जालरंग प्रकाशनाचा आंतरजालीय दिवाळी अंक : दीपज्योती

Submitted by विशाल कुलकर्णी on 21 October, 2010 - 22:49

नमस्कार मायबोलीकर,

ही आनंदाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचवताना मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो आहे. आजकाल दिवाळी अंकाच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभुमीवर अनेकोनेक देखणे आणि नितांत सुंदर आंतरजालीय दिवाळी अंक प्रकाशित होत आहेत.

श्री. प्रमोदकाका देव यांच्या जालरंग प्रकाशनातर्फे हा पहिला दिवाळी अंक " दीपज्योती " वाचकांच्या स्वाधीन करताना विशेष आनंद होतो आहे. जालरंगने यापूर्वी २००९ साली हिवाळी अंक शब्दगाऽऽरवा , २०१० साली होळी विशेषांक हास्यगाऽऽरवा, पावसाळी विशेषांक ऋतू हिरवा आणि १५ ऑगस्टच्या निमित्ताने जालवाणी असे चार अंक प्रकाशित केलेले आहेत. हा प्रत्येक अंक एका ब्लॉगच्या माध्यमातला होता तरी काही विशिष्ट वेगळेपणा जपण्याचा आम्ही प्रयत्न केला होता.

आनंदाची गोष्ट म्हणजे या दिवाळी अंकात आम्हा सगळ्यांचाच खारीचा वाटा आहे. हा अंक आपल्या साहित्याच्या सर्व अपेक्षांना पुरेपूर उतरून आमचं हे गोंडस लेकरु आपल्या स्वाधीन करतोय. त्याचे लाड करणं आता आपल्या मर्जीवर अवलंबुन आहे. हा अंक खालील दुव्यावर उपलब्ध आहे.

"जालरंग प्रकाशनाचा प्रथम दिवाळी अंक : दीपज्योती "

safe_image.php_.png

आपले बहुमुल्य प्रतिसाद आणि सुचना यांवे मनःपूर्वक स्वागत !

आपला एक मायबोलीकर

विशाल कुलकर्णी

गुलमोहर: 

अरे वा, अभिनंदन Happy अंक वरवर चाळून पाहिला. वेळ मिळेल तसा वाचेनच.
मायबोली दिवाळी अंकाबरोबर इतरही चांगले अंक आंतरजालावर उपलब्ध झाले तर वाचकांसाठी पर्वणीच ठरेल Happy

मंदारने सकाळीलिंक दिली होतीच.
प्रमोदकाका आणि विशाल्,आपले मनःपूर्वक अभिनंदन... आणि आभार. Happy

मंजु खाली एक पान किंवा चित्र असेल त्यावर क्लिक केल्यास मजकुर दिसेल. अंक ब्लॉगस्पॉटवर, जर तुझ्याकडे ब्लॉगस्पॉट ब्लॉक असेल तर शक्यता कमी आहे.
सर्वांचे आभार Happy

>>>मला अंक उघडल्यावर लेखांची शीर्षकं फक्त दिसताहेत. पूर्ण लेख वाचायचा असेल तर काय करायचं?
मंजुडी,उजव्या बाजूला असलेल्या लेखक नामावळीपैकी कोणत्याही नावावर टिचकी मारा..म्हणजे त्या विशिष्ट व्यक्तीचा लेख दिसेल/दिसतील. तसंच पानाच्या वरच्या भागात विषयांचे दुवे दिलेत...तिथे टिचकी मारलीत तर त्या त्या विषयांचे लेख दिसतील....

वरवर चाळला अंक. बरेच इंटरेस्टिंग लेख दिसत आहेत. आता वाचून सांगतो. बरेच माबोकर यात दिसत आहेत. सर्वांचे अभिनंदन!

Back to top