गणेशोत्सव २०१० : स्पर्धा निकाल

Submitted by संयोजक on 27 September, 2010 - 05:37

नमस्कार मंडळी,

गणेशोत्सवातील सर्व स्पर्धा/कार्यक्रमांना उत्स्फूर्त दाद व प्रतिसाद दिल्याबद्दल संयोजक मंडळाकडून सर्व मायबोलीकरांचे मन:पूर्वक आभार.

या गणेशोत्सवात एकंदर ५ स्पर्धा होत्या. त्यातील ३ स्पर्धांचे निकाल परीक्षकांमार्फत व उरलेल्या २ स्पर्धांचे निकाल जनमत चाचणीने लावण्यात आले आहेत.

टाकाऊतून टिकाऊ व प्रकाशचित्र या स्पर्धांसाठी अनुक्रमे सीमा व रुनी आणि सावली व अबेडेकर यांनी तर शब्दांकुर या स्पर्धेसाठी स्वाती_आंबोळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. परीक्षकांनी वेळात वेळ काढून परीक्षण केले व निकाल दिला. त्याबद्दल परीक्षकांना संयोजक मंडळाकडून परत एकदा अनेक धन्यवाद.

गणेशोत्सव स्पर्धांचा निकाल खालीलप्रमाणे:

अशीही जाहिरातबाजी विषय १ व २ या स्पर्धांच्या मतदानामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत त्याबद्दल अत्यंत दिलगीर आहोत त्यामुळे प्रत्यक्ष मतदान किती झालंय ते इथेच देतोय तरी कृपया नोंद घ्यावी.

अशीही जाहिरातबाजी:

विषय क्र. १ - दीपिका पदुकोण व दगडु तेली मसाला : विजेता - फचिन
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.

(एकूण मते ५१ त्यांपैकी सर्वाधिक मते फचिन - १४; अरभाट - ११ मते; अश्विनी के - ७ मते; स्वप्ना_राज - ३ मते; रैना - २ मते; मैत्रेयी - २ मते, विक्रम३११ - २ मते; आर्च - २ मते; कविता नवरे - २ मते; दीपांजली - १ मत; नंद्या - १ मत; प्रसीक - १ मत; नवीना - १ मत; वृषा - १ मत; छाया- १ मत)

विषय क्र. २ - सन्नी देओल व उंदीर मारण्याचे औषध : विजेती - स्वप्ना_राज
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.
(एकूण मते ३८ त्यांपैकी सर्वाधिक मते स्वप्ना_राज - १३; अरभाट - १० मते; अरूंधती कुलकर्णी - ९मते; ; परदेसाई - २ मते; आर्च - १ मत, वृषा - १ मत; भरत मयेकर - १ मत; प्रसीक - १ मत)

विषय क्र. ३ - लालूप्रसाद यादव व अरमानीचे सूट : विजेती - अरूंधती कुलकर्णी - झालेले मतदान इथे पहा.
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.

विषय क्र. ४ - पल्लवी जोशी व साड्या : विजेती - पौर्णिमा- झालेले मतदान इथे पहा.
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.

आमने-सामने स्पर्धा :

जोडी क्र. १ - शाहिद कपूर व सैफ अली खान : विजेती - दीपांजली- झालेले मतदान इथे पहा.
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.

जोडी क्र. २ - सानिया मिर्झा व शोएब मलिक : विजेता - ऋयाम- झालेले मतदान इथे पहा.
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.

टाकाऊतून टिकाऊ स्पर्धा :

विजेती क्र. १- दीपांजली (प्रवेशिका क्र. ११)
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.
विजेती क्र. २ - लाजो (प्रवेशिका क्र. ९ व प्रवेशिका क्र. १०)
विजेती क्र. ३ - धनुडी (प्रवेशिका क्र. ८) व रोझा (प्रवेशिका क्र. ६)
उत्तेजनार्थ प्रवेशिका : दीपांजली (प्रवेशिका क्र. ७)

प्रकाशचित्र स्पर्धा निकाल :

प्रकाशचित्र स्पर्धा विषय १ - विरुद्ध :

विजेती प्रवेशिका - प्रवेशिका क्र. १६ - सूर्यकिरण
Prachi_Viruddha_Entry_Suryakiran.jpg
परीक्षकांचे विचार:
या प्रकाशचित्रामधले त्या मुलीच्या डोळ्यातले भाव अतिशय सुंदर पकडले आहेत. त्या मुलीचा पेहराव, डोक्यावरचा तो मुकुट आणि डोळ्यातले भाव यांचा एकमेकांशी असलेला विरुद्ध संबंध फार आवडला.

विशेष उल्लेख :
प्रवेशिका क्र. ११ - योगेश२४
या प्रकाशचित्रामधला अ‍ॅन्गल फारच सुरेख आहे.

प्रकाशचित्र स्पर्धा विषय २ - एक नवी सुरुवात :

विजेती प्रवेशिका - प्रवेशिका क्र. ९ - गुणेश
Vidhi-294-4.jpg
अगदी एकमताने या प्रवेशिकेची निवड केलीय. विषयाची अनुरुपता, फोकस, रंग, कंपोझिशन, अ‍ॅन्गल सगळंच आवडलं.

विशेष उल्लेख :
प्रवेशिका क्र. ८ - सूर्यकिरण
या फोटोमधला विषय आवडला पण फोकस, लाईट अजून चांगला करता आला असता.

प्रकाशचित्र स्पर्धा विषय ३ - आधार :

विजेती प्रवेशिका - प्रवेशिका क्र. २ (योगेश२४)
Aadhar.jpg
रंग, कंपोझिशन, विषयाची अनुरुपता आवडली.

विशेष उल्लेख
प्रवेशिका क्र. २३ - सीमा
कंपोझिशन, अ‍ॅन्गल बदलला असता तर हा अजून छान येऊ शकला असता

शब्दांकुर पर्ण १ : संध्याकाळ

विजेती : अश्विनी के
तू पुरवलेले तेजाचे पुंजके, सूर्याची लाज राखायला
मान उंचावून पहात होतीस अस्त रोखणारे हजारो हात
सोबतीला...श्वासांची टप्पा चुकलेली लय
अचानक मागून चाहूल..अन् तिरंगी लडिवाळ वेढा
परत आली होती तुझी तेजाची रिक्त कुपी
सोबतीला...आता फक्त सांजवात

उल्लेखनीय कविता: भरत मयेकर
संध्याकाळ रेंगाळतेय
ढगांच्या किनारींवर
वार्‍याच्या लकेरताना
स्तब्ध अशा पाण्यावर.
उबदार तरुछाया
मिटतात घरट्यांत
काजळी प्रकाश मिळे
जरतारी अंधारात

शब्दांकुर पर्ण २ : गंधवार्ता

या पर्णासाठी एकही विजेती कविता नाही. परीक्षकांना खालील कविता उत्कृष्ट वाटली परंतू ती या फेरीसाठी दिलेले नियम पाळत नाही.

भरत मयेकर
वा‍र्‍यावर लहरत येतो
हलकासा सुवास,
तशाच आठवणीही
फुलांच्या, कळ्यांच्या
आणि
फुलण्याच्याही

शब्दांकुर पर्ण ३ : आता काही देणे घेणे उरले नाही

विजेता : भरत मयेकर
कधी पीस तर, कधी शिंपला, केव्हा मरवा
येण्याजाण्या कधी बहाणे केले नाही?
येताजाता, देताघेता समीप आलो
हाती धरले हात कधी, ते कळले नाही.
तुझे नि माझे आता काही उरले नाही
माझे जे जे , तुझेहि जे जे, एक जाहले
आता काही देणे घेणे उरले नाही

शब्दांकुर पर्ण ४ : विडंबन

विजेती : मामी
सांग सांग डागदरा, मुलगाच होईल काय?
क्लिनिकमध्ये पैसे चारलेत, नक्की कळेल काय?
नवरा, सासूबाईंची नियत बदलेल काय?
लाडू मिळाला नाही तर बर्फी चालेल काय?
डागदरा, डागदरा, खरं सांग एकदा
दोन वर्षांतून अ‍ॅबॉर्शन केलयं रे तिनदा ......
डागदरा उद्या आहे महत्वाचा पेपर
छातीत धडधड होत राहील, रिझल्ट लागेस्तोवर

गणेशोत्सवातंर्गत घेतलेल्या स्पर्धांमधील सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व विजेते आणि सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन!

संयोजकांचे आभार्स! Happy

माफी> परीक्षकांचेही आभार्स! Happy

..

योगेशला अनुमोदन !

परीक्षकांच्या विचारांचे खरोखर कौतूक .. सबंध गणेश उत्सव टिमचे मनापासून आभार. पुढच्या वर्षी गणेशउत्सवाचे संयोजन करण्याची तीव्र इच्छा.

अभिनंदन सर्वांचे. Happy

प्रकाशचित्राचे निकाल खूपच छान. सुंदर प्रकाशचित्रे.

अभिनंदन केलेल्या सर्वांना धन्यवाद आणि इतर सर्व विजेत्यांचंही अभिनंदन !
टाकाउतून टिकाऊ स्पर्धेमुळे अनेक इतर वस्तु पण काढल्या आहेत सजवायला, स्पर्धेची आयडिआ ज्यांची होती त्यांना धन्यवाद आणि अर्थात संयोजक, परिक्षकांनाही !

Pages