Submitted by संयोजक on 8 September, 2010 - 20:48
देवा तुझा ॐकार (भजन)
गीत, संगीत : योग
गायक : योग
देवा तुझा ॐकार होवूदे साधन होवूदे साधन
देहाशी ऊरे काजळी आत्मा निरंजन ||
संसार डोह भरीला मिटे ना तरंग
दान द्यावे देवा आता निर्गुणाचा संग ||
दाटे काळोख दिशांनी दिसे नाही वाट
सिद्ध द्यावी देवा आता अंतरी पहाट ||
पाप पुण्य दैव काही नुरावे गहाण
ऊद्धार करावा देवा रचावे निर्वाण ||
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान
खूप छान
खूप छान रे........!! अगदी
खूप छान रे........!!
अगदी मनापासून गायला आहेस !!!!
अगदी जयवीजींशी सहमत.
अगदी जयवीजींशी सहमत.
धन्यवाद! अल्बम मधिल हे शेवटचे
धन्यवाद!
अल्बम मधिल हे शेवटचे गीत- भैरवी आहे.
खरं सांगायचं तर या गीतातून जे व्यक्त करायचे आहे (संकल्पना) आणि सूर्/चाल या गोष्टी आधीच डोक्यात होत्या. नेमके शब्द स्फुरायला मात्र वेळ लागला. शक्यतो गणपती हा रिध्धी, सिद्धी, बुध्धी अन मांगल्याचा, विघ्नहर्ता देव आहे तेव्हा या संबंधित गोष्टी आपण त्याच्याकडे मागतो असा संकेत आहे.
पण आपल्या संस्क्रूतीत मोक्ष अन ॐकार साधना या दोन गोष्टी महत्वाच्या समजल्या जातात. या भैरवीतून नेमके तेच मागणे आहे- निर्वाण्/मोक्षप्राप्ती हे साध्य अन त्यासाठी ॐकार हे साधन. म्हणूनच शेवटी जे काही मागे ऊरणार आहे ती "काजळी" फक्त देहाशी ऊरावी, आत्मा/तेज मात्र निरंजन (निष्कलंक) रहावा.
_________________________________________________
पुन्हा एकदा,
ही सर्व गीते मायबोलीच्या वाचक/श्रोत्यांपर्यंत पोचवल्याबद्दल संयोजक मंडळाचे, अॅडमिन चे आभार. आणि ही गीते ऐ़कून त्यातील सर्व गुण दोषांसकट स्विकारून ईथे आवर्जून प्रतिक्रीया दिल्याबद्दल मा.बो. करांचे अनेक आभार.
गणपती बाप्पा मोरया!
-योग.
गीत, संगीत दोन्ही आवडले. इथे
गीत, संगीत दोन्ही आवडले.
इथे टाकल्याबद्दल खूप खूप आभार.
योग, मनापासून अभिनंदन! श्री
योग,
मनापासून अभिनंदन!
श्री गणरायाची गीते लिहून, संगीतबद्ध करून, गायन, रेकॉर्डिंग, मिक्सिंग या सर्व गोष्टी, इतक्या कमी कालावधी मधे आपण पूर्ण केल्यात!
या अल्बम चे संगीत संयोजन आपणच केले का? मस्तंच झाले आहे.
आपल्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा..
मंडळी, पुढच्या वर्षी देखील बाप्पांच्या कृपेनेच, बाप्पांची नवीन गाणी मायबोली वर ऐकायला मिळोत अशी अपेक्षा करायला हरकत नसावी!
जय हेरंब!!
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!
योग खुप खुप छान ! संयोजक
योग खुप खुप छान ! संयोजक मंडळाचे सुद्धा खुप खुप आभार त्यांच्यामुळे माबोवर खुप चांगली गाणी/ भजनं ऐकायला मिळाली.
>>या अल्बम चे संगीत संयोजन
>>या अल्बम चे संगीत संयोजन आपणच केले का? मस्तंच झाले आहे
संगीतब्ध्ध केले तेव्हा प्रत्त्येक गीताची संपूर्ण चाल, लागणारी वाद्ये, काही ठिकाणी वाजवलेले संगीत तुकडे वगैरे तयार करून ठेवले होते पण त्या सर्वाला खर्या अर्थाने आकार दिला आणि परीपूर्ण केले ते अत्यंत गुणी व मेहेनती कलाकार, संगीत संयोजक- प्रशांत लळीत यांनी.