आला आला गुढीपाडवा
औषधी कडुलिंब वाढवा
नविन वर्ष झाले सुरु
दारात उंच गुढी उभारु
उपवास मस्त आषाढी एकादशी
एकादशी आणि दुप्पट खाशी
करत विठ्ठल नामाचा गजर
दर्शनाने पडतो सगळा विसर
श्रावणात असतात सणच सण
माझा आवडता रक्षाबंधन
ताईने आणली राखी छान
जेवणाला नारळी भाताचा मान
नागपंचमीला पुजा नागोबाची
नैवेद्याला थाळी दुध लाह्यांची
चित्र वापरु, नको सापाला धोका
उंच कसा जातो बघा माझा झोका
बैल पोळा म्हणजे बैलांचा सण
तासलेली शिंगे आणि नवी वेसण
गेरूचे ठिपके आणि रंगित झुल
लाड होतात जसे लाडकं मुल
मुलांचा आवडता आला बाप्पा
आरासीच्या रंगल्या गप्पा
नैवेद्याला एकविस मोदक
तयार झालेत सगळे वादक
नवरात्राची सुरुवात घटस्थापना
नऊ दिवस देवीची उपासना
भोंडला - दांडिया , चौरंगावर भुलाबाई
खिरापत ओळखायला सगळ्यांचीच घाई
नवरात्र उत्सवाचा शेवट दसरा
आपट्याविना करु सगळे साजरा
मिळुन करु सरस्वती पुजन
रावणाच्या प्रतिमेचे करु दहन
सणांचा राजा म्हणजे दिवाळी
उटणे लावुन पहाटेच अंघोळी
नवे कपडे, फराळाचे पदार्थ चाखु
फटाक्यांशिवाय करुन प्रदुषण रोखु
संक्रांतीला तिळपोळी खाउया
सगळ्यांशी गोडगोड बोलुया
स्नेह वाढवणारा हा सण
नको तंटा करु निर्मळ मन
होळी रे होळी खाऊ पुरणपोळी
सर्व वाईट प्रथा जाळी
लाकडा एवजी केरकचरा जाळु
वृक्षतोडीने होणारा पर्यावरण र्हास टाळु
रंगपंचमी म्हणजे उधळण रंगांची
मस्तीच मस्ती लहान थोरांची
कृत्रिम आणि घातक रंग टाळू
नैसर्गिक रंगाने इको-फ्रेंडली खेळु
वर्षे.. बरं झालं तू
वर्षे.. बरं झालं तू प्रोजेक्ट नाही केलास.. आम्हाला एकाच वेळेस एवढे सारे सण अनुभवायला मिळाले.. आता मराठी कॅलेंडर मधे फक्त एवढेच दिवस शिल्लक रहावेत..
___/\___
मस्त गं वर्षा तुझ्या या
मस्त गं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वर्षा तुझ्या या कवितेमुळे मला सगळे सण लक्षात राहतील असं वाटतय
माझापण ___/\___
चांगली कविता
चांगली कविता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वर्षे शुद्धलेखन कल्हई १.
वर्षे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
शुद्धलेखन कल्हई
१. नेवेद्याला>> नैवेद्याला.
२. नवे येसण >> वेसण
३. गेरूचं >> गेरूचे
४. लाडक >> लाडकं
५. उटने >> उटणे
६. जिथे जिथे उ आहे तिथे तिथे दिर्घ ऊ कर..
बाकी कविता झ्याक..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नेवेद्य बदल की गं
नेवेद्य बदल की गं![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
छान जमलीय सण वर्षाचे :
छान जमलीय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सण वर्षाचे : तुझेच काय म्हणून? आमचे पण हेच सण आहेत![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्त जमलीय कविता फक्त
मस्त जमलीय कविता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फक्त "आपट्याविना" वाली ओळ कळाली नाही. आपट्याची पाने देउ नयेत वगैरे असे काही आहे का आजकाल?
वर्षे, एकदम मस्त जमलिये कविता
वर्षे, एकदम मस्त जमलिये कविता
बोले तो, एकदम झक्कास ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फक्त "आपट्याविना" वाली ओळ कळाली नाही. आपट्याची पाने देउ नयेत वगैरे असे काही आहे का आजकाल?<<< हे मला पण नाही उमजले![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
आपट्याची पाने देउ नयेत वगैरे
आपट्याची पाने देउ नयेत वगैरे असे काही आहे का आजकाल? >>> दोन वर्षापुर्वी सकाळ मधे दसर्याच्या १ दिवस आधी आणि नंतर असे आपट्याच्या झाडाचे फोटो आले होते. तो दुसर्या दिवशीचा झाडाचा बोडखे फोटो पाहुन खुपच वाईट वाटले होते.
मला आत्ता ते सापडले नाही. पण ही लींक जवळपास तशीच आहे
http://epaper.esakal.com/esakal/20090928/5438900599957801860.htm
वर्षे, छान कविता. दोन
वर्षे, छान कविता.
दोन वर्षापुर्वी सकाळ मधे दसर्याच्या १ दिवस आधी आणि नंतर असे आपट्याच्या झाडाचे फोटो आले होते. तो दुसर्या दिवशीचा झाडाचा बोडखे फोटो पाहुन खुपच वाईट वाटले होते. >>>>> मी कुठेतरी असे वाचले होते कि आपले बहुतेक सण निसर्गाशी संबंधित असतात. आपट्याचे पान खुडले तरी त्याला नविन पानं येतातच कि, त्यामुळे वाईट वाटण्याचे कारण नाही. (चुभुद्याघ्या :))
योगेश तुझं म्हणणं जरी खरं
योगेश तुझं म्हणणं जरी खरं असलं तरिही, आपण आपट्याची पाने तोडून त्याचं कन्स्ट्रक्टिव्ह असं काय करतो ना? नुसती देव-घेव करून नंतर फेकूनच देतो..![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
हम्म्म.... मग सोन्याचे पानं
हम्म्म.... मग सोन्याचे पानं घ्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लय भारी गं
लय भारी गं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वर्ष..खासच!!
वर्ष..खासच!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फार फार सुंदर.
फार फार सुंदर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त कविता आपण आपट्याची पाने
मस्त कविता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपण आपट्याची पाने तोडून त्याचं कन्स्ट्रक्टिव्ह असं काय करतो ना? नुसती देव-घेव करून नंतर फेकूनच देतो.. >> अगदी अगदी.
खुप छान लिहल आहे, गमतीशीर आणि
खुप छान लिहल आहे, गमतीशीर आणि बोधपुर्ण...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
छाने
छाने![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद
धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)