पावसांच्या सरी चालू झाल्या की निसर्ग आपली ही संपत्ती उधळायला सुरुवात करतो. त्या संपत्तीपैकीच ही काही रान फुले व झाडे. निसर्गाकडू आपल्याला ही संपत्ती विनामुल्य, विनाकष्ट मिळत असते. ही छोटी मोठी रानफुले, झाडे आपल्या नजरेला, मनाला अगदी गारवा देउन जातात. मनाचा, शरीराचा थकवा ह्यांच्या सहवासाने कुठे दुर पळतो त्याचा पत्ता लागत नाही. फक्त आपण त्यांच्याकडे डोळसपणे पाहील पाहीजे. निसर्गाने दिलेल्या ह्या संपत्तीची नजरेने लूट करुन पहा.
हे गोंडे नेहमीच कोणत्याही रानात, रस्त्यावर स्वागतासाठी ताठ सज्ज झालेले असतात.
तेरडा हा तर सगळ्यांच्याच परिचयाचा. नेहमीच हसत उभे असलेले हे फुल. पिठवरीला ह्या झाडाला पुजेचा मान मिळतो. ह्याची फळ खुप गमतीशिर असतात. लहानपणी ही तयार झालेली फळ तोडायची आणि हलकेच हाताने दाबायची मग हे फळ फुटून त्याचा आकार किडीप्रमाणे होतो. मग ते किडीच्या आकाराचे फळ कोणाच्यातरी अंगावर फेकून घाबरवायचे असा गमतीशीर खेळ असायचा.
ही आहे कोरांटी. माझ्या रानभाज्यांच्या सिरिजमधली भाजी. हे तिचे आलेले फुल. ही फुले आलेली झाडे जिथे मोठ्या संख्येने असतात तेथे काश्मिर असल्याचा भास होतो. लहान असताना आमच्या समोरच्या पडीक जागेत ही झाडे मोठ्या प्रमाणात होती. सगळे त्याला काश्मिरच म्हणायचे. ह्या फुलांमध्ये मधही असते. लहानपणी ही फुले काढून त्याची मध चोखण्याचाही टाईमपास चालु असायचा. तसेच ह्या फुलांचे गजरेही करायचो आम्ही.
अळू हा सुद्धा सगळ्यांच्याच परिचयाचा. त्याला आलेले हे फुल केवड्याच्या पातीसारखे भासते.
हे निसर्गाचं एक इटूकल पिटूकल बाळ अगदी बाळबोधपणे आपल्या बाललिला करत डोलत असत.
निसर्गाच्या ह्या पांढर्या फुलांचा अविष्कार अगदी नजर खिळवुन ठेवतो.
हे रोपट पहा कस तोर्यात मिरवतय. खाली पसरलेल्ल्या कवळ्याच्या रोपांना सांगत आहे माझी पान तुमच्यापेक्षा लांब आणि रंगित आहेत अगदी मोरपिसासारखी.
निसर्गाने ह्या रोपट्याला पहा कस रंगवुन टाकलय. निसर्गाच्या ह्या वरदानाने हे रोपट स्वतःला आकर्षीत करुन घेत आहे.
मस्तच आहे . खुप आवडल लेख आणि
मस्तच आहे . खुप आवडल लेख आणि फोटो.
दिनेशदा तेरड्याचे हे वेगळे
दिनेशदा तेरड्याचे हे वेगळे रुप खुप आवडले. मी डबलच्या तेरड्याची बी पेरुन लागवड केली आहे. फुल आल्यावर फोटो टाकतेच. पण ही धायटी अजुन पाहीली नाही कुठे.
सगळ्यांनाच खुप खुप धन्यवाद.
जागु आज ऑफिसात येताना
जागु आज ऑफिसात येताना बाजुच्या रोपट्यांना मुद्दाम बघत होते. मला वाटले कवळा आहे पण एक रोप उपटुन पाहिले तर तो भुईआवळा होता (कवळ्यासारखाच पण मागच्या बाजुने बारीक बारिक गोल गाठी असतात). मला वाटते कवळा आणि भुईआवळुआच्या पानरचनेत फरक आहे भु.आ. ची संयुक्त पाने एकाखाली एक येतात तर कवळ्याची समोरासमोर...
आज रात्री भु.आ चा फोटू टाकते...
ही पोस्ट अशासाठी की कवळा असा ऑफिसातच सापडला तर रात्रीच्या भाजीची व्यवस्था होईल
साधना अग माझ्याकडे खुप आहे
साधना अग माझ्याकडे खुप आहे कवळा.
तु म्हणतेस तो भुईआवळा मी पाहीला आहे. त्याचा काय उपयोग असतो ?
डाळींबाची कळी, बरीच मोठी
डाळींबाची कळी, बरीच मोठी असते. (अनारकली ना ती !) फ़ुगीर
असते. पाकळ्या जास्त असतात. नर फूलात पाकळ्यांचा पसारा जास्त
असतो, तर मादीफूलात ओव्हरीच्या रुपात छोटे डाळिंब असते.
धायटीची फूले जेमतेम इंचभर. पाकळ्या अशा वेगळ्या
नसतातच. शिवाय पानांचा पोत वेगळा असतो.
भुक लागली तर धायटीची फ़ूले खायला काहीच हरकत नाही.
(खरे तर आत्ताच्या आता तूम्हा दोघांना, हात धरुन ओढत नेत,
धायटी दाखवावीशी वाटतेय.)
खरे तर आत्ताच्या आता तूम्हा
खरे तर आत्ताच्या आता तूम्हा दोघांना, हात धरुन ओढत नेत,
धायटी दाखवावीशी वाटतेय.)
दिनेशदा योग आल्यावर बघुच.
माझ्याकडे मादी डाळिंब आहे. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात भरपुर फुल येतात. खुप सुंदर रंग असतो ह्या फुलांचा.
हो मी पाहिलीय डाळींबाची कळी..
हो मी पाहिलीय डाळींबाची कळी.. (पंकजचे शेत आहे डाळींबाचे). धायटी पाहताच क्षणभर भास झाला डाळींबाचा मला वाटले कोणीतरी कळी अर्धवट खाल्लेले डाळींबाचेच रोपटे आहे की काय...
बाकी ते हात धरुन ओढत नेत, धायटी बघायला माझी काही हरकत नाही.. तेवढेच भटकुन होईल. कारण धायटी काय इथे मिळणार नाही.. थेट घाटातच जावे लागेल
जागू /दिनेशदा छानच
जागू /दिनेशदा
छानच ...सुपरररररररररर
मला पाहताच एकदम डाळिंबच वाटले. तशीच लहान पाने व फुल.. >>>>अगदी अगदी, मलापण ते पहील्या नजरेत डाळिंबच वाटले...
आता या दिवसात, वाशी रेल्वे
आता या दिवसात, वाशी रेल्वे लाईनच्या आजूबाजूला मस्त तेरडा फुललेला असतो. बेलापूर स्टेशनच्या बाहेरच, कळलावीचा वेल दिसतो. तसा कळलावीचा वेल कर्नाळ्यापर्यंत दिसतोच.
या दोन्ही फुलांशिवाय गौरीची आरास पुर्णच होत नाही.
सही आहे हे. ह्यातल्या
सही आहे हे. ह्यातल्या बर्याचशा गोष्टी मला माहित नव्हत्या. धन्स.
बाकी ते हात धरुन ओढत नेत,
बाकी ते हात धरुन ओढत नेत, धायटी बघायला माझी काही हरकत नाही.. तेवढेच भटकुन होईल. कारण धायटी काय इथे मिळणार नाही.. थेट घाटातच जावे लागेल
साधनाशी सहमत.
मानस, चंदन धन्यवाद.
दिनेशदा आमच्याकडे हा तेरडा पावला पावलावर दिसतो आता. रस्त्यावरुन येताना आता अगदी निसर्गरम्य ठिकाणी आल्यासारख वाटत.
दिनेशदा कळलावीचा वेल कसा असतो ?
जागू. कळलावीला वेल हिरवागार
जागू.
कळलावीला वेल हिरवागार पण लवचिक असतो. त्याची पाने बांबूच्या पानासारखी पण लवचिक असतात. पानांची टोकेच, तणाव्याचे काम करतात आणि एखाद्या झुडूपावर तो वेल चढत जातो.
हा वेल तसा लक्षात येत नाही, पण त्याला फूले आले कि मात्र लक्ष वेधून घेतो. लाल, पिवळा आणि हिरवा असे ट्राफिक सिन्गलचे सर्व रंग असतात यात. पाकळ्या कतरी किनार्याच्या असतात, आणि या पाकळ्या १८० अंश कोनात वळुन देठाच्या खाली गोलाकार लरतात. लांब पुंकेसर असतात.
गौरी गणपतिच्या सजावटीत हि फूले असतातच. त्या दिवसात विकायलाही येतात.
याच्या कंदाच्या काढ्याने, बाळंतपणाच्या कळा लवकर येतात. म्हणून हे नाव. (या वेलामूळे घरात भांडणे होतात, असाही गैरसमज आहे)
इंग्लीशमधे ग्लोरिया सुपर्बा असे नाव आहे.
फोटो रात्री टाकतो इथे.
कळलावीला वेल हिरवागार पण
कळलावीला वेल हिरवागार पण लवचिक असतो. >>>>दा, विहिगावच्या भटकंतीत वाटेत पुष्कळ ठिकाणी दिसली होती कळलावीची फुले. पण आमच्या मित्रांनी बाईक थांबवलीच नाही.
दिनेशदा आले लक्षात
दिनेशदा आले लक्षात आम्हीत्याला नागदौणा किंवा नागवेल म्हणतो. नागपंचमीला हा आम्ही नागाला वाहतो. तसेच गौरी आणि पिठवरीलाही हा वेल गरजेचा असतो.
"दवणा" हा प्रकार माहित आहे का
"दवणा" हा प्रकार माहित आहे का कुणाला? खुप सुगंधी वनस्पती असते. सुका दवणा कपड्यात ठेवला तर मस्त सुवास येतो.
शिखर शिंगणापुर (तालुका माण, जिल्हा सातारा) येथे भरपुर प्रमाणात सापडतात. आम्ही ते शंकराला वाहण्यासाठी घेतो.
योगेश माझ्या आईकडे आहे दवणा.
योगेश माझ्या आईकडे आहे दवणा. खुप छान वास येतो दवण्याच्या तुर्यांना.
जागू, तुम्ही "नागदौणा"
जागू, तुम्ही "नागदौणा" लिहिलंत ना त्यावरून आठवला हा दवणा
योगेश दवण्यासारखाच पाचु हा
योगेश दवण्यासारखाच पाचु हा प्रकार असतो काहीतरी की दौणालाच पाचु म्हणतात माहित नाही. दिनेशदांना माहीत असेल त्याबद्दल.
छान माहिती आणि फोटोही. अळूचे
छान माहिती आणि फोटोही.
अळूचे फूल पहिल्यांदाच पाहिले.
मला वाटतं, दवणा, पाचू आणि
मला वाटतं, दवणा, पाचू आणि मरवा एकाच वनस्पतिंची नावे असावीत. जून्या काळातल्या लावण्यात याचा उल्लेख सापडतो. कोल्हापूरच्या जोतिबाला पण तो वाहतात. मुंबईला दादरच्या फूलबाजारात हमखास मिळतो.
मला वाटतं अश्विनीमामी ने लावलाय तो घरी. मला बंगळुरुला बिया मिळाल्या होत्या. (बहुतेक नलिनीला दिल्या मी त्या.)
नदीकाठी नागरमोथा नावाचे पण सुगंधी गवत सापडते (मुळांना सुगंध असतो) उटण्यात, केशतेलात वापरतात तो.
दा, मी आता मरवा बद्दलच
दा, मी आता मरवा बद्दलच विचारणार होतो.
"शालु हिरवा पाचु नि मरवा" या गाण्यतला मरवा म्हणजे तोच का?
आता मला वाटतेय, पाचू आणि मरवा
आता मला वाटतेय, पाचू आणि मरवा वेगवेगळे असावेत. शांताबाईंकडून अशी चूक होणे नाही.
असा केसात माळून मरवा (कीचकवध, लता आणि सुधीर फ्डके ) आणि
हिरव्या रंगाची हौस माझी पुरवा (आई मी कुठे जाऊ ? आशा ) या दोन्ही गाण्यात मरव्याचा उल्लेख आहे.
चला आणखी थोडे रंग उधळतो. अगदी
चला आणखी थोडे रंग उधळतो.
अगदी डावीकडे आहेत ती खोबर्याची फूले. तामणीपेक्षा बरीच वेगळी.
मग आहेत ति फालसा किंवा पर्यूषकांची फूले. या झाडांच्या फळांपासून केलेले फालसांचे सरबत खुप चवदार लागते. तोंडाला चव आणते.
मग आहे ती कळलावी उर्फ वाघनखी उर्फ गौरीचे हात
आणि मग आहेत ती मुरुडशेंगेची फूले. ही फूले आधी केशरी, मग पिवळी आणि मग जांभळी होतात. याच्या शेंगा पोटात मुरडा झाल्यास देतात. (बाळगुटी मधे मुरुडशेंग असते. सुतळीच्या तूकड्यासारखी दिसते ) यापैकी खोबर्याची फूले सोडल्यास बाकी रानात सहज दिसतात. माहीती असली म्हणजे उपयोग करुन घेता येतो.
धन्यवाद दा, मी यातील फक्त
धन्यवाद दा,
मी यातील फक्त कळलावीचीच फुले पाहिली आहेत (इतरही पाहिली असतील पण नावे आत्ता समजली :)).
कळलावीचे फुल पाहिले कि जास्वंदीचा एक प्रकार आठवतो. संपूर्ण पाकळ्यानां कातरल्यासारखी नक्षी असते.
दवणा, पाचू आणि मरवा एकाच
दवणा, पाचू आणि मरवा एकाच वनस्पतिंची नावे असावीत
तिनही वेगवेगळे आहेत. मी फक्त मरवा पाहिलाय... बाकीचे कोणी पाहिले असल्यास फोटु डकवा.
आणि दिनेश, फोटू थोडे मोठे डकवा.. फोटू नीट दिसत नसल्यामुळे रानात मुळ झाड शोधणे कठीण जाईल... (नाहीतर तुम्ही या सोबत भटकंतीला म्हणजे फोटोवर अवलंबुन राहायला नको )
मी कळलावी भरपुर पाहिलीय, माझ्या जिममध्येही आहे
काय अफ़ाट द्यान आहे तुम्हा
काय अफ़ाट द्यान आहे तुम्हा सगळ्याचे
कळलावीचे फुल पाहिले कि
कळलावीचे फुल पाहिले कि जास्वंदीचा एक प्रकार आठवतो. संपूर्ण पाकळ्यानां कातरल्यासारखी नक्षी असते.
योगेश ही फुले माझ्या माहेरी आहेत.
साधना माझ्या आईकडे दवणा आहे. मी फोटो टाकेन त्याचा.
दिनेशदा माझ्याकडे नागरमोथ्याचे गवत खुप पसरते. आम्हाला उपटून टाकावे लागते. पण त्याची मुळे आत खोलवर असल्याने ते परत परत उगवते.
खोबर्याचे झाड माझ्या माहेरी आहे. ह्यात पांढरा रंगही असतो.
तुम्ही जे फालसा लिहीलय त्याला आमच्याकडे धामण म्हणतात. त्याची फळे पिकल्यावर गोड लागतात. लहानपणी खाल्लेली आहेत.
कळलावीला आम्ही नागदौणा म्हणतो. ह्याची फुल मी आधी फ्लॉवरपॉट मध्ये सजवायचे.
चौथ्या फोटोतील झाड पाहील्यासारख वाटतय. अजुन मोठा फोटो टाकलात तर लक्षात येईल.
Pages