२५० ग्रॅम सेल्फ रेसिंग फ्लार किंवा २५० ग्रॅम मैदा + अडिच ते ३ टी स्पून बेकिंग पावडर
२५० ग्रॅम बटर (शक्यतो अनसॉल्टेड) - बटर अगदी चिल्ड - थंडगार असावे.
१०० मिली गार पाणी
थोडा मैदा
१. चिल्ड बटर च्या क्युब्ज करुन घ्याव्यात.
२. से रे फ्ला किंवा मैदा + बे पा चाळणीतुन २ वेळा चाळुन घ्यावा.
३. एका मोठ्या बोल घेऊन त्यात मैदा आणि बटर घालावे. मैदा आणि बटर हाताने कुस्करुन बटर चे छोटे तुकडे आणि मैद्याचे क्रम्स होईपर्यंत मळावे.
४. या मिश्रणाच्या मधे खळगा करुन त्यात गार पाणी ओतावे (३/४ पाणी आधी घाला. कधी कधी काही मैद्याला कमी पाणी लागते). हाताने नीट एकत्र करुन गोळा बनवावा. हा मळलेला गोळा साधारण पुर्यांच्या कणके सारखा घट्ट असावा. यात बटर चे तुकडे दिसत असायला हवेत. बटर पूर्ण मेल्ट व्हायला नको या स्टेजला. हा गोळा १०-१५ मिनीट परत फ्रीज मधे ठेवावा.
५. आता हा गोळा ओट्यावर थोडा मैदा भुरभुरुन त्यावर ठेवावा. लाटण्याने साधारण ४-५ मिमी जाड पोळी लाटावी.
६. लाटलेली पोळी तीन भागात दुमडावी आणि परत घडी घालावी. ही घडी परत लाटावी आणि ४-५ मिमी जाड पोळी करावी. बटर मेल्ट होऊन पेस्ट्री फार मऊ होत्येय अस वाटलं तर लाटुन घडी केल्यावर परत फ्रिज मधे ठेवावी.
७. क्र. ५ आणि ६ ची प्रोसेस साधारण ३ ते ५ वेळा करावी. जितकी जास्त वेळा कराल तितके पेस्ट्रीला पदर जास्त सुटतात आणि खुसखुशीत होते.
८. शेवटच्या स्टेज ला पोळी साधारण २-३ मिमी लाटावी. पेस्ट्री तयार.
- ही पेस्ट्री मी एकदाच करुन बघितली आहे. मेहेनत आहे पण मस्त खुसखुशीत होते.
- पेस्ट्रीसाठी बटर अगदी गार हवे. पाणी सुद्धा फ्रिज मधले वापरले तर उत्तम.
- ही शीट दोन बटर पेपर च्या मधे घालुन फ्रीझ करता येते. त्यासाठी पेस्ट्री फार पातळ लाटु नये. फ्रिझर मधुन काढुन थॉ केल्यावर पातळ लाटुन घ्यावी.
- ही पेस्ट्री बेक्ड करंजी ( http://www.maayboli.com/node/20472 ) २ मिमी पातळ पेस्ट्री लाटावी, व्हेजी पफ्स, खारी बिस्किट करायला वापरता येते.
- यात बटर भरपुर आहे, पण त्यानेच खुसखुशीतपणा येतो. मार्जरीन/ऑऑ वगैरे वापरुन करुन बघायला पाहिजे.
मस्त गं लाजो करून बघेन पण
मस्त गं लाजो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लेकाला अन नवर्यासाठी फक्त करेन ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
करून बघेन पण खाणार नक्की नाही
ये हुयी ना बात. त्या बेक्ड
ये हुयी ना बात. त्या बेक्ड करंज्या पाहुन मी 'भारतात पेस्ट्री शिट्स मिळणार नाहीत, सबब ह्या करंज्या रद्द' म्हणुन बंद करुन टाकलेल्या. आता परत आशेला कोंब फुटताहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा गोळा १०-१५ मिनीट परत फ्रीज मधे ठेवावा.
ह्या स्टेजच्या नंतर बटर मेल्ट होत असेल ना???
मागे टिवीवर बेक आणि केक कार्य्क्रमात खारीसाठी शिट दाखवलेली. त्यात त्यांनी मैद्याची वर दिलीय तशीच मोठी चपाती लाटुन त्यावर कॉर्नफ्लोर+तुप यांचा साठा पसरायचा अगदी भरपुर आणि दुमडायची, मग ती चपाती दोन तास फ्रिज करायची, मग बाहेर काढुन परत लाटुन परत साठा पसरुन फ्रिज असे पाचसहा वेळा करुन मग शिट बनवलेली. (फ्रिज करायचे यासाठी की साठा लावल्यावर परत पातळ लाटायला त्रास होतो. फ्रिज केल्यावर साठा घट्ट होतो आणि लाटणे सोपे जाते)
हा कार्यक्रम पाहिल्यावर खारीमध्ये किती फॅट जातात याचा अंदाज आला. घरी आपण चांगल्या दर्जाचे फॅट्स वापरु पण भारतीय बेकरीवाले काय वापरत असतील देव जाणे. खारीत खुप फॅट्स् असतात हे नुसते ऐकलेले, प्रत्यक्ष पाहिल्यावर खारी खायची इच्छा कायमची नाहिशी झाली.
ह्या स्टेजच्या नंतर बटर मेल्ट
ह्या स्टेजच्या नंतर बटर मेल्ट होत असेल ना???<<<
साधना, बटर मेल्ट होऊन पेस्ट्री फार मऊ होत्येय अस वाटलं तर लाटुन घडी केल्यावर परत फ्रिज मधे ठेवावी. मी वरती टीप्स मधे अॅड करते हे.
मी अत्ता जशी आठवत्येय तशी रेसिपी लिहीली. घरी जाऊन पुस्तक परत बघेन आणि काही राहिलं असेल तर रेसिपीत अॅड करेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साधनाने लिहिल्याप्रमाणे
साधनाने लिहिल्याप्रमाणे प्रत्येक घडीच्या मधे चरबी घालावी लागते. मी मुद्दाम चरबी लिहिलेय, कारण ओरिजीनल कृतिमधे लार्ड वापरतात. भारतात ठिकठिकाणी या पेष्ट्रीचे पॅटिस, रोल्स वगैरे मिळतात, त्यात चरबी म्हणून काय वापरले असेल, याबद्दल मला शंका आहे.
ह्म्म्म्म, मस्तच प्रायोगिक
ह्म्म्म्म, मस्तच प्रायोगिक तत्वावर करुन बघायला हरकत नाही
दिनेशदा , पॅटीस रोल्स मधे वगरे वनस्पती तूप घडीत वापरतात,
चरबी इथे ही वापरतात अस ऐकलय खर , पण वनस्पती तूप वापरताना बघीतल्य स्वतः
भारतात ठिकठिकाणी या
भारतात ठिकठिकाणी या पेष्ट्रीचे पॅटिस, रोल्स वगैरे मिळतात, त्यात चरबी म्हणून काय वापरले असेल, याबद्दल मला शंका आहे.
माझ्या एका तमिळ मैत्रिणीच्या घरी ओवळ्यासोवळ्याचे प्रस्थ प्रमाणाबाहेर जास्त होते. त्यांच्या कम्युनिटीत 'खारी खायची नाही कारण त्यात प्राण्यांची चरबी वापरलेली असते' असा दंडक काढलेला. मैत्रिणीला खारी खुप आवडायची, पण तिला ती कायमची सोडावी लागली. ... (हे विषयांतर झाले, क्षमस्व.)
अजुन एक विषयाला धरुन शंका. मी मैद्याचा काहीही प्रकार करताना लाटायला लागले की लाटणे उचलले की लाटलेली पोळी परत मुळ जागी येते. लाजोच्या फोटोत शिट्स अगदी व्यवस्थित जागच्याजागी राहिलेल्या दिसताहेत. हे कसे जमवायचे??? मी प्रायोगिक तत्वावर आज शिट्स करुन पाहते.
Thanks a lot, लाजो. आता
Thanks a lot, लाजो. आता करंज्या,सामोसे,पॅटीस,टार्ट आणि इतर पदार्थही बेक करु शकेन आणि तेही अगदी होममेड. पुन्हा एकदा बडावाला थँक्स !
२५० ग्रॅम सेल्फ रेसिंग फ्लार
२५० ग्रॅम सेल्फ रेसिंग फ्लार किंवा >>
लाजो, तुला self rising (सेल्फ रायजींग ) म्हणायचं आहे न?
लाजो, तुला self rising (सेल्फ
लाजो, तुला self rising (सेल्फ रायजींग ) म्हणायचं आहे न?<<< हो, इथे उच्चार रेसिंग असा करतात त्यामुळे मी तसच लिहीलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ब्रिटीश आणि ऑस्ट्रेलियन लोकं
ब्रिटीश आणि ऑस्ट्रेलियन लोकं सेल्फ-रेझिंग (raising) flour म्हणत असावेत .. माझी आई बेकींग क्लास ला जायची (भारतात) आणि तीही तसाच उच्चार करते कायम .. आपल्याकडे ब्रिटीश influence जास्त असल्यामुळे असेल तसं ..
बेकींग च्या संदर्भात rising आणि raising चा अर्थ एकच ना ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त गं लाजो थँक्स गं आता
मस्त गं लाजो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
थँक्स गं आता त्या बेक्ड करंज्या करायला काहीही हरकत नाही. मी पण पेस्ट्री शिट्स मुळेच ह्या करंज्या करायच नाही अस ठरवल होत आता नक्की करुन बघेन.
ये हुयी ना बात. बेक्ड करंज्या
ये हुयी ना बात. बेक्ड करंज्या करायला काहीही हरकत नाही. मी पण पेस्ट्री शिट्स मुळेच ह्या करंज्या करायच नाही अस ठरवल होत आता नक्की करुन बघेन.
परवा मी पफ पेस्ट्री बनवायचा
परवा मी पफ पेस्ट्री बनवायचा घाट घातला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण तु लिहिल्याप्रमाणे पिठात बटर घातले तर लाटता येईल याची खात्री वाटत नव्हती. म्हणुन नेटवर दाखवल्याप्रमाणे चौकोनी पोळी लाटुन त्यच्या मध्ये बटरची पोळी ठेवली.
मुंबईची हवा किती गरम आहे हे आम्हाला सवय झाल्यामुळे जरी लक्षात येत नसले तरी माझ्या बटरला ही हवा जराही सहन होईना. फ्रिजरमध्ये अर्धा तास ठेवुन पोळी लाटायला काढली तरी ती लाटता येईना, नरम गोळा झाला. शेवटी सगळा प्रोजेक्ट आवरुन सरळ फ्रिजरमध्ये ढकलुन दिला. (नंतर नेटवरच्या इंडिअन टिमच्या रेसिपीत वाचले पहिल्या पोळीला रात्रभर फ्रिजर आवश्यक आहे, थंड हवेत अर्धा तास पुरेसा होत असेल).
काल परत पोळी काढली आणि प्रोजेक्टला सुरवात केली. पहिल्या प्रयत्नानंतर मात्र नेटवर दाखवली तशी माझी पोळी बनायला लागली. काल दिवसभर लागुन ५ वेळा घड्या घातल्या. इथल्या हवेत पोळी लाटायला घेतली की खुप नरम पडायला लागते.
ही जी पोळी आहे ती सध्या साधारण पाव किंवा अर्धा इंच आहे. मला वाटते त्याचे लहान तुकडे कापुन ते चांगले लाटून (२-३ मीमी ) मग वापरावे अशी मुळ आयडीया असावी.
पण आता प्रश्न हा की जर मी तुकडे कापले तर बटर बाहेर निथळणार नाही ना? माझ्या कल्पनेप्रमाणे बटर एव्हाना पुर्णपणे पिठात मिसळले असणार. पण काही सांगता येत नाही. उगीच काहीतरी भलतेच झाले तर बनलेला पदार्थ मला एकटीलाच गुपचुप खावा लागेल
(टाकायचा धीर कसा होईल ???)
तसेही भलतेसलते होणार नाही म्हणा, काही झाले तर आयताकृती तुकडे करुन सरळ खारी म्हणुन खपवेन, खारीला चिक्कार गि-हाईके आहेत घरात. पण मी हा घाट घातलाय तो व्हेज, नॉनवेज पफ पॅटीस वगैरे जरा चांगल्या रचना करता येतील या आशेवर..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला जर ही पेस्ट्री फ्रिजरमध्ये फ्रिज करुन नंतरच्या वापरासाठी ठेवायची झाली तर २-३ मीमी पातळ लाटुन ठेवावी की आता जशी आहे तशीच ठेवावी?
साधना, मी तुझ्यासारखाच
साधना,
मी तुझ्यासारखाच पेस्ट्री बनविण्याचा " दाहक"प्रसंग अनुभवला आहे..मैदा-बे.पा-बटर्-फ्रीज चे पाणी-लाटा -फ्रिज मधे ठेवा-पुन्हा लाटा..काटेकोर पणाने केले.एकुण पेस्ट्रीपैकी अर्ध्या पेस्ट्री मधे मसाला भरुन पेस्ट्री ओव्हन मधे बेक केली ..सारणाची चव छान होती..पण वरच्या पेस्ट्री चे हाताला व खाताना खूप बटर लागत होते..त्यामुळे उरलेल्या पेस्ट्री मधे थोडा मैदा मिसळुन त्याचे साटे लाटुन खोबरे+पि.साखर च्या करंज्या केल्या व तळल्या..या दोन्हीथी पापुद्रे सुटलेले दिसत होते पण दुकानातल्या सारखा संपूर्ण लेयर नव्हता..मग असे कळले कि बेकरीवाले अन कुकिंग क्लास वाले मार्गरीन वापरतात..मार्गरीन घरी करता येते त्यासाठी सनफ्लॉवर आणुन ते डबल ब्रायलर मधे वितळवुन रूम टेम्प्.ला आणुन फ्रिज मधे सेट करायचे.सेट झाले कि त्याला खूप फेटायचे कि मार्गरीन तयार होते..पण हा प्रकार पुन्हा केला नाही..आता तू यशस्वी झालीस कि कळव..