधला अनुभव, रोल आणि झालेली प्रगती किंवा घडलेल्या हरकत घेण्यास पात्र अशा बाबी! आय मस्ट नो हू इज डुईंग व्हॉट... अॅन्ड... ऑफकोर्स.. व्हाय..!!!
सुरुवातीला तिने २८ की पोझिशन्सवर असलेल्यांची एक वेगळी यादी तयार केली मॅन्युअली! ती वेगळी ठेवली. चक्रावून टाकणारी बाब म्हणजे कर्मचार्यामंध्ये सायराचेही नाव होते. तेही तिने त्या यादीत लिहून ठेवले. आजवर तिला वाटायचे की सायराला डॅड पर्सनल अकाउंटमधून पगार देतात. पण तिची सॅलरी गुप्ता हेलिक्सकडून येत होती. त्यानंतर संपूर्ण कागद दोन वेळा पुन्हा तपासले. डोळ्यावर आता झोप येत होती. पण झोपून चालणार नव्हते. उद्या जमलेच तर ऑफीसलाही जाऊ असे ठरवले होते तिने! पण हे काम नियंत्रणात आल्याशिवाय नाही! त्यामुळे टिच्चून बसली होती ती! रात्री अकरा वाजता जेवण केले तिने! मोना झोपेपर्यंत सायरा झोपणे शक्यच नव्हते. त्यामुळे मोनाने तिला झोपायला सांगीतले. जाण्यापुर्वी काही खायच्या गोष्टी आणि आणखीन एक ड्रिन्क बनवून बेडरूममध्ये ठेवायला सांगीतले.
तिच्या मनात सतत विचार येत होता. आपण हे काय आणि कशासाठी करत आहोत. त्यातच तिला जाणवले. ही सगळी यादी पुण्यातील कर्मचार्यांची आहे. मुंबईचे वेगळेच! कंटाळा आला या विचाराने! पण अजूनही काहीही असे सापडत नव्हते जे वाचून झोप उडावी!
मध्यरात्रीचा एक! मोना उठली. एक मस्त धुंद होती खरे तर मनावर! पण ती धुंद मनावर आधीच असलेल्या ताणामुळे आणि स्वतःच्या चिवट स्वभावामुळे आत्ता जाणवतही नव्हती. जरा फ्रेश वाटावे म्हणून मोनाने इतक्या रात्री बाथ घेतला. आणि...
... बाथ घेता घेता टबमध्येच ती दचकली...काय वाचले आपण?? ओह... मूर्ख आहोत आपण.. इतके कसे समजले नाही?? ... आय शूड हॅव्ह लुक्ड अॅट इट दॅट वे फ्रॉम द बिगिनिंग ओन्ली...
घाईघाईत मोना पुन्हा बेडवर आली. काही कागद तपासल्यानंतर ती गोष्ट कन्फर्म झाली.
खरे म्हणजे.. तीन गोष्टी कन्फर्म झाल्या... वरवर वाटायला अगदीच किरकोळ... पण.. काही शंका येत असली अन नीट बघितले तर.. निश्चीतच त्यात घोळ जाणवावा...
मोना पाचगणीला शिकायला असतानाच्या काळात कधीतरी... सायरा बंगल्यावर केअर टेकर म्हणून जॉईन झाली होती... आणि... तिचा मूळ पत्ता जो होता... तो ..चक्क हरयाणातील पिंजोर गावातला होता... आणि... .. आपली आत्या लग्नानंतर सासरी गेली ती पिंजोरलाच गेली... हे मोनाला व्यवस्थित माहीत होते... याचाच दुसरा अर्थ... सायरा ... जतीन खन्नामुळे गुप्ता हेलिक्सला जॉईन झालेली असल्याची ... फारच दाट शक्यता होती...
दुसरी गोष्ट म्हणजे... डॅडचा पी.ए. व्हायच्या अगोदर... गोरे अर्देशीर सरांचा पी.ए. होता दिड वर्ष! अगदी सुरुवातीच्या काळात!... ही फारच महत्वाची बाब वाटत होती...
आणि तिसरी म्हणजे.... पराग नावाचा जो ड्रायव्हर आत्ता मोनालिसाच्या मर्सिडीझवर होता... ही वॉज... ही वॉज ग्रॅज्युएट.. अॅन्ड... ही हॅड टेकन हिज स्कूल एज्युकेशन अॅट... सेन्ट बिशप्स... ही वॉज कॉन्व्हेन्ट एज्युकेटेड... त्याला इंग्लीश अतिशय व्यवस्थित येत असणार होतं... आणि सुरुवातीच्या काळात... सहा महिने तो... लोहिया अंकलची कार चालवत होता.. आता बंगल्याच्या चार आऊट हाउसेसपैकी एकात तो एकटाच राहात होता... सायरा आणि डॅड त्याच्याशी हिंदीत बोलायचे अन तोही... पण.. निश्चीतच त्याचं इंग्लीश सुपर्ब असणार होतं...
व्हॉट आय डू... अॅन्ड व्हॉट आय अॅम डुईंग... इज प्रॉबेबली... नोन टू समवन.. विथ एव्हरी मायन्यूट डिटेल...
काहीतरी बरेच सापडले या विचारात, काहीश्या समाधानात आणि काहीश्या चिंतेत मोनालिसा झोपली तेव्हा पहाटेचे अडीच वाजलेले होते... आणि... स्कॉचच्या तीन पेग्जची धुंद असूनही... मोना पहाटे चारला पुन्हा दचकून जागी झाली होती... केवळ दिड तासात...
पटकन दिवा लावून तिने पुन्हा सगळ्या कागदांचा गठ्ठा काढला अन बेडवर ठेवला. अत्यंत घाईघाईने तिने सगळे कागद विस्कटले. जागरण झाल्यामुळे झालेल्या लालभडक डोळ्यांनी ती घाईघाईत तो एक विशिष्ट कागद शोधत होती. आजची पहाटच अनेक रहस्यांना उलगडणारी असावी असे तिला वाटत होते. कुमार भसीनकडे आपण हे सगळे कागद मागीतले हेही कुणाला तरी माहीत असेल... पण.. हे कागद मागवल्यामुळेच आपल्याला अनेक गोष्टी समजत आहेत...
हाच तो कागद... शर्वरी कुंभार... पी.ए. टू मेहरा..
... सध्याचा पत्ता... वानवडी पुणे... कायमचा पत्ता... ... मालाड... मुंबई...
आणि... सुबोध गुप्ताचा कायमचा पत्ता... शिमला... आणि सध्याचा पत्ता.. मालाड .. मुंबई..
आत्ता मोनालिसाच्या चेहर्यावरचे विचित्र भयावह स्मितहास्य जर सायराने पाहिले असते तर दचकलीच असती.....
"... सायराSSSSSS"
'पहाटेचे सव्वा चार ही काय हाक मारायची वेळ आहे??? ' बेलचा आवाज ऐकून पाठोपाठ हाक ऐकून दचकून उठलेली सायरा स्वतःच्या रूममध्ये वैतागून पुटपुटत होती.
तिच्या खोलीत एक बेल ठेवलेली होती. जी डॅडच्या बेडरूममधून, स्टडीमधून, लिव्हिंग रूममधून आणि मोनाच्या बेडरूममधून वाजवता यायची. मोनाला त्या बेलची कधीच गरज लागायची नाही. पण.. आता ती गुप्ता हेलिक्सच्या सध्याच्या सर्वोच्च पदावर होती... ..
घाईघाईत सायरा तिच्या बेडरूममध्ये आली तेव्हा एकही कागद बेडवर नव्हता....
"येस मॅम.. डिड यू कॉल मी???"
"यॅह... आय नीड सम मेडिसीन्स... कॅन यू गो विथ पराग टू रुबी हॉल अॅन्ड गेट दोज??"
"शुअर मॅम.. काय होतंय??"
"प्रचंड डोकं दुखतंय आणि... हात पाय गळून गेलेत... "
"शुअर मॅम... मी.. परांजपेंना बोलवू का??"
"अंहं.. इतक्यात डॉक्टरची गरज नाही वाटत आहे.. तू फक्त औषधे घेऊन ये...
"शुअर मॅम... लिहून घेऊ?? काय काय आणायचे??"
दहाव्या मिनिटाला एक लांबलचक काळीशार एस क्लास मर्सिडीझ बंगल्यातून बाहेर पडत असताना...
... मोनालिसा सायराच्या खोलीत पोचलेली होती...
कोरेगाव पार्क पासून रुबी फार लांब नव्हते. पराग आणि सायरा परत यायला फक्त पंचवीस मिनिटे लागणार होती फार तर!
काहीही अस्ताव्यस्त झालेले नाही असे सायराला वाटणे अत्यावश्यक होते. अत्यंत अलगदपणे मोना तिचे कपाट, वस्तू यात काहीतरी शोधत होती.
शोधत होती म्हणजे काय शोधायचे आहे ते माहीत होते असे मुळीच नाही... पण... त्या स्वरुपाचे काहीतरी नक्कीच असायला हवे होते तिच्याकडे...
... जुने फोटो मिळाले... सायराचे आई वडील, भाऊ बहिणी.. छोटीशी सायरा... अंहं.. काहीच उपयोग नाही... सॅलरी स्लिप्स.. अंहं....
एक मात्र होतं... सायराचा वॉर्डरोब एखाद्या हिंदी नटीलाच काय मोनालिसालाही लाजवेल असा होता.. कधी हे सगळे परफ्युम्स ती वापरत होती कोण जाणे... इतके सगळे ड्रेसेस कधी घातलेले पाहिलेही नाहीत... कधी सुट्टीही घ्यायची नाही...
येशूची मूर्ती!...
टी.व्ही... रेडिओ... टेप... सगळंच आहे की खोलीत.. अरे??? अच्छा!... बाईसाहेब बीअरही घेतात... बरं! फ्रीज तर एकदम मस्त मस्त गोष्टींनी भरलेला आहे.... चॉकलेट्स.. केक्स.. बीअर... अरे वा??
अंहं! काहीच मिळत नाही आहे..
असे होणार नाही खरे तर... स्कूल अॅन्ड कॉलेज सर्टिफिकेट्स.. छान.. असेच काहीतरी हवे होते... अगदी फाईलला नाव वगैरे आहे की... अंहं.. यातही... काहीही...
.. सण्ण्ण्ण्ण्ण....
पाठीच्या मणक्यांमधून ४४० चा प्रवाह वाहावा तसा धक्का बसला मोनालिसाला..
... त्या फाईलमधील काही कागदांच्यामधे एका अगदी छोट्याश्या चिठ्ठीवजा कागदावर काहीतरी लिहीलं होतं... आणि ते चिठोरं.. स्टेपल किंवा चिकटवलेलं नव्हतं.. तसंच अडकलं होतं कागदांमध्ये...
मोनाबेटी१९८०...
हा पासवर्ड इथे कसा?? सायराचा गुप्ता हेलिक्सच्या ऑपरेशन्सशी संबंधच काय??
पोखरलेला आहे... आपला बंगला कुणीतरी पूर्णपणे पोखरलेला आहे...
काय हवं आहे कुणालातरी?? सगळी दौलत?? मग अशी .. अश्या पद्धतीने का हवी आहे?? या.. शेअर्स विकत घ्यायची हिम्मत दाखवा.. हे.. हे असले कसले भीतीदायक.. घाणेरडे प्रकार...
आणि हे अक्षर कुणाचं आहे?? आपल्याला कुठे माहीत आहे सायराचं अक्षर??
संपूर्ण फाईल उलटी करून झटकली मोनाने.. अश्याच आणखीन काही चिठ्या वगैरे पडतात की काय हे पाहायला...
... नाही पडल्या..
तिने पुन्हा ती फाईल दुसर्या खोलीत जाऊन अत्यंत घाईघाईने तपासली. बारीक अक्षरात जरी काहीही दिसले तरीही लक्षपुर्वक बघत होती...
मुळात.. सायरासारख्या तल्लख स्त्रीला पासवर्ड असा लिहून ठेवायची काय गरज?? पाठ नाही का होणार इतका सोपा पासवर्ड.. ???
कंटाळून आणि सायरा येण्याची काळजी वाटून मोनाने पटकन ती फाईल होती तशी ठेवली.. कपाट बंद केले... नाईट लॅम्पही बंद करून स्वतःच्या बेडरूममध्ये आली.. जणू फारच डोके दुखते आहे असा चेहरा करून आडवी झाली...
.... काहीच मिनिटात सायरा आणि पराग आले.. सायराने पाण्याबरोबर गोळ्या दिल्या.. ती निघून गेली असती तर मोनाने त्या घेतल्या नसत्या.. पण ती समोरच उभी राहिल्यामुळे दोन गोळ्या घ्याव्याच लागल्या.. एक पेन कीलर आणि एक अल्प्रॅक्स.. जी प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळायचीच नाही.. पण परांजपेंचे प्रिस्क्रीप्शन उगाचच घेऊन ठेवलेले होते डॅडनी कधीतरी... त्याचा उपयोग झाला.. ही गोळी गुप्तांची मुलगी घेणार आहे हे केमिस्टला माहीत असणे शक्य नव्हते... गुप्ता आहेत की गेले याचाही त्याने विचार केलेला नव्हता.. डॉक्टर आणि पेशंट दोघेही रेप्युटेड असल्यामुळे देउन टाकल्या होत्या गोळ्या...
मात्र.. मोनाने अल्प्रॅक्स गिळली नाही.. नुसतीच दाताखाली ठेवली.. सायरा लाईट बंद करून निघून गेली...
पैसा पैसा पैसा! नालायक लेकाचे सगळे! डॅड तरी इतके वेंधळे कसे? पासवर्ड गोरेला माहीत असणं एक वेळ समजू शकते! पण.. हिलाही समजला म्हणजे.. चेन असणार चेन.. पण.. शंका येत असूनही डॅडनी.. पासवर्ड बदलला का नसेल?? का?? ...
... मोनाबेटी१९८०... मोहनगुप्ता@गुप्ताहेलिक्स.कॉम.. मोनाबेटी १९८०... आपल्याला झोप का येत नाही आहे??.. शिवास रीगलचे तीन पेग घेऊनही?? ... आपण.. अचानक स्कॉच कशी काय घ्यायला लागलो गेल्या आठ दिवसात??
गोळी थुंकून मोना विचार करत होती अंधारात!
मी एकटी आहे?? पूर्ण एकटी?? का? कुणीच माझ्याबाजूने का नाही?? कुणाचे वाईट केले होते डॅडनी??
खाडकन मोना उठून बसली पुन्हा!
खरेच की! माणूस असा का वागेल?? एक तर डॅडनी त्याचे काहीतरी नुकसान केलेले आहे किंवा... डॅडना फसवून त्याला दौलत हवी आहे.. सत्ता हवी आहे...
नुकसान.. नुकसान... नुकसान...
काहीतरी झालं होतं खरं.. आपण लहान होतो तेव्हा.. काय झालं होतं?? डॅड खूप चिडले होते त्या दिवशी.. कुणावर?? आपल्याला काहीच कळायचं नाही.. पण.. ती एक फाईल होती खरी.. डार्क ब्ल्यू कलरची... नुकसान... कुणाचं नुकसान झालं होतं??? माहीत नाही.. पण डॅड म्हणत होते..
'व्हाय शूड आय डू इट अॅट द कॉस्ट ऑफ हेलिक्से'स बिझिनेस... युअर लॉस इज युअर हेडेक.. आय हॅव्ह नथिंग टू डू विथ इट मॅन..."
'मॅन'! कोण असेल तो मॅन???
सायराची काहीही भीती न बाळगता मोना उठून सरळ डॅडच्या स्टडीत गेली... सायरा आलीच... सायराची नजर किंचित गंभीर वाटली मोनाला... आणि बोलताना स्वरही.... कारण तिला स्वत:च्या रूममध्ये गेल्यागेल्याच मॅडम वापरत असलेल्या ब्ल्यू हेवन परफ्युमचा सुगंध खोलीत दरवळलेला जाणवलेला होता..
"नॉट फीलिंग लाईक स्लीपिंग मॅम??"
"अं?? नो.. नॉट रिअली... यू गो टू बेड.. डोन्ट वरी..."
"राईट मॅम.. हॅव अ गुड मॉर्निन्ग.."
"मॉर्निन्ग सायरा..."
खूप खूप जुने कागद, फायली काढून बसली होती मोना! मात्र त्या आधी तिने स्टडीचे दार आतून लॉक केलेले होते.
आणि.. रात्रभर अखंड अभ्यास करण्याचे फळ शेवटी मिळालेच...
अर्देशीर...
फिरोज मॉड्यूल नावाचं युनिट टाकलं होतं १९८७ मध्ये अर्देशीर सरांनी! चार हॉबिंग मशीन्स होती त्यात.. आता ते केव्हापासूनच सिक युनिट म्हणून अवशेषरुपात होतं भोसरीत.. खरच की.. आपण त्या पार्टीला गेलो होतो... या युनिट्मध्ये ते गुप्ता हेलिक्सचे गिअर हॉब करून देण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेत होते. डॅडनी मित्राला मदत व्हावी म्हणून ही अॅरेंजमेन्ट मान्य केली होती.
आणि.. केव्हातरी १९८८ मध्ये हळूच तीन गिअरबॉक्सेसही बनल्या होत्या त्यात.. म्हणजे.. अर्देशीर इकडे हेलिक्समध्ये... आणि त्यांच्या स्वतःच्या युनिटमध्ये तीन मोठ्या गिअरबॉक्सेस बनवल्या ... नुसते गिअर बनवता बनवता.. आणि... बोकारो स्टील प्लॅन्टला विकायलाही निघाले... टेंडर भरताना मात्र फिरोज मॉड्युल नावाने नाही भरले.. अलोकतोडी कन्सल्टन्ट्स रांची यांच्या नावाने भरले... आणि अॅक्च्युअल निगोसिएशन्सच्या वेळेस डॅडना समजले.. अलोकतोडी इज 'एल वन' आणि किंमतीतला फरक चक्क वीस टक्के! हू द हेल इज धिस अलोकतोडी??
बोकारोवाले मित्र असल्यामुळे नाव आणि इतर कागदपत्रे दाखवली. अर्देशीर साप निघाला होता. डॅडना समजले. डॅडनी एकही गिअरबॉक्स मुद्दाम सप्लाय केली नाही त्या वर्षी! कारण एल वन आणि एल टू या दोघांना /२५ गिअर बॉक्सेस' एवढी क्वांटिटी देणे शक्यच नव्हते. डॅडनी बोकारो स्टील प्लॅन्ट, अर्देशीर आणि आणखीन एक सप्लायर या तिघांचीही मजा बघितली.. खरच मजा आली... बोकारोने डॅडने कोट केलेल्या प्राईसवर इतर सतरा गिअर बॉक्सेस घ्यायची तयारी दर्शवली.. डॅडने अक्षरशः नाचवले .. देणारच नाही म्हणाले.. पूर्ण क्वांटिटी घेतलीत तरच देऊ... नाहीतर कॉस्टिंगच परवडत नाही.. गव्हर्नमेंट सेक्टरसमोर इतका स्ट्रॉन्ग स्टॅन्ड घेणे खरे तर चुकीचेही आहे आणि अशक्यही आहे.. पण घेतला डॅडनी... बोकारोवाले अर्जन्सीमुळे शरण आले.. मात्र सहा टक्के डिसकाउंट मात्र ताणून धरले त्यांनी.. शेवटी डॅडनीही मान्य केले..
पंचवीस गिअरबॉक्सेस सप्लाय झाल्या हेलिक्समधून.. एका वर्षात.. अर्देशीर यांनाच तो डिसपॅच बघावा लागला.. मात्र.. त्या आधी दोघांची प्रचंड भांडणे झाली.. कधी नव्हे ते डॅडनी अर्देशीरसारख्या जुन्या आणि वयाने मोठ्या असलेल्या माणसाला फोनवरून भयानक झापले... अर्देशीरही भांडतच होते..
शेवटी लोहिया अंकलनी मध्यस्थी केली.. सगळे मागचे विसरून पुढे जाऊयात असे ठरले.. अर्देशीर यांना आता पुन्हा गिअर हॉबिंगचे काम मिळू लागले हेलिक्सकडून.. पण डॅड ते डॅडच...
त्यांनी मनात राग ठेवून स्वतःकडची मशीन्स वाढवली हॉबिंगची.. अर्थात.. ते धंद्यासाठी योग्यच होते म्हणा.. अर्देशीर यांनी त्यातही 'घ्यायचीच तर माझीच मशीन्स घ्या' असा आग्रह करून पाहिला..
शेवटी... नव्या मशीन्सची सर्व्हिस आणि बाहेर काम देण्यापेक्षा इनहाऊस काम करण्यात असलेली बचत हे दोन्ही घटक मान्य करावेच लागल्यामुळे अर्देशीर यांचे युनिट आता फक्त इतर दोन गिअर बॉक्स मॅन्युफॅक्चरर्सवर अवलंबून चालू लागले.
त्याही दोघांनी मात्र मशीन्स घेतल्यावर... फिरोज मॉड्युल अक्षरशः बंद करावे लागले.. अर्देशीर इकडे भल्या मोठ्या पगारावर ई.डी. म्हणून आणि तिकडे त्यांचे स्वतःचेच युनिट दिवाळखोरीत निघाले.. जवळपास सत्तर लाख कर्ज झाले त्या काळी.... कसे आणि कुणी फेडले की काय केले काहीच नोंदवलेले नव्हते त्या फाईलमध्ये... !!!
'या सगळ्याचा बहुधा सूड घेतायत अंकल.. '
मोनाच्या मनात सहजच विचार आला. सगळा करस्पॉन्डन्स समोरच होता. डॅडच्या स्टडीतील पेपर अन पेपर वाचायला हवा असा विचार करून ती पुन्हा स्वतःच्या बेडरूममध्ये आली.
आणि तिच्या डोक्यात आत्ता कुठे प्रकाश पडला..
... अर्देशीर... फिरोज... दोन्ही नावे इराणी... पारशी...
आणि... जडेजा जरी डायरेक्टर असले तरीही... कंपनीचे नाव काय???
फारुख ऑटो... ....
... म्हणजे... गिअर शेव्हिन्ग मशीन्सचे कॉन्ट्रॅक्ट फारुख ऑटो रद्द करणार हे.. आधीच ठरले होते तर... त्या सगळ्या इमेल्स बोगस होत्या.. पण मग.. हे डॅडना कसे काय माहीत नव्हते?? की फारुख ऑटो अर्देशीर सरांची असू शकेल.. की नाहीच आहे त्यांची... आज पुन्हा मेहरांना भेटायला पाहिजे.. आपल्याला ऑफीसमध्ये 'न जाऊन' परवडणारच नाही.. आय मस्ट गो...
मोनाने सरळ आवरायलाच घेतले.. सायरा सकाळी उठली ती हादरून बघतच राहिली..
रात्री नऊ वाजता शिवास रीगलचे तीन पेग्ज आणि पहाटे चार वाजता अल्प्रॅक्स घेऊन ही मुलगी टक्क जागी कशी राहू शकते???
नशा! बिझिनेस ही एक नशा असते... स्पर्धेची नशा... अनेकदा पैशांसाठी काही करण्याचा प्रश्नच राहिलेला नसतो... आणि नेमकी तीच नशा मोनालिसा गुप्ताला झालेली होती...
पहिला चहाचा घोट घेताना शेजारीच असलेला फोन वाजला आणि मोनाने उचलला...
".. अर्देशीर..."
"स्सर.. टेल मी सर.. गुड मॉर्निन्ग.. "
"मॉर्निन्ग बेटा... आय हॅव अॅन आयडिया.. देअरफोर कॉल्ड यू... वेअर यू स्लीपिंग???"
"नो नो... टेल मी.. अं.."
"ओह.. यू कॅन कॉल मी अंकल बेटा.. आय फील वुई शूड सेल ऑफ दोज ओल्ड टाईप ऑफ शेव्हिन्ग मशीन्स अॅन्ड बाय न्यु वन्स.. आय नो अ गाय हू इज इन्टरेस्टेड इन बायिन्ग दिज मशीन्स... व्हॉट डू यू फील बेटा??"
"... ..आय... आय मीन.. ऑफकोर्स.. वुई मस्ट... अंकल.."
फोन ठेवला तेव्हा कालपासून केलेला संपूर्ण अभ्यास वाया गेल्याचे भाव होते मोनाच्या चेहर्यावर... अंकल तर... आपल्याच कंपनीच्या इन्टरेस्टचे बोलतायत...
.... आपण मूर्ख आहोत की काय???
पण... आपल्याला जे काय करायचंय ते मात्र करायलाच हवं...
पहिलं म्हणजे.. शर्वरी कुंभार... मेहरांची पी.ए. ... इतरत्र हालवायला हवी... गोरेला दुसरे काम द्यायला हवे... पराग ऐवजी.. एखादा वेगळा ड्रायव्हर ठेवायला हवा... सायरा.... सायराला हेलिक्सच्या एखाद्या बिनमहत्वाच्या डिपार्टमेंटला टाकता येतंय का ते बघायला हवं... आणि आजच्या आज...
... मेहरांना भेटायला हवं... ते... जपानला का गेले नाहीत.. डॅडच्या ते नक्की किती क्लोज होते... या सगळ्याचा अंदाज घ्यायला हवा...
मोनाने स्वतःच मेहरांचा नंबर लावला.. कंपनीत त्यांना भेटण्याऐवजी हॉलिडे इन ला ब्रेकफास्टला ते येतील का ते विचारणार होती ती...
"अरे??? मॉर्निन्ग मिस मोनालिसा..."
"मॉर्निन्ग मॉर्निन्ग मि. मेहरा... "
"येस?? एनीथिंग स्पेशल?? "
"नॉट रिअली.. आय जस्ट थॉट ऑफ.. यु नो?? हॅव्हिन्ग ब्रेकफास्ट टुगेदर अॅट हॉलिडे इन.."
"ओह... आय विश आय कूड.. रिअली...
"व्हाय?? व्हॉट हॅपन्ड??"
".. आय अॅम इन बॉम्बे करन्टली... "
"ओह... ओके?? सम अदर टाईम.. "
"फाईन... थॅन्क्स फॉर कॉलिंग.. हॅन अ नाईस डे मिस मोनालिसा... "
"थॅन्क्स.. टू यू टू.. मिस्टर मेहरा.. "
".... "
"..."
"... अं... हे... हॅलो... हॅलो... आर यू देअर?????"
".... येस... येस मिस्टर मेहरा??? "
"या.. आय जस्ट वॉन्टेड टू टेल यू वन थिन्ग हरिडली.. लेट्स डिस्कस द डिटेल्स लॅटर... "
"... यॅह??? अबाऊट व्हॉट??"
"दोज शेव्हिन्ग मशीन्स.. दे हॅव अनादर टाईप ऑफ बिग प्रॉस्पेक्टिव्ह अॅप्लिकेशन कमिंग इन निअर फ्युचर... आपण.. ती मशीन्स आता निश्चीतच कमिशन करायला हवी आहेत... कुणी विकायची वगैरे आयडिया काढली तर.. डोन्ट एन्टरटेन इट मिस मोनालिसा.... "
(No subject)
(No subject)
(No subject)
सॉलीड...बेफिकीरजी...काय
सॉलीड...बेफिकीरजी...काय टेरीफिक चालली आहे हो ही कथा...डोक्याला मुंग्या आल्या वाचून....
केवळ अफलातून.....पुढचा भाग लवकर टाका हो...
बिझिनेस ही एक नशा असते...
बिझिनेस ही एक नशा असते... स्पर्धेची नशा... झक्कास!!!!!!!!!!!!!!!!!
मस्तच बेफिकीरजी... किती
मस्तच बेफिकीरजी...
किती टिव्स्टस ... अफलातून...पु.ले.शु.
अप्रतिम...... त्या फील्ड्च
अप्रतिम...... त्या फील्ड्च मला फारस काही माहीत नाही म्हणुन अगदि लक्षपुर्वक वाचाव लागत.....हया कादंबरीतुन मिळेल ती नक्की....
खुपच छान लिहिलय...
पु.ले. शु
सॉलीड...
सॉलीड...
जबरदस्त!!! तुम्हाला एवढं
जबरदस्त!!! तुम्हाला एवढं सुचतं कसं काय? Hats off 2 u.....
बेफिकिरजी.. आम्हाला मोनाच्या
बेफिकिरजी.. आम्हाला मोनाच्या फिकिरीत टाकलत ना शेवटी!!!
तुम्ही प्रत्यक्ष भेटला कधी तर तुम्हाला दोन्ही हात जोडून नमस्कार करेन .. म्हणून आत्ता _/\_ हे स्वीकारा.. Hats off 2 u..अगदी अगदी
मस्त!!!!!!!!!
मस्त!!!!!!!!!
इंटरेस्टिंग ...
इंटरेस्टिंग ...
स ला म ...
स ला म ...
सुन्दर....... सावरी
सुन्दर.......
सावरी
बेफिकिरजी.. मस्त!!!!!!!! हा
बेफिकिरजी..
मस्त!!!!!!!!
हा वाचून झालाय चार वेळा आता पर्यन्त
पूढ्चा भाग कधी?
जबरदस्त!!! Hats off 2 u.....
जबरदस्त!!!
Hats off 2 u.....
सलाम बेफिकिरजी _/\_
सर्वांचे आभार मानतो.
सर्वांचे आभार मानतो.
Hats Off 2 U sir.
Hats Off 2 U sir.
खूपच उत्कंठावर्धक सुरवात आहे
खूपच उत्कंठावर्धक सुरवात आहे ..... कॉरपोरेट जगावर फारच छान भाष्य करणारी ... पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत.
एक शंका : आपण इथे अजिबातच नको असलो तर? काय फरक पडतो? ५१ % शेअर्स आहेत आपले. भरपूर फायदा मिळत राहिला असता. घर आहेच! पैसा तर अफाट आहे. प्लस पगार म्हणून एक लाख पंचाहत्तर हजार महिन्याला घरात पोचले असते. आपण इथे येऊन का बसतो आहोत?
>>>>>>>>>>>>>>>>> मोनाला केवळ एक लाख पंचाहत्तर हजार रूपये पगार?
एक तर स्त्री असल्याने एक
एक तर स्त्री असल्याने एक विशिष्ट कॅज्युअल दृष्टिकोन होता सगळ्यांचाच!
<<< त्या सर्वांचा निषेध !
ओल्ड माँकची नशा उतरायची आहे
ओल्ड माँकची नशा उतरायची आहे आजुन तर तेवढ्यात तुम्ही नवीन पेग भरलात "Madam"ची!!..भलताच झिंगलोय...पुढच्या भागाची वाट पाहतोय..!! येउद्या पुढचा भाग लवकर!!
कहानीमे ट्विस्ट.... वेगवान
कहानीमे ट्विस्ट....
वेगवान कथा... कोणावर विश्वास ठेवायचा नककी?
मोनाला त्या हार्ड ड्रिन्कची सवय लागायला नको मात्र..... काय आहे ना ड्रिन्क्स घेउन हतबल झालेल्या स्त्रिया बघवत नाहीत.....मोना कशी झाशीची राणी पाहायला आवडेल.
अर्थात ती तुमची कथानायिका आहे त्यामुळे तुम्ही तीला हवी तशी रन्गवू शकता पण राहावल नाही म्हणून लिहील....
नमस्कार बेफिकीरजी... मी
नमस्कार बेफिकीरजी...
मी तुमच्या कथा बरेच दिवस वाचतो आहे पण प्रतीक्रिया पहिल्यांदाच देतो आहे.
कोर्पोरेट जगावरचा हा प्लॉट मस्त जमतो आहे आणि खुपच उत्कन्ठावर्धक आहे. पण तुमच्या आधिच्या सगळ्या कथांमधे होती तशी प्रेमकहाणी ह्यात आणु नका एवढीच विनंती.
चौकट राजा
मस्त जमलिय! बेफिकीरजी
मस्त जमलिय! बेफिकीरजी तुम्हाला मानल!
बेफिकीर जी कोर्पोरेट जगाची
बेफिकीर जी
कोर्पोरेट जगाची खूप काही माहित नसूनही, तुम्ही दिलेल्या डिटेल्समुळे ही कथा चांगल्यापैकी समजायला लागली आहे.
कथेवर तुमची पकड अगदी जबरदस्त......as usual.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
पु.ले.शु.
नाद.... भावा....
नाद.... भावा.... नाद्द्द्द्द्द्द्द्द्द्द्द्द्द्द्द.
शब्द नाहित
मस्तच... मोनाचा अॅटिट्युड
मस्तच... मोनाचा अॅटिट्युड आवडला...बिझनेस खरोखरंच तिच्या रक्तातच असावा, नाहीतर त्यातलं इतकं समजणं, त्यावर इतका विचार करणं बिझनेसमधल्या नव्या माणसाला जमणारही नाही आणि झेपणारही नाही...त्यातून तिचे वय, अनुभव पहाता इतके डीप थिन्किंग जरा अवघडच वाटते... तिची ग्रास्पिंग पॉवर निश्चितच हाय आहे.
नवीन जबाबदारीने घाबरुन न जाता हाती घेतलेले मिशन यशस्वी करण्याची मोनाची धाडसी वृती आवडली... भ्रष्टाचाराचे स्कॅन्डल उलगडणार्या मोनाला माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा!!!
........_/\_..........
........_/\_..........
______/\______
______/\______