*****************************************************
ह्या स्पर्धेचे नियम इथे बघता येतील. - http://www.maayboli.com/node/18690
*****************************************************
प्रवेशिका क्र. २६
मायबोली आयडी : प्रिया
"हा आम्हांला हवा असलेला आधार आहे फक्त त्या डब्यातील दही-भात चाटून-पुसून साफ करेपर्यंत! पण तोवर पाय हलवू नका... कारण तो डबा इतका उंच धरलाय की त्याच्यापर्यंत पोहोचायला आम्हांला तुमच्या पायाचा आधार घेऊनच उभं रहायला हवं. साधा दही-भात तो काय... पण त्यासाठी किती मिनतवाऱ्या कराव्या लावता आणि डबा आमच्या ब्लँकीवर ठेवला असता तर छानपैकी बसून नसता का खाता आला? पण नाही... असा उंच धरायचा आणि मग आपल्या पायाचा आधार द्यायचा आम्हांला उभं रहायला. चालायचंच - शेवटी कुत्र्याचा जन्म पडला ना!
हे सगळं एन्याच्या डोळ्यांत मला स्पष्ट दिसत होतं :)"
छायाचित्रात बदल फक्त crop आणि border एवढाच केला आहे. फोटो Droid Incredible या mobile phone ने काढला आहे.
*****************************************************
प्रवेशिका क्र. २५
मायबोली आयडी : jayu
Hampi : shekado varshapasun bhakkampane ubhe rahun kharya arthane tharalele "AADHARSTAMBH".
*****************************************************
प्रवेशिका क्र. २४
मायबोली आयडी : लाजो
नोव्हेंबर २००५ मधे आपले लाडके अभिनेते श्री अमिताभ बच्चन यांना पोटाच्या त्रासामुळे लिलावती रुग्णालयात भरती केले होते. त्यावेळेस शेजारीच असलेल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट च्या बिल्डींग बाहेर लावलेला हा फलक. या फलकावरचा मजकुर म्हणजे बच्चन कुटुंबियांना, आमिताभच्या चाहत्यांनी दिलेला मानसिक आधारच जणु
आम्ही डिसेंबर २००५ मधे भारतात गेलो तेव्हाही हा फलक तिथेच होता. राखणीला असलेल्या शिपायाला काठीचा आधार
कॅमेरा: Cannon EOS 20D
सेटिंग आता आठवत नाही.
छायाचित्रात केलेला बदलः मायक्रोसॉफ्ट पिक्चर मॅनेजर मधे साईज लहान केला.
*****************************************************
प्रवेशिका क्र. २३
मायबोली आयडी : saavanee
*****************************************************
प्रवेशिका क्र. २४
मायबोली आयडी : Mallinathk
आधार - तुझा मला की माझा तुला,
कही कळत नाही,
एवढंसच आहे गणित,
तेही जुळत नाही.
Prakashchitrat Kelele Badal : Photoshopo CS madhun border apply keliy ani aakaar kami kelay.
*****************************************************
प्रवेशिका क्र. २३
मायबोली आयडी : सीमा
"पोटाशी पाठी धरणार्या ह्या "मुलीला" पाटी हाच "आधार". गावाकडच्या गुळकर्यांच्या मुलांच्या शाळेतला हा फोटो."
*****************************************************
प्रवेशिका क्र. २२
मायबोली आयडी : मवा
*****************************************************
प्रवेशिका क्र. २१
मायबोली आयडी : यो रॉक्स
शीर्षक : आमचे आधाराशी अतूट नाते... !
Camera - : Canon SX 120IS
Setting -: Auto
*******************************************************
प्रवेशिका क्र. २०
मायबोली आयडी : रोहित ..एक मावळा
शेतीतंत्र कितिही विकसित झाले असले तरी बळीराजाचा खरा आधार म्हणजे हा त्याचा सखा,सोबती.......
फोटो - Sony Ericsson W८१०i ( २ Megapixel )
(स्थळ - सिध्दगड,मुरबाड)
********************************************************
प्रवेशिका क्र. १९
मायबोली आयडी : डॅफोडिल्स
शिर्षक : माथ्यावर संसार.. सांगा कुणाचा आधार ?
कॅमेरा : कोडॅक ९.२ मेगापिक्सेल
पिकासा वापरून फोटोला बॉर्डर व मायबोली गणेशोत्सव२०१० लिहिले आहे.
********************************************************
प्रवेशिका क्र. १८
मायबोली आयडी : आशुतोष०७११
इतरवेळी जरी माझं ताईशी पटलं नाही तरी अभ्यासाच्यावेळी 'आधार' ताईचाच.
*******************************************************
प्रवेशिका क्र. १७
मायबोली आयडी : aschig
स्वत:च्या मृत्युनंतरही अनेकांना आधार देणारा हा रेडवुड वृक्ष
Redwood National Park
No changes to the photo except for proportional reduction in size
Original size 1600x1200
Olympus Camedia UZ700
*******************************************************
प्रवेशिका क्र. १६
मायबोली आयडी : uju
*****************************************************
प्रवेशिका क्र. १५
मायबोली आयडी : shrutiD
नीट निरखून पाहिलं, तर लक्षात येतं की या फोटोत एक पाल आहे..आता तुम्ही म्हणाल, यात कसला आलाय आधार? पण इथे, त्या पालीला त्या खोडाचा आधार तर आहेच.. पण खोलवर जाऊन विचार केला तर लक्षात येतं की तिला खरा आधार आहे, तो त्या खोडाच्या रंगसंगतीचा...
कॅमेरा: Kodak EasyShare C160
******************************************************
प्रवेशिका क्र. १४
मायबोली आयडी : सीम
Seattle मधल्या या घरांना आधार, जमिनी ऐवजी पाण्याचा!
यांच्या किंमती ऐकून, आम्ही आमच्या बोटीच्या कठड्याचा आधार घेतला!
******************************************************
प्रवेशिका क्र. १३
मायबोली आयडी : नीधप
शीर्षक - नक्की कोण कोणाला आधार देतंय!
फोटोशॊप मधे क्रॊप आणि कलर सॆच्युरेशन व कॊन्ट्रास्ट किंचित वाढवलाय.
मायबोली गणेशोत्सव २०१० असा मार्क टाकलाय.
******************************************************
प्रवेशिका क्र. १२
मायबोली आयडी : लालू
आधारस्तंभ..
******************************************************
प्रवेशिका क्र. ११
मायबोली आयडी : मनिष कदम
प्रत्येक वेळी आधारासाठी समोरुन हाथ मिळेलच असे नाही. त्यावेळी आपल्यालाच आधार शोधावा लागतो. त्या मुलीने घेतलाय तसा.
कॅमेरा निकॉन D100.
ISO 200.
LENS 18-125
******************************************************
प्रवेशिका क्र. १०
मायबोली आयडी : अगो
शीर्षक : ’रुक जाना नहीं, तू कहीं हारके ....’
स्थळ : रेडविंग, मिनेसोटा इथे बरेच तास पायपीट केल्यावर दमलेल्या मित्राला दिलेला आधार
******************************************************
प्रवेशिका क्र. ९
मायबोली आयडी: सिंडरेला
शिर्षक: डॅडी मला धर !!!
कॅमेरा: सोनी सायबरशॉट ४.१
चित्रावर केलेले संस्कार: पेंट ब्रशमध्ये प्रकाशचित्राचा आकार लहान करणे
**************************************************************************************************
प्रवेशिका क्र. ८
मायबोली आयडी : अमृता
बाबाचा हात धरुन, त्याच्या आधारवर सगळी भिती मागे सारुन अथांग सागरात खेळायला निघालेली चिमुरडी.
******************************************************
प्रवेशिका क्र. ७
मायबोली आयडी : विशाल कुलकर्णी
जगण्यासाठी प्रत्येकाला काहीना काही 'आधार' हवा असतो. काहींना तो सहज मिळतो तर काहीजण तो जिद्दीने स्वतःच्या मेहनतीच्या, मनगटाच्या जोरावर मिळवतात.
जगण्याशी झुंज माझी
नको आधार कुबड्यांचा...
मी लढतो माझी लढाई
मज आधार मनगटाचा...!
******************************************************
प्रवेशिका क्र. ६
मायबोली आयडी : निंबुडा
कैलास पर्वतावर बसलेले शंकर-पार्वती आणि खालून कैलासाला आपल्या दशभुजांनी आधार देऊन तोलून धरणारा रावण. वेरूळ लेण्यांमधील एका लेणीत हा नजारा फोटोत कैद केला. लेण्यांमध्ये पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने फोटोच्या वरच्या भागात अंधार आला आहे.
******************************************************
प्रवेशिका क्र. ५
मायबोली आयडी : ट्युलिप
'आधार' एकमेकांना.
सुंदरबनाच्या दलदलीत झाडांना मुळांनी बाहेर येऊन दिलेला 'आधार' आणि श्वासासाठी धडपडत वर आलेल्या अधांतरी मुळांना झाडांनी दिलेला 'आधार'.
******************************************************
प्रवेशिका क्र. ४
मायबोली आयडी : मामी
******************************************************
प्रवेशिका क्र. ३
मायबोली आयडी : स्वाती_आंबोळे
******************************************************
प्रवेशिका क्र. २
मायबोली आयडी : योगेश२४
"आधार" म्हटला कि जाणवतो तो फक्त देणार्याचा उदारपणा किंवा घेणार्याचा दुबळेपणा, पण वास्तव कदाचित वेगळे असू शकते, याही पलिकडे भावना असू शकतात. भावना ज्या फक्त अनुभवता येतात, भावना ज्या शब्दांच्या पलिकडल्या असतात.
" सुखदु:ख खेळ असतो आयुष्यभराचा
तुझे अस्तित्व "आधार" जीवनाचा”
....असंच काही वाटत असेल ना या अळंबीला?
******************************************************
प्रवेशिका क्र. १
मायबोली आयडी : deepa_s
.
.
दीपा, योगेश, स्वाती.. मस्त
दीपा, योगेश, स्वाती.. मस्त आहेत फोटो!
सगळे फोटो एकाच धाग्यावर येणार का? नवीन आलेला कळत नाही.
हो, एका विषयाचे सगळे फोटो
हो, एका विषयाचे सगळे फोटो एकाच धाग्यावर येतील.
तीन विषयांसाठी तीन वेगळे वेगळे धागे आहेत.
अमृता ह्यांची प्रवेशिका ह्या
अमृता ह्यांची प्रवेशिका ह्या धाग्यावर प्रकाशित केली आहे.
योगेशची मस्त आहे. अमृता, मी
योगेशची मस्त आहे. अमृता, मी एक असाच बाप-लेकाचा टाकणार होते आता नाही टाकत.
.
.
संयोजक, माफ करा थोडी गडबड
संयोजक, माफ करा थोडी गडबड झाली. पण आता फोटो पाठवला आहे. तो प्रकाशित करणार का ?
सिंडरेला, तुमचा फोटो प्रकाशित
सिंडरेला, तुमचा फोटो प्रकाशित केला आहे.
धन्यवाद.
धन्यवाद.
दीपा_स,योगेश, स्वाती, मामी,
दीपा_स,योगेश, स्वाती, मामी, ट्युलिप , निंबुडा, विशाल , अम्रुता , सिंडरेला , अगो सगळ्यांचे फोटो अप्रतिम !!!!!!
मामी - छान प्रचि. octopus च
मामी - छान प्रचि. octopus च वाटतोय.
त्याला शिर्षक द्या ना.
सिंडे, कित्ती क्यूट फोटो.
सिंडे, कित्ती क्यूट फोटो.
सिंडरेला, फोटो क्युट , तू पण
सिंडरेला, फोटो क्युट , तू पण आली आहेस फोटोत सावलीच्या रुपात
धन्यवाद
धन्यवाद
लालू ह्यांची प्रवेशिका ह्या
लालू ह्यांची प्रवेशिका ह्या धाग्यावर प्रकाशित केली आहे.
क्या बात है ! सर्व प्रवेशिका
क्या बात है ! सर्व प्रवेशिका आवडल्या.
पहिले ९ तर सर्व फोटो अप्रतिम. नंबर काढणर्यांचं काम इथे अवघड होणारंय!
shrutiD यांची प्रवेशिका ह्या
shrutiD यांची प्रवेशिका ह्या धाग्यावर प्रकाशित केली आहे.
uju यांची प्रवेशिका ह्या
uju यांची प्रवेशिका ह्या धाग्यावर प्रकाशित केली आहे.
shrutiD खुप छान
shrutiD खुप छान
श्रूती.. दमदार एंट्री
श्रूती.. दमदार एंट्री
aschig, तुमची प्रवेशिका
aschig, तुमची प्रवेशिका प्रकाशित केली आहे.
आशुतोष, तुमची प्रवेशिका
आशुतोष, तुमची प्रवेशिका प्रकाशित केली आहे.
डॅफोडिल्स तुमची प्रवेशिका
डॅफोडिल्स तुमची प्रवेशिका प्रकाशित केली आहे.
रोहित.. एक मावळा, तुमची
रोहित.. एक मावळा, तुमची प्रवेशिका प्रकाशित केली आहे.
यो रॉक्स, प्रवेशिका प्रकाशित
यो रॉक्स, प्रवेशिका प्रकाशित केली आहे.
डॅफो, तोषा, यो रॉक्स.. भन्नाट
डॅफो, तोषा, यो रॉक्स.. भन्नाट एंट्री.
२, ३ ६ आणि ८ ह्या प्रवेसिका
२, ३ ६ आणि ८ ह्या प्रवेसिका खूप आवडल्या!
मस्त आहेत सगळ्याच
मस्त आहेत सगळ्याच प्रवेशिका.... आवडल्या
डॅफो, तोषा, यो रॉक्स
डॅफो, तोषा, यो रॉक्स ............खुप छान
mawaa यांची प्रवेशिका ह्या
mawaa यांची प्रवेशिका ह्या धाग्यावर प्रकाशित केली आहे.
Pages