नमस्कार मंडळी,
गणेशोत्सवातील सर्व स्पर्धा/कार्यक्रमांना उत्स्फूर्त दाद व प्रतिसाद दिल्याबद्दल संयोजक मंडळाकडून सर्व मायबोलीकरांचे मन:पूर्वक आभार.
या गणेशोत्सवात एकंदर ५ स्पर्धा होत्या. त्यातील ३ स्पर्धांचे निकाल परीक्षकांमार्फत व उरलेल्या २ स्पर्धांचे निकाल जनमत चाचणीने लावण्यात आले आहेत.
टाकाऊतून टिकाऊ व प्रकाशचित्र या स्पर्धांसाठी अनुक्रमे सीमा व रुनी आणि सावली व अबेडेकर यांनी तर शब्दांकुर या स्पर्धेसाठी स्वाती_आंबोळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. परीक्षकांनी वेळात वेळ काढून परीक्षण केले व निकाल दिला. त्याबद्दल परीक्षकांना संयोजक मंडळाकडून परत एकदा अनेक धन्यवाद.
गणेशोत्सव स्पर्धांचा निकाल खालीलप्रमाणे:
अशीही जाहिरातबाजी विषय १ व २ या स्पर्धांच्या मतदानामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत त्याबद्दल अत्यंत दिलगीर आहोत त्यामुळे प्रत्यक्ष मतदान किती झालंय ते इथेच देतोय तरी कृपया नोंद घ्यावी.
अशीही जाहिरातबाजी:
विषय क्र. १ - दीपिका पदुकोण व दगडु तेली मसाला : विजेता - फचिन
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.
(एकूण मते ५१ त्यांपैकी सर्वाधिक मते फचिन - १४; अरभाट - ११ मते; अश्विनी के - ७ मते; स्वप्ना_राज - ३ मते; रैना - २ मते; मैत्रेयी - २ मते, विक्रम३११ - २ मते; आर्च - २ मते; कविता नवरे - २ मते; दीपांजली - १ मत; नंद्या - १ मत; प्रसीक - १ मत; नवीना - १ मत; वृषा - १ मत; छाया- १ मत)
विषय क्र. २ - सन्नी देओल व उंदीर मारण्याचे औषध : विजेती - स्वप्ना_राज
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.
(एकूण मते ३८ त्यांपैकी सर्वाधिक मते स्वप्ना_राज - १३; अरभाट - १० मते; अरूंधती कुलकर्णी - ९मते; ; परदेसाई - २ मते; आर्च - १ मत, वृषा - १ मत; भरत मयेकर - १ मत; प्रसीक - १ मत)
विषय क्र. ३ - लालूप्रसाद यादव व अरमानीचे सूट : विजेती - अरूंधती कुलकर्णी - झालेले मतदान इथे पहा.
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.
विषय क्र. ४ - पल्लवी जोशी व साड्या : विजेती - पौर्णिमा- झालेले मतदान इथे पहा.
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.
आमने-सामने स्पर्धा :
जोडी क्र. १ - शाहिद कपूर व सैफ अली खान : विजेती - दीपांजली- झालेले मतदान इथे पहा.
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.
जोडी क्र. २ - सानिया मिर्झा व शोएब मलिक : विजेता - ऋयाम- झालेले मतदान इथे पहा.
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.
टाकाऊतून टिकाऊ स्पर्धा :
विजेती क्र. १- दीपांजली (प्रवेशिका क्र. ११)
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.
विजेती क्र. २ - लाजो (प्रवेशिका क्र. ९ व प्रवेशिका क्र. १०)
विजेती क्र. ३ - धनुडी (प्रवेशिका क्र. ८) व रोझा (प्रवेशिका क्र. ६)
उत्तेजनार्थ प्रवेशिका : दीपांजली (प्रवेशिका क्र. ७)
प्रकाशचित्र स्पर्धा निकाल :
प्रकाशचित्र स्पर्धा विषय १ - विरुद्ध :
विजेती प्रवेशिका - प्रवेशिका क्र. १६ - सूर्यकिरण
परीक्षकांचे विचार:
या प्रकाशचित्रामधले त्या मुलीच्या डोळ्यातले भाव अतिशय सुंदर पकडले आहेत. त्या मुलीचा पेहराव, डोक्यावरचा तो मुकुट आणि डोळ्यातले भाव यांचा एकमेकांशी असलेला विरुद्ध संबंध फार आवडला.
विशेष उल्लेख :
प्रवेशिका क्र. ११ - योगेश२४
या प्रकाशचित्रामधला अॅन्गल फारच सुरेख आहे.
प्रकाशचित्र स्पर्धा विषय २ - एक नवी सुरुवात :
विजेती प्रवेशिका - प्रवेशिका क्र. ९ - गुणेश
अगदी एकमताने या प्रवेशिकेची निवड केलीय. विषयाची अनुरुपता, फोकस, रंग, कंपोझिशन, अॅन्गल सगळंच आवडलं.
विशेष उल्लेख :
प्रवेशिका क्र. ८ - सूर्यकिरण
या फोटोमधला विषय आवडला पण फोकस, लाईट अजून चांगला करता आला असता.
प्रकाशचित्र स्पर्धा विषय ३ - आधार :
विजेती प्रवेशिका - प्रवेशिका क्र. २ (योगेश२४)
रंग, कंपोझिशन, विषयाची अनुरुपता आवडली.
विशेष उल्लेख
प्रवेशिका क्र. २३ - सीमा
कंपोझिशन, अॅन्गल बदलला असता तर हा अजून छान येऊ शकला असता
शब्दांकुर पर्ण १ : संध्याकाळ
विजेती : अश्विनी के
तू पुरवलेले तेजाचे पुंजके, सूर्याची लाज राखायला
मान उंचावून पहात होतीस अस्त रोखणारे हजारो हात
सोबतीला...श्वासांची टप्पा चुकलेली लय
अचानक मागून चाहूल..अन् तिरंगी लडिवाळ वेढा
परत आली होती तुझी तेजाची रिक्त कुपी
सोबतीला...आता फक्त सांजवात
उल्लेखनीय कविता: भरत मयेकर
संध्याकाळ रेंगाळतेय
ढगांच्या किनारींवर
वार्याच्या लकेरताना
स्तब्ध अशा पाण्यावर.
उबदार तरुछाया
मिटतात घरट्यांत
काजळी प्रकाश मिळे
जरतारी अंधारात
शब्दांकुर पर्ण २ : गंधवार्ता
या पर्णासाठी एकही विजेती कविता नाही. परीक्षकांना खालील कविता उत्कृष्ट वाटली परंतू ती या फेरीसाठी दिलेले नियम पाळत नाही.
भरत मयेकर
वार्यावर लहरत येतो
हलकासा सुवास,
तशाच आठवणीही
फुलांच्या, कळ्यांच्या
आणि
फुलण्याच्याही
शब्दांकुर पर्ण ३ : आता काही देणे घेणे उरले नाही
विजेता : भरत मयेकर
कधी पीस तर, कधी शिंपला, केव्हा मरवा
येण्याजाण्या कधी बहाणे केले नाही?
येताजाता, देताघेता समीप आलो
हाती धरले हात कधी, ते कळले नाही.
तुझे नि माझे आता काही उरले नाही
माझे जे जे , तुझेहि जे जे, एक जाहले
आता काही देणे घेणे उरले नाही
शब्दांकुर पर्ण ४ : विडंबन
विजेती : मामी
सांग सांग डागदरा, मुलगाच होईल काय?
क्लिनिकमध्ये पैसे चारलेत, नक्की कळेल काय?
नवरा, सासूबाईंची नियत बदलेल काय?
लाडू मिळाला नाही तर बर्फी चालेल काय?
डागदरा, डागदरा, खरं सांग एकदा
दोन वर्षांतून अॅबॉर्शन केलयं रे तिनदा ......
डागदरा उद्या आहे महत्वाचा पेपर
छातीत धडधड होत राहील, रिझल्ट लागेस्तोवर
गणेशोत्सवातंर्गत घेतलेल्या स्पर्धांमधील सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
विजेत्यांचे मनःपूर्वक
विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!!!
सर्वांचे हार्दिक अभिनंदन.
सर्वांचे हार्दिक अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे मनापासून
सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन
सर्वांचे अभिनंदन!!
सर्वांचे अभिनंदन!!
सुंदर विषय देऊन कल्पनाशक्तीला
सुंदर विषय देऊन कल्पनाशक्तीला चालना देणार्या संयोजकांचे, कलाकृतींची निवड करणार्या (आणि मला सुखद धक्के देणार्या) परीक्षकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
(घरातल्या अनेक टाकाऊ वस्तूही आम्ही आता टिकाऊ होणार म्हणुन आभार मानत आहेत!)
विजेत्यांचे आणि सर्व स्पर्धकांचेही अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
मला ज्यांनी मत दिले, त्या सर्वांची ऋणी आहे, धन्यवाद!
मायबोली, गणेशोत्सव संयोजक
मायबोली, गणेशोत्सव संयोजक मंडळ, मायबोलीकर - सर्वांचे धन्यवाद!
मला कशी काय ही विडंबनात्मक कविता सुचली मलाच माहित नाहीये .... विषय वाचला आणि एकदम लिहाविशीच वाटली. स्त्रीभ्रुणहत्येचा विषय कुठेतरी मनात रेंगाळत होता तोच लेखणीतून उतरला.....
वा ! सर्वांचे हार्दिक अभिनंदन
वा ! सर्वांचे हार्दिक अभिनंदन !
वा ! सर्व विजेत्यांचे हार्दिक
वा ! सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
सगळ्यांचे मनापासून अभिनंदन
सगळ्यांचे मनापासून अभिनंदन
सर्व विजेत्यांचं मनापासून
सर्व विजेत्यांचं मनापासून अभिनंदन
संयोजक आणि परिक्षकांचेही अभिनंदन !! वेळात वेळ काढून आम्हाला इतका आनंद दिलात ..... खूप खूप धन्यवाद
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!!
सर्वांचे मनापासुन अभिनंदन...
सर्वांचे मनापासुन अभिनंदन...
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन, त्यासोबतच हि स्पर्धा आयोजीत केल्याबद्दल माबो, आयोजक, संयोजक, परिक्षकांचे आभार
....आणि आता पार्टी पाहिजे
सर्व विजेत्यांचे अभिनंदन...
सर्व विजेत्यांचे अभिनंदन...
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. संयोजक आणि परिक्षकांचेही अभिनंदन आणि आभार. टाकाउतुन टिकाउ मधे मला सर्वांच्याच प्रवेशीका आवडल्या होत्या. त्यामुळे हे मला अनपेक्षित होतं. . प्रकाशचित्रांची स्पर्धा पण एकदम खास होती.
सगळ्यांच विजेत्यांचे
सगळ्यांच विजेत्यांचे अभिनंदन.
त्याच बरोबर स्पर्घेत सहभागी झाल्याबद्दल मायबोलीकरांचे अभिनंदन.
सर्व विजेत्यांचं हार्दिक
सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन!
सर्व स्पर्धक आणि संयोजक - ग्रेट जॉब!
संयोजक, विजेते, परिक्षक, आणि
संयोजक, विजेते, परिक्षक, आणि स्पर्धकांचे अभिनंदन.
अरे वा! छान.... सर्व विजेते,
अरे वा! छान.... सर्व विजेते, संयोजक व परीक्षकांचे अभिनंदन व ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचेही मनापासून अभिनंदन! सर्वांच्या सहभागामुळे हा गणेशोत्सव व स्पर्धा संस्मरणीय झाल्या.
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
छान छान प्रवेशिका पाठवल्याबद्दल सगळ्या स्पर्धकांचेही विशेष कौतुक !
आणि परिक्षकांचे आणि गणेशोत्सव समितीचे खास आभार!
सर्व विजेत्या आणि सहभागी
सर्व विजेत्या आणि सहभागी मायबोलीकरांचे अभिनंदन!!
स्पर्धक आणि विजेते दोघांचे
स्पर्धक आणि विजेते दोघांचे अभिनंदन.
गणेशोत्सव संयोजन इतक्या सुरेख पद्धतीने करणार्या समिती सदस्यांचेही अभिनंदन
सर्व विजेत्यांचे मनापासून
सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन
सर्वच विजेत्यांचे हार्दिक
सर्वच विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. एकच श्रेष्ठ प्रवेशिका निवडणे खरेच कठीण होते.
सर्व विजेत्यांचे व सहभागी
सर्व विजेत्यांचे व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे खूप, खूप
सर्व विजेत्यांचे खूप, खूप अभिनंदन. प्रकाशचित्रे निवडण्यामागची कारणे देण्याची कल्पना छानच! त्यामुळे परीक्षक फोटोमध्ये काय बघतात हे समजले. त्यासाठी खास धन्यवाद.
मायबोली गणेशोत्सवाचे सभासद
मायबोली गणेशोत्सवाचे सभासद २७५ होते पण मतदान खूपच कमी झालं आहे ... असं का? मतदान करण्याकरतासुध्दा तितकाच उत्साह दिसायला हवा.
सर्वांचे अभिनंदन आणि आभार
सर्वांचे अभिनंदन आणि आभार
मायबोलीच्या प्रत्येक सभासदाने १ बाटली आणि १ पिशवी जरी परत सत्कारणी लावली तरी माझे उद्दिष्ट सफल झाले म्हणेन मी
माझ्या कलाकृतींचे कौतुक आणि काहिंनी ऑलरेडी वस्तु प्रत्यक्ष करुन बघणे किंवा जरुर करुन बघु म्हणुन सांगणे ही देखिल माबोकरांनी पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने उचललेली पावलच आहेत
परत एकदा धन्यवाद
Pages