कोजागिरीच्या दूसर्या दिवशी फर्ग्युसन कॉलेजसमोरील चौकात ट्राफिक पोलीसनामक डोमकावळे टपून बसलेले.
या चौकात वाहतूक पोलिसांनी कॉलेजमधून बाहेर पडणार्यास मूलांच्या गाड्या अडवून तपासायला सुरूवात केली.
या वेळी निमीत्त्य होते ते गाड्यांच्या मागे असणार्या नंबर प्लेट्स.
बर्याचदा या प्लेट्सवर खाली अगदी बारीक अक्षरात ‘साई ऑटो’ ‘पाषाणकर ऑटो’ असे काहीतरी लिहीलेले
असते.
पोलिस नेमके यालाच आक्षेप घेऊन मूलांची अडवणूक करत होते.
मूलं बिचारी निमूटपणाने पावती फाडून अथवा पैसे देऊन पुढे जात होती.
याच कॉलेजमधल्या आमच्या एका मित्राने मात्र याला जोरदार विरोध केला.
सिग्नलवर अथवा चौकात ट्राफिक पोलिस बर्याचदा अडवल्यावर गाडीची चावीच काढून घेतात.
नियमाप्रमाणे असे करणे चूक आहे.
आमच्या या मित्राने ‘ गाडीला हात लाऊ नका, मी स्वतःहून गाडी लाऊन तूमच्या कडे येतो’ असे त्यांना बजावले
आणि गाडी शेजारी लावली.
तेंव्हा ट्रा.पो. सुद्धा जरा चपापलाच
.
गाडी रस्त्याशेजारी लाऊन मित्राने ड्रायव्हिंग लायसंस आणि पि.यु.सी. दूरूनच पोलिसांना दाखवले.
( पोलिस लायसंस आपल्याकडे ठेऊन घेतात आणि आपण पैसे न दिल्यास/पावती न फाडल्यास ते परत करत
नाहीत. यावर आम्ही मित्रांनी शोधून काढलेला हा उपाय आहे.)
एवढं होऊनही त्यांनी पावती फाडायला सुरूवात केल्यावर मित्राने आवाज थोडा वाढवला.
नंबर प्लेट तपासायचे आदेश असल्यास पोलिसांना त्याने या कारवाईच्या आदेशाची प्रत दाखवायला सांगितली.
अशी कारवाई करण्याचे वरीष्ठांचे आदेश आहेत असे फक्त मित्राला सांगण्यात आले. आणि हे आदेश दाखवायला
आम्ही बांधील नाही हे पोलिसांचे त्यावरचे उत्तर.
त्यावर मित्राने वाद घातल्यावर त्याला ‘पोलिस कारवाईत अडथळा आणला म्हणून अटक करीन, डोळ्यात पाणी
आणीन’ अशा धमक्या मिळू लागल्या.
ताबडतोब मित्राने भर चौकात जाऊन एकट्यानेच मोठमोठ्याने घोषणा द्यायला सुरूवात केली.
’’दादागिरी नही चलेगी,
नही चलेगी, नही चलेगी.’’
’’अटक मटक चवळी चटक.
परवानगीशिवाय करतात अटक’’
पोलिस तर चाटच पडले.
त्यांना अशी काही अपेक्षाच नव्हती.
काय करावं हेही त्यांना कळेना.
त्यातला एकजण मित्रावर जोरजबरदस्ती करून त्याला चौकातून बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करू लागला.
मित्राने शांतपणे पाठीमागे हात बांधून सांगितले की अंगाला हात लावाल तर मारहाण केली म्हणून केस करीन.
अटक करायची असेल तर पेट्रोलिंगला बोलवा. माझी अटक करून घेण्याची तयारी आहे.
(नियमाप्रमाणे वाहतूक पोलिसांना सामान्य नागरिकांना अटक करण्याचे अधिकार नसतात. त्यासाठी त्यांना
पेट्रोलिंगला बोलवावं लागतं.)
रीतसर पेट्रोलिंगला फोन करून बोलवण्यात आले.
एव्हाना बघे जमलेच होते. मित्राने जमलेल्या मूलांना ‘’यांना लायसंस देऊ नका ‘’ म्हणून सांगायला सुरूवात केली.
मूलींना अडवणार्या ट्रा.पो.ना विरोध करायला सुरूवात केली.
कारण पुरूष ट्रा.पो. मूलींच्या गाड्या अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने अडवत होते.
(इथेही नियमाप्रमाणे, मूलींना अडवून तपासणी करायची असल्यास अशी कारवाई करायला एखादी महिला
ट्रा.पो.सोबत असणे गरजेचे असते)
इकडे पेट्रोलिंगची गाडी येईपर्यंत मित्राच्या घोषणा सुरूच होत्या.
पेट्रोलिंगच्या गाडीमधून मित्राला मॉडर्न पोलिस चौकीवर नेण्यात आले.
गाडीत पोलिस अत्यंत उर्मटपणे वागले.
आता बघ बेट्या कशी चामडी लोळवतो तूझी वगैरे धमक्या तर सुरूच होत्या.
तिथे मित्राने वरीष्ठ पोलिस अधिकाऋयासमोर पोलिसांच्या या अरेरावीचा पाढा वाचला.
पैसे खाण्यासाठी अशा क्षुल्लक कारवाया करण्यापेक्षा इतर अनेक कामे करण्यासारखी आहेत ती करा असेही
बजावले.
पोलिसच असे उद्दामपने वागले तर आम्ही कुणाकडे पाहायचे?
असा आदेश काढन्यापूर्वी जरा लोकांना कळवायला हवं. पूर्वसूचना द्यायला हवी.
‘’तूम्ही फार बोलता हो..जरा शांत व्हा.. ‘’ इति वरीष्ठ.
’’अहो तूम्ही बोलायला भागच पाडता. तूम्ही वरीष्ठ आहात, एवढे शिकलेले आहात म्हणून सभ्यपणे बोलताय.
पण हे ट्रा. पो. सामान्यांशी काय भाषेत बोलतात ते एकदा ऐका.
मला मीरा बोरवणकरांचा नंबर द्या, मला त्यांच्याशी बोलायचयं’’ आमचा मित्र म्हणाला.
मीरा बोरवणकरांचा फोन नंबर द्यायला आम्ही तूम्हांला बांधील नाही असे वरीष्ठ म्हणताच मित्राने सांगितले की
माहिती अधिकार नियम 4 प्रमाणे पोलिस आयुक्त, उपायुक्त आणि इतर अधिकार्यांची नावे आणि
त्यांचे फोन नंबर एका बोर्डवर लिहून पोलिस चौकीत लावणे बंधनकारक आहे.
तूमच्या चौकीत असे काही बोर्ड लावलेले दिसत नाही.
मी जाफर भाईंना फोन करून तक्रार करू का? मित्राने विचारले.
(पी.ए.जाफरभाई हे सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत आणि वाहतूक शाखेचे माहिती अधिकारी आहेत. एक
अतिशय उत्तम अधिकारी म्हणून ओळखल्या जातात)
ही मात्रा बरोबर लागू पडली.
ताबडतोब मीरा बोरवणकरांना फोन लावण्यात आला.
मित्राने सगळी परिस्थीती सांगून हे कसं चूक आहे हे त्यांना सांगितलं.
मीरा ताईंनी सगळं ऐकून घेऊन त्या वरीष्ठांशी बोलून ताबडतोब ही कारवाई बंद करायला सांगितली.
मूद्दलात वरीष्ठांचे असे काही आदेश नव्हतेच.
(आणि असले असते तरी नागरीकांना पूर्वसूचना देणे बंधनकारक होते).
त्यानंतर वरीष्ठांनी फर्ग्युसनवरच्या ट्रा.पों.ना फोन करून कारवाई बंद करायला सांगितली आणि ही टीम परत
बोलवण्यात आली.
ही लोकं खरच परत येतात का हे पाहायला मित्र तिथेच थांबला. आणि ते सगळे परतल्यावरच
तिथून हलला.
गंमत म्हणजे तो त्या वरीष्ठांना म्हणाला,
साहेब इथे आणलत खरं पण आता परत सोडायची काही तरी व्यवस्था करा ना’’
एका हवालदाराच्या गाडीवर बसून मित्र परत कॉलेजला पोहचला !
काही मूद्दे-
हे सगळं करायला माहिती अधिकारातल्या काही नियमांची माहिती करून घ्यावी लागते. थोडी हिंमत दाखवावी
लागते आणि पोलिसांना प्रश्न विचारावे लागतात हे जरी सगळं खरं असलं तरी आपण असं काही केल्याशिवाय
पोलिस यंत्रणा ताळ्यावर येत नाही हेही तेवढच खरं.
ड्रायव्हिंग लायसंस नसल्यास 1000 रूपयांचा दंड मागणारे हे डोमकावळे नंतर 100 रूपयांची लाच घेऊन
आपल्याला सोडतात.
प्रत्यक्षात, हा दंड केवळ 200 रूपये आहे. नो पार्किंगसाठी 100 रू तडजोड रक्कम तर गाडीची कागदपत्रे नसतील
(हा त्यांचा हूकमी एक्का!) 100 रूपये तडजोड रक्कम भरावी लागते.
प्रत्यक्षात अव्वाच्या सव्वा दंड सांगून
आपल्याला धमक्या दिल्या जातात. आणि आपण नेमके इथेच फसतो.
(दंडाविषयीची ही सर्व माहिती आम्ही मित्रांनी महिती अधिकार नियम 2005 खाली रीतसर मागवलेली आणि
ऑथेंटिक आहे.आम्ही तर याच्या फोटो कॉपी काढून मित्रांमधे वाटल्यात आणि त्या नेहमी सोबत ठेवतो.)
अर्थात, मित्राने केला तो सगळा खटाटोप सगळ्यांनी करायची गरज नाही. पण प्रश्न तर आपण नक्कीच विचारू
शकतो.
आम्हांला ना कुठल्या राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे ना पुण्यातले कुणी ‘दादा’ ‘ताई’ अथवा ‘साहेब’ आमच्या
पाठीशी उभे आहेत.
(या मोठ्या नावांच्या आधाराने चाललेल्या मूजोरीचे अनेक किस्से आहेत, पण इथे तो विषय नको)
स्वतःच्या हिमतीवर आणि आणि माहिती अधिकाराच्या मदतीने आम्ही हे करू शकलो तसं कुणीही हे करू शकेल
हा अनुभव तुमच्याशी शेअर करावा वाटला म्हणून लिहीण्याचा खटाटोप.
लिहीण्यात काही चूका झाल्या असल्यास सांभाळून घ्यावे.
@ admin : हा अनुभव नेमका कुठे टाकावा हे न कळाल्याने मी सध्या 'लेखा'त टाकला आहे.
तूम्हांला योग्य वाटेल त्या ठिकाणी तो हलवलात तरी चालेल.
सह्ही!
सह्ही!
सहीये. तुमच्या मित्राच्या
सहीये. तुमच्या मित्राच्या हिमतीला दाद दिली पाहिजे.
ग्रेट!
ग्रेट!
सही किस्सा आहे.
सही किस्सा आहे.
सही!!!
सही!!!
अरे सही ! हॅट्स ऑफ टू हिम !
अरे सही ! हॅट्स ऑफ टू हिम ! ही खरी गांधीगिरी.
खरी माहिती इथे तुम्ही दिलीत, त्याबद्दल तुमचेही अभिनंदन ! मस्त लिहिलय.
ग्रेट!! तुमच्याकडे असल्यास
ग्रेट!!
तुमच्याकडे असल्यास वरिष्ठ पोलिस अधिकार्यांचे फोन नं. इथेही देउन ठेवा. सगळ्यांनाच मदत होईल.
चांगलं हिंमतीचं काम केलं
चांगलं हिंमतीचं काम केलं मित्राने.
माहीती अधिकार नियमांची माहीती दिलीत हे पण चांगले केलेत. अजून काही माहीती असेल ती पण द्या, नक्कीच उपयोग होईल सगळ्यांना.
वा! तुमच्या मित्राचे कौतुक
वा! तुमच्या मित्राचे कौतुक आणि इथे हा किस्सा आणि इतर माहिती सांगितल्याबद्दल तुमचे आभार.
हा असा अनुभव शेअर केल्याबद्दल
हा असा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद. एक महत्त्वाची माहिती मिळाली.
अरे वा
अरे वा
छान. आपण सगळ्यांनी हे
छान. आपण सगळ्यांनी हे शिकण्यासारखं आहे. तुमच्या मित्राला अभिनंदन सांगा आणि असा आवाज उठवायला हिम्मत लागते. ती त्याज्याजवळ आहे म्हणून कौतुक वाटलं.
हा अनुभव तुमच्याशी शेअर करावा
हा अनुभव तुमच्याशी शेअर करावा वाटला म्हणून लिहीण्याचा खटाटोप.>> त्याबद्दल धन्यवाद !
पुर्वी फक्त जानेवारी,
पुर्वी फक्त जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यात चेकिंग व्हायचे. चेकिंगचा कोटा पुर्ण करण्यासाठी. आता रोजच चेकिंग होते याचे कारण अतिरेक्यांच्या कारवायानसुन दुसरेच काहि आहे. आता प्रत्येक खाते मलईदार होत चालले आहे याचा हा पुरावा.
सागर >> तुमच्या मित्राचे
सागर >> तुमच्या मित्राचे कौतुक.
मस्त रे!
मस्त रे!
मस्त. सागर, आपण माहितीच्या
मस्त.
सागर,
आपण माहितीच्या अधिकाराखाली मिळवलेली माहिती इथेही उपलब्ध करून द्याल का?
हिंमतीची दाद द्यायला हवी
हिंमतीची दाद द्यायला हवी !
>>माहितीच्या अधिकाराखाली मिळवलेली माहिती इथेही उपलब्ध करून द्याल का?
अनुमोदन. ही माहिती कृपया इथे द्याच.
है शाब्बास! यांचा माज
है शाब्बास! यांचा माज उतरवायला असाच जबरी मनुष्य पाहिजे. खरंच तुमच्या मित्राच्या हिमतीचं आणि नेटाचं कौतुक !
>>>साहेब इथे आणलत खरं पण आता परत सोडायची काही तरी व्यवस्था करा ना’’ हे लै भन्नाट!
सहीच आहे तुमचा मित्र!
सहीच आहे तुमचा मित्र! तुम्हाला पण उपयोगी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
अरे वा, खरंच मस्त. तुमच्या
अरे वा, खरंच मस्त. तुमच्या मित्राचं अभिनंदन.
खरंच सही आहे तुमचा मित्र! हे
खरंच सही आहे तुमचा मित्र! हे शेअर केल्याबद्दल धन्यवाद
वा ! तुमच्या मित्राला
वा ! तुमच्या मित्राला आम्हातर्फे शाब्बासकी द्या!
लय भारी!!
लय भारी!!
ग्रेट!
ग्रेट!
ग्रेटच ! माहिती अधिकार नियम
ग्रेटच !
माहिती अधिकार नियम इथे उपलब्ध करुन द्याल का ?
ग्रेट, हिंमतवाला आहे तुमचा
ग्रेट, हिंमतवाला आहे तुमचा मित्र
ही माहिती जरी मुंबईच्या
ही माहिती जरी मुंबईच्या अतिरिक्त पोलिस कमिशनर यांनी दिलेली असली तरी सर्व महाराष्ट्रासाठी उपयोगी आहे.
महाराष्ट्राबाहेर काय आहे मला सांगता येणार नाही.
हि माहिती आंतरजालावरुन आलेली आहे. किती खात्रीलायक आहे माहित नाही. पण पोलिस सुध्दा काही संत नाहीत. ही माहिती प्रविण सुद साहेबांनी दिलेली आहे हे ट्रॅफिक पोलिसांना सांगावे.
Subject: Notice from Praveen Sood (Additional Commissioner for Traffic, Mumbai) - 022 - 22942276.
Dear All,
Please forward this mail as many as you can..do your bit for to help the ignorant.
Take a printout of this and keep it in your car's glove compartment.
May come handy... Not knowing this may leave a big hole in your pocket.
Information you should have: If you are getting caught quite often by traffic police, then please read on.
From now onwards, the Traffic Police cannot catch a motorist just to examine the driving license or vehicle documents.
They can catch you only if you have violated any traffic laws or if you are driving drunk. Remember that when caught for traffic violation, the fine you pay must be limited to the violation. In other words, the police can't bloat the bill saying that you have no insurance cover or emission certificate, etc.
Many motorists do not know this. According to the law, no policeman can slap a penalty on you just because you have no insurance or emission certificate.
If you have not purchased insurance cover for your vehicle, then the police officer must issue a notice, not impose penalty.
You must be given 15 days' time to purchase insurance cover and one week for obtaining the emission certificate.
Days later, meet the sub-inspector at his station with the insurance cover or emission certificate, so that he will annul the charge at once.
Police can fine you only if you fail to produce these documents within the stipulated period.
If your vehicle is brand new, then you need not bother about obtaining the emission certificate for one full year.
In response to a question as to why policemen fine people instantly without giving them time to obtain insurance cover or emission certificate, Additional Commissioner for Traffic Praveen Sood said, "Yes, it is a mistake. People must force policemen to issue notice or complain to me at least the following day.”
The best way to teach the police a lesson is by filing a written complaint with their higher officials and, a week later, using the Right to Information Act (RTI) to know the action taken against them. Remember, any question or application filed under RTI cannot be ignored and no official is bold enough to ignore the RTI Act.
Praveen Sood
(Additional Commissioner for Traffic, Mumbai)
022 - 22942276.
जबरा! खरच मस्त कृती! आणि
जबरा! खरच मस्त कृती!
आणि माहिती द्या इथेही
सर्वांचे आभार..! ज्याने हे
सर्वांचे आभार..! ज्याने हे सगळं केलंयं त्याला तूमचे अभिनंदनाचे निरोप पोहचवलेत
वेगळा लेख लिहीण्यापेक्षा इथेच आम्ही विचारलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे देतो-
1) दूचाकी वाहनाचा चालक परवाना नसल्यास किती रूपये दंड असतो?
उ. 200 रूपये दंड जागीच भरावा लागतो. त्यानंतर 15 दिवसांच्या आत संबंधित पोलिस चौकीत परवान्याची प्रत
दाखल करावी लागते.
2) दूचाकी वाहन नो पार्किंगमधे पकडले तर किती रू. दंड असतो?
उ. जर वाहन जागीच पकडले तर 100 रू तडजोड रक्कम भरावी लागते. जर वाहन टोईंग करून नेले तर अधिक
टोईंग चार्जेस रू 50 भरावे लागतात.
3) गाडीची कागदपत्रे जर जवळ नसतील तर किती रू दंड असतो?
उ. 100 रू तडजोड रक्कम भरावी लागते.
4) जर गाडीला नंबर प्लेट नसेल किंवा ती झाकून जर गाडी चालवली जात असेल तर किती दंड असतो?
उ. 100 रू तडजोड रक्कम भरावी लागते.
5) सिग्नलला लाल दिवा लागलेला असताना डावीकडे वळण्याकरीता परवानगी असते का? या संबंधीचे नियम
काय आहेत?
उ. सिग्नल यंत्रणेतच व रस्त्याची व तेथील वाहतूक परिस्थीतीनुसार डावीकडे वळण्याची व्यवस्था करण्यात येत
असते.
टीप: हे मोठे गोलमाल आणि अनाकलनीय उत्तर आहे. आम्ही मात्र डावीकडे वळण्याची परवानगी नसते असाच
अर्थ घेऊन ते पाळतो.
6) गाडी चालवताना गाणी ऐकायची परवानगी आहे का? नसल्यास किती रूपये दंड भरावा लागतो?
उ. परवानगी आहे.
7) गाडी चालवताना मोबाईलवर बोलण्याची परवानगी आहे का? नसल्यास किती रूपये दंड भरावा लागतो?
उ. गाडी चालवताना मोबाईलवर बोलायची परवानगी नाही. 150 रू. तडजोड रक्कम भरावी लागते.
8) संपूर्ण पूणे जिल्ह्यात हेल्मेट सक्ती आहे का? असल्यास कोणत्या कायद्यानुसार?
उ. मोटार वाहन कायदा सन 1988 कलम 129 अंवये हेल्मेट सक्ती आहे.
9) गाडी चालवताना चेहर्याला रूमाल बांधायची परवानगी आहे का? नसल्यास किती दंड भरावा लागतो?
उ. परवानगी आहे.
10) दूचाकी वाहनाने सिग्नल मोडला तर किती रूपये दंड आहे?
उ. 100 रू तडजोड रक्कम भरावी लागते.
11) पुण्यामधे कोणत्या रस्त्यावर दूचाकी वाहनांना बंदी आहे?
उ. फक्त लकडी पुलावर दिवसा बंदी आहे.
टीप: कॅंपात एम.जी. रोडवर देखिल अशी काही विशीष्ट काळाकरता बंदी असते, पण त्यांनी तसे यात दिले नाही.
12) सामान्य नागरीकांना वाहतूक किंवा इतर पोलिसांचे ओळखपत्र मागण्याचा अधिकार आहे का?
उ. नाही.
13) जड वाहनांना बंदी असलेल्या रस्त्यावरून जड वाहन नेल्यास किती रू दंड असतो?
उ. 100 रू तडजोड रक्कम भरावी लागते.
शेवटचा प्रश्न होता की पुण्यात कोणत्या पुलांवर व रस्त्यांवर जड वाहनांना बंदी आहे? ( सर्व रस्ते व पुलांची नावे
व पत्ते मिळावेत)
याचे उत्तर आणि ही यादी खूप मोठी आहे ती येथे देत नाही. आणि तिचा दूचाकी चालवणार्यांना फारसा
उपयोगही नाही. पण यादीनुसार पुणे शहरातल्या ( मूळ/जूने शहर) जवळपास सगळ्या रस्त्यांवर जड वाहनांना
बंदी आहे. या नियमाचे तर सर्रास उल्लघन केल्या जाते.
Pages