अटक मटक चवळी चटक, परवानगीशिवाय करतात अटक!

Submitted by सागर on 27 October, 2010 - 11:57

कोजागिरीच्या दूसर्‍या दिवशी फर्ग्युसन कॉलेजसमोरील चौकात ट्राफिक पोलीसनामक डोमकावळे टपून बसलेले.
या चौकात वाहतूक पोलिसांनी कॉलेजमधून बाहेर पडणार्यास मूलांच्या गाड्या अडवून तपासायला सुरूवात केली.

या वेळी निमीत्त्य होते ते गाड्यांच्या मागे असणार्‍या नंबर प्लेट्स.

बर्‍याचदा या प्लेट्सवर खाली अगदी बारीक अक्षरात ‘साई ऑटो’ ‘पाषाणकर ऑटो’ असे काहीतरी लिहीलेले
असते.

पोलिस नेमके यालाच आक्षेप घेऊन मूलांची अडवणूक करत होते.
मूलं बिचारी निमूटपणाने पावती फाडून अथवा पैसे देऊन पुढे जात होती.

याच कॉलेजमधल्या आमच्या एका मित्राने मात्र याला जोरदार विरोध केला.
सिग्नलवर अथवा चौकात ट्राफिक पोलिस बर्‍याचदा अडवल्यावर गाडीची चावीच काढून घेतात.
नियमाप्रमाणे असे करणे चूक आहे.

आमच्या या मित्राने ‘ गाडीला हात लाऊ नका, मी स्वतःहून गाडी लाऊन तूमच्या कडे येतो’ असे त्यांना बजावले
आणि गाडी शेजारी लावली.
तेंव्हा ट्रा.पो. सुद्धा जरा चपापलाच
.
गाडी रस्त्याशेजारी लाऊन मित्राने ड्रायव्हिंग लायसंस आणि पि.यु.सी. दूरूनच पोलिसांना दाखवले.
( पोलिस लायसंस आपल्याकडे ठेऊन घेतात आणि आपण पैसे न दिल्यास/पावती न फाडल्यास ते परत करत
नाहीत. यावर आम्ही मित्रांनी शोधून काढलेला हा उपाय आहे.)

एवढं होऊनही त्यांनी पावती फाडायला सुरूवात केल्यावर मित्राने आवाज थोडा वाढवला.
नंबर प्लेट तपासायचे आदेश असल्यास पोलिसांना त्याने या कारवाईच्या आदेशाची प्रत दाखवायला सांगितली.

अशी कारवाई करण्याचे वरीष्ठांचे आदेश आहेत असे फक्त मित्राला सांगण्यात आले. आणि हे आदेश दाखवायला
आम्ही बांधील नाही हे पोलिसांचे त्यावरचे उत्तर.
त्यावर मित्राने वाद घातल्यावर त्याला ‘पोलिस कारवाईत अडथळा आणला म्हणून अटक करीन, डोळ्यात पाणी
आणीन’ अशा धमक्या मिळू लागल्या.

ताबडतोब मित्राने भर चौकात जाऊन एकट्यानेच मोठमोठ्याने घोषणा द्यायला सुरूवात केली.

’’दादागिरी नही चलेगी,
नही चलेगी, नही चलेगी.’’

’’अटक मटक चवळी चटक.
परवानगीशिवाय करतात अटक’’

पोलिस तर चाटच पडले.
त्यांना अशी काही अपेक्षाच नव्हती.
काय करावं हेही त्यांना कळेना.
त्यातला एकजण मित्रावर जोरजबरदस्ती करून त्याला चौकातून बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करू लागला.
मित्राने शांतपणे पाठीमागे हात बांधून सांगितले की अंगाला हात लावाल तर मारहाण केली म्हणून केस करीन.
अटक करायची असेल तर पेट्रोलिंगला बोलवा. माझी अटक करून घेण्याची तयारी आहे.

(नियमाप्रमाणे वाहतूक पोलिसांना सामान्य नागरिकांना अटक करण्याचे अधिकार नसतात. त्यासाठी त्यांना
पेट्रोलिंगला बोलवावं लागतं.)

रीतसर पेट्रोलिंगला फोन करून बोलवण्यात आले.

एव्हाना बघे जमलेच होते. मित्राने जमलेल्या मूलांना ‘’यांना लायसंस देऊ नका ‘’ म्हणून सांगायला सुरूवात केली.
मूलींना अडवणार्‍या ट्रा.पो.ना विरोध करायला सुरूवात केली.
कारण पुरूष ट्रा.पो. मूलींच्या गाड्या अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने अडवत होते.

(इथेही नियमाप्रमाणे, मूलींना अडवून तपासणी करायची असल्यास अशी कारवाई करायला एखादी महिला
ट्रा.पो.सोबत असणे गरजेचे असते)

इकडे पेट्रोलिंगची गाडी येईपर्यंत मित्राच्या घोषणा सुरूच होत्या.
पेट्रोलिंगच्या गाडीमधून मित्राला मॉडर्न पोलिस चौकीवर नेण्यात आले.

गाडीत पोलिस अत्यंत उर्मटपणे वागले.
आता बघ बेट्या कशी चामडी लोळवतो तूझी वगैरे धमक्या तर सुरूच होत्या.

तिथे मित्राने वरीष्ठ पोलिस अधिकाऋयासमोर पोलिसांच्या या अरेरावीचा पाढा वाचला.
पैसे खाण्यासाठी अशा क्षुल्लक कारवाया करण्यापेक्षा इतर अनेक कामे करण्यासारखी आहेत ती करा असेही
बजावले.
पोलिसच असे उद्दामपने वागले तर आम्ही कुणाकडे पाहायचे?
असा आदेश काढन्यापूर्वी जरा लोकांना कळवायला हवं. पूर्वसूचना द्यायला हवी.

‘’तूम्ही फार बोलता हो..जरा शांत व्हा.. ‘’ इति वरीष्ठ.

’’अहो तूम्ही बोलायला भागच पाडता. तूम्ही वरीष्ठ आहात, एवढे शिकलेले आहात म्हणून सभ्यपणे बोलताय.
पण हे ट्रा. पो. सामान्यांशी काय भाषेत बोलतात ते एकदा ऐका.
मला मीरा बोरवणकरांचा नंबर द्या, मला त्यांच्याशी बोलायचयं’’ आमचा मित्र म्हणाला.

मीरा बोरवणकरांचा फोन नंबर द्यायला आम्ही तूम्हांला बांधील नाही असे वरीष्ठ म्हणताच मित्राने सांगितले की
माहिती अधिकार नियम 4 प्रमाणे पोलिस आयुक्त, उपायुक्त आणि इतर अधिकार्‍यांची नावे आणि
त्यांचे फोन नंबर एका बोर्डवर लिहून पोलिस चौकीत लावणे बंधनकारक आहे.
तूमच्या चौकीत असे काही बोर्ड लावलेले दिसत नाही.
मी जाफर भाईंना फोन करून तक्रार करू का? मित्राने विचारले.

(पी.ए.जाफरभाई हे सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत आणि वाहतूक शाखेचे माहिती अधिकारी आहेत. एक
अतिशय उत्तम अधिकारी म्हणून ओळखल्या जातात)

ही मात्रा बरोबर लागू पडली.

ताबडतोब मीरा बोरवणकरांना फोन लावण्यात आला.

मित्राने सगळी परिस्थीती सांगून हे कसं चूक आहे हे त्यांना सांगितलं.
मीरा ताईंनी सगळं ऐकून घेऊन त्या वरीष्ठांशी बोलून ताबडतोब ही कारवाई बंद करायला सांगितली.

मूद्दलात वरीष्ठांचे असे काही आदेश नव्हतेच.
(आणि असले असते तरी नागरीकांना पूर्वसूचना देणे बंधनकारक होते).

त्यानंतर वरीष्ठांनी फर्ग्युसनवरच्या ट्रा.पों.ना फोन करून कारवाई बंद करायला सांगितली आणि ही टीम परत
बोलवण्यात आली.

ही लोकं खरच परत येतात का हे पाहायला मित्र तिथेच थांबला. आणि ते सगळे परतल्यावरच
तिथून हलला.
गंमत म्हणजे तो त्या वरीष्ठांना म्हणाला,
साहेब इथे आणलत खरं पण आता परत सोडायची काही तरी व्यवस्था करा ना’’ Happy
एका हवालदाराच्या गाडीवर बसून मित्र परत कॉलेजला पोहचला !

काही मूद्दे-
हे सगळं करायला माहिती अधिकारातल्या काही नियमांची माहिती करून घ्यावी लागते. थोडी हिंमत दाखवावी
लागते आणि पोलिसांना प्रश्न विचारावे लागतात हे जरी सगळं खरं असलं तरी आपण असं काही केल्याशिवाय
पोलिस यंत्रणा ताळ्यावर येत नाही हेही तेवढच खरं.

ड्रायव्हिंग लायसंस नसल्यास 1000 रूपयांचा दंड मागणारे हे डोमकावळे नंतर 100 रूपयांची लाच घेऊन
आपल्याला सोडतात.

प्रत्यक्षात, हा दंड केवळ 200 रूपये आहे. नो पार्किंगसाठी 100 रू तडजोड रक्कम तर गाडीची कागदपत्रे नसतील
(हा त्यांचा हूकमी एक्का!) 100 रूपये तडजोड रक्कम भरावी लागते.
प्रत्यक्षात अव्वाच्या सव्वा दंड सांगून
आपल्याला धमक्या दिल्या जातात. आणि आपण नेमके इथेच फसतो.

(दंडाविषयीची ही सर्व माहिती आम्ही मित्रांनी महिती अधिकार नियम 2005 खाली रीतसर मागवलेली आणि
ऑथेंटिक आहे.आम्ही तर याच्या फोटो कॉपी काढून मित्रांमधे वाटल्यात आणि त्या नेहमी सोबत ठेवतो.)

अर्थात, मित्राने केला तो सगळा खटाटोप सगळ्यांनी करायची गरज नाही. पण प्रश्न तर आपण नक्कीच विचारू
शकतो.

आम्हांला ना कुठल्या राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे ना पुण्यातले कुणी ‘दादा’ ‘ताई’ अथवा ‘साहेब’ आमच्या
पाठीशी उभे आहेत.
(या मोठ्या नावांच्या आधाराने चाललेल्या मूजोरीचे अनेक किस्से आहेत, पण इथे तो विषय नको)

स्वतःच्या हिमतीवर आणि आणि माहिती अधिकाराच्या मदतीने आम्ही हे करू शकलो तसं कुणीही हे करू शकेल

हा अनुभव तुमच्याशी शेअर करावा वाटला म्हणून लिहीण्याचा खटाटोप.
लिहीण्यात काही चूका झाल्या असल्यास सांभाळून घ्यावे. Happy

@ admin : हा अनुभव नेमका कुठे टाकावा हे न कळाल्याने मी सध्या 'लेखा'त टाकला आहे.
तूम्हांला योग्य वाटेल त्या ठिकाणी तो हलवलात तरी चालेल.

गुलमोहर: 

वर जी उत्तरे दिली आहेत ती नक्की कोणी दिलेली आहेत ? पोलिसांनी ?
कायद्याशी संबंधित लोकांनी वाहतुकीच्या नियमांची संक्षिप्त स्वरूपात माहिती येथे दिली तर सर्व वाचकांना फार उपयोग होईल.

सागर त्या मित्राचे खरोखर कौतूक. पण जर योग्य माहिती नसेल तर पोलीस अशी अडवणूक करतातच, आणि सामान्य लोक त्याला बळी पडतात.
आता बहुतेकांच्या मोबाईलवर किंवा आयपॉडवर रेकॉर्डींगची सोय असते. पोलीसांशी बाचाबाची होत असताना, ताबडतोब रेकॉर्डींगचे बटन दाबून, जर तो सुखसंवाद रेकॉर्ड करता आला, तर तो कुठल्याही चॅनेलकडे पोहोचवता येईल. मग काय !!

राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच मंत्रीपद धोक्यात आलेल दिसतय. सगळे जर कायद्याची माहिती घेऊन वाहने चालवतील तर दंड कोण भरणार ?

@ महेश,

माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत 20/1/2009 रोजी आम्ही विचारलेल्या प्रश्नांना मिळालेली ही उत्तरे
आहेत.
ही माहिती संबंधित विभागाच्या माहिती अधिकार्‍याकडून दिल्या जाते.

( लेखात उल्लेख केल्याप्रमाणे श्री पी. ए. जाफरभाई, सहा. पोलिस आयुक्त तथा माहिती अधिकारी- वाहतूक
शाखा,पुणे शहर, यांच्या स्वाक्षरीने ही कागदपत्रे आम्हांला मिळाली)

@ fortyniner

नंबर प्लेटविषयी त्यावेळेस प्रश्न विचारले नव्हते,त्यामूळे माहिती उपलब्ध नाही.
पण अशा तपासणीपूर्वी नागरीकांना पूर्वसूचना द्यावी लागते हा नियम ठाऊक आहे.

मूख्य मूद्दा हा होता की वाहतूकीचे अनेक भीषण प्रश्न असताना त्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याऐवजी पोलिस अशा
काही ( हमखास चरायला मिळणार्‍या जागांवर) टपून बसतात आणि आपल्याला लूटतात.

सागर्,त्या पत्राची स्कॅन कॉपी इथे टाकता आली तर लायसन्ससोबत त्या पत्राची प्रतही जवण बाळगता येईल आणि जास्त बोलला पोलिस तर त्याला दाखवता येईल.

मेबी ह्या लिंक्स जास्त उपयोगी पडतील Happy

http://www.rtopune.info/index.htm (ही साईट केवळ इंग्रजीतच माहिती देत्ये

http://www.trafficpolicemumbai.org/FAQs.htm (अन् इथं देवनागरीत माहिती मिळवण्याचा पर्याय उपलब्ध आहे.)

लय भारी...

डावीकडे वळायचे असेल तर सिग्नल चालू असताना डावीकडे वळायचा सिग्नल मिळालेला असेल तेव्हाच वळायचे असते.. बर्‍याच ठिकाणी सरळ जायचा सिग्नल बंद असताना ही डावीकडे वळायचा सिग्नल असतो. तो पाहुनच डावीकडे वळणे इष्ट..

सागर.. बहुतेक सगळ्या उत्तरात तडजोड रक्कम असे म्हणले आहे.. त्याचा अर्थ पावती न दाखवता द्यायची रक्कम की पावती घेऊन द्यायची रक्कम.. कारण जर पावती फाडली तर बहुतेक कोर्टात जाऊन ती रक्कम भरावी लागते असे काहीसे ऐकिवात आहे..

आणि गाडी चालवताना लायसेन्स बरोबर बाळगणे सक्तीचे आहे पण गाडीची कागदपत्रे तसेच इन्शुरन्सची कागदपत्रे काही प्रत्येक जण बरोबर बाळ्गत नाही. ते लगेच जर नसेल तर जिथे पकडले असेल तिथल्या भागातल्या वाहतुक पोलिसांच्या स्थळावर जाऊन ती दाखवली तर चालते.. हे प्रविण सूद ह्यांनी पाठवलेल्या पत्रातच लिहिलेले आहे.. त्याला सुद्धा काही तरी १ आठवड्याची मुदत असते.

तुमचा मित्र लई भारी दिस्तो! Happy झक्कास!
या लेखाने अगदी दुखती नस पकडलीत. चान्गला लेख, चान्गली माहिती

मागे ज्ञानप्रबोधिनीसमोर अशीच गाड्या उचलुन नेणार्‍या, व नेताना टेम्पोतून मोटारसायकल खाली फेकुन देणार्‍या ऑन ड्यूटी गुन्डान्चा फोटू/लेख लोकसत्ता व (बहुधा अन्य पेपरात पण) झळकला होता त्याची आठवण झाली! Happy

भारीये! ब्राव्हो तुमच्या मित्राला.

वाहतूक पोलिस लिटरली टपून बसलेले असतात ठराविक ठिकाणी आणि ठराविक दिवशी. अरेरावी तर विचारू नका. इतकं करूनही वाहतूकीत सुधारणा दिसत नाहीचे! Uhoh

भारीच की, तुमच्या मित्राने नियमाने वागत जबरी कृती केलीय. नुसता नियम माहिती असण्यापेक्षा तो पाळणे व पोलिसांसमोर न घाबरता शांतपणे वागणे अजूनतरी सामान्य माणसाला जमत नाही, तुमच्या मित्राच्या धाडसाचे कौतुक व तुम्ही ही माहिती उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार. Happy

सागर,
तुझ्या मित्राच खरच कौतुक कराव तेवढं कमीच आहे...
तुलाही धन्यवाद ..
माहिती मिळाली आणि हिम्मत देखिल आणखी वाढली !
जमल्यास दंड,नियम यांची यादी एकदा माबोवर टाकुन दे किंवा मला मेल कर
Happy

भारीच!! Happy

ट्राफिक पोलीसने अडवल्यावर हमखास PUC बद्द्ल विचारतो .... मी आतापर्यन्त येकदाही दाखावले नाहि करण येकाहि ट्राफिक पोलीसाला PUC norms आणि त्याचि गरज काय हे सान्गता आले नाहि....
आणि येका RTO ला norms सान्गता आले तर त्या बिचार्याला limits सान्गता आले नाहि ... मी २ तास थाम्बलो पण काहिच दिले नाहि....त्यामुळे मी आता PUC पण काढले नाहि....

तुमच्या मित्राचे अभिनंदन.

इथे, वरील प्रकार वाचून, इतके का भारतातले पोलीस वाईट आहेत? भारत वाईट. असे लोकांना वाटू नये म्हणून मी माझे या देशात आलेले अनुभव लिहू शकतो.

पण काय आहे, जरा अधिकार मिळाला की माणसे कमी अधिक प्रमाणात दादागिरी करायला लागतात. मग कुठल्याहि देशाची का असेनात. उगीच भारताचे नाव वाईट करण्यात अर्थ नाही असे मला वाटते.

Pages