नमस्कार मंडळी,
गणेशोत्सवातील सर्व स्पर्धा/कार्यक्रमांना उत्स्फूर्त दाद व प्रतिसाद दिल्याबद्दल संयोजक मंडळाकडून सर्व मायबोलीकरांचे मन:पूर्वक आभार.
या गणेशोत्सवात एकंदर ५ स्पर्धा होत्या. त्यातील ३ स्पर्धांचे निकाल परीक्षकांमार्फत व उरलेल्या २ स्पर्धांचे निकाल जनमत चाचणीने लावण्यात आले आहेत.
टाकाऊतून टिकाऊ व प्रकाशचित्र या स्पर्धांसाठी अनुक्रमे सीमा व रुनी आणि सावली व अबेडेकर यांनी तर शब्दांकुर या स्पर्धेसाठी स्वाती_आंबोळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. परीक्षकांनी वेळात वेळ काढून परीक्षण केले व निकाल दिला. त्याबद्दल परीक्षकांना संयोजक मंडळाकडून परत एकदा अनेक धन्यवाद.
गणेशोत्सव स्पर्धांचा निकाल खालीलप्रमाणे:
अशीही जाहिरातबाजी विषय १ व २ या स्पर्धांच्या मतदानामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत त्याबद्दल अत्यंत दिलगीर आहोत त्यामुळे प्रत्यक्ष मतदान किती झालंय ते इथेच देतोय तरी कृपया नोंद घ्यावी.
अशीही जाहिरातबाजी:
विषय क्र. १ - दीपिका पदुकोण व दगडु तेली मसाला : विजेता - फचिन
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.
(एकूण मते ५१ त्यांपैकी सर्वाधिक मते फचिन - १४; अरभाट - ११ मते; अश्विनी के - ७ मते; स्वप्ना_राज - ३ मते; रैना - २ मते; मैत्रेयी - २ मते, विक्रम३११ - २ मते; आर्च - २ मते; कविता नवरे - २ मते; दीपांजली - १ मत; नंद्या - १ मत; प्रसीक - १ मत; नवीना - १ मत; वृषा - १ मत; छाया- १ मत)
विषय क्र. २ - सन्नी देओल व उंदीर मारण्याचे औषध : विजेती - स्वप्ना_राज
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.
(एकूण मते ३८ त्यांपैकी सर्वाधिक मते स्वप्ना_राज - १३; अरभाट - १० मते; अरूंधती कुलकर्णी - ९मते; ; परदेसाई - २ मते; आर्च - १ मत, वृषा - १ मत; भरत मयेकर - १ मत; प्रसीक - १ मत)
विषय क्र. ३ - लालूप्रसाद यादव व अरमानीचे सूट : विजेती - अरूंधती कुलकर्णी - झालेले मतदान इथे पहा.
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.
विषय क्र. ४ - पल्लवी जोशी व साड्या : विजेती - पौर्णिमा- झालेले मतदान इथे पहा.
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.
आमने-सामने स्पर्धा :
जोडी क्र. १ - शाहिद कपूर व सैफ अली खान : विजेती - दीपांजली- झालेले मतदान इथे पहा.
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.
जोडी क्र. २ - सानिया मिर्झा व शोएब मलिक : विजेता - ऋयाम- झालेले मतदान इथे पहा.
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.
टाकाऊतून टिकाऊ स्पर्धा :
विजेती क्र. १- दीपांजली (प्रवेशिका क्र. ११)
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.
विजेती क्र. २ - लाजो (प्रवेशिका क्र. ९ व प्रवेशिका क्र. १०)
विजेती क्र. ३ - धनुडी (प्रवेशिका क्र. ८) व रोझा (प्रवेशिका क्र. ६)
उत्तेजनार्थ प्रवेशिका : दीपांजली (प्रवेशिका क्र. ७)
प्रकाशचित्र स्पर्धा निकाल :
प्रकाशचित्र स्पर्धा विषय १ - विरुद्ध :
विजेती प्रवेशिका - प्रवेशिका क्र. १६ - सूर्यकिरण
परीक्षकांचे विचार:
या प्रकाशचित्रामधले त्या मुलीच्या डोळ्यातले भाव अतिशय सुंदर पकडले आहेत. त्या मुलीचा पेहराव, डोक्यावरचा तो मुकुट आणि डोळ्यातले भाव यांचा एकमेकांशी असलेला विरुद्ध संबंध फार आवडला.
विशेष उल्लेख :
प्रवेशिका क्र. ११ - योगेश२४
या प्रकाशचित्रामधला अॅन्गल फारच सुरेख आहे.
प्रकाशचित्र स्पर्धा विषय २ - एक नवी सुरुवात :
विजेती प्रवेशिका - प्रवेशिका क्र. ९ - गुणेश
अगदी एकमताने या प्रवेशिकेची निवड केलीय. विषयाची अनुरुपता, फोकस, रंग, कंपोझिशन, अॅन्गल सगळंच आवडलं.
विशेष उल्लेख :
प्रवेशिका क्र. ८ - सूर्यकिरण
या फोटोमधला विषय आवडला पण फोकस, लाईट अजून चांगला करता आला असता.
प्रकाशचित्र स्पर्धा विषय ३ - आधार :
विजेती प्रवेशिका - प्रवेशिका क्र. २ (योगेश२४)
रंग, कंपोझिशन, विषयाची अनुरुपता आवडली.
विशेष उल्लेख
प्रवेशिका क्र. २३ - सीमा
कंपोझिशन, अॅन्गल बदलला असता तर हा अजून छान येऊ शकला असता
शब्दांकुर पर्ण १ : संध्याकाळ
विजेती : अश्विनी के
तू पुरवलेले तेजाचे पुंजके, सूर्याची लाज राखायला
मान उंचावून पहात होतीस अस्त रोखणारे हजारो हात
सोबतीला...श्वासांची टप्पा चुकलेली लय
अचानक मागून चाहूल..अन् तिरंगी लडिवाळ वेढा
परत आली होती तुझी तेजाची रिक्त कुपी
सोबतीला...आता फक्त सांजवात
उल्लेखनीय कविता: भरत मयेकर
संध्याकाळ रेंगाळतेय
ढगांच्या किनारींवर
वार्याच्या लकेरताना
स्तब्ध अशा पाण्यावर.
उबदार तरुछाया
मिटतात घरट्यांत
काजळी प्रकाश मिळे
जरतारी अंधारात
शब्दांकुर पर्ण २ : गंधवार्ता
या पर्णासाठी एकही विजेती कविता नाही. परीक्षकांना खालील कविता उत्कृष्ट वाटली परंतू ती या फेरीसाठी दिलेले नियम पाळत नाही.
भरत मयेकर
वार्यावर लहरत येतो
हलकासा सुवास,
तशाच आठवणीही
फुलांच्या, कळ्यांच्या
आणि
फुलण्याच्याही
शब्दांकुर पर्ण ३ : आता काही देणे घेणे उरले नाही
विजेता : भरत मयेकर
कधी पीस तर, कधी शिंपला, केव्हा मरवा
येण्याजाण्या कधी बहाणे केले नाही?
येताजाता, देताघेता समीप आलो
हाती धरले हात कधी, ते कळले नाही.
तुझे नि माझे आता काही उरले नाही
माझे जे जे , तुझेहि जे जे, एक जाहले
आता काही देणे घेणे उरले नाही
शब्दांकुर पर्ण ४ : विडंबन
विजेती : मामी
सांग सांग डागदरा, मुलगाच होईल काय?
क्लिनिकमध्ये पैसे चारलेत, नक्की कळेल काय?
नवरा, सासूबाईंची नियत बदलेल काय?
लाडू मिळाला नाही तर बर्फी चालेल काय?
डागदरा, डागदरा, खरं सांग एकदा
दोन वर्षांतून अॅबॉर्शन केलयं रे तिनदा ......
डागदरा उद्या आहे महत्वाचा पेपर
छातीत धडधड होत राहील, रिझल्ट लागेस्तोवर
गणेशोत्सवातंर्गत घेतलेल्या स्पर्धांमधील सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
सर्वांचे अभिनंदन आणि धन्यवाद.
सर्वांचे अभिनंदन आणि धन्यवाद.
संपूर्ण संयोजक समितीचे आणि परीक्षकांचे आभार.
समद्या इजेत्या लोकांइचे
समद्या इजेत्या लोकांइचे आभिनंदन
संयोजक क्षमस्व. शब्दांकुर
संयोजक क्षमस्व.
शब्दांकुर पर्ण २ : गंधवार्ता चे परीक्षक वर लिहिलेच आहे, पण तिकडे लक्ष गेले नव्हते.
मुटे साहेब. पत्ता पण हवाय का?
मुटे साहेब. पत्ता पण हवाय का?
ऋयामजी
ऋयामजी
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन
संयोजक महोदय, ३ दिवस उलटले
संयोजक महोदय,
३ दिवस उलटले पण शब्दांकुर पर्ण २ : गंधवार्ता च्या संदर्भातील
"या पर्णासाठी एकही विजेती कविता नाही." हे वाक्य पचणी पडत नाहीये किंवा अर्थही लागत नाहीये.
कारण स्पर्धेचा विजेता ठरविणे म्हणजे
"त्या स्पर्धेत उपलब्ध असलेल्या प्रवेशिकेपैकी जी प्रवेशिका सर्वोत्तम असेल (अर्थात परीक्षकाच्या दृष्टीकोनातून) ती निवडणे" एवढाच अर्थ मला माहीत आहे.
(आणि त्या पर्ण क्र-२ मध्ये १४ प्रवेशिका आल्या आहेत)
या व्यतिरिक्त दुसरा अर्थ/व्याख्या असेल तर सांगीतल्यास बरे होईल.
केवळ एक जिज्ञासा आहे, आग्रह नाही.
दिलेला शब्द कवितेत, तो ही
दिलेला शब्द कवितेत, तो ही चपखल बसेल असा वापरणे ही 'शब्दांकुर-पर्ण २'साठी अट होती. आणि परीक्षकांच्या मते कोणत्याच प्रवेशिकेने ती अट समाधानकारकरित्या पूर्ण केलेली नाही.
परीक्षकांचे मत आणि हे निकाल अंतिम आहेत.
आपले मत निराळे असू शकते, आणि त्याचा पूर्ण आदर आहे.
शब्दांकुर : पर्ण- २ येथे
शब्दांकुर : पर्ण- २
येथे स्पर्धेचे जे नियम दिले आहेत
..........................................................
नियम : दिलेला शब्द कवितेत यायला हवा इतकाच.
कविता लयबद्ध वा मुक्तछंद, हळवी, गंभीर वा विनोदी कोणत्याही रंगरूपाची असू शकते.
मर्यादा : चार ते आठ ओळी
.........................................................
असे म्हटले आहे.
दिलेला शब्द कवितेत, तो ही चपखल बसेल असा वापरणे ही 'शब्दांकुर-पर्ण २'साठी अट होती
असे म्हटलेले नाही.
तसे आधी माहीत असते तर माझ्यासाऱख्या शब्द चपखल न बसवता येणार्या माणसाने कविता पोस्टण्याआधी दहादा विचार केला असता. (आता भविष्यात उपयोग होईल.)
१४ पैकी कोणत्याही कवितेला पुरस्कार मिळाला असता तर ती कविता माझ्याकवितेपेक्षा अधिक सरस आहे, असा अर्थ निघाला असता. आणि त्याचा आनंद झाला असता.काही शिकता आले असते.
"या पर्णासाठी एकही विजेती कविता नाही." याचा अर्थ सर्वच कविता अपात्र आणि दखल घेण्याच्याही लायकिच्या नाहीत, असा अर्थ निघतो आहे.
.................................
विद्यार्जनाच्या जिज्ञासेपोटी शंकासमाधान मिळविण्याच्या हेतूने शंका उपस्थित केल्या होत्या.
कुणाचाही अनादर करायचा हेतू नाही. कुणी दुखावल्यास क्षमा असावी.
सर्वांचे अभिनंदन
सर्वांचे अभिनंदन
सर्व विजेत्यांचे आणि सहभागी
सर्व विजेत्यांचे आणि सहभागी स्पर्धकांचं अभिनंदन !
परिक्षक आणि संयोजक मंडळाचही हा कार्यक्रम यशस्वी पार पाडल्याबद्दल अभिनंदन !
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
मुटेसाहेब, 'शब्दांकुर' या
मुटेसाहेब,
'शब्दांकुर' या स्पर्धेच्या परिक्षक स्वाती आंबोळे यांनी वर उत्तर दिलं आहेच. स्पर्धा जाहिर केली तेव्हाच संयोजकांनी स्पष्ट केलं होतं की स्पर्धेचा निकाल परिक्षकांमार्फत लावला जाईल. जो काही परिक्षाकांचा निर्णय असेल तो सर्वांना बंधनकारक राहिल. संयोजक मंडल निर्यणप्रक्रियेत अथवा निकालामधे कोणत्याही प्रकारे हस्ताक्षेप करणार नाहीत. परीक्षकांचे मत आणि हे निकाल अंतिम आहेत.
आपल्या मताचा पूर्ण आदर आहे.
धन्यवाद.
मुट्यांचा मुद्दा बरोबर आहे.
मुट्यांचा मुद्दा बरोबर आहे. स्पर्धेच्या नियमात स्पष्ट लिहिले आहे की 'नियमः दिलेला शब्द कवितेत यायला पाहिजे इतकाच. कविता ४ ते ८ ओळींची असली पाहिजे'.
ह्या नियमात बसण्यार्या अनेक कविता आहेत.
परीक्षकांचे स्पष्टीकरणः
दिलेला शब्द कवितेत, तो ही चपखल बसेल असा वापरणे ही 'शब्दांकुर-पर्ण २'साठी अट होती. आणि परीक्षकांच्या मते कोणत्याच प्रवेशिकेने ती अट समाधानकारकरित्या पूर्ण केलेली नाही.
परीक्षकांचे नियमाबाबतचे स्पष्टीकरण हे जाहीर नियमांच्या थेट अर्थापेक्षा वेगळे आहे तसेच 'ठळक' केलेले शब्द तर विरुद्धार्थी आहेत. तसेच जाहीर नियम हा 'स्पष्ट' (unambiguous) आहे त्यामुळे त्याबाबत 'अर्थ लावणे' (interpretation) ही गरज नाहिये. परीक्षकांना नियमाच्या आधारे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे, पण नियमाचा अर्थ 'स्पष्ट' असताना त्याच्या बाहेर जाऊन काही निकष बनवणे हे चुकीचे वाटले.
मुट्यांचे >>> "त्या स्पर्धेत उपलब्ध असलेल्या प्रवेशिकेपैकी जी प्रवेशिका सर्वोत्तम असेल (अर्थात परीक्षकाच्या दृष्टीकोनातून) ती निवडणे" एवढाच अर्थ मला माहीत आहे. >>> हे वाक्य बरोबर आहे. जर कुठलीच प्रवेशिका स्पर्धेच्या नियमात बसत नसेल तर सर्व प्रवेशिका बाद करणे हे मान्य आहे. पण जर एक जरी प्रवेशिका नियमात बसत असेल तर ती प्रवेशिका स्पर्धेच्या गुणांकनासाठी ग्राह्य धरली पाहिजे. जर प्रत्येक प्रवेशिकेस शून्य गूण मिळाले असल्यास, सर्व प्रवेशिका ह्या विजयी घोषित केल्या पाहिजेत.
उदा: लांब उडीच्या स्पर्धेत जर प्रत्येक स्पर्धकाने फाउल केला तर सर्व स्पर्धक हे बाद होतील. पण समजा दोघांनी बरोबर उडी मारली पण केवळ १ आणि २च फूट मारली आणि परीक्षकांची अपेक्षा ४ फुटाची असेल तरी ज्याने/जिने २ फुटाची उडी मारली तो/ती विजयी असेल.
तसेच स्पर्धेचे नियम बनवणे, राबवणे ही संयोजक मंडळाची जबाबदारी असल्याने जर परीक्षकांचे निकष हे जाहीर नियमांपेक्षा वेगळे असतील तर संयोजक मंडळाने त्याबाबत हस्तक्षेप करणे जरुरी आहे.
पण जर एक जरी प्रवेशिका नियमात
पण जर एक जरी प्रवेशिका नियमात बसत असेल तर ती प्रवेशिका स्पर्धेच्या गुणांकनासाठी ग्राह्य धरली पाहिजे>>>>>>>> एक पण प्रवेशिका जर नियमात बसत नसेल तर सगळ्याच बाद असतील ना? इथे तेच झालय असं वाटतय. आता तुम्ही जर म्हणाल की शब्द "चपखल" बसला पाहिजे हे नियमात दिलेलं नव्हतं तर एक वेळ ठीक आहे पण मग ज्यात शब्द चपखल बसत नाहीत त्याला आपण कविता म्हणू शकतो का? थोडक्यात शब्द चपखल बसणे हे कवितेबाबत "बेसीक" नाहीये का?
सगळ्यांचे अभिनंदन
सगळ्यांचे अभिनंदन
बुवा मला नेमके हेच म्हणायचे
बुवा मला नेमके हेच म्हणायचे आहे. मुट्यांनी सुद्धा हाच प्रश्न उपस्थित केला आहे. >>> "या पर्णासाठी एकही विजेती कविता नाही." याचा अर्थ सर्वच कविता अपात्र आणि दखल घेण्याच्याही लायकिच्या नाहीत, असा अर्थ निघतो आहे. >>> ह्याचे उत्तर हो आहे असे दिसते (तसे ते स्पष्टपणे दिलेले नाही).
आलेल्या प्रवेशिका कविता आहेत की नाहीत, त्यात असलेले शब्द हे चपखलपणे बसले आहेत की नाहीत, त्या रचनांचा काय अर्थ लागतो वगैरे प्रश्नांची उत्तरे लावण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य परीक्षकांना आहे. पण 'दिलेला शब्द कवितेत, तो ही चपखल बसेल असा वापरणे ही 'शब्दांकुर-पर्ण २'साठी अट होती' हे वाक्य चुकीचे आहे. दिलेला शब्द कवितेत असावा इतकेच ह्यातून दोन गोष्टी स्पष्टपणे येतातः प्रवेशिका ही कविता असली पाहिजे, त्यात दिलेला शब्द असला पाहिजे. आलेल्या प्रवेशिका कविता नाहीत, त्यात दिलेला शब्द वा इतर शब्द वा त्यांचे अर्थ चपखलपणे बसत नाहीत वगैरे ठरवण्याचेदेखील परीक्षकांना स्वातंत्र्य आहे. पण दिलेला शब्द प्रवेशिकेत चपखलपणे बसणे ही अट होती हा नियम ठरवण्याचा अधिकार नाही.
तात्पर्यः
आलेल्या प्रवेशिका दिलेला शब्द चपखलपणे न बसवल्याने 'कविता' ठरत नाहीत व म्हणुन प्रवेशिका बाद ठरवल्या आहेत. - मान्य
आलेल्या प्रवेशिकांमध्ये दिलेला शब्द नियमाप्रमाणे चपखलपणे न बसवल्याने त्या बाद ठरवण्यात आल्या आहेत - हे चूक.
माझ्यासाठी लेखनसमाप्ती.
सर्व विजेत्यांचे मनापासुन
सर्व विजेत्यांचे मनापासुन अभीनंदन.
बाकी मला टाकाउतुन टिकाउ ह्या
बाकी मला टाकाउतुन टिकाउ ह्या स्पर्धेचा निकाल देखिल फारसा पटला नाही.
परिक्षकांचा निर्णय अंतिम असतो हे मान्य असले तरी एक वाचक, प्रेक्षक म्हणुन काय पटले नाही हे सांगण्याचा देखिल मला अधिकार आहे असे मला वाटते.
हि केवळ एक स्पर्धा होती आणि ती खिलाडुपणे घेणे ह्या गोष्टी अगदी मान्य आहेत, पण कुठेतरी निकष लावतांना काही उणिवा जाणविल्या तर त्या निदर्षनास आणुन देणे ह्यांसाठी हे लिहीत आहे.
माझ्या आईची एन्ट्री होती म्हणुन मला खरंतर अशी openely माझी नाराजी व्यक्त करावी की नाही असे वाटत होते, पण मी जरी एक नुसती वाचक, प्रेक्षक असती तरी मी माझी नाराजी नक्कीच व्यक्त केली असती.
बक्षिस क्रं १ च्या एन्ट्रीला जर उपयुक्तता आणि कलाकृती हा निकष लावला असेल तर त्याच निकषात बक्षिस क्रं ३ 'रोझा' ची देखिल एन्ट्री चपखल बसते. अर्थात दिपांजलीची कलाकृती उत्कृष्ट आहे मला त्याबद्दल शंकाच नाही पण रोझाची देखिल एन्ट्री मग कलाकृती आणी उपयुक्तता (भेटवस्तु म्हणुन, एक artifact म्हणुन) तितकीच चांगली होती.
विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन!
विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन!
बाकी मला टाकाउतुन टिकाउ ह्या
बाकी मला टाकाउतुन टिकाउ ह्या स्पर्धेचा निकाल देखिल फारसा पटला नाही
परिक्षकांचा निर्णय अंतिम असतो हे मान्य असले तरी एक वाचक, प्रेक्षक म्हणुन काय पटले नाही हे सांगण्याचा देखिल मला अधिकार आहे असे मला वाटते.
<< वर्षा १००% अनुमोदन.
बक्षिस क्रं १ प्रवेशिका उत्तम आहे यात वादच नाही. परंतु या एन्ट्रीला जर टाकाऊतुन टिकाऊ, उपयुक्तता आणि कलाकृती हा निकष लावला असेल तर त्याच निकषात बक्षिस क्रं २ मधे जास्तीत जास्त टाकाऊ वस्तु वापरुन विविध कलात्मक, उपयुक्त, टिकाऊ वस्तु बनवल्या आहेत. आणि या वस्तु कुणालाही बनवता येण्यासारख्या आहेत, भेट देण्यासारख्या आहेत. तसेच दोन्ही प्रवेशिका स्पर्धेच्या प्रत्येक नियमात बसतात. आणि पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाच्या जास्तीत जास्त जवळ आहेत. दोन्ही प्रवेशिका पुर्णपणे वेगळ्या आहेत. एकच माध्यम परत वापरलेले नाही. जर प्रवेशिका क्र. ९ ला मिळालेले प्रतिसाद आणि या प्रवेशिकेचा आवडत्या १० मधे १४ सभासदांनी केलेला समावेश हे पाहिले तर प्रवेशिका नक्कीच चांगली आहे हे सिद्ध होते. इतर कुठल्याही प्रविशिकेला इतका भरभरुन प्रतिसाद मिळालेला नाही.
माझ्या दोन्ही प्रवेशिकांना २ रे बक्षिस मिळाले यात मला आनंद आहेच. मी आधी काही बोललेही नव्हते परंतु अता विषय निघाला आहे म्हणुन लिहीले. यात कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही. परिक्षकांचा निर्णय पटला नाही एव्हढेच.
असो. माझे पर्यावरण संवर्धनाचे उद्दिष्ट सफल होवो हे महत्वाचे
संयोजकांना एक नम्र विनंती: पुढच्या वेळेस सर्व स्पर्धांचे निकाल हे मतदान पद्दतीनेच व्हावेत. त्यामुळे मायबोली सभासदांना काय आवडते आणि काय नाही हे कळेल कारण परिक्षकांची आवड आणि सभासदांची आवड यात खुपच फरक आहे हे यावर्षी प्रकर्षाने जाणवले.
किंवा, स्पर्धा ठेवुच नयेत. फक्त विविधगुण दर्शन
धन्यवाद.
मुटेसाहेबान्च्या शन्केचा
मुटेसाहेबान्च्या शन्केचा पूर्ण आदर करूनही, टण्याच्या एका वाक्यावर मी पार्ल्यावर जे लिहीले ते इथे टाकतोय
**********
9 October, 2010 - 10:28
अरे सेव्ह करण्याकरता तुझ्या विपुमधे तुझ्याच वाक्यावरची माझी पार्ल्यावरची पोस्ट थोडाकाळ टाकून ठेवतो रे भो! तिथुन वाहून जाईल ना म्हणून
>>>>>
>>>> म्हणजे 'वाक्यात उपयोग करा'मध्ये शब्द सर्वानुमते चपखल असावा लागतोच तर कवितेत तो असावाच ह्याचे बंधन मुळातच नाहिये. <<<
आधुनिक नवकविन्चे कायदे अस काही म्हणत असतील, पण हे सूत्र अमान्य आहे.
एक वा अनेक शब्द "चपखल" बसणे वा अर्थवाही होणेच अपेक्षीत नसेल तर कविताच का रचावी? नुस्तेच, हव तर आलटून पालटून कखगघ ते हळक्षज्ञ म्हणावे की! शब्द तरी हवेत कशाला? नै का?
आयला, जिथे सन्गितातले केवळ सात सूर देखिल नियमात (अर्थात "रागात") बान्धून त्यातुन अर्थवाही सुरावटी तयार करणार्यान्नी अधिक सन्वादासाठी मराठी भाषेची आख्खी बाराखडी जोडीला दिली तरी आशयसम्पन्न कविता करण्या ऐवजी दिलेला शब्द "केवळ (दगड) वापरणे " या अर्थी वापरायचा असेल तर बाकी कसल्या मर्तिकान्चे नाही, तरी मराठी भाषेच्या मर्तिकाचा बीबी मला लौकरच उघडावा लागेल यात सूतराम शन्का नाही!
(असो, आपला काय सम्बन्ध नाय बोवा कवितान्शी! बोम्बलायला इथे साध गद्य देखिल धड रचता येत नाही, पद्य काय रचणार कप्पाळ?
हां, पण नुस्तच कैतरी वापरत रचायच असेल तर आपण देखिल र ला ट जोडू शक्तो बरकां, तेवढा साक्षर आहे मी!
अन माझ्या (वा कुणाच्याही) साक्षरतेची साक्षच काढायची असेल तर र ला ट जोडून केलेल्या कविता पुरेश्या ठरतील ना? मग तर काय? आख्खा भारतच साक्षर झालाय असे म्हणावे लागेल, नै?) <<<<
******************
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
>>>पुढच्या वेळेस सर्व
>>>पुढच्या वेळेस सर्व स्पर्धांचे निकाल हे मतदान पद्दतीनेच व्हावेत. त्यामुळे मायबोली सभासदांना काय आवडते आणि काय नाही हे कळेल. >>><<<
फक्त ह्या वाक्यांस अनुमोदन! फक्त कविता ,लेख वगैरे सोडून(हे एक माझ्याकडून अॅडिशन वरील वाक्यात. कारण कविता वगैरे कळण्याचा आपला प्रांत नाहीये. कला वगैरे समजते).
<<<संयोजकांना एक नम्र विनंती:
<<<संयोजकांना एक नम्र विनंती: पुढच्या वेळेस सर्व स्पर्धांचे निकाल हे मतदान पद्दतीनेच व्हावेत>>>
परीक्षक/मतदार यांचा निर्णय मान्य करायची तयारी स्पर्धेत भाग घेण्यापूर्वीच ठेवायला हवी. जिथे मतदान पद्धतीने निकाल आहेत तिथेही कुणाला आक्षेप घ्यावासा वाटू शकेल. स्पर्धेच्या निमित्ताने डु.आयची चर्चा चाललेलीही पहायला मिळाली.
यापेक्षा स्पर्धा न ठेवता नुसताच सोहळा ठेवावा.
आपले कलागुण इतरांसमोर मांडायची संधी मिळणे आणि त्यांनी (मग किती जणांनी आणि कोणी हे महत्त्वाचे आहे का?) ते वाखाणणे हे पुरेसे आहे.
टाकाऊतून टिकाऊ स्पर्धेचे खरे पारितोषिक 'इथे मांडलेल्या कलाकृती करण्याचा प्रयत्न किती जणांनी केला' हेच ठरावे. तेव्हा जे कोणी इथल्या कलाकृतींवर हात आजमावून बघणार असतील त्यांनी तशी नोंद छायाचित्रासकट केली तर सादरकर्त्या/कर्तीला समाधान होईल.
कवितेत नुसता शब्द बसवल्याने झाले की तो त्या ओळीच्या/कवितेच्या अर्थाशी सुसंगत बसायलाही हवा?
रच्याकने साक्षरतेचा आणि कवितालेखनाचा काय संबंध? महाराष्ट्रातल्या जात्यावरच्या ओव्या/प्रांतोप्रांतीची लोकगीते काय साक्षर लोकांनी(च) लिहिली? बहिणाबाई चौधरी साक्षर होत्या का?
लिंबुटिंबुजी, या पर्णामधिल
लिंबुटिंबुजी,
या पर्णामधिल माझी कविता बघा.
.......
गंधवार्ता
दोर गळ्यात लटकवून
बाप झुलतोय झाडावर
माय निपचित पडलीय
हृदय फाटता धरतीवर
बाळ खिदळतंय मनीसंगे
मिशा तिच्या धरता-धरता
नाही जराही त्याला
कसलीsssचं गंधवार्ता
.
गंगाधर मुटे
...................................
"गंधवार्ता" हा शब्द चपखल बसला नाही?
र ला ट जोडून केलेली रचना वाटते?
(पुरस्काराची अभिलाषा मला नाही,कारण मी शेतकर्यांच्या प्रश्नांना वाचा फोडू पाहतोय. त्यांचे दु:ख विकून पोट भरणारा मी व्यावसायी नाही. जेथे मी काही विकतच नाही तेथे मोबदला मिळण्याची अपेक्षाही असू शकत नाही. त्यामुळे विजेता होणे न होणे गौन असते, पण अवहेलना क्षम्य असू शकत नाही.)
धन्यवाद अॅडमिन. संयोजक तुमचे
धन्यवाद अॅडमिन.
संयोजक तुमचे स्पस्टीकरण वाचले. आभारी आहे.
मंडळी, यावर्षीच्या
मंडळी,
यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या स्पर्धा निकालांबाबत वर काही मायबोलीकरांनी नाराजी व्यक्त केली आहे, म्हणून हा संयोजक मंडळाचा खुलासा.
यावर्षीच्या स्पर्धा ठरवताना तीन स्पर्धांना परीक्षक नेमले होते ते याच कारणासाठी की कुठेही कंपूबाजी न होता चांगल्या व दर्जेदार प्रवेशिकांना न्याय मिळावा. नेमलेले परीक्षक पक्षपातीपणा करणार नाहीत याची खात्री होती म्हणूनच प्रवेशिका निनावी न ठेवता त्या त्या नावाने प्रवेशिका प्रकाशित केल्या होत्या. तसेच एकदा परीक्षक नेमले की तो घेतील तो निर्णय संयोजक मंडळ/स्पर्धक सगळ्यांनाच बंधनकारक असतो. त्यात संयोजक मंडळानेही ढवळाढवळ करणे योग्य नाही, कारण परीक्षक म्हणून ज्यांची निवड केली जाते ते त्या क्षेत्रातील जाणकार असतात.
परीक्षक, स्पर्धक व इतर मायबोलीकर यांचीही मतं/दृष्टीकोन एकमेकांपेक्षा वेगळा असू शकतो, अर्थात आपली मतं द्यायचा सगळ्यांनाच पूर्ण हक्क आहे. यावर्षीचा निकाल जाहीर झालेला आहे व त्यात फेरफार करणं आता शक्य नाही व योग्यही होणार नाही. त्यामुळे तुमच्या सुचनांचा पुढील संयोजक मंडळास नक्कीच उपयोग होईल.
धन्यवाद.
मी टाकाऊतुन टिकाऊ या साठी
मी टाकाऊतुन टिकाऊ या साठी परिक्षक म्हणुन काम केलेले. या नात्याने वरिल आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न करित आहे.
मी आणि रुनी ने गुणांकनासाठी ६ विभाग केलेले. दहा पैकी प्रत्येक विभागाला मार्क्स दिले.
गुणांकन ची मेथड ठरल्यावर रुनी आणि मी आपापले मार्क्स दिले. म्हणजे रुनी ने तिची एक्सेल शीट तयार केली. आणि मी माझी. अर्थातच कुणावरही अन्याय होवु नये हाच याचा उद्देश होता. नंतर मार्क्स एकत्र केले.
माहिती साठी काय विभाग केलेले ते देत आहे.
१. नाविन्य/क्रिएटिव्हिटी
२. उपयुक्तता
३.साहित्याची सहज उपलब्धता
४.भेट देण्यायोग्य आहे अथवा नाही
५.वस्तु करण्याची काठीण्य पातळी
६.पर्यावरणाला पुरक
ज्यावेळी या स्पर्धेत भाग घेतला गेला तेव्हाच गुणांकन "मतदान" पद्धतीने न होता "परिक्षकांकडुन" होणार आहे याची प्रत्येक स्पर्धकाला जाणीव होती. ते मान्य करुनच प्रवेशिका पाठवण्यात आल्या होत्या , असं मी तरी गृहित धरते.
हा निकाल लावताना दिलेल्या निकषात जास्तीत जास्त योग्य बसणार्या कलाकृती निवडण्याचा प्रयत्न केला. तो पुर्णपणे बरोबर असेलच अस प्रत्येकाला वाटाव असा माझा दावा मुळीच नाही. परंतु दिलेल काम योग्य पद्धतीने करण्याचा आणि कुणा एकावर अन्याय होउ न देण्याचा प्रामाणीकपणाने प्रयत्न केला आहे एवढच सांगु इच्छिते.
धन्यवाद.
'आश्चर्यकारकरीत्या' 'टण्या'
'आश्चर्यकारकरीत्या'
'टण्या' यांच्याशी मी 'हजार' टक्के सहमत आहे. (कवितेच्या नियमांबाबत)
मात्र!
हे सगळे अप्रतिम आहे. या स्पर्धा, त्यातील परिक्षकांची निरीक्षणे ('चपखल' हे सोडून) फारच सुंदर!
तो 'मुकुट घातलेल्या मुलीचा फोटो आणि त्याबाबतचे मतप्रदर्शन अत्यंत पटले.'
-'बेफिकीर'!
Pages