Submitted by कौतुक शिरोडकर on 19 October, 2010 - 01:40
प्रेरणास्थान - (http://www.maayboli.com/node/20437)
वाटतो जरी विनम्र मी वरुन,
माज पोसलाय आत भरभरुन
'लाटले' उघड कसे करायचे?
आय लपवितो करास घाबरुन
घेतली असंख्य सौख्यसाधने
साम, दाम, दंड, भेद वापरुन
कोण साव ? कोण चोर ? प्रश्न हा...
मी सलाम ठोकतोच बावरुन
फोल कल्पना......... इथेच एसिबी,
घाम का फुटे उगाच दरदरुन?
नोकरी कशी बरे तरायची ?
लाच मागतो जनास चाचपुन
सोड रे चिरीमिरी अशी मना
'हात मार एकदाच' सावरुन
वंद्य काय आज जाणतो जरी,
पोसतो घरा इमान कुस्करुन
-- कंपाऊंडर कौतुक शिरोडकर
गुलमोहर:
शेअर करा
क्या बात है... कौतुका...
क्या बात है... कौतुका... तुका कसा सुचता हा सगला?
महाप्रतिम... मान गये हुजूर!!!
महाप्रतिम... मान गये हुजूर!!!
खरच छान.... हल्ली पोलिसांना
खरच छान.... हल्ली पोलिसांना बघुन सुरक्षित कमी आणि भीती जास्त वाटते.....
अप्रतिम विडंबन कौतुकराव,
अप्रतिम विडंबन कौतुकराव, तुमचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.............
कंपाऊंडर असून पोलिसांची इतकी
कंपाऊंडर असून पोलिसांची इतकी अचूक माहिती?
मला तरी विडंबर बोर वाटलं... इतना खास जम्या नही.
मस्त कविता.
मस्त कविता.
<<<वाटतो जरी विनम्र मी
<<<वाटतो जरी विनम्र मी वरुन,
माज पोसलाय आत भरभरुन>>>>
एवढेच पुरेसे होते. कुठल्याही आय डी ने टाकले असतेस तरी ओळखु आले असते. नाव द्यायची गरज नव्हती.
विशल्या, तुच एक जातीचे
विशल्या, तुच एक जातीचे ओळखणारा....
धन्यवाद मित्रानो !
दक्षिणे, तुला 'बोर' केलं त्याबद्दल सॉरी.... पुढच्यावेळेस दुसरं फळ ट्राय करेन.
हे आणखीन एक.... धमाल
हे आणखीन एक.... धमाल विडंबन.
http://www.manogat.com/node/20881
कौतुक, खुप छान... सावरी
कौतुक,
खुप छान...
सावरी
(No subject)
विडंबन..
विडंबन..

कौतुक, सहिच
कौतुक, सहिच जमलिये........
विशाल्याला १००% अनुमोदन........ विडंबनात तुझा हातखंडा आहे........
कौतूक.. एकदम तर्राट विडंबन...
कौतूक.. एकदम तर्राट विडंबन...