२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २

Submitted by बेफ़िकीर on 17 June, 2010 - 16:38

साहू या वेश्येच्या मुलाची कहाणी लिहायला घेत आहे. एक अत्यंत टाळला गेलेला विषय, ज्यावर लोक एक तर नाक मुरडतात किंवा हसतात!

आणि... त्यातलेच काही जण जगाची नजर चुकवून तिथे जातात...

या कादंबरीचा उद्देश उगाचच उदात्त वगैरे आहे असा माझा मुळीच दावा नाही. समाजातील शोषित घटकांवर लिखाण करणे, त्यांच्या प्रश्नांना समाजापुढे मांडणे वगैरे असले काहीही या कादंबरीचे हेतू नाहीत.

हे फक्त एक वास्तव आहे. जे आपल्यापासून काही किलोमीटरवर किंवा कदाचित शेजारच्या गल्लीतही घडत असते. आपण स्वतःला पांढरपेशे समजून या बाबींपासून दूर राहतो. मात्र, हे वास्तव तिथे घडत असते म्हणूनच आपल्याकडे घडत नाही हे विसरले जाते.

कादंबरी या विभागात यातील सर्व भाग होते. आता ते मागे पडले आहेत. माझ्या सदस्यनामावर (बेफिकीर) क्लिक केल्यानंतर 'पाऊलखुणा' या हेडखाली ते सर्व भाग मिळावेत.

आपल्या दोघांच्या प्रतिसादांबद्दल मनापासून आभार!

धन्यवाद!

मायबोली प्रशासक व प्रकाशक यांचे मनःपुर्वक आभार! या कादंबरीचे सर्व भाग एकत्रित स्वरुपात येथे दिल्याबद्दल मी मायबोलीचा ऋणी आहे.

-'बेफिकीर'!

मला वाटतय कि हे लिखान निदान मुंबई पुण्यातल्या सव॓ कॉलेजातील मुलांना फस्ट॓ ईयरलाच वाचायला दिलेच पाहिजे तुमच्या लिखानाचा खरा हेतु सफळ होईल

वास्तवादी वर्णन केले आहे बुधवार पेठेचे. पुर्वि व आताही गणेश उस्तवात गणपति पाहण्यासाठि पुण्यामध्ये बाहेरुन येणारांची बुधवार पेठ व शुक्रवार पेठ हि आवडती ठिकाणे . रात्रभर तेवढयाच परिसरात हौसे गौसे नवसे फिरुन गणपति कमी पाहनार व वेलकम तोहफा मधेच फिरत बसणार . वेश्या व्यवसायात गरिबी मुळे व परिस्थिती मुळे फसवुन मुलिंना आणुन बळजबरीने ढकलले जाते व सुरु होते ललिताचि कहाणी . यातुन बाहेर पडणे जवळपास अशक्यच . परंतु समाजाला त्याचे काय देणे घेणे . ललिता आणि साहूचे अनुभव पुन्हा एकदा विदारक सत्यच दाखवणार आणि आम्ही ते वाचुन छान अप्रतीम म्हणुन अभिप्राय देवुन विसरुन जाणार . एका ज्वलंत विषयाला सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद .

मायबोलीवर कायमचे सदस्य व्हायचे ठरवले फक्त तुमच्यामुळे..............
"बेफिकीर" मानले तुम्हाला...........
आजपर्यंत फारच कमी असे वाचले होते कि ज्यामुळे मन सुन्न होवून जायचे.....
पण तुमची प्रत्येक लेखमालिका वाचताना एकदम विसरून जातो आम्ही स्वतः ला राव..........
फारच भारी लिहिता...........असेच लिहित जा.........
आणि आमच्या सारख्या वाचकांना असेच प्रत्येकवेळी नवीन काहीतरी शिकायला देत जा.................

बी विजयकुमार व श्री गणेशदादा,

आपले दोघांचेही मनःपुर्वक आभार मानतो.

-'बेफिकीर'!

अप्रतिम लिहीही आहे .कादंबरी .लिखाणात विदारक सत्य पांढरपेश्या समाजापुढे मांडले .
एक जिवंत वातावरण उभे राहिले .ह्या कथानकावर अप्रतिम सिनेमा किंवा नाटक बनू शकतो .
पंखा झालो तुमच्या लिखाणाचा
तुमच्या नावाला न शोभणारे मुद्देसूद लिखाण केले आहे . तुम्ही

.

नमस्कार रमेशराव,

आपला प्रतिसाद वाचला. त्या स्त्रीला शोधून काढण्यात दुर्दैवाने मी आपली मदत करू शकत नाही. मात्र ज्या व्यक्तीच्या हस्ते या पुस्तकाचे येत्या शनिवारी प्रकाशन होणार आहे त्या व्यक्तीची संस्था (जाणीव / वंचित विकास) ही वेश्यावस्तीतील मुलांच्या पुनर्वसनासाठीच काम करते. आपण त्या कार्यक्रमाला येऊ इच्छीत असलात व त्या व्यक्तीशी बोलू इच्छीत असलात तर खालील लिंकवर क्लिक करावेत.

http://www.maayboli.com/node/24327

येथे आपण आल्यास त्या मुलीबाबत काहीतरी माहिती मिळण्याची कदाचित शक्यता आहे. निश्चीत काहीच नाही.

प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

श्री. निनाद कुलकर्णी ००७,

आपलेही मनापासून आभार!

-'बेफिकीर'!

बेफिकीर... बरेच दिवसांपासून वाचीन-वाचीन म्हणता म्हणता काल आणि आज अश्या २ बैठकांमध्ये सर्व १४ भाग वाचून संपवले. खरेतर वचन सुरू केले आणि मग ते सोडवेनाच. एक असे विश्व जे आपल्याला आपल्या जीवनात कुठेही नकोसे असे वाटणारे... पण त्याबद्दल माहिती करून घेण्याची उत्सुकता असणारे..

दुर्दैवी आयुष्य जगुनही साहू किंवा ललिता अश्या व्यक्तींच्या मनात चांगुलपणा शिल्लक राहू शकतो हे नक्कीच जाणवले.

तुमची लेखनशैली आवडली...आवश्यक तिथे रोख-ठोक वाक्य लिहायला तुम्ही कचरला नाहीत. ती वाक्य उगाच घुसडली गेलेली नसून कथेस पूरक आहेत हे लक्ष्यात येते आणि वाचताना चुकीचे वाटत नाही.

तुमचे इतर लेखनही लवकरच वाचेन... आम्हाला अश्या एका विश्वाबद्दल कादंबरीच्या माध्यमातून माहिती दिल्याबद्दल तुमचे शतशः: आभार.. Happy

बेफिकिर,

फारच भारी लिहिता. आज एका दिव्सात पुर्न वाचलि.खरेतर वाचन सुरू केले आणि मग ते सोडवेनाच. पुर्न सुन्न जाले आहे.

मी अप्पा बलवन्त चौकात राहते. भोहरि गल्लित जान्या करता बुधवार पेठ मधुन जाते पन आता मात्र एक नाव लक्शात राहिल..

साहू .....

अम्हाला अश्या एका विश्वाबद्दल कादंबरीच्या माध्यमातून माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार.....

-विम्झ

बेफीकीर ...... अहो खरच काय भयानक अहे ...पण तुम्ही म्हणता तसे वास्तव आहे ...अगदी आप्ल्या शेजारच्या गल्लीत पण घडत असेल .....तुमच्या लेख शैली ने तर अजुनच मनाला भिडली ..... अनी खरच हे मुलाना तरुण वयात येतानाच वाचायला पाहिजे ..... जमेल तर इन्ग्लिश मधे पण चालेल ( म्हणजे माझे म्हणणे इतकेच की भाषा हा अडसर , नसावा इतकच ... ) .....

आपल्या लिखाणाला , प्रतिभेला मानाचा मुजरा ....

Back to top