हरवलेला भारतीय

Submitted by चाणक्य. on 26 September, 2010 - 02:28

प्रत्येक देशाला अस्तित्वासाठी एक समान धागा असावा लागतो.समान धागा असल्याशिवाय 'अनेकत्वातुन एकता" म्हणजे फक्त पोकळ घोषणा आहे. एकच गोष्ट भारतात हरवलेली आहे आणी ती म्हणजे 'भारतीय" असणे. "भारतीय" असणे हे बाकि सर्व गोष्टीच्या मागे पडते. ऊरते ते केवळ हिंदु असणे, मुसलमान असणे,बिहारी असणे, दलीत असणे, ब्राह्मण असणे.

आसाममधे आसामी बिहारिंना मारतात. ओरिसामधे, संघ परिवार ख्रिश्ननांवर हल्ले करतो. आंध्रात तेलंगणा वरुन मारामार्या पेटतात.मायावती 'सर्वजन' चा वापर करुण निवडणुक जिंकते पण बाकि सगळिकडे राखिव जागांबद्द्लच बोलते. कौग्रेस साचार कमिटीचा वापर करुन मुसलमानांचे मन जिंकु पहाते. मनसेसाठी भारतीय म्हणजे फक्त मराठी. शिवसेनेसाठी मराठी महाराष्ट्रात, बाहेर हिंदु.

काहि हिदुंच्या मते एम एफ हुसेन वरचा हल्ला योग्य असतो, पण तस्लिमा वरचा हल्ला निंदनीय असतो.काहि मुस्लिमांच्या वते तस्लिमा वरचा हल्ला योग्य असतो पण गुजराथेत झालेले हत्या़कांड निंदनीय असते.काहि शिखांच्या मते डेरा वरचा हल्ला बरोबर असतो पण १९८४ च्या पुस्तकावरिल बंदि अयोग्य असते.

आपल्याला कशाचा नक्की राग येतो ? प्रत्यक्ष क्रुतिचा कि क्रुतिमागच्या अन्यायाचा ?

अशा प्रकारच्या निवडुन केलेल्या प्रतिक्रिया आपल्याला परत फक्त मध्ययुगात घेउन जाउ शकतात. प्रत्येक अशा क्रूतीचा तितक्याच तिव्रतेने निषेध केला पाहिजे मग ती कोणाकडुनहि असो - हिंदु असो वा मुसलमान वा शिख वा ब्राह्म्ण वा तामिळ आणी तो निषेध हिदु म्हणुन, शिख म्हणुन, दलित म्हणुन, नवबौद्ध म्हणुन न करता फक्त अन्यायाचा निषेध म्हणुन करण्याइतकी प्रगल्भता हवी.

आणी आपल्याला कशाचा निषेध करायचा असतो ? बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याएवजी राखिव जांगावरुन भांडणे केली जातात. शहरांवरच्या बोज्याचा प्रश्न सोडविण्याएवजी मरठी बिहारी भांडणे लावली जातात.

प्रत्येक क्षणी , प्रत्येक दिवशी 'भारतीय' तुटतोय. भारतीय लोक वेगळे होतायेत आणी हिदु, बिहारि, पंजाबी, तेलगु, शिख, मुसलमान, जन्माला येत आहेत. आज हिंदु म्हणुन मला मालेगावला जायला भिती वाटते. मराठी म्हणुन उत्तर प्रदेशात, बिहारि म्हणुन आसामात.

भारतातील लोकांना 'भारतीय" म्हणुन एकच ओळ्ख मिळवण्यात अपयश आले आहे आणी प्रांतीक/धार्मिक्/जातीय ओळखीची सीमा ओळखण्यातही!

सर जोन ग्रेशम म्हणाले होते की भारत असे काहिहि अस्तित्वातच नाहिये.वेगवेगळ्या भाषा, प्रांत, धर्म, जाती आणी संस्क्रुती याचे ते फक्त एक गाठोडे आहे. मास्लोव असे म्हण्ल्याचे एकिवात आहे कि भारतात superpower होण्याची क्षमता आहे पण superpower होण्याची wisdom नाहि! आजच्या भारताचे खरे अपयश हेच आहे कि भारतात हुशार लोक आहेत, शिकलेली लोक आहेत पण sensible आणी rational (सयुक्तीक) लोक नाहित.

गुलमोहर: 

"आजच्या भारताचे खरे अपयश हेच आहे कि भारतात हुशार लोक आहेत, शिकलेली लोक आहेत पण sensible आणी rational (सयुक्तीक) लोक नाहित."

आहेत हो. पुष्कळ आहेत.
फक्त कमालीच्या बाहेर अफाट लोकसंख्या, नि त्यात 'sensible आणी rational' नसलेले लोक खूप खूप जास्त आहेत. त्यांच्या या 'गुणांमुळे' ते बाकीच्यांचा आवाज बुडवून टाकतात. आणि अहो, इतकी अफाट लोकसंख्या की मनात आणले, मरेस्तोवर कष्ट केले, तरी फार थोड्या लोकांच्यात आपण 'sensible आणी rational' मूल्ये पसरवू शकतो. अगदी सबंध जगात सुद्धा कुणा कुणाला एव्हढी लोकसंख्या 'सांभाळण्याची' अक्कल व ताकद असणार नाही. अनेक पिढ्या गेल्या तरी हे विषम प्रमाण कमी तर होणारच नाही, उलट लोकसंख्या वाढली तर जास्तच होईल. त्यातून काही लोक जे जगात अतिरेकीपणा करतात, ते मुळी 'sensible आणी rational' लोकांचा जीवच घेतात!

'sensible आणी rational' लोकांकडून 'अतिरेकी प्रतिक्रिया', आरडाओरडा होत नाही. लोकांना मारूनच टाकायचे, असे होत नाही. व्हायलाहि नको. पण त्यामुळे होते काय, काही 'sensible आणी rational' लोकांना त्यांच्या 'sensible आणी rational' असण्याबद्दल शंका येते, की आपण असेच राहिलो, तर आपला काही उपयोग होणार नाही, कारण आपल्याला कुणीच विचारत नाही. मग त्यांच्यासारखे नवीन लोक तयार होत नाहीत, उलट आहेत त्यातले पण हळू हळू कमी 'sensible आणी rational' होऊ लागतात.

हे सगळ्या जगातच हळू हळू होऊ लागले आहे.

भारत आपला आहे, त्याबद्दल आपल्या भावना वेगळ्या, असे होऊ नये असे वाटते, म्हणून आपण भारताबद्दल कळकळीने बोलतो, पण इतर जगात काही वेगळी परिस्थिती नाही .

पण 'sensible आणी rational' अजिबात नाहीत असे नसून उलट कदाचित् संख्येने जास्तच असतील, (अफाट लोकसंख्या, एक टक्का म्हंटले तरी किती लोक होतील. कित्येक देश इतके लहान की दहा देश मिळून सुद्धा भारता इतकी लोकसंख्या होत नाही, तर तिथे प्रत्येकी दहा टक्के लोक असे असले तरी त्या 'sensible आणी rational' लोकांची संख्या भारतातल्या 'sensible आणी rational' लोकांइतकी होणार नाही.)

पुष्कळ भारतीयांनी परदेशात जाऊन नेत्रदीपक यश मिळवले याचे कारण बहुधा तेच असावे, विरोध कमी!

फक्त कमालीच्या बाहेर अफाट लोकसंख्या, नि त्यात 'sensible आणी rational' नसलेले लोक खूप खूप जास्त आहेत. री फार थोड्या लोकांच्यात आपण 'sensible आणी rational' मूल्ये पसरवू शकतो. अगदी सबंध जगात सुद्धा कुणा कुणाला एव्हढी लोकसंख्या 'सांभाळण्याची' अक्कल व ताकद असणार नाही

अहो हे असणारच आहे. पण म्हणुन मग सगळेच अतीरेकि होणार का ?

पण त्यामुळे होते काय, काही 'sensible आणी rational' लोकांना त्यांच्या 'sensible आणी rational' असण्याबद्दल शंका येते, की आपण असेच राहिलो, तर आपला काही उपयोग होणार नाही, कारण आपल्याला कुणीच विचारत नाही. मग त्यांच्यासारखे नवीन लोक तयार होत नाहीत, उलट आहेत त्यातले पण हळू हळू कमी 'sensible आणी rational' होऊ लागतात.

मग ते sensible आणी rational' नव्हेतच झक्की साहेब! सगळे होउनहि जे rational रहातात तेच खरे. अहो

पण त्यामुळे होते काय, काही 'sensible आणी rational' लोकांना त्यांच्या 'sensible आणी rational' असण्याबद्दल शंका येते

ज्यांना स्वताच्या sensible आणी rational विचारांची शंका वाटते ते sensible आणी rational असतीलच कसे ? अहो मग त्यांना sensible आणी rational असण्याचा अर्थच समजला नाहि. अहो sensible आणी rational असणे म्हणजेच स्वताच्या विचारांबद्द्ल ठाम असणे, त्या बद्द्ल कसलीहि शंका नसणे.

@उदय साहेब

अहो रामाची सीता कोण असे झाले कि तुमचे! अहो एक भारतीय दुसर्या भारतीयाला केवळ तो बिहारि आहे, मुसल्मान आहे, दलित आहे, तेलगु आहे म्हणुन मारतो तो सोडुन जे उरतात ते भारतीय. देश हा धर्म, प्रांत, भाषा, जात ह्या पेक्षा मोठा आहे हे मानणारा भारतीय. फार सोपे आहे ते!

गणु चांगल लिहिलयं,
मला वाटतं भारतात सुपरपॉवर होण्याची क्षमतापण आहे आणि हुशारी पण आहे , नाही ती फक्त सामाजीक आणि राजकीय इच्छाशक्ती.

अहो हे असणारच आहे. पण म्हणुन मग सगळेच अतीरेकि होणार का ?

sensible आणी rational (सयुक्तीक) लोक का नाहीत याबद्दलची माझी कारणे तुम्हाला पटली नसतील. पण तसे लोक नाहीत असे नाही. जे आहेत ते सापडणार नाहीत, शोधावे लागतील. तुम्ही म्हणता तेव्हढे अत्त्युच्च दर्जाचे, अविचल, संपूर्णपणे निर्दोष असलेलेहि लोक असतील, पण "नागुणि गुणिनं वेत्ति, गुणी गुणिषु दुर्लभः" हे वाचले असेलच तुम्ही. किंवा "गाढवापुढे वाचली गीता" हेहि माहित असेल. जिथे sensible आणी rational नसणार्‍यांचे प्रमाण कमालीच्या बाहेर, अफाट जास्त आहे, तिथे असे sensible आणी rational लोक असतील हे बर्‍याच जाणांना कळणार कसे? अगदी सांगून सुद्धा!!

देश हा धर्म, प्रांत, भाषा, जात ह्या पेक्षा मोठा आहे हे मानणारा भारतीय.
--- पण देशा पर्यंतच का थांबलात... थोडे पुढे जाऊन देश, धर्म, प्रांत, भाषा, जात ह्या पेक्षाही मोठा मानवता धर्म का नको आपल्या नजरे समोर ठेवायला?

समोरच्या व्यक्तीला त्याच्या जाती, धर्मा नुसार मोजमाप करणे हे मलाही मान्य नाही. कळपाने, गटा-गटाने रहाणे या मधे कुठे तरी मनात असुरक्षीतता दडलेली आहे. हे असुरक्षीततेचे (अस्तित्वाचे) भुत दिवसंदिवस वाढत आहे किंवा पद्धतशीर पणे वाढवले जात आहे. ह्या विचारधाते तुन निर्माण झालेली (ब्रेन वॉश) पिढी, समोरच्याचे विचार बघायच्या आधी त्याच्या कातडीचा रंग,जात-धर्म, प्रांत आधी बघणार.

सर्व जनतेने मनापासुन मानवतावाद जोपासला, त्या बद्दल आदर प्रेम दाखवले तर मग राज ठाकरे मनसे बाजुला करुन मानवतावादा साठी स्वातंत्र पक्ष स्थापन करतील. कुठली विचारधारा स्विकारली तर लोक कमी श्रमात आपल्या बाजुला आकर्षिले जातील हा अंदाज... हाच अंदाज धरुन तस्लीमा नसरिन बद्दल फतवा निघतो किंवा गोध्रा पुढील घटना घडतात घडवल्या जातात.

तुम्ही लिहिलेला लेख स्प्रुहणिय अन विचारप्रवर्तक आहे.
यावर आणखी मनन करून अभिप्राय देइन.
एका वेगळ्या विचार मंथनाचा श्री गणेशा केल्याबद्दल अभिनंदन
Happy
जियो!!

आज ''सेन्सिबल आणि रॅशनल'' लोक नक्षलवाद्यांशी संवाद साधून, त्यांचा योग्य विकास व त्यांना शिक्षण देऊन तेथील प्रश्न सुटू शकतो, तेथील परिस्थिती बदलू शकते हे वारंवार सांगत आहेत. सरकार देतंय का त्याकडे लक्ष? उलट त्यांचा आवाज दाबायचा प्रयत्न चालू आहे.

काश्मिरातही तीच परिस्थिती आहे.

नागालँड, आंध्र (तेलंगणा), उत्तर-पूर्व भारत, पश्चिम बंगाल..... ह्या सर्व राज्यांमध्येच नव्हे, तर बहुतेक राज्यांमध्ये सर्वसामान्य जनता काही न् काही कारणावरून अशांत आहे. कधी तेथील विकासाचा उडालेला बोजवारा असो, कधी भ्रष्टाचार असो, कधी वांशिक अन्याय असो की अजून कोणते कारण असो.... मनातल्या खदखदणार्‍या रागाला वाट करून द्यायला त्यांना एखादी ठिणगीच पुरेशी असते. राजकीय पक्ष व पक्षनेते ह्या ठिणग्यांना आपापल्या स्वार्थासाठी फुलवायचे, त्यांचा ज्वालामुखी करण्याचे काम प्रामाणिकपणे करत असतात. आणि त्यांना फशी पडणारी माणसेच बहुसंख्य आढळतील. आपला बळीचा बकरा केला जातोय, आपल्या पाठीवरून बंदूक रोखून कोणी आपला गैरफायदा घेत आहे हे कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशा सर्वसामान्यांना जर फक्त लाठीचीच भाषा कळणार असेल, हाणामारीचीच भाषा कळणार असेल तर मग राष्ट्रीय राजवटच का लागू करू नये?

स्वातंत्र्य उपभोगायची, एका स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक म्हणून आपली कर्तव्ये व जबाबदार्‍या पार पाडायचीही योग्यता अंगी बाणवावी लागते. आणि खेदाने म्हणावेसे वाटते की, समानतेच्या गोष्टी अजूनही विचारात, पुस्तकातच आढळतात. वास्तवात त्याचे प्रतिबिंब दिसते, पण फार अंधुक. अजून येथील समाज स्त्रीला दुय्यम दर्जा देताना दिसतो. भारतात विविध धर्म असले तरी त्या प्रत्येक धर्मातही जातीयता, भेदाभेद पाळले जातात. गरीब -श्रीमंत ही दरी तर दिसतेच दिसते.

....पण आज हेच दृश्य जगातील अनेक देशांमध्येही दिसते, किंबहुना अधिक वाईट स्वरूपात, हेही विसरून चालणार नाही. वंशभेद, वर्णभेद, स्त्री-पुरुष असमानता, गरीबी-श्रीमंती यासारखी परिस्थिती व धगधगता असंतोष आंतरराष्ट्रीय बातम्यांत रोजच आढळतो.

भारताची अवाढव्य लोकसंख्या व मर्यादित नैसर्गिक स्रोत (जमीन, पाणी, अन्न इ. इ.), शिवाय शेजारील देशांमधून होणारी बेकायदेशीर घुसखोरी यांमुळे जर लोकसंख्येचा वेग असाच राहिला तर भविष्यात स्थिती अजूनच बिकट आहे. पण ह्या लोकसंख्येवर राष्ट्रीय पातळीवर काही ठोस धोरण, उपाय केलाय कोणी नजीकच्या काळात? म्हणजे मला तरी तो ''सेन्सिबल आणि रॅशनल'' पैकी एक उपाय वाटतो!

लोकांचा भांडाभांडीचा, स्वार्थी वृत्तीचा कल लक्षात घेता भारतात स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनंतरही एवढ्या भाषा, उपभाषा, धर्म, प्रांत अद्याप टिकून आहेत हेच मोठ्ठे आश्चर्य आहे असे मला वाटते. जगाच्या पाठीवर इतर कोठे असते तर तसे ते एवढी वर्षे टिकू शकले असते का, हाही विचार करण्याचा भाग आहे.

उदय
पण देशा पर्यंतच का थांबलात... थोडे पुढे जाऊन देश, धर्म, प्रांत, भाषा, जात ह्या पेक्षाही मोठा मानवता धर्म का नको आपल्या नजरे समोर ठेवायला?

तुमचे बरोबर आहे. मानवता धर्मच नजरे समोर ठेवायला पाहिजे. पण धर्म, प्रांत, भाषा, जात यापेक्षा देश मोठा हे सांगीतले तर लोकांना जरा तरी समजते. मानवता धर्म म्हटले तर अव्यावहारिक समजले जाते.

झक्की
"गाढवापुढे वाचली गीता" हेहि माहित असेल. जिथे sensible आणी rational नसणार्‍यांचे प्रमाण कमालीच्या बाहेर, अफाट जास्त आहे, तिथे असे sensible आणी rational लोक असतील हे बर्‍याच जाणांना कळणार कसे? अगदी सांगून सुद्धा!!

कोणीहि गाढव नसते. लोकांना विचार करायला लावला कि लोक sensible आणी rational बनायला लागतातच. स्वतंत्र विचार न करणे हा एकमेव प्रश्न आहे

लोकांचा भांडाभांडीचा, स्वार्थी वृत्तीचा कल लक्षात घेता भारतात स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनंतरही एवढ्या भाषा, उपभाषा, धर्म, प्रांत अद्याप टिकून आहेत हेच मोठ्ठे आश्चर्य आहे असे मला वाटते. जगाच्या पाठीवर इतर कोठे असते तर तसे ते एवढी वर्षे टिकू शकले असते का, हाही विचार करण्याचा भाग आहे.

तुमचा प्रश्न हेच त्याचे उत्तर आहे. भारतात खुप जास्त कळ्प आहेत - सर्व प्रकारचे - धार्मिक, प्रांतिक, जातिय, भाषीय. आणी हे कळ्प floating आहेत. उदा. ब्राह्मण विरुद्ध मराठी डोके फोड्णारे नंतर एकत्र येउन मुसलमानांची डोकि फोडतात. बिहारिंविरुद्ध बोलताना राज गुज्रराथींना आपले म्हणतात, तेलंगणासाठी आपापसात मारामरि करणारे धरणाच्या राजकारणासाठी महाराष्ट्राविरुद्ध लगेच एकत्र येतात.
कळ्प सोयीनुसार बदलले जातात. एक किंवा दोनच प्रभावशाली गट असते तर कधीच विभाजन झाले असते. पण तसे नाहिये. त्यामुळे भारताचे विभाजन होणे शक्य नाहि. आणी याला दुर्देव म्हणावे सुदैव हा पश्न आहे. कारण ह्याचा अर्थ एकच आहे - कि हा कळ्प प्रकार तसाच चालु राहिल, अजुन कळ्प बनतील, अजुन मार्यामार्या होतील,स्थानीक दहशतवाद वाढेल पण हे थांबवायचा उपायच नसेल.

आपल्याला कशाचा नक्की राग येतो ? प्रत्यक्ष क्रुतिचा कि क्रुतिमागच्या अन्यायाचा ? अतिशय व्यापक आणि योग्य प्रश्न आहे.
एकतर्फी विचार करणार्‍यांना हे प्रश्न पडत नाहीत. पडले तरी ते दुर्लक्ष करतात. आपला तो बाळ्या दुसर्‍याचं ते कार्टं अशाप्रकारे संकुचित पद्धतीने विचार करुन आपापले कंपु बनवतात. हे सर्व थांबायला हवं आणि सर्वांनीच अंतर्मुख व्हायला हवं.

तुमचा प्रश्न हेच त्याचे उत्तर आहे. भारतात खुप जास्त कळ्प आहेत - सर्व प्रकारचे - धार्मिक, प्रांतिक, जातिय, भाषीय. आणी हे कळ्प floating आहेत. उदा. ब्राह्मण विरुद्ध मराठी डोके फोड्णारे नंतर एकत्र येउन मुसलमानांची डोकि फोडतात. बिहारिंविरुद्ध बोलताना राज गुज्रराथींना आपले म्हणतात, तेलंगणासाठी आपापसात मारामरि करणारे धरणाच्या राजकारणासाठी महाराष्ट्राविरुद्ध लगेच एकत्र येतात.
कळ्प सोयीनुसार बदलले जातात. एक किंवा दोनच प्रभावशाली गट असते तर कधीच विभाजन झाले असते. पण तसे नाहिये. त्यामुळे भारताचे विभाजन होणे शक्य नाहि. आणी याला दुर्देव म्हणावे सुदैव हा पश्न आहे. कारण ह्याचा अर्थ एकच आहे - कि हा कळ्प प्रकार तसाच चालु राहिल, अजुन कळ्प बनतील, अजुन मार्यामार्या होतील,स्थानीक दहशतवाद वाढेल पण हे थांबवायचा उपायच नसेल.

ह्म्म्म.... बहुतेक बरोबर असावे.

" आज ''सेन्सिबल आणि रॅशनल'' लोक नक्षलवाद्यांशी संवाद साधून, त्यांचा योग्य विकास व त्यांना शिक्षण देऊन तेथील प्रश्न सुटू शकतो, तेथील परिस्थिती बदलू शकते हे वारंवार सांगत आहेत. सरकार देतंय का त्याकडे लक्ष? उलट त्यांचा आवाज दाबायचा प्रयत्न चालू आहे. "

हे ''सेन्सिबल आणि रॅशनल'' कुणी भारताबाहेरील लोक आहेत का? कारण गणू म्हणतात भारतात आज तसे लोक नाहीत. मी सांगण्याचा प्रयत्न केला की, आहेत हो! पण त्यांना ते पटलेले दिसत नाही.

वारंवार सांगूनहि सरकार दुर्लक्ष का करतात? या प्रकारालाच "गाढवापुढे वाचली... " असे म्हणतात. पण गणू म्हणतात, कुणिहि गाढव नसतो. मग कदाचित् "लोकांना विचार करायला लावला कि लोक sensible आणी rational बनायला लागतातच. स्वतंत्र विचार न करणे हा एकमेव प्रश्न आहे" या गणूंच्या विधानाप्रमाणे त्यांना विचार करायला लावला पाहिजे.

पण त्यांनी गणूंना पाहिजे, किंवा तुम्हाला जे अपेक्षित आहे, त्या ऐवजी काही वेगळाच स्वतंत्र विचार केला तर ते sensible आणी rational ठरतील का? की फक्त गणू म्हणतात तसा विचार केला तरच?

आणि गणू म्हणतात, "अहो sensible आणी rational असणे म्हणजेच स्वताच्या विचारांबद्द्ल ठाम असणे, त्या बद्द्ल कसलीहि शंका नसणे."
या न्यायाने सरकार आत्ताच sensible आणी rational असेल तर? शिवाय ते त्यांच्या मताप्रमाणे कृति पण करत आहेत! पण ती कृति तुम्हाला पसंत नाही असे दिसते, म्हणून ते sensible आणी rational नाहीत, असे का?

मला वाटते, सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे भरपूर पैसे देऊन गणूंना भारताचे डिक्टेटर बनवावे, चीनमधे असतात तसे. मग ते सगळ्यांना सांगतील की "स्वतंत्र विचार करा," की लग्गेच सगळे sensible आणी rational बनतील.

मग तसे झाल्यावर पुढे करायचे काय हो? काही विचार आहेत का?

"त्यामुळे भारताचे विभाजन होणे शक्य नाहि. आणी याला दुर्देव म्हणावे सुदैव हा पश्न आहे"

हा प्रश्न सोडवून त्यावर काही कृति करावी का?

सध्या तरी, माझ्या मते भारताचे विभाजन झाले नाही हे सुदैव आहे. पण तो माझा स्वतंत्र विचार आहे. मी स्वतंत्र विचार केला तर आणि त्यावर ठाम राहिलो तर मी संकुचित होतो, sensible आणी rational होत नाही. मला गणूंचे मत जाणून घ्यायची इच्छा आहे.

फक्त वांदा असा की, मी माझ्याच मतावर ठाम राहिलो तर संकुचित होतो, पण माझे मत सोडून गणूंचे ऐकले तर माझ्या मतावर ठाम नाही म्हणून sensible आणी rational ठरत नाही! आता काय करावे?

ज्याप्रमाणे फळाचा त्याग केल्यावर कर्मदोष होत नाही, तसे गणूंसारखा विचार केला की संकुचितपणाचा दोष लागत नाही. एकदम sensible आणी rational बनतो. अर्थात तसे बनल्यावर पुढे काय करायचे हा प्रश्न उरतोच. म्हणजे आपण सगळे sensible आणी rational झालो की एकदम सगळे प्रश्न, काही न करता, सुटतील का? का परत काहीतरी करावेच लागेल? काय करावे लागेल?

गणू, लिहा, लिहा. तुम्ही विचार करायला लावला आहे. आम्हाला लवकर sensible आणी rational व्हायचे आहे.

झक्की Happy

गणू,
तुम्ही लिहिलेले कितीही गोड-गोड, छान-छान वाटत असले तरी काही विशेष पटले नाही. हे सगळे तात्विक विवेचन आहे. तेही विचार न करता लिहिले आहे असे वाटते.

एकीकडे रॅशनल (सयुक्तिक) लोक नाहीत असं म्हणता आणि लोक गाढव नसतात असंही म्हणता! विचार करायला शिकवावे लागेल असे म्हणता! म्हणजे अध्यात्मात जसे एक कुठलेतरी अ‍ॅब्सोल्युट सत्य आहे असे मानतात, तसे तुम्ही एक कुठल्यातरी प्रकारेच विचार करणे म्हणजे सेन्सिबल असणे असं म्हणताहात!

<<आपल्याला कशाचा नक्की राग येतो ? प्रत्यक्ष क्रुतिचा कि क्रुतिमागच्या अन्यायाचा ?
>>
कृती आणि कृतीमागचा अन्याय ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीच आहेत मुळी. 'अन्याय' नावाच्या गोष्टीला काही स्वतंत्र अस्तित्व नाही. कुठलीतरी कृती हीच अन्याय होते. त्यामुळे वरचा प्रश्न अगदी भारी विचार वाटत असला तरी त्या प्रश्नाला काहीही अर्थ नाहीये.

<<
काहि हिदुंच्या मते एम एफ हुसेन वरचा हल्ला योग्य असतो, पण तस्लिमा वरचा हल्ला निंदनीय असतो.काहि मुस्लिमांच्या वते तस्लिमा वरचा हल्ला योग्य.... ... .. पण १९८४ च्या पुस्तकावरिल बंदि अयोग्य असते.
>>
अर्थातच. ज्या व्यक्तिचा ज्याच्याशी संबंध येतो त्याच्यावर तो टीप्पणी करणार. प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीवर कसं मत व्यक्त करणार? प्रत्येकाची प्रॉब्लेमकडे बघण्याची एक चौकट असते आणि ज्याला जी बाजू योग्य वाटते त्यानुसार तो कृती/विरोध करणार. तुम्ही तरी 'बिहारी', 'आसामी', 'भारतीय' ह्या विषयांवर का थांबलात? इथे भारतीय विषयांवर बोलले की तुम्ही पुढे जाऊन म्हणाल की मग अमेरिका - इराक अन्याय, आफ्रिकेतला वंशभेद, ह्याच्यावर लोक का मतं व्यक्त करत नाहीत? त्यामुळे ज्याला जे योग्य आणि जवळचे वाटते त्याच्यावर प्रत्येकजण मत व्यक्त/कृती/विरोध करणार. आणि इतर लोकांची विरोधी मते ऐकल्याशिवाय आपले मत सेन्सिबल आहे हे प्रत्येकजण ठरवू कसं शकणार?

<<
हिंदु असो वा मुसलमान वा शिख वा ब्राह्म्ण वा तामिळ आणी तो निषेध हिदु म्हणुन, शिख म्हणुन, दलित म्हणुन, नवबौद्ध म्हणुन न करता फक्त अन्यायाचा निषेध म्हणुन करण्याइतकी प्रगल्भता हवी.
>>
म्हणजे काय? उगीच काहीतरी लिहायचे! आता एखादा मनुष्य हिंदू असल्यामुळे त्याच्यावर अन्याय होत आहे असे त्याला वाटत असेल, तर तो हिंदू म्हणूनच निषेध करणार! अजून कसा निषेध करणार??

तुमच्या लेखातल्या बर्‍याचशा वाक्यांवर आक्षेप घेऊन लिहिता येईल खरंतर. हे असलं तात्विक विवेचन करण्यापेक्षा अरुंधती ह्यांनी लिहिलेल्या प्रश्नांवर काय करता येईल असे तुम्हाला सेन्सिबल विचार करुन वाटते, ते लिहा.

झक्की केवळ वादासाठी वाद घालायचाच असेल, शब्दांशी खेळायचे असेल तर त्यात खुप गंमत आहे. आणी तुम्हाला खुप मजा येतेय त्यात असे दिसते आहे . असो.

ज्याप्रमाणे फळाचा त्याग केल्यावर कर्मदोष होत नाही, तसे गणूंसारखा विचार केला की संकुचितपणाचा दोष लागत नाही. एकदम sensible आणी rational बनतो

झक्की तुम्हाला मुळ फरक कळतच नाहि. मी कोणताच विचार मांडला नाहिये. मी कोणतीच बाजु घेतली नाहिये. मी फक्त विचार करायला सांगतो आहे. reasoning करायला सांगतो आहे. कोणाच्याही मागे आधळ्यासारखे जाउ नये असे आवाहन करत आहे. स्वतंत्र विचार करायला सांगतो आहे. असो. कळत असेल तरि न कळवुन घेण्याची व्रुत्ती सोडुन द्यायला सांगतो आहे.

मला वाटते, सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे भरपूर पैसे देऊन गणूंना भारताचे डिक्टेटर बनवावे
चांगले आहे. तुम्हि सुरवात करता का ? जास्त नकोत - तुमच्याकडुन २५-३० लाख बास झाले. वाट पहातो चेकची.

मला फचिन ह्यांचे पोस्ट आवडले. त्यात विचारांची सरमिसळ नाही . विचारात स्पष्टपणा हवा जो गणू. ह्यांच्या पोस्टमध्ये तरी दिसत नाही. आणि विचारात स्पष्टपणा कदाचित रॅशनल माणूसच ठेवू शकतो.

गणू. ह्यांचे पोस्ट निव्वळ शब्दबंबाळ वाटत आहे. कुठेतरी आलेली चिड ते व्यक्त करत आहेत, पण सेन्सिबल, रॅशनल ह्या शब्दात घोळ झालेला आहे. हे म्हणजे मागेत्या हिंदुत्वावर धर्म सोडून द्या टाईप विवेचन झाले आहे. धर्म, जात कोणी सोडत नाही ना? मग त्या चौकटी मान्य करुन पुढे काय करायचे पाहावे, पण चौकटच मान्य नाही असे म्हणून एकटा लढू शकाल, पण निराशाच हाती येईल. चौकटीत राहून बदल केले तर कदाचित बदल शक्य आहे.

कृती आणि कृतीमागचा अन्याय ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीच आहेत मुळी. 'अन्याय' नावाच्या गोष्टीला काही स्वतंत्र अस्तित्व नाही. कुठलीतरी कृती हीच अन्याय होते. त्यामुळे वरचा प्रश्न अगदी भारी विचार वाटत असला तरी त्या प्रश्नाला काहीही अर्थ नाहीये.

फचिनबाबा, जो पर्यंत कुठल्याही कंपुच्या द्रुष्टिकोनातुन विचार करता तोपर्यत जरिहि क्रुती तिच असेल तरी ती काहि वेळेला अन्याय्य वाटते तर काहि वेळेला न्याय्य. कुठलीतरी कृती हीच अन्याय होते तेव्हाच जेव्हा कंपुपासुन बाजुला व्हाल.

अर्थात कंपुपासुन बाजुला झालात तरच हे लक्षात येइल.

प्रत्येकाची प्रॉब्लेमकडे बघण्याची एक चौकट असते आणि ज्याला जी बाजू योग्य वाटते त्यानुसार तो कृती/विरोध करणार

ज्याला जी बाजू योग्य वाटते त्यानुसार तो कृती/विरोध करतोच. यात नवीन काय सांगीतले ? म्हणुनच तर सगळे घोळ चालु आहेत.

आता गम्मत पहा तुमचीच - तुम्हाला हे मान्य आहे "ज्याला जी बाजू योग्य वाटते त्यानुसार तो कृती/विरोध करतोच" जो पर्यंत तुम्हि ती क्रुती करताय , पण उद्या दुसर्या कंपुच्या लोकांनी तिच क्रुती केली - जी त्याच्या बाजुप्रमाणे योग्य आहे - तर मात्र ती तुमच्या मते अन्याय ठरते. आले का लक्षात फचिनबाबा ? मला अपेक्षा नाहिच तरिहि विचारतोय!

तुम्ही तरी 'बिहारी', 'आसामी', 'भारतीय' ह्या विषयांवर का थांबलात? इथे भारतीय विषयांवर बोलले की तुम्ही पुढे जाऊन म्हणाल की मग अमेरिका - इराक अन्याय, आफ्रिकेतला वंशभेद, ह्याच्यावर लोक का मतं व्यक्त करत नाहीत?
अहो बाबा, उदाहरण म्हनुन दिली आहेत. ती देताना मिक्स करायचा प्रयत्न केला - मंदार साहेबासारखा कंपुतला अस्तो तर फक्त हिंदुवरिल अत्याचाराबद्दलच लिहिले असते. जगातले सर्व अन्याय देण्याएवजी विकेपिडियाची लिक देतो हवी आहे का सांगा.

<चौकटीत राहून बदल केले तर कदाचित बदल शक्य आहे.> देशी, हे मला तरी बरोबर वाटते.
पण तो शहाणपणा झाला. त्याला इथे लोक sensible आणी rational म्हणतील का?

चौकटीत रहाणे म्हणजेच 'कंपूत' रहाणे. नि ते पण चांगले नाही असे काहींना वाटते. ती 'स्वतंत्र बुद्धी' नव्हे. शिवाय, त्यात काहीच गंमत नाही.
राडा, जाळपोळ, तोडमोड अशी 'नुसती प्रतिक्रिया' व्यक्त केली की लै धमाल! मग लोकांना आपले नाव कळते. आपण 'स्वतंत्र बुद्धीचे' आहोत असे चार लोक म्हणतात. मग निवडून यायचे नि मग काय, लै पैका! लिंक देऊ का विकी वरची, किती लोकांनी असेच केले आहे त्याची?
हेच आजकालच्या जगात खरे.

Proud Proud Proud

sensible आणी rational "झक्की तुम्हाला मुळ फरक कळतच नाहि. मी कोणताच विचार मांडला नाहिये. मी कोणतीच बाजु घेतली नाहिये. मी फक्त विचार करायला सांगतो आहे. reasoning करायला सांगतो आहे. कोणाच्याही मागे आधळ्यासारखे जाउ नये असे आवाहन करत आहे. स्वतंत्र विचार करायला सांगतो आहे. असो. कळत असेल तरि कळवुनच घेण्याची व्रुत्ती सोडुन द्यायला सांगतो आहे."

आता कळले. इथे कुठलाहि विचार नाही, काय करावे याचीहि चर्चा नाही. नुसतेच शब्द आहेत. पण या 'शब्दांशी खेळायचे ' नाही.

बरं. आता नाही खेळणार!

"तुम्हि सुरवात करता का ? जास्त नकोत - तुमच्याकडुन २५-३० लाख बास झाले. वाट पहातो चेकची."

नाही, नाही. मी काही करणार नाही हो. लोकांनी तसे करावे.
मी कोणताच विचार मांडला नाहिये. मी कोणतीच बाजु घेतली नाहिये. मी पण तुमच्याशी १०० टक्के सहमत होऊन्, फक्त विचार करायला सांगतो आहे. reasoning करायला सांगतो आहे.

"नक्षलवाद्यांशी संवाद साधून, त्यांचा योग्य विकास व त्यांना शिक्षण देऊन तेथील प्रश्न सुटू शकतो, तेथील परिस्थिती बदलू शकते ". असेहि कुणि सुचवले आहे.
पण तिथे गेल्यावर ते लोक तुमच्या जिवावर उठतात, म्हणून आपण जायचे नाही, 'लोकांनी 'जायचे. आपण फक्त विचार करायला नि reasoning करायला सांगायचे.
आपण जिवंत राहिलो तरच मंत्री वगैरे होऊ शकतो. तिथे जाऊन संवाद साधायचा प्रयत्न केला नि त्यांनी आपल्याला मारून टाकले तर आपण फक्त विचार करायला नि reasoning करायला सांगायचे कसे?
सांगायला आपण, करायला लोक अशी कामाची विभागणी करावी.

पण तिथे गेल्यावर ते लोक तुमच्या जिवावर उठतात, म्हणून आपण जायचे नाही, 'लोकांनी 'जायचे. आपण फक्त विचार करायला नि reasoning करायला सांगायचे.

झक्की अहो मग तुम्हि काय करताय. इथे ?

नाही, नाही. मी काही करणार नाही हो. लोकांनी तसे करावे.
सांगायला आपण, करायला लोक अशी कामाची विभागणी करावी.

कसे बरोबर ओळ्खले तुम्हि! आता देउनच टाका ते २५-३० लाख मला!

"नक्षलवाद्यांशी संवाद साधून, त्यांचा योग्य विकास व त्यांना शिक्षण देऊन तेथील प्रश्न सुटू शकतो, तेथील परिस्थिती बदलू शकते ". असेहि कुणि सुचवले आहे.

अहो पण तुम्हि काय सुचवता ते तरी कळु दे. का नुसतेच इतरांचे बोलणे खोडणार ?

"आता गम्मत पहा तुमचीच - तुम्हाला हे मान्य आहे "ज्याला जी बाजू योग्य वाटते त्यानुसार तो कृती/विरोध करतोच" जो पर्यंत तुम्हि ती क्रुती करताय , पण उद्या दुसर्या कंपुच्या लोकांनी तिच क्रुती केली - जी त्याच्या बाजुप्रमाणे योग्य आहे - तर मात्र ती तुमच्या मते अन्याय ठरते. आले का लक्षात फचिनबाबा ? मला अपेक्षा नाहिच तरिहि विचारतोय"

फचिन, तुमच्या लक्षात आले नसेल म्हणून मी स्पष्ट करून सांगतो - उद्या कुणि उगाचच तुमच्या घरात घुसून तुमच्या भावंडांना मारले तरी तुम्ही अन्याय झाला असे ओरडायचे नाही. कारण तुम्ही तुमचे कुटुंब या कंपूत आहात. कंपू बाहेर आल्यावर, तुम्ही विकी वरची लिंक वाचली, की तुम्हाला कळेल की त्या कुणि तुम्हाला मारले ते त्यांना योग्यच वाटले असेल, म्हणून त्यांना तुमच्यावर अन्याय केल्याचा दोष लागणार नाही!

तर या सर्वात तुम्ही काही तक्रार करायची नाही. मी मात्र बाजूला उभा राहून, गंमत बघता बघता, विकीवरची लिंक बघून मग, फक्त विचार करीन. कुणाची बाजू घेणार नाही. म्हणजे मग घोळ होणार नाहीत.

असे आहे ते. Proud Proud

एकंदरीतच लोक कंपूबाज. पहिला कंपू आपले शरीर, आपले मन. मग आपल्या रक्ताच्या नात्यातली माणसे, मग आपल्या धर्माची, आपल्या देशातली, आपल्या जगातली, फक्त मानव असलेली, मग सर्व चेतन प्राणी, मग सर्व चेतन व अचेतन अशी आपली कंपूची व्याप्ति वाढतच जाते. सर्वं कंपूमयं जगत्! मग कंपूतून बाहेर पडायचे तरी कसे? का जगात कुठेच कुणाचेच काही चुकत नाही असे समजायचे? जे होते ते बरोबर आहे असे समजायचे का? म्हणजे मग विचार कशाला करायचा? reasoning कशासाठी करायचे?

हे हि नाहि, ते हि नाहि, ते तर नाहिच नाहि, हे पण नाहिच नाहि.

मी बघा कसा भारी! सगळ्याचे बोलणे खोडतो. माझी पोस्ट शेवटची. हे म्हणजे असे झाले कि आपण तर आहात गटारातच चिखल खात बसलेले पण दुसरा म्हणाला गटार साफ करु तर पोपटपंची करत म्हणयचे की 'कसला पोपटपंची करतो बघा!' Proud Proud Proud

अहो भारतीय होणे फार पुढची गोष्ट आहे..आपल्याला अजुन साधे माणुस होउन दुसर्‍याला आदराने वागवणे जमत नाही. इथे येउन जबरी पोस्ट आहे वगैरे लिहिणारे या मायबोलीवर स्वत: "फूट पाडणार्‍या आणि चिथावणार्‍या" पोस्ट्स टाकतात आणि इथे येउन उदात्ततेचा आव आणतात. मायबोलीवर साधे एक मायबोलीकर होणे जमत नाही भारतीय कसले डोंबलाचे होणार? आपण आपली फूटीच्या घाणीने बरबटलेली मने साफ करुया मग पहा आपण भारतीय होत जातो की नाही.

गणू,
मी निरुद्योगी असल्याने जाणून बुजून तुमच्या बोलण्याचा उपहास नि कुचेष्टा करतो आहे. त्यातून मुद्दामून चुकीचे अर्थ काढून तुमची खेचतो आहे, नि तुम्ही खेचल्या जात आहात! फारच सोपा कारभार. तुम्हाला धन्यवाद.

रस्त्यावरच्या वेड्याला जसा कुणिही पोराने येऊन दगड मारावा, तसे मी तुम्हाला दगड मारतो आहे. नि तुम्ही पण त्या वेड्यासारखे वेडेवाकडे बोलू लागला आहात!

पण एकंदरीत तुमचे म्हणणे अजून पुष्कळांना पटले नाही. तर जरा जास्त विचार करून व्यवस्थित लिहा, नि मग बघा लोकांना पटते का. माझ्या नादी लागू नका, नाहीतर हा धागा बंद होईल.

पण आता मी या चिखलातून बाहेर पडतो आहे. तुम्हाला वाटले तर तुम्ही तिथेच बसा, साफ करा, काही करा!
इतके दिवस करमणूक केल्याबद्दल धन्यवाद.

जरा काम संपले नि पुनः वेळ मिळाला तर पुनः येईनच! करमणूक हवीच.

''सेन्सिबल आणि रॅशनल'' वागण्यासाठी प्रत्येक भारतीय माणसाला आता ट्रेनिंगच घ्यावे लागणार बहुतेक!

माझ्या मते तसे वागण्यासाठी उजवा व डावा मेंदू संतुलित रीतीने वापरावा लागेल. मात्र त्यासाठी पोषक परिस्थितीही निर्माण व्हायला हवी. शिवाय जिथे लोकांना उपासमारी, कुपोषण, बेघर असणे, रोगराई - दुर्घटना - नैसर्गिक आपत्ती यांसारख्या भेडसावणार्‍या समस्या असतात तिथे त्यांना काय सांगणार, सेन्सिबल आणि रॅशनल वागा म्हणून!!! ते म्हणतील आधी आम्हाला छत द्या, दोन वेळचे पुरेसे अन्न द्या, आमच्या मुलाबाळांचे भवितव्य सुरक्षित करा, आमचे नुकसान भरून काढा..... कसे करणार त्यांना सेन्सिबल आणि रॅशनल? आणि त्यांना ह्या गोष्टी मिळाल्या नाहीत तर त्यांचा संताप कोणत्याही निमित्ताने भडकणार..... मग पोटाची खळगी भरायला, पाच-पन्नास रुपयांसाठी ते भाडोत्री गुंड बनणार.... जाळपोळ करणारे, दगडफेक करणारे बनणार!! बरं, त्यांच्या रोजीरोटीची सोय केली तरी जाणार आहे का त्यांचा संताप? उपेक्षेचे, आपला गैरफायदा घेतला गेल्याचे, आपल्याला लुटल्याचे दु:ख कोणत्या न कोणत्या उद्रेकासरशी बाहेर पडत राहणार!! या लोकांना कसं काय सेन्सिबल आणि रॅशनल विचार करायला लावणार? शिवाय त्यांचा गैरफायदा घेत, त्यांना भडकावत आपला स्वार्थ साधणारे राजकारणी मतलबी पोत्याने पडलेले असताना हे शक्य आहे का?

>>शिवाय त्यांचा गैरफायदा घेत, त्यांना भडकावत आपला स्वार्थ साधणारे राजकारणी मतलबी पोत्याने पडलेले असताना हे शक्य आहे का
नेमका प्रश्ण आहे. पण फक्त भारतात नाही तर ईतरही अगदी विकसनशील वा विकसीत देशात अन्न वस्त्र निवारा सुरक्षा ई. चे प्रश्ण सरसक्त सुटलेले आहेत असे नाही. पण त्या विकसनशील वा विकसीत राष्ट्रांमध्ये परिस्थिती ईतकी बिकट नसेल याचे कारण कायद्याची अंमलबजावणी.
अगदी सोपे ऊ.दा. घ्याय्चे तर गाडी चालवताना "लेन ची शिस्त पाळा" हा साधा नियम आपल्याकडे प्रत्त्येक सेकंदाला गाडीखाली तुडवला जातो. (अर्थात दोन लेन आणि २०० गाड्या ही वस्तुस्थिती आहे)हेच आपलेच लोकं जेव्हा ईतर "कायद्याची कडक अंमलबजावणी" करणार्‍या देशात गाडी चालवतात तेव्हा नियाम काटेकोरपणे पाळतात- कारण एकच कायद्याची भिती!

तेव्हा गंमत वाटेल पण जे प्रश्ण सामान्य ज्ञान, अन नागरी प्रशिक्षण देवून सुटत नाही ते निव्वळ कायद्याच्या धाकाने सुटू शकतात. आता भारतात कायद्याच्या अंमलबजावणी बद्दल बोलणे म्हणजे चंद्रावर माझी मेणबत्ती पेटत नाही म्हणून आटापिटा करण्यासारखे आहे.

"अजूनही" घोंगडे भिजत पडलेल्या आयोध्येच्या रामजन्मभूमी जमिनीवरील "मालकी हक्काच्या" वादावरील कोर्टाचा निकाल यायचाय.. तो यायच्या आधी अन तो आल्या नंतरही एक भारतीय नागरीक म्हणून आपण किती रॅशनलपणे वागू शकतो याचा पुरावा मिळेलच (आपण वागू शकत नाही याचा पुरावा १९९२ लाच मिळाला). अर्थात या एकाच विषयावर ईथे वेगळा बा.फ. काढता येईल पण मुद्दा तोच असेल "हरवलेला भारतीय".

वर कुणितरी राजकीय ईच्छाशक्ती वगैरे लिहीले आहे. सध्ध्या राजकीय आर्थिक शक्ती "सार्वजनिक मालमत्तेचा खेळ" (cwg) यात खर्च होत आहे, राजकीय बुध्धी माओवाद, नक्षलवाद ई. वाद प्रकरणात खर्च होत आहे, अन ऊरलेली जी काही राजकीय शक्ती आहे ती आपापसात मारमारी करण्यात व्यस्त आहे.

तात्पर्यः आपण सारे भारतीय (पासपोर्ट भारतीय आहे हा एक सर्वसमान निकष!) ईथे एकमेकावर कुरघोडी करण्यात धन्यता मानुया अन मग ऊद्या आणखिन काही नविन वाद झाले की अरेरे तर्कबुध्धी अन भारतीयत्व लयाला गेले अशी खंत व्यक्त करुया. थोडक्यात आपण आहोत तिथेच आहोत, तिथेच राहू.

मला वाटत भारत हा इतका कमकुवत देश नाही. काही तात्कालिक प्रश्न असतात ज्यात एखादा प्रांत किंवा संपुर्ण देश काही काळ ढवळला जातो. ही एक रिअ‍ॅक्शन असते.

हिंदुत्ववादी पक्ष दिल्लीत सत्तेवर येईल हे म्हणणे १८८४ साली हास्यास्पद होते. शहाबानो च्या प्रकरणातली तत्कालिन सरकारची कोलांडी उडी असो की मुफ्ती महंमद सैद यांनी केलेली तडजोड असो बहुतांच्या नजरेतुन सुटली नाही म्हणुन बरोब्बर १२ वर्षांनी सत्तांतर झालेल दिसल.

काही काळ भारतीय समाज कोणाच्या कोणाच्या भजनी लागतो पण सत्य समजल्यानंतर त्यांच्याकडे पहात सुध्दा नाही.

भारतीयत्व हे १९५० साली निर्माण झालेल्या घटनेने निर्माण झालेले नाही. ती एक अनेक वर्षांची सामाजिक परंपरा आहे.

बद्रीकेदारा पासुन कन्याकुमारी पर्यत आणि सोमनाथापासुन अतिपुर्वेकडील परंपरांचा तो संगम आहे.हा संगम सर्वसमावेशक आहे. एकमेव भारत हा असा देश आहे ज्याला उपमा नाही.

Pages