बिंदिया नैन ही धाडसी मुलगी होती हेच त्याला माहीत नव्हतं!
नॉर्मली मुली आपल्या गप्प बसतात आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्याच्या मागे लागतात. पण ही होती सिलिगुडी येथे वास्तव्यास असलेल्या एका मेजरची मुलगी! ती बिनधास्तच असणार!
कधीकधी लाईट जातात आणि अभ्यासात खंड पडतो म्हणून तिने आज एक कमांडो टॉर्च विकत आणला होता आणि आपल्या रूममेट्सना दाखवत होती. रूममधे लाईट घालवून निर्माण केलेला प्रकाश तर भरपूर होता. पण उत्सुकता म्हणून 'हा प्रकाशझोत किती लांबवर जातो' हेही मुलींना पाहायचे होते आणि त्या तिघीही गॅलरीत आल्या होत्या.
आणि बिंदियाने सरळ आपला प्रकाशझोत टाकला की होस्टेलच्या मागच्या टेकडीवर!
आत्मानंद ठोंबरे! लांबवर अंधारात कसेबसे बसून लेडिज होस्टेलच्या प्रकाशलेल्या रूम्सवर नजर ठेवून होते. अर्थात, तो आत्मा आहे हे या मुलींना समजलेच नाही. खरे तर तिथे कुणीतरी आहे व इतक्या लांब आहे याची चिंताही बाळगण्याचे काही कारण नव्हते. पण असा कसा काय अंधारात एखादा माणूस असेल? बर देहधर्मासाही पलीकडच्या मजूर वस्तीतले कुणी आले म्हंटले तरी अगदी इकडच्या बाजूला येईल याची शक्यता नव्हतीच! आणि प्रकाशझोत पडल्या पडल्या जाणवलेल्या त्या माणसाच्या घाबरलेल्या वेगवान हालचाली आणि कॉलेजकडेच पळण्याची दिशा पाहून इतर मुलींना काहीही समजले नसले तरीही बिंदियाला क्षणार्धात समजले! हा वासूगिरी करणारा पोरगा आहे जेन्ट्स होस्टेलवरचा कोणीतरी!
तीरासारखी बिंदिया खाली धावली अन तिच्या मागोमाग रूममधल्या दोन आणि त्यांची धावपळ पाहून आणखीन चार मुली! झाले काय तेच बिंदियाशिवाय कुणाला माहीत नव्हते.
आणि नेमकी बिंदिया खाली आली त्या क्षणाला आत्म्याला लपायला एक जागा मिळाली. काय झाले काय झाले वर जशी चर्चा वाढू लागली तशी बिंदिया सगळ्या मुलींना म्हणाली...
"कोई लडका था... लडकियोंको घुरने आया था यहां... भागगया लगता है..लेकिन ध्यान रखो सब.. जैसेही मिलेगा पकडेंगे... डरना मत... कुछ नही करते ऐसे रोमिओज..."
आत्म्याने हे संपूर्ण वक्तव्य ऐकले होते. आणि त्याची खरोखरच देहधर्मासाठी पुन्हा टेकडीवर जायची मनस्थिती झालेली होती.
सहा महिने झाले त्या घटनेला!
वन्याच्या आईला अॅडमिट केलेले समजल्यावर चौघेही पहाटे पाच वाजता कर्जत तालुक्यात पोचले अन हॉस्पीटलमधे एकच हल्लकल्लोळ उडाला! वन्या अन त्याची बहीण वनिता दोघांनाही दिल्या, अश्क्या आणि आत्माने सावरले. आई बरी होती! म्हणजे लागले बरेच होते, पण पूर्ण बरी होण्यासारखी होती आणि तेही चार, पाच दिवसात
पण एक मोठा घोळ झाला होता. नेमका एका स्थानिक राजकीय पुढार्याच्या पत्नीला त्याच रात्री किरकोळ अपघात झाल्यामुळे तिला तेथ आणले होते आणि त्याच्यासमोर 'नवर्याने मारहाण केलेल्या बाईला' अॅडमिट केले गेल्यामुळे त्याने त्या बाबीचे राजकीय भांडवल करता यावे म्हणून दबाव आणून त्या गोष्टीची रीतसर पोलीस केस करायला लावली होती आणि वन्याचा बाप चौकीवर रात्रभर पोलिसांची दमबाजी अन शिवीगाळ ऐकत घाबरून बसला होता.
दिल्या आणि आत्मानंदने खूप सांगीतल्यामुळे वन्याने काहीतरी खटपट करून त्याला सकाळी दहाला चौकीवरून काढण्यात यश मिळवलं! पण एका टुकार दोन पानांच्या स्थानिक दैनिकात मात्र मारहाण झालेल्या बाईचा व मारहाण करणार्या नवर्याचा फोटो आला होता व ती त्या दिवशीची हेअलाईन ठरली होती. त्यामुळे अब्रूच गेल्यासारखा वन्या हतबल झाला होता.
नेमका तो पुढारी दिल्याच्या मामांच्याच पक्षाचा निघाल्यामुळे दिल्याने जबाबदारी घेऊन त्याला दुसर्या दिवशी 'कालची बातमी अपूर्ण माहितीमुळे दिली होती व तो एक अपघात होता' असे छापून आणायलाच लावले.
मात्र या काळात अशोकने सगळी धावपळ करून वन्याच्या आईच्या उपचारांमध्ये अत्यंत मोलाचा वाटा उचलला. परिस्थिती अशी होती की दिल्या बातमीच्या भानगडीत अडकलेला, आत्मानंद सारखा वन्याबरोबर त्याला मदत म्हणून फिरतोय! यात नेमकी पेशंट असलेली त्याची आईच दुर्लक्षित होऊ नये म्हणून अशोक तिथेच थांबून जीवाचे रान करून सगळे आणून देत होता आणि वनितालाही धीर देत होता.
दुसर्या दिवशी जेव्हा अशोक, दिल्या आणि आत्मा निघाले तेव्हा सगळ्यांसमोर वन्याच्या बापाने वन्याची रडत रडत माफी मागीतली. आपल्याच मुलाचा मित्र नसता तर आपण आत्ताही चौकीतच सडत असतो आणि आपल्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम करणार्या आपल्या बायकोकडे कुणीच पाहिले नसते हे त्याला जाणवले. अक्षरशः मुलाच्या तीनही मित्रांसमोर त्याने रडत रडत माफी मागीतली. तेव्हाही आत्म्यानेच त्यांना 'काका, अहो रागाच्या भरात होतं असं, तुमचं किती प्रेम आहे, वनदास नेहमी सांगत असतात आम्हाला' असे म्हणाला आणि मग तर वन्याच्या बापाने वन्याला जवळच घेतला.
इतके अपराध असूनही जेव्हा बापाचा तो स्पर्श झाला तेव्हा लहानपणापासून बापाने 'पहिला मुलगा' म्हणून आपले केलेले अमाप कौतुक वन्याला आठवले अन तोही जरा ओलावलाच! त्याने बापाच्या पाठीवरून हात फिरवला.
एक आठवड्याने वन्याही कॉलेजला परत आला तेव्हा.....
..... रूम नंबर २१४ मधली या आधी झालेली सर्व भांडणे आता नष्ट झालेली होती आणि वन्या आणि अश्क्याने एकमेकांना मिठी मारली होती... अशोकने खुल्या दिलाने माफीही मागीतली होती आणि दिल्याने वन्याकडून कबूल करून घेतले होते की त्याच्या पैशांनीही वन्या दारू पिणारच!
मात्र या सहा महिन्यात एका बाबीने फारच गंभीर स्वरूप धारण केले! ते म्हणजे सहा महिन्यात अशोकच्या मोठ्या भावाच्या दोन आणि वडिलांची एक चक्कर होस्टेलला झाली होती. त्या शिवाय त्या दोघांनी आजवर त्याला चार पत्रेही पाठवली होती. या सर्वाचा उद्देश एकच की 'तू शपथ घे की त्या मुलीत गुंतणार नाहीस'! आणि प्रत्येक वेळेस अशोकचे उत्तर एकच होते! आता 'न गुंतण्याचा' प्रश्न येत नाही. जेव्हा गुंतलेलोच नव्हतो तेव्हाच तो प्रश्न होता. मला तुमच्या सर्वांबद्दल प्रेम व आदर आहे. पण ती मुलगी मुसलमान असली तरीही अत्यंत चांगली आहे व प्रेमळ आहे.
अशोकने असा स्टॅन्ड घेण्यामागे होत्या सारसबागेच्या आनंद भेळवाल्यापाशी झालेल्या त्याच्या आणि रशिदाच्या आजवरच्या चार भेटी!
रशिदा अशोकला भेटून फारच सुखवायची! तिच्या चेहर्यातच बदल व्हायचा. अर्थात, पहिल्या भेटीत हे झालेले नव्हते. पहिल्या भेटीत तिला फार भीती वाटत होती. पण त्याच भेटीत अशोकने तिच्याहून लहान असूनही इतके भारी विचार मांडले होते की ती ऐकतच बसली होती.
"देखो, आप मेरेसे उमरमे बडी हो, आप मोहमेडियन हो, आपकी एक बार शादीभी हुई है! मै कॉलेजमे जाता हूं, सिर्फ बीस साल का हूं, हिंदू हूं और मेरी अभी शादी की उमर तो हैही नही! ये सबभी अगर ध्यानमे ले, तो भी ये तो फिर भी सच है के मुझे हमेशा लगता है के मै आपसे मिलू और मैने एक बार आपसे रिक्वेस्ट की तो आपने भी बडे दिले ना नही करी! है ना? तो इसके पिछे कुछ तो होगाही जो हम दोनोंके बसमे नही है! मै एक मोटासा.. सावलासा लडका हूं! लेकिन दिलसे अच्छा हूं! आप सुंदर तो है ही! मगर आप भी दिलसे बहोत अच्छी है! आपसे दोस्ती करके मै आपपर कोई अहसान नही जतारहा हूं!
देखिये, हम दोनो मे जो फासले है वो तो इतने है के कोईभी हमे दोस्ती बढानेकी पर्मिशन नही देगा.. लेकिन... दोस्ती तो सार फासलोंसे परे है ना?
रशिदा... मै... मै कुछ कह नही सकता... लेकिन.. जो कहना चाहता हूं... वो बात... कई बार कई लोगोने अपने अपने.... उस दोस्तसे कही है... आप खुदही समझले... आप पुनामेही है अपनी मांजी के साथ... तो ... हम लोग तो किसीको बताये बिना और किसीको कुछ मालूम हुवे बिनाभी मिल सकते है... लेकिन... मैने एक बात ठानली है... मैने अपने घरवालोंसे बहुत बडा झगडा किया है..."
रशिदा - किस बातपर??????
अशोक - मैने... मतलब अपनी तरफसे मैने.... उनको बतादिया है....
रशिदा - .....??????
अशोक - ........
रशिदा - क्या?? क्या बतादिया??????
अशोक - यही.... के मै सिर्फ आपसेही शादी करना चाहता हूं!
खाडकन रशिदा गंभीर झाली होती. बराच वेळ नुसतेच बसून होते दोघे!
मग रशिदानेच तोंड उघडले.
रशिदा - देखिये.. एक तो आप छोटे है.. सीखरहे है... मेरी शादी हुई थी... उन्होने मुझे तलाकभी नही दिया है... सिर्फ छोडदिया... और... और हम लोग... मुस्लिम है... आप लोगोंके घरमे ... मेरा बहू बनके आना... होही नही सकता... लेकिन....
अशोक - ...... लेकिन???
रशिदा - लेकिन... मेरी पहिली शादी.. आठ साल पहले हुई थी... उस मर्दसे मुझे कोई भी लगाव नही था... दरस्सल वो सब सोचनेकी उम्रही नही थी... उसने बहोत पीटा.. मारा.. शराब पीता था.. गालिया देता था... मै शायद.. मै शायद एक दिन मर भी जाती ... लेकिन पता नही क्यों... उसीने छोड दिया.. लेकिन... एक बात मै तुमसे जरूर कहना चाहुंगी.. के... हमारे बीचमे अगर कोई भी ऐसा रिश्ता ना भी हो.. जिसे दुनिया एक नाम दे सकती है... फिर भी... अगर मैने... मुझे... पहिली बार कोई अच्छा लगा हो.. तो वो तुम हो... अशोक... दीवारोंपर पिक्चर्सके पोस्टर्स लगे हुवे होते है... देखे है?? कुर्बानी, त्रिशुल, डॉन?? देखते हो ना?? उन सब पोस्टर्समे जो हिरो होते है ना.. वो दिखनेमे हिरो होते है.... और... जब आदमी जिंदगी जीना सीखता है ना.. तो साथ साथ ये बात सीख जाता है... के उन पोस्टर्समे जैसे होते है... वैसे रोज की जिंदगीमे कोई हिरो नही होता... देखनेम हो भी! लेकिन... पेश आनेमे तो हरगीज नही... इसलिये... तुम मोटे हो या सावले.. हिंदू हो सीख... सीख रहे हो या शादीशुदा हो.... जो रिश्ता उस दिन अॅक्सीडेन्टके दिन हम दोनोमे पैदा हुवा... मेरे लिये वो एकही रिश्ता है... और वो एकही रिश्ता मैने अपने दिलसे किया है...इसलिये... हमारी शादी शायद कभी ना भी हो... हम शायद दोबारा ना भी मिले.. शायद एक दुसरे को दोबारा देख भी न पाये... लेकिन... मेरे लिये अब तुम वो इन्सान हो... जिसे मै चाहती हुं... और जिसके सिवा मै किसीको चाह नही सकुंगी! लेकिन एक वादा करो.... अब हम नही मिल सकते... ..
आणि केवळ पंधराच दिवसांनी भेटण्याचा मोह अनावर झाल्यामुळे रशिदा पुन्हा त्याच आनंद भेळवाल्याच्या स्टॉलपाशी त्याला भेटली होती.
आणि हे त्याने सरळ पत्रातून घरी सांगूनही टाकले होते.
त्यानंतर वडील आणि मोठा भाऊ एकदमच आले रूमवर! नशीबाने त्या संध्याकाळी कुणीच प्यायला बसलेले नव्हते. पण रूममधे साठलेला सिगारेटचा धूर पाहून नाक मुरडून वडिलांनी अशोकलाच बाहेर यायला सांगीतले. खरे तर अशोकला स्वतःला तो प्रसंग फेस करायला काहिच हरकत नव्हती. पण त्याने साथ असावी म्हणून दिल्या, वन्या आणि आत्मानंद तिघांनाही बरोबर घेतले.
सहाच्या सहा जण अक्षय हॉटेलमधे गेले! अशोकचा मोठा भाऊ बोलायला लागला.
दादा - अशोक... आम्ही हे सांगायला आलो आहोत की हे वय आडनिडं असतं! या वयात तसं काहीही नसतं! एखाद्या मुलाला एखादी मुलगी सहज आवडू शकते. संपूर्ण आयुष्य ज्याच्याबरोबर काढायचं असतं असा माणूस असा एकदा पाहून किंवा दोन तीनदा भेटून ठरवता येत नाही. खरे तर त्या वयात तेवढी.... तेवढी अक्कलच नसते. त्याचे कारण हे असते की त्या वयात जबाबदार्या नसतात. नुसतीच आवड असते. तुला आता सांगायलाच हवे म्हणून सांगतो! तुझी बायको मुसलमान असेल तर तुझ्या वहिनीच्या घरचे कुणीही आपल्याकडे येणार नाहीत. ते कडक आहेत. तुझी बायको मुसलमान असली तर तिच्या सगळ्या रीतीभाती वेगळ्या असणार! ते रोजे पाळणार, मांसाहार करणार, सगळं करणार! आपल्यासारखे दसरा दिवाळी ते पाळत नाहीत.
अशोक, ठायी ठायी, क्षणोक्षणी तुला मी आज जे सांगतोय ते आठवत राहील, त्याचा अनुभव येत राहील! की दादा काय सांगत होता! ती मुलगी मुसलमान असल्याची जाणीव तुला प्रत्येक गोष्टीत होत राहील. तिचं ते हिंदी बोलणं, बघणं, वागणं, स्वयंपाक! अशोक, ते लोक आणि आपण! खूप खूप अंतर असतं दोघांमध्ये!
एक लक्षात घे! मी काय किंवा वहिनी काय! तुझ्या हिताचंच सांगणार ना? बरं मी म्हणतो एक वेळ आमचं जाउदेत! बाबा तर तुझ्याच चांगल्याचं सांगणार ना? आई गेल्यावर ते एकटे झाले असते. मी अन तुझ्या वहिनींनी जमेल तसा त्यांना मानसिक आधार दिला. पण आज नाही म्हंटले तरी त्यांच्या तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. तू आता इंजीनीयर होणार आहेस! मी एवढा शिकू शकलो नाही. पण तुला ते शिकवतायत! आता मला सांग! शिक्षणाचा विषय बाजूला ठेवून तू जर एका मुसलमान अन तेही लग्न करून नवर्याने सोडलेल्या बाईच्या मागे लागलास तर बाबांना मनःशांती तरी मिळेला का??
एक नीट लक्षात ठेव अशोक! ती बाई वाईट असेल असे मी म्हणतच नाही आहे. पण जरा सर्व घटकांचा विचार कर! मुसलमान समाजात नवर्याने तलाक न घेता वार्यावर सोडलेली जी बाई असते तिला समाजात नेमके काय स्थान मिळते ते आपल्याला माहीत नाही. कदाचित असेही असेल की अशा बाईला कुणीच कधी जवळ करणार नसेल! त्यामुळे कदाचित तिचे भवितव्य मुस्लिम समाजात जर शुन्य असले तर? मग तिला पर्यायच काय आहे एखाद्या इतर धर्मीयाकडे वळण्याशिवाय! तू म्हणशील ती नोकरी करून एकटी राहू शकते! पण पंचविसाव्या वर्षी असा निर्णय घेणे ही अत्यंत अवघड बाब आहे अशोक! पुढे जवळपास पन्नास साठ वर्षांचा प्रचंड कालखंड असताना तो एकट्याने ढकलणे एवढे सोपे नाही! एका तरुण वयाच्या स्त्रीसाठी तर अधिकच अवघड!
मला असे म्हणायचे नाही की तुला तिने फितवले आहे किंवा त्यात तिचा काही प्लॅन आहे. पण तूच विचार कर! तुझे सामाजिक स्टेट्स किती वेगळे आहे. हिंदू, अविवाहीत, इंजीनीयर होणारा, फक्त वीस वर्षांचा! आणि ती? मुसलमान, लग्न झाल्यानंतर नवर्याने सोडलेली, वयाने तुझ्याहून पाच वर्षांनी मोठी आणि ... न शिकलेली!"
'न शिकलेली' या शब्दांवर मात्र अशोकने मौन सोडले.
अशोक - बाराव्वी झाली आहे रशिदा....
दादा - एक मिनीट.. तिचे क्वालिफिकेशन हा आपल्या चर्चेचा मुद्दाच नाही... ती डॉक्टर असूदेत.. पण मी हे जे सगळं सांगतोय ते समजतंय का नाही?? डोक्यातच शिरत नसेल तर अवघड आहे मग...
अशोक - तुझं झालं का बोलून??
दादा - नाही... आधी मला हे सांग... हे तुझे हे जे रूममेट्स आहेत... त्यांचं या डिस्कशनमधील स्थान काय?? म्हणजे तुमच्या मैत्रीबाबत मला काहीच म्हणायचं नाही.. पण ही बाब अत्यंत घरची आहे... ही आपण सगळे कशी काय डिस्कस करायला बसलो आहोत??
खरे तर हाच प्रश्न अशोकच्या वडिलांनाही विचारावासा वाटत होता. अठरा, वीस वर्षांच्या पोरांसमोर काय म्हणून ही चर्चा! बरं! ही सगळी चांगल्या घरची मुलं आहेत म्हणून आपण त्यांना उडवून लावू शकत नाही एवढंच! पण नीट सांगायला काहीच हरकत नाही, की मुलांनो, आम्हाला जरा बोलूदेत! तुम्ही परत रूमवर जा!
बाबा - बरोबर आहे.. अशोक... आत्ता आपण तिघंच बोलू असं मलाही वाटतं!
मेसेज समजल्यामुळे दिल्या, आत्मा आणि वन्या उठले. अशोककडे पाहून मान डोलावून बाहेर जायला निघाले तेव्हा अशोक म्हणाला...
अशोक - थांबा... बाबा... दादा... हे तिघं तुमच्यापुढे खूपच लहान आहेत, आपल्या घरातले नाहीत, आपण आत्ता जे बोलणार आहोत ते अत्यंत खासगी व अत्यंत महत्वाचं आहे... सगळं बरोबर आहे... मग मला सांगा... हेच विचार त्या रात्री मला हार्ट अॅटॅक आल्यावर या तिघांनी केले असते तर????
खरे तर हा फारच अनाठायी आणि उद्धट प्रश्न होता. अशी परिस्थिती आल्यावर एखादा अनोळखी माणूस सुद्धा मदतीला धावतो तिथे हे तिघे तर काय खोलीत राहणारे मित्रच होते. मात्र, अशोकने अशा वेळी आणि अशा ग्रूपमधे तो प्रश्न विचारला होता की वडिलांचा आणि भावाचा चेहराच खर्रकन उतरला.
बाबा - हे बघ अशोक, तुझ्यावरच काय, माझ्या स्वतःवर तुझ्या या तीनही मित्रांचे अत्यंत मोठे उपकार आहेत. काय वाट्टेल ते झाले तरीही तू या मित्रांची मैत्री निभाव आणि मीही त्यांच्या उपकारात राहीन! पण तरीही... ही चर्चाच वेगळी आहे... यात अनुभवाचे बोल महत्वाचे आहेत. भावनेचे नाहीत.
खरे तर आत्तापर्यंत दिल्या, वन्या आणि आत्मानंदने निघून जायला हवे होते. पण अचानक गरज नसताना आत्मा बोलू लागला आणि मग सगळ्यांनाच थांबावं लागलं!
आत्मा - काका, दादा, आम्ही यायला नको होतं! ही चर्चा होणार हे माहीत असून आम्ही तिघेही उद्धटपणे इथे येऊन बसलो त्याबद्दल ... खरच क्षमस्व! आम्ही निघतो आहोत.. पण... तुमची परवानगी असेल तर... एकच बोलू का??
वडील आणि दादा उत्सुकतेने बघत होते. आत्म्याची भाषा परिपक्व असल्याने त्याच्या बोलण्याचा प्रभाव पडत होता. त्यांचे उत्सुक चेहरे पाहून आत्मा पुढे म्हणाला...
"तुमचा दोघांचा अजिबात विश्वास बसणार नाही. पण अशोक यांनी आम्हाला हे सगळे सांगीतले आणि खरंच सांगतो... आमची चौघांची त्या दिवशी अक्षरशः कधी झाली नव्हती भांडणे झाली. आम्ही तिघांनी कसून विरोध केला यांच्या या कल्पनेचा! अक्षरशः मूर्खपणाची कल्पना! एका हिंदू अविवाहीत मुलाने वयाने मोठ्या असलेल्या एका मुस्लिम परित्यक्तेशी विवाह करण्याची! हे ऐकूनच हे दिलीप इतके भडकले की त्या दिवशी हे सरळ तुम्हाला दूरध्वनी करणार होते दादा! तुम्हाला सांगणार होते की अशोक यांचा प्रस्ताव कधीही मान्य करू नका! हे जे वनदास आहेत त्यांनी तर त्या रशिदाताईंना स्वतः भेटून यांचा नाद सोडायची विनंती करायची तयारी दर्शवली. मी अशोक यांना म्हणालो.. की निदान स्वतःच्या घरचा, घरातल्या मंडळींचा तरी विचार करा! ज्यांनी केवळ तुमच्यासाठी आजवर सर्व कष्ट काढले त्यांना केवळ तुमच्या इच्छेमुळे तुम्ही लांब करणार?
आणि खरच सांगतो, दिलीप यांनी तुम्हाला दूरध्वनी केला नाही, वनदास त्या ताईंना भेटले नाहीत... कारण काय माहीत आहे? कारण आहे ... खुद्द रशिदाताई आम्हाला... आपण आत्ता सगळे जिथे बसलो आहोत... तिथेच आम्हाला तिघांनाही दुसर्या दिवशी भेटल्या... आणि .. त्यांचे बोलणे.. मला हिंदीत सांगता येणार नाही... पण... मातृभाषेत... जमेल तसे सांगतो... तुम्हा मोठ्यांना थापा मारायचा हेतू असता तर आम्ही तुमच्या समोर येऊच शकलो नसतो आत्ता इथे... एवढेच काय? अशोक यांचे एका गोष्टीसाठी मात्र आम्ही तिघांनीही कौतुक केलेले आहे ती ही ... की त्यांनी काहीही न लपवता तुम्हा सर्व मोठ्या माणसांना आणि आम्हा मित्रांना सगळे खरे खरे सांगीतले...
तर रशिदा ताई म्हणाल्या....
आपल्या दोघांमध्ये कोणतेही नाते निर्माण होऊ शकत नाही अशोक... तुम्ही तुमच्या घरच्यांचे मनःस्वास्थ्य बिघडवून माझ्याशी नाते जोडू पाहता आहात ही अत्यंत हास्यास्पद बाब आहे... मी एक चाळीत राहणारी स्त्री... ठीक आहे की तुम्हीही एका तशाच चाळीत राहता.. तुम्ही काही फार श्रीमंत नाही आहात.. पण तरीही... मी एक चाळीत राहणारी स्त्री... जिचे वयाच्या.. फक्त सतराव्या वर्षी लग्न लावले तिच्या आईने... का माहितीय?? कारण वडील नव्हते मला.. आणि आईवर मी आता फक्त एक जबाबदारी ठरत होते.. माझी आईला साथ मिळायच्या ऐवजी आईला माझी जबाबदारी वाटत होती... मी शिकत होते.. बारावीला मला ८१ % गुण मिळालेले होते.. कसेबसे पैसे जमवून महाविद्यालयात प्रवेशही घेतला होता... आमच्या समाजात बरेचदा स्त्री एवढी शिकलेली चालतही नाही... कारण स्त्री म्हणजे फक्त वंश वाढवण्यासाठी आणि घरकाम करण्यासाठी आणलेली कंत्राटावरची मजूर... एवढीच ओळख आमची... सुंदर असलो तर अधिक मागणी... इतकंच...
मी तर सुंदर गणण्याइतकीही नाही अशोक.. आणि.. वय फक्त सतरा... आई म्हातारी... तुम्हाला सांगते.. आईने तो निर्णय परस्पर घेतला तेव्हा मन इतके तडफडले.. निपाणीत आजूबाजूला दिसत होते... आमचा मुहल्ला सोडून बाहेर पडले की बाकीचे सर्व लोक किती स्वच्छ राहात होते.. किती शिकत होते.. नोकर्या करत होते... बायकांना किती सन्मान होता घरात.. बायकाही नोकर्या करत होत्या... आणि अशोक.. इतके विचार करण्याचे माझे वयही नव्हते... पण... काही बालिश स्वप्ने होती... की आपल्याला कुणीतरी आवडावा... आणि त्यालाही आपण... आणि त्याच्याशीच लग्न व्हावे.. महाविद्यालयातील बाकीच्या सर्व मैत्रिणी ज्या वेळेस अभ्यासाला लागल्या त्या वेळेस मी... मेहंदी लावून घेत होते हातांवर... येणार्या जाणार्या बायका माझी थट्टा करत होत्या...
पण... आईचा सहवास संपणार आणि.. ती एकटी राहणार आणि म्हातारपणात तिला काही सोसणार नाही या विचारांनी मी खूप त्रासलेले होते... सतत आईला सांगायचे... जा त्यांच्याकडे आणि सांग.. नाही मला लग्न करायचं.. पण आई ती आईच.. शेवटी तरुण मुलीला किती दिवस घरात ठेवणार..
आणि त्या दिवशी मी त्या माणसाला पहिल्यांदा पाहिले... ज्याच्याशी माझी शादी होणार होती... काही कामाने तो आमच्या घरी आला होता... माझ्याकडे असा बघत होता जणू मी म्हणजे बटीकच आहे... आणि त्या दिवशी.. तो गेल्यानंतर... माझे आणि आईचे पहिलेवहिले आणि .. प्रचंड भांडण झाले.. इतके की मी घर सोडून जाण्याची अन जीव देण्याची धमकी दिली.....
... अशोक... तुमच्या समाजात स्त्रिया शिकतात... स्वतःच्या पायावर उभ्या राहतात.. स्वतःसाठी नवरा शोधू शकतात.. त्यांना निवड असते... एक किंवा दोन मुले झाल्यावर थांबतात... घरात त्यांना पुरुषांइतकाच सन्मान असतो... आमच्याही समाजात अशी कित्येक उदाहरणे असतीलही.. पण प्रामुख्याने आमच्या समाजात स्त्री ही पुरुषावर अवलंबून असलेली, त्याच्या कलाने चालणारी असते अशोक...
मी दिलेल्या धमकीचा परिणाम भलताच झाला... आईला दवाखान्यात न्यावे लागले.. तिला खूप मनस्ताप झाल्यामुळे चक्कर आली होती... तिची ती परिस्थिती पाहून मी ठरवले.... सर्व स्वप्नांना सुरुंग लावायचा... आपल्याला जन्म देणार्या आणि आपल्याला लग्न होईपर्यंत तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार्या आईला निदान... आपल्याकडून तरी त्रास होता कामा नये.... कोणताच...
... मी लग्नाला तयार झाले... त्या नालायक माणसाशी लग्न करायला... आणि.. मग हळूहळू माझी चेष्टा करणार्या बायकांना पाहून आनंदायला लागले... हातांची मेंदी... नवीन कपडे... नटणे.. यात रस घेऊ लागले..
लग्नाचा दिवस उजाडला... काय ते कौतुक... आमची शादी अगदीच साधी झाली खरे तर.. आईकडून त्यांनी बरेच काय काय घेतले... ते देण्यासाठी आईला पुढचे वर्षभर तरी काही ना काही काम करावे लागणारच होते.. म्हणून तिने एका शिवणाच्या दुकानात नोकरीही धरली... .. आणि इकडे...
... माझ्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात झाली... सासू आणि दीर पहिल्या दिवसापासूनच टाकून बोलायला लागले... नवरा मात्र मजा करायला पाहात होता... तो मिळेल ते काम करायचा... दीरही तसाच... जाऊही शेवटी शेवटी छळायला लागली... आणि एक दिवस तो स्फोट झाला...
मी सासूला उलटून बोलले.... आणि अशोक... त्या चौघांनी मला बांधले आणि चटके दिले... हे बघा.. माझ्या हातावरचे डाग... मी आक्रोशत होते... आजूबाजुच्या लोकांनी मधे पडून माझा तो छळ थांबवला.. शरीरभर होणार्या वेदना विसरून मी पुन्हा कामाला लागले.. पण आता... आता माझा छळ अधिक वाढला...
आईकडे असताना कधीही घरात मांसाहार व्हायचा नाही.. तुम्हाला सांगते अशोक.. निपाणीत अनेक मुसलमान असे आहेत जे नवरात्रही बसवतात घरात... गणपतीच्या मिरवणूकीत नाचतात.. दसर्याला खरेदी करतात.. दिवाळीला फटाके उडवतात.. गोडधोड करतात.. आमचेही घर तसेच होते... आम्हीही नवरात्र बसवायचो... एकदाही मांसाहार न केलेल्या मला.. सासरी फक्त मांसाहार शिजवायलाच लागायचा आजवर.. पण त्या दिवशी त्यांनी... दोन कोंबड्या घरात आणून मारल्या... मला ते दृष्य पाहवले नाही.. त्यावरून थट्टा झाल्यावर पुन्हा मला त्रास दिला...
त्यातच गल्लीतला एक दारुडा उगाच्च माझ्याशी काहीतरी बोलायचा.. मी एक शब्द त्याच्याशी न बोलता खाली मान घालून घरात पळायचे... पण जावेने माझ्या नवर्याकडे खोटी तक्रार केली... नवर्याने तुला सोडून देईन असा दम भरला आणि.. त्या दिवशी मला उपाशी ठेवून... खूप मारले अशोक.. खूप मारले.. त्या माराची आठवण आली तरी आज शहारे येतात अंगावर... असे कुणालाही मारू नये... तो दारुडा मात्र अजूनही तसाच वागत होता...
त्यातच आमच्याकडे कुठूनही लांबलांबचे नातेवाईक येत! दोन खोल्यांच्या त्या घरात आमचा कसला संसार होणार आधीच पाच माणसे असताना.. त्यात हे नातेवाईक.. आले की दहा दहा दिवस राहायचे.. सगळेच भणंग... सगळ्यांची धुणी भांडी अन स्वैपाक करताना जीव जायचा अक्षरशः.... पण... तरीही माझ्या आईकडे बघून मी सहन करायचे... मात्र... त्या दिवशी फारच झाले...
आलेल्या तीन नातेवाईक पुरुषांनी सासूला आणि नवर्याला बरेच पैसे दिले होते... कसले पैसे दिले काही कळले नाही... मग घरातच पार्टी करायला बसले... आम्ही दोघी जावा सतत पुढे पुढे करत होतो... हे आणा.. ते आणा.. माझा नवरा अन दीर प्यायचे आणि भरपूर प्यायचे हे घरात मला आणि सगळ्यांनाच माहीत होते... पण एवढ्याश्या घरात एकदम पाच माणसे बसून प्यायला लागल्यावर भीतीच वाटली.. त्यातच त्या पैसे देणार्याने माझी थट्टा केली... दारूचा परिणाम झालेल्या नवर्याला त्यात काहीच वाटले नाही... मात्र मी त्या माणसासमोर अधिक जायचे नाही असा विचार केला.. पण जायचे नाही तर करायचे काय? सारखी आतल्या खोलीत बसून राहिले तर जाऊ आणि सासू ओरडतील.. शेवटी तिथेच बसावे लागले.. त्याचे धाडस वाढले... तो अंगाशी आला तशी मात्र मी भडकून काहीतरी बोलले....
... आणि अशोक.. त्यावर नवर्याने मलाच झापले.. नुसते झापले नाही तर आलेल्या लोकांच्यासमोर शिव्या देऊन मारलेही.... माझा सगळा सन्मान.. काहीही कारण नसताना... माझ्या वागणूकीत, माझ्या संस्कारांमध्ये कोणतीही खोट नसताना... नष्ट झाला अशोक....
मात्र मी शील बचावले... माझ्या छळाच्या बातम्या हळूहळू आईपर्यंत पोहोचू लागल्या.. ती एक दोनदा येऊन गेली तर तिचाच पाणउतारा झाला... त्यानंतर मीच तिला येऊ नको म्हणून सांगीतले... एका वर्षात मी फक्त तीन वेळा माहेरी गेले एकाच गावात माहेर असून... आणि हेच आनखीन एक वर्ष चालले... त्यानंतर मात्र मूल नाही मूल नाही म्हणून ओरडा चालू झाला... माझा नवरा चोवीस तास पिऊन येणार... त्या दोन खोल्यात आम्ही पाच माणसे.... अन या परिस्थितीत त्यांना मूल हवे होते... मी मान खाली घालून ऐकून घ्यायचे... पण एकदा नवरा बाहेर गेलेला असताना मी पुन्हा उलटून बोलले.. सासूला म्हणाले की तुमच्या मोठ्या मुलाला तरी कुठे मूल आहे...... झालं.. माझं नशीबच फिरलं... अधिकच मारहाण आणि कामे पडू लागली.. आता जाऊ येताजाता मारायची.. का म्हणून मी हे सहन करायचं?? एक दिवस मात्र मी सरळ घरातून पळून गेले... आईला फक्त मी कायमची आली आहे एवढेच म्हणाले.... दोन तास आईने मला समजावून सांगीतले.. तेवढ्यात सासरचे लोक अनेकांना घेऊन आले... आम्हाला वाळीत टाकण्याची चर्चा झाली.. घाबरलेल्या आईने माझी मुलगी पुन्हा पळून येणार नाही असे आश्वासन दिले... आणि या रशिदा बेगमचा पुन्हा अतोनात छळ सुरू झाला अशोक... दिवसांवर दिवस जात होते.. पण एकेक दिवस ढकलायचा म्हणजे मला जीवावर येत होते... त्यातच जावेला दिवस गेले... त्या आनंदात त्यांचे कौतुक आणि म्हणून माझे हाल सुरू झाले.. आता तर नवराही येता जाता मला सोडण्याची धमकी देऊ लागला... अशोक... जावेला मुलगा झाला... त्यांच्या लग्नानंतर आठ वर्षांनी... माझ्या लग्नाला आता तीन वर्षे झाली होती... मी नवर्याला खूप समजावून सांगू पाहात होते की तुमचे आणि माझे असे एक घर असायला हवे.. मूल आपल्यालाही होईल... पण नाही... मला मारच मिळायचा... जावेचा मुलगा आता मोठ व्हायला लागला.. काही झाले तरी लहान मूल... लळा लागणारच.. पण त्याला हात लावला की जाऊ हात लावू नको म्हणायची... तुझी नजर लागेल म्हणायची... कितीही वाईट वाटले तरी जमेल तेव्हा मी माझ्या पुतण्याला जव्ळ घ्यायचे...
.... अशीच आणखीन चार वर्षे गेली.... आता माराची सवय झाली होती... शिव्यांची सवय झालेली होती... आता आईला भेटणे महिन्यातून एखादवेळेलाही जमत नव्हते... घरातून बाहेर पडले तर हिच्या सवयीच वाईट अशी टीका होत होती... त्यामुळे सूर्याकडेही पाहायला मिळायचे नाही तीन तीन दिवस.... उपासमार.. टोचून बोलणे आणि मार खाणे... हे माझे आयुष्य बनत असतानाच... त्या दिवशी काय बनाव झाला सगळ्यांमध्ये माहीत नाही...
... पण रात्री... नवरा बाहेर गेला तो आलाच नाही... आणि... आतल्या खोलीत दीर आला.. खूप खूप प्रतिकार केला मी... अक्षरशः हातात येईल ते घेऊन त्याला मारले... तो प्यायलेला होता... त्याला फारसा प्रतिकारच करता येत नव्हता... तयनेच दार आतून लावून घेतलेले असल्याने सासू अन जाऊ आत येऊ शकत नव्हत्या... पण अचानक पुतण्या घराबाहेर पळाला आणि वस्तीत त्याने बोंब मारली... चाची अब्बा को माररही अशी... अनेक लोक आले... आता सासरच्याच लोकांचे भांडे फुटायची वेळ आली... दीर मार खाऊन खाली पडलेला होता ... अगदी हळूहळू कण्हत होता.... बाहेरून दारावर काही म्हातार्या बायका माणसांचे आवाज आले तसे मला जरा बरे वाटले.. कुणीतरी तरी वाचवायला आहे आपल्याला... मग मिच बनाव केला अशोक... मी जोरजोरात ओरडू लागले अन थोड्या वेळाने एक डबा उचलून जोरात खाली आपटला... जणू मी सहन न झाल्यामुळे दिराला काहीतरी फेकून मारले आहे असे दाखवले आणि खाडकन दार उघडून बाहेर आले... समोर झुबेदाचाची होती... तिला मिठी मारून स्वतःची सगळी कहाणी ऐकवली... आजचा प्रकार ऐकून मात्र वस्तीतील सगळ्यांनीच हजेरी घेतली घरातल्यांची.... आणि दुसर्याच दिवशी नवर्याने मला सोडून दिले....
तेव्हापासून मी आईकडेच आहे... आईलाही आता उलट बरेच वाटते...त्यातच मला बदनामी सहन होत नसल्यामुळे दुसरीकडे नोकरी करायची इच्छा झाल्यावर पुण्याला नोकरी मिळाली... परत जाताना झालेल्या अपघातात आपली भेट झाली... अशोक... माझ्या मनात खरंच काही नव्हते.... तुम्ही तर माझ्यापेक्षा लहानही आहात... तुम्हाला कदाचित माझ्या काही प्रश्नांचे अर्थ समजणारही नाहीत... उत्तरे देणे तर फारच लांबचे... पण... तरीही.. केवळ तुमचे मन चांगले आहे म्हणून मी हे प्रश्न विचारते... उत्तरे नकोच आहेत... प्रश्न समजले नाहीत तर तसे सांगा... पण मला माझ्या मनातले प्रश्न कुणाला विचारावेत हेच समजायचे नाहीत... तुमच्यासारखा चांगल्या घरातला, अत्यंत चांगले संस्कार असलेला एक माणूस भेटला म्हणून धीर तरी झाला..... अशोक....
.... मी मुस्लिम घरात जन्माला आले त्यात ... माझी चूक काय??
मी.. मी एक मुलगी आहे... ही माझी चूक आहे?? मी गरीब घरात जन्माला आले ही माझी चूक आहे?? मला वडील नाहीत.. मी केवळ वर्षाची असताना ते गेले... यात माझी चूक काय आहे??? आईला जबाबदारीतून मोकळे व्हावेसे वाटणे... शक्य तितक्या कमी पैशात मुलगी उजवावी असे वाटणे.. त्याचा परिणाम म्हणून स्थळाच्या चांगुलपणाबाबत काहीही चौकशी न करता शादी पक्की करणे... यात माझी चूक काय आहे... आईला तिच्या जबाबदारीचे प्रेशर वाटू नये म्हणून मी माझी सर्व स्वप्ने उद्ध्वस्त करून ते स्थळ मान्य करणे... ही चूक झाली????
अशोक... तुम्ही चांगल्या घरातले आहात... हिंदू आहात... तुमचे वडील.. तुमचे मोठे भाऊ.. तुमच्या वहिनी.. सगळे अत्यंत चांगले आहेत... तुमच्यावर प्रेम करतात... तुमच्या घरी बाईला मारत नाहीत... तिला मूल होत नाही म्हणून चटके देत नाहीत.. दिराबरोबर संबंध ठेवायची जबरदस्ती करत नाहीत.. येताजाता फटके देत नाहीत... मग... मी केवळ इकडच्या घरात जन्माला आले... म्हणून ... मी कितीही चांगली असले तरीही.. मी तुमच्या घरातल्या स्त्रीला असते तसे स्थान आपल्याला मिळावे असा.. विचारसुद्धा करू नये??? .... केला तर ती माझी चूक आहे?? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न....
.... तुम्ही लोक... तुमच्या सगळ्या पिढ्या... तुमचे सर्व पुर्वज आणि वंशज... कायम असेच चांगले राहणार... आमच्या समाजात स्त्री कायम अशीच राहणार... मग... तुमचा चांगुलपणा... हा कायम तुमच्या स्वतःसाठीच का?? तो चांगुलपणा चांगुलपणा आहे हे सिद्ध होण्यापुरता तरी इतरांसाठी का नाही?? आमच्या समाजातील काही चांगली व साध्या घरांची स्वप्ने पाहणार्या मुलींना तुम्ही कधीच स्वीकारणार नाही... तुम्ही हिंदू आहात म्हणून आम्ही तुमच्या मुली, तुमची स्थळे कधीच स्वीकारणार नाही... मग... मग तुम्ही अपघातापुरती माझी मदत कशाला केलीत?? कशाला मला चांगुलपणाची झाक दाखवलीत... कशाला मोह पाडलात?? कशाला हे सगळे??? माझ्या आयुष्यात आलातच कशाला??? आणि... मी जर धर्म बदलला तर... तुमच्या सगळ्यांचे विचार... अगदी क्षणात बदलतील माझ्याबद्दलचे?????? "
तब्बल पंधरा मिनिटे आत्मा बोलत होता. स्तब्ध होते सगळे! स्तब्ध!
आत्मानंद चक्क खोटे बोलला होता. त्याला हे काहीही माहीत नव्हते. फक्त रशिदाकडे कोण कोण आहेत एवढेच माहीत होते. हे सगळे सांगताना त्याला नेमके जे म्हणायचे होते ते मात्र तो बरोब्बर म्हणाला नव्हता. कारण त्याची भिस्त होती त्याच्या बोलण्यातून जाणार्या संदेशावर!
तो संदेश व्यवस्थित पोचलेला होता. फक्त, एका अकोणिस वर्षाच्या मुलाने सांगीतलेल्या या कथानकामुळे अशोकचे वडील आणि भाऊ या निर्णयाच्या बाबतीत द्रवतील असे मुळीच नव्हते. पण तेवढ्यात अशोक स्वतःच म्हणाला....
अशोक - आत्मा... ही कथा खरे तर मला यांना सांगायची नव्हतीच... पण तूच सांगीतलीस... तर आता मी पुढचेही सांगून ठेवतो... बाबा.. दादा... काहीही होवो... मी रशिदाशीच लग्न करणार... तिनेच काही कारणाने नकार दिला तर गोष्ट वेगळी... आत्ता नाही करणार... वेळ आल्यावरच करेन... पण जेव्हा करेन तेव्हा तिच्याशीच... नाहीतर .... कुणाशीच नाही... आणि... तुमच्या परतीच्या गाडीला फक्त एक तास राहिला आहे... जाताना मला होकार देऊनच जा... पुन्हा हा विषय चर्चेला नको... तुम्ही नको म्हणणार असाल तर... मग मात्र .... मला काहीच बोलायचे नाही... फक्त एवढंच... की मी रशिदाला अंतर देऊ शकणार नाही.....
खाडकन कानफडात वाजवावी असा विचार आला असता दादाच्या मनात एरवी!
पण... नेमके काय झाले काही समजले नाही... बुवा ठोंबरेंच्या मुलाने रक्तात असलेले सगळे कम्युनिकेशन स्किल या प्रसंगात ओतून अचानक चमत्कारिक सिच्युएशन तयार केली होती... आणि त्याचा परिणाम म्हणून अशोकचे वडील म्हणाले...
बाबा - तिला विचार... हिंदू होईल का... हल्ली काय म्हणा... जग पुढे गेलंय... पण... शिक्षण झाल्याशिवाय आणि नोकरी लागल्याशिवाय... लग्न करायचं नाही...
आणि वडील आणि दादा निघून गेल्यानंतर... दोन पेग हा नेहमीचा 'मॅक्स' कोटा संपल्यानंतर अशोक पवारने त्या रात्री आत्म्याला तिसरा पेग स्वतःच्या हातांनी ओतून गिळायला लावला होता....
================================================
आणि गेल्या काही महिन्यात लागलेल्या सवयीप्रमाणे 'रोजच्यासारखा फिरून येतो' असे सांगून आत्मा आज टेकडीवर गेलेला असताना बिंदियाच्या टॉर्चमुळे अचानक भयानक प्रसंग उद्भवला होता अन तो एका ठिकाणी कसाबसा लपला होता. तब्बल पाऊण तास तिथे लपून तो खूप जोरात पळत रूमवर आला.
अशोक - काय हो?? ... लागली की काय??
आत्मा एकदम अचानक बोलून गेला...
आत्मा - लागलीच असती... वाचलो...
दोघांनी उच्चारलेल्या 'लागली' या शब्दाचे भिन्न अर्थ जाणवल्यामुळे पिकलेला सौम्य हशा विरल्यानंतर वन्याने विचारले...
वन्या - कुणाबद्दल बोलताय??
आत्मा - ठेच ठेच..
वन्या - अच्छा अच्छा! ... पण पळताय का एवढे??
आत्मा - मला वाटले उशीर झाला.. तुम्ही सुरू केली असेल...
वन्या - काय?
आत्मा - मदिरा??
वन्या - आत्म्या... लय पितोस तू... लय रेग्यूलर पितोयस...
आत्मा - आज... मद्यप्रशानासाठी पुरेसे कारण उपलब्ध आहे...
वन्या - काय???
आत्मा - आज... कॅन्टीनमधे.. सुरेखावहिनींनी मला... चहा पाजला...
एकदम दिल्याने धरलाच त्याला! शिव्यांचा भडिमार ओसरल्यावर दिल्या म्हणाला...
दिल्या - भुतुकल्या... नीट बोल... ही घटना का घडली...
आत्मा - आपण मारू नयेत मला...
दिल्या - अजून ठेवून देईन दोन...
आत्मा - नको... मी खर बोलणारच आहे... सत्यापासून मागे वळणारा मी नव्हे...
दिल्या - बोल नाहीतर हा काल गालापासून मागे वळेल..
आत्मा - त्या म्हणाल्या.... तुमच्यामुळे दिलीप उत्तीर्ण होत आहेत...
दिल्या - कोचा करीन तुझा कोचा...
आत्मा - अवश्य करा... पण तय आधी एकदा खात्री करून घ्या...
वनदास - पण मला हे समजत नाय... यात पिण्यासारखं काय आहे???
आत्मा - त्यानंतर त्या म्हणाल्या... की हे ... पितात का कक्षात??
दिल्या - XXXXX मग तू काय बोललास???
आत्मा - मी म्हणालो त्या दिवसापासून यांनी स्पर्श केला नाही मद्याला....
अशोक - ... मग???
आत्मा - तर म्हणाल्या... त्यांचा अगदीच विरोध आहे असे नाही.... एखाद दिवशी... ठीक आहे...
आता सगळ्यांना समजले. पिण्याचे काय पुरेसे कारण होते ते!
एकच कल्ला झाला. वनदास आंगनवर धावला. काही वेळातच तो ओल्ड मंकचा खंबा घेऊन आला. तोवर कांदे फुटलेले होते. मेसमधून मीठ आणण्यात आलेले होते. अशोकने पटापटा ग्लासमधे पेग भरले...
अशोक - तुला कसा बे??
वनदास - अर्धा सोडा... बाकी पाणी...
अशोक - अहो... तुम्हाला??
आत्मा - मला सोडा सहन नाही होणार...
अशोक - दारू सहन होते का??
आत्मा - ती होते...
अशोक - दिल्या तुला बे???
दिल्या - लार्ज... नीट....
अशोक - पाणी तरी घेत जा दिल्या पाणी...
दिल्या - बायकीपणा शोभत नाय मला....
अशोक - घ्या रे... चीअर्स...
दिल्या - चीअर्स...
वनदास - चीअर्स...
आत्मा - ....माझेही...
आणि दुसरा पेग संपता संपतच दार वाजले... शिपाई उभा होता...
"आत्मानंद ठोंबरे........ सापत्नीकर सरांनी बोलवलंय..."
"... म.. मला...का????"
"लेडिज होस्टेलला गेलावता का तुम्ही??? त्या बिंदिया नैनची कंप्लेन आहे... तुम्हाला पळताना पाहिलंन"
हा हा हा हा ......... किति
हा हा हा हा .........
किति सांगु मि सांगु कुनाला ...
आज आनंदि आनंद झाला.......
हुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र,
माझा पहिला नंन्बर्.....
पेढे खाऊ शंभर...
सगळ्याना टुक टुक..........
. हे काय?
.
हे काय?
आज मीपन पहीली...
आज मीपन पहीली...:)
>>>> rohit83 | 11 October,
>>>>
rohit83 | 11 October, 2010 - 20:19
.
हे काय?
>>>>
एष्टीत कधी रुमाल नाही टाकला का हो ?
अहो त्र्यांयशी, त्यानी
अहो त्र्यांयशी, त्यानी कळशी/बादली/रुमाल टाकुन ठेवलाय नंब्रा/नळावर.
बाकी चालुद्या...
ए ग्रेट
ए ग्रेट परेश.....
मस्त.....
सावरी
हा हा हा हा ..... आसुरी आनंद
हा हा हा हा ..... आसुरी आनंद म्हणतात ह्याला.
एष्टीत कधी रुमाल नाही टाकला का हो ? >>> लय भारि, लय भारी
हे काय किति वाट पाहायची पण
हे काय किति वाट पाहायची पण ठीक हा हा हा ..... आसुरी आनंद म्हणतात ह्याला.
एष्टीत कधी रुमाल नाही टाकला का हो ? >>> लय भारि, लय भारी
छान !!!!!!!!!!!!
छान !!!!!!!!!!!!
एष्टीत कधी रुमाल नाही टाकला
एष्टीत कधी रुमाल नाही टाकला का हो ? ऋयामा, >>> लय भारि, लय भारी>>>> अनुमोदनाचा मोठ्ठा मोदक परेश, स्मिता तुम्हाला
परेश.... अभिनंदन!!!!!! तुमच्या आनंदात सहभागी आहे.
सावरी, आपला नंबर हुकला....पण हरकत नाही... Better Luck Next Time
सही...
सही...
येऊद्या लवकर पुढचे
येऊद्या लवकर पुढचे भाग...लेखनासाठी शुभेच्छा!
सानी, नाही ग्...आपला नम्बर
सानी,
नाही ग्...आपला नम्बर नाहीए हुकला.....
परेशला गोड सन्धी दिली आपण.....
बघतेस ना कित्ती खुश आहे तो.......मला तर खुप छान वाटतय...मज्जा वाटतेय खुप......खुप लहान झाल्यासारख वाटतय......जम्माडी जम्म्त....
आणि हो.. एष्टीत कधी रुमाल नाही टाकला का हो ?........मोदक......
लगे रहो......
सावरी
आयला हे काय बरुबर नाय! आम्हि
आयला हे काय बरुबर नाय!
आम्हि आपलं नळाखाली बादली लाउन, मानेकाकांसारखं प्रमिलावहिनींकडं चहाला म्हणून काय गेलो ह्यानी ईकड रान उठवलं माझा नंबर! माझा नंबर म्हणुन. सांगुन ठेवतो माझा नंबर पहिला, नाहीतर हा संगणक पेटवून देईन............................!
(ह.घ्या.)
१६ व्या भागाची खूपच वाट
१६ व्या भागाची खूपच वाट पाहायला लावलीत भूषण. पण भाग नेहमीसारखाच उत्तम आहे!
परेशला गोड सन्धी दिली
परेशला गोड सन्धी दिली आपण..... >>>> हा हा हा हा, माणसाच मन कस असत नाहि .....
बघतेस ना कित्ती खुश आहे तो.......मला तर खुप छान वाटतय...मज्जा वाटतेय खुप......खुप लहान झाल्यासारख वाटतय......जम्माडी जम्म्त.... >>> ह्या बद्द्ल काहि बोलायाच नाहि, एकदम बरोबर, अगदि पहिलि, दुसरित असल्यासारख वाटतय, आणि प्रगतिपुस्तक हातात मिळाल्यासारख वाटतय.
सावरी आणि सानि, धन्स.... माझ्या आनंदात सहभागि झाल्याबद्द्ल.
बाकि बेफिकिर्जी, काय काटा आला अंगावर वाचुन, अशीपण माणस अस्तात? एतका छ्ळ होतो? अस वाट्ल, बिचारि रशीदा असहि वाटल, पण अजुन छान ह्यामुळे वाटल, कि आत्म्या साला खोट बोलतोय, बेण चुकुन ईजिनिअरिंग ला आलय. पण त्या वाक्यापर्यंत वाचुन थरकाप ऊडाला होता.
आत्मा - आज... कॅन्टीनमधे.. सुरेखावहिनींनी मला... चहा पाजला...
दिल्या - भुतुकल्या... नीट बोल... ही घटना का घडली... >>> दिल्या भाऊ लक्ष ठेवा, तस पोर चांगलि हायेति, मि आपल मस्करि केलि.
आता दिल्या काहि तरी शक्कल लढवणार वाटत(लास्ट लाईन).
आता आत्म्याचा कोचा होणार
आता आत्म्याचा कोचा होणार वाटतं...
आता आत्म्याचा कोचा होणार
आता आत्म्याचा कोचा होणार वाटतं - कैलासराव, 'होता होता वाचणार आहे'
सर्वांचे (म्हणजे १७ पैकी पाच सत जणांचे) मनःपुर्वक आभार!
-'बेफिकीर'!
बेफिकीरजी, आत्म्याने इतक्या
बेफिकीरजी,
आत्म्याने इतक्या प्रभावीपणे सांगितलेली छळकथा खोटी आहे हे वाचून हुश्श्श झाले...
जरी ही सगळीच कथा असली...तरी त्यात सत्यांश आहे, हे माहिती असल्याने रशिदाची कथा वाचतांना अंगावर काटा येत होता...न जाणो किती स्त्रिया अशा अत्याचारांचा सामना करत असतील...
अशोक आणि रशिदा मधे झालेल्या संवादातले अशोकचे हिंदी संवाद आवडले... तुमचे हिंदी फारच सफाईदार आहे...हे यानिमित्ताने समजले....("हाफ राईस..."च्या वेळेचे हिंदी संवाद ग्रामिण होते...अर्थात, ती कथेची मागणीच होती...)
एकंदर, हा भाग आवडला...
आत्मानंदची 'झिरो' होण्याकडची वाटचाल पाहून पुन्हा पुन्हा दु:ख होतेय
मस्तच झाला आहे हा लेख
मस्तच झाला आहे हा लेख सुद्द्धा. तुमची शेवटची ओळीला पंच लाईन द्यायची खासियत आम्हाला जाम आवडते बुवा. आता BFC (बेफिकीर फ्यान क्लब) काढायचा विचार चालू आहे.
तुमच्या छापील पुस्तकांची वाट बघत आहे (लौकर काढा हो), तोपर्यंत तुमच्या लेखांची मुद्रणप्रत (फक्त) वैयक्तिक वाचनासाठी काढायची परवानगी हवी आहे.
आता BFC (बेफिकीर फ्यान क्लब)
आता BFC (बेफिकीर फ्यान क्लब) काढायचा विचार चालू आहे. >>>
अनुमोदन..
बेफिकीरजी मी नेहमी प्रतिक्रिया देत नाही. पण तुमचे लिखाण नियमीतपणे वाचत असते. लवकर पुढचे भाग येऊद्या ...पु.ले.शु..
आजम
आता BFC (बेफिकीर फ्यान क्लब)
आता BFC (बेफिकीर फ्यान क्लब) काढायचा विचार चालू आहे. >>>....
लवकर काढ्.....मी पहीली........
सावरी
(No subject)
आता BFC (बेफिकीर फ्यान क्लब)
आता BFC (बेफिकीर फ्यान क्लब) काढायचा विचार चालू आहे. >>>
माझा पण नंबर लावा या फ्यान क्लब मध्ये बरं!!!
बेफिकीरजी...
अतिशय सुदंर लिहीता हो तुम्ही.
U r Simply GREAT!!!!
बेफिकीर फॅन क्लब ऑलरेडी
बेफिकीर फॅन क्लब ऑलरेडी प्रस्थापित झालेला आहे.
अध्यक्ष : डॉ.कैलास गायकवाड
कार्यकारी अध्यक्ष :
उपाध्यक्ष :
सचिव :
उपसचिवः
खजिनदारः
उपखजिनदार:
कार्यकारिणी सदस्य :
१)
२)
३)
४)
५)
.
.
.
.
.
.
.
गाळलेल्या जागा भरा..
कार्यकारिणी सदस्य : १) संदिप
कार्यकारिणी सदस्य :
१) संदिप आहेर
कार्यकारिणी सदस्य : २) परेश
कार्यकारिणी सदस्य :
२) परेश केद्रे
अध्यक्ष : डॉ.कैलास गायकवाड
अध्यक्ष : डॉ.कैलास गायकवाड >>>...
१००% अनुमोदन
( स्वगत : न देऊन काय करता राव. आमचा आज्जा म्हणायचा डॉक्टर, वकील आणि पोलीस यांच्याशी वैर असू नये. पण दिवसा ढवळ्या दरोडा? कलीयुगच म्हणायचं आणखी काय? ह. घ्या.)
आम्ही आपले कार्यकर्तेच बरे ...
अहो बोरगे साहेब.... तेव्हा
अहो बोरगे साहेब.... तेव्हा पहिला नंबर लावल्यावर आम्ही काही म्हणालो का? हे तसंच आहे.... हाजीर तो वजीर....... इथे मी पैला नंबर लावला...
अवांतर : तुमचे आजोबा खूप चांगले म्हणतात
बेफिकीर फॅन क्लब ऑलरेडी
बेफिकीर फॅन क्लब ऑलरेडी प्रस्थापित झालेला आहे.
अध्यक्ष : डॉ.कैलास गायकवाड
कार्यकारी अध्यक्ष :
उपाध्यक्ष :
सचिव :
उपसचिवः
खजिनदारः
उपखजिनदार:
कार्यकारिणी सदस्य :
१)
२)
३)
४)
५)
.
.
.
.
.
.
.
गाळलेल्या जागा भरा..
...........आणि मी.........मला विसरलात न???????????
सावरी
Pages