नुकत्याच झालेल्या ट्रिप मधे भारतीय कस्टमचा एक सुखद अनुभव आला. (झक्की ऐकताय ना? )
झालं असं कि आम्ही एअर इंडियाच्या सलग विमानसेवेने मुंबईत पोहोचलो. सुट्टीकरता गेलेलो त्यामुळे फारसं सामान नव्हतच. पटापट बॅगा घेउन ग्रीन चॅनल मधुन निघालो. हल्ली कस्टम मधे पुर्वीसारखा त्रास नसतो त्यामुळे निश्चिंत होतो. एका बॅग मधे फोन, इलेक्ट्रिक शेवर असल्या चटरफटर इलेक्ट्रॉनीक वस्तु होत्या. ती बॅग त्यांनी उघडायला सांगितली. ते सोपस्कार झाल्यावर निघालो. टॅक्सीत बसुन अर्ध्या रस्त्यावर आलो तेव्हा माझ्या डोक्यात दिवा पेटला. एक छोटी बॅगपॅक नाहिच्चे. त्यात डिजीकॅम, हँडीकॅम, माझं नविन जॅकेट ह्या गोष्टी होत्या. झालं! एकमेकांवर आरडाओरडा करुन झाला. कुठे राहिली असेल ह्यावर भांडुन झालं. शेवटी प्रीपेड टॅक्सी शोधायला एका माणसाने मदन केलेली त्यानेच चोरली असणार आणि परत जाउन काही उपयोग नाही. कॅमेरे गेले!! असं वाईट कन्क्लुजन काढुन आम्ही घरी पोचलो.
घरी गेल्या गेल्या कुणाला काही सांगितलं नाही. झोपता झोपता पुन्हा विचार केला. तेव्हा कस्टम मधे पण राहिली असु शकेल असं वाटलं. एक अंधुक आशा वाटत होती कि बॅगेवर पत्ता आणि फोन नंबर आहे. कुणा सदगृहस्थाच्या हातात पडली तर कदाचीत मिळेल सुद्धा. त्यात एक वाईट गोष्ट झालेली कि घरचा फोन नीट चालत नव्हता. तेव्हा सेल फोन नंबर का नाही टाकला ह्या साठी चुकचुकाट करुन झाला. झोपलो.
सकाळी सकाळी ६ वाजता फोनची एक रिंग वाजली नी फोन बंद झाला. आमच्या आशा थोड्या पल्लवीत झाल्या. परत ३,४ वेळा असं झालं. उचले पर्यंत फोन कट होत होता. पुन्हा वाजला. किरणने एका झेपेत उचलला. प्रचंड खरखर... त्यातुन त्याला कस्टम, किरण भावे एवढे २ शब्द ऐकु आले. पुरेसे होते.
मग काही पुन्हा फोन आला नाही. पण जी कोणी व्यक्ती करत होती तिने खुप वेळा ट्राय केलेलं.
उजाडल्यावर किरण एअरपोर्ट वर गेला. पण प्रॉबलेम असा कि तिथे आत जाणं कठिण. तिथे त्याला अजुन एक माणुस भेटला ज्याचं सामान राहिलेलं. त्याच्याकडुन कस्टमचा नंबर घेउन त्यांना फोन केला. पण तिथे कुणाला काहिच माहिती नव्हतं. झालेलं असं कि आम्ही आलो तेव्हाचे अधिकारी आता घरी गेले होते आणि त्यांची ड्युटी २ दिवसांनंतर होती. आशा परत मंद झाल्या. (रच्याकने, त्यांनी ड्युटी पुर्ण १२ तास असते)
२ दिवसांनी पुन्हा किरण गेला. पुन्हा फोन केला. अधिकारी त्या दिवशीचे होते. तेव्हा एक अधिकारी बाई होती तिने आमची बॅग एअर इंडियाच्या हवाली केलेली. तिचं आम्हाला फोन करत होती. गेट पास इत्यादी सोपस्कार केल्या नंतर गुहेत प्रवेश मिळाला. असंख्य हरवलेल्या सामानांमधुन आमची बॅग आम्हाला मिळाली. अगदी व्यवस्थित सील केलेली होती.
लांबण लावलय.. माहित्ये, पण हा अनुभव सांगावासा वाटला. कधीपासुन लिहायचं होतं ते आज जमलं.
तुमचेही असे चांगले अनुभव असतील तर येउद्या. नेहेमीच काय शिव्या द्यायच्या.
किरणचे अॅडीशनः
त्या बाईंचे नाव मला नक्की आठवत नाहीये पण मला वाटते तिला 'लक्ष्मी'मॅडम का काहीतरी तिचे सहकारी म्हणत होते. त्या साऊथच्या असाव्यात. त्याचबरोबर ज्याने आमची बॅग प्रथम उघडून पाहिली (पण काहीही त्रास न देता सोडले) त्याचे काहीतरी मराठी आडनाव होते.
ह्या सगळ्यात केवळ कस्टमच नव्हे तर एअर इन्डियाच्या स्टाफची सुद्धा खुप सहकार्य आणि मदत झाली.
म्हणजे खरेतर कस्टम सुद्धा क्लिअर होऊन आलेली अशी ती बेवारस बॅग होती, जी नियमाप्रमाणे डिस्पोज ऑफ झाली असती. पण त्या अधिकार्यांनी ती नियमात बसवणासाठी ती बॅग त्या प्लेन मधून न येता मागाहून आली अशा धर्तीच्या रुटीन मध्ये ती घालून सुरक्षित ठेवली. त्या बाईंनी आतमध्ये किमती सामान आहे हे पाहून लगेचच ती सील केली.
मला आत कोणत्याही रेफरन्सशिवाय आत येण्यासाठी त्यांनी एक माणूस बाहेर पाठवून माझा पासपोर्ट आत नेऊन माझ्यासाठी आयत्या वेळी गेटपास बनवून आणला. नंतर त्यानेच मला अनेक रजिस्टर्स वर सह्या करवून आतल्या लॉकप मध्ये ठेवलेली बॅग बाहेर आणण्यापासून हातात मिळेपर्यंत मदत केली.
मी इतका भांबावून गेलो होतो की मला ह्यापैकी कोणाचेच नाव विचारायचे देखील सुचले नाही.
फक्त रेफरंस साठी २० जूनला भारतात पोचलेली AI 140 ला रिसिव्ह केलेली टीम एवढाच रेफर्न्स शिल्लक आहे.
कोणाला असे वाटेल की केले तर त्यात काय एवढे, आपल्याला सापडले असते तर आपणही नसते का केले. इ. पण मी म्हणतो की असे जण आणि अशी निरपेक्ष परोपकारी वृत्ती फार कमी होत चालली आहे, त्यामुळे अशा गोष्टी हायलाईट होणे फार महत्वाचे आहे.
हो, हल्ली कस्टममधे खुप
हो, हल्ली कस्टममधे खुप सुधारणा आहे.
असो. )... तर, तेव्हा कस्टमच्या रांगेत मुलगी कडेवर जी बसली व कुरकुर करु लागली ती थांबेचना व मला ती व सामान एकदम काही झेपेना. मग एक अधिकारी म्हणाला, 'अकेले हो क्या'? मी हो सांगितले तर म्हणाला 'या रांगेतुन बाहेर व जा निघुन जा साईडने' !!! . अस्स बर वाटल ना. माझ्या electronic सामान नव्हते तरी लेसरपट्टयावर लायनीत उभे राहुन सामान टाकायचा जो प्रचंड वेळ वाचलाय म्हणता.
मागील प्रवासात जेव्हा मी व मुलगीच गेलो होतो (हो, तोच प्रवास जेव्हा चावलांची जुही एकदम माझ्या समोरुन आली,काय छान दिसते अजुनही
भारतात तरी तिथे राहिलेल्या
भारतात तरी तिथे राहिलेल्या बॅगेचे पुन्हा स्कॅनिंग करावे लागते. माझ्याकडे एक भलतीच बॅग आली होती. ती परत करायला गेल्यावर कस्टमवाल्यांनी दोन्ही बॅग स्कॅन करवल्या.
आर्च, तुला सकाळमध्ये लिहायची
आर्च, तुला सकाळमध्ये लिहायची प्रॅक्टिस दिसतेय![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
एकदा माझ्या मेहूण्याने एका
एकदा माझ्या मेहूण्याने एका ब्रिटिश बाईची बॅग घरी आणली (चूकून). घरी पोहोचायला रात्री तीन वाजले होते. मग ब्रिटीश एयरवेजला फोन केला (तो त्याने आलेला मुंबईत). तोपर्यंत ती बाई बॅगेची वाट बघून, भांडण करून ५०० $ घेऊन हॉटेलला गेलेली. बीएने सांगितले, 'आम्ही तिचा हॉटेलचा पत्ता/ फोन देतो. तुम्ही त्यांना त्यांची बॅग द्या, आणि $५०० घ्या. ते आणून आम्हाला द्या मग कस्टम्स मधून बॅग घेऊन जा.'
मग पहाटे चार वाजता त्या बाईकडे हॉटेलवर. दार उघडताच बाईने झडप घालून बॅग घेतली आणि दार लावून घेतले. मग तो फोन पण उचलेना (तिला $५०० परत द्यायचे नव्हते). शेवटी १५ मिनीटे वाट पाहून बीए ला फोन. तर ते $५०० आणाच म्हणू लागले. मग वैतागून तो एयरपोर्टवर गेला. तिथे कस्टम्सशी हुज्जत, बीए शी हुज्ज्त इत्यादी करून शेवटी बॅग घेऊन घरी (गोरेगांवला) आला तेव्हा ८ वाजलेले..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हल्ली कस्टममधे खुप सुधारणा आहे.
'या रांगेतुन बाहेर व जा निघुन जा साईडने' <<< मुलं लहान असताना मी प्रत्येक ट्रिपला हा अनुभव घेतलाय.
सायो, लिहायची नाही वाचायची.
सायो, लिहायची नाही वाचायची.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आर्च, तुला सकाळमध्ये लिहायची
आर्च, तुला सकाळमध्ये लिहायची प्रॅक्टिस दिसतेय >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
माझ्याकडे एक भलतीच बॅग आली होती. >> बघा तुमच्यासारखी लोक अशा भलत्याच बॅगा घेऊन जातात नि नाव कस्ट्म नि airlines ची नावं खराब होतात![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आर्च लिही गं तु तिथे. कोणी
आर्च![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
लिही गं तु तिथे. कोणी नाही तर मी तरी तिथे चांगला प्रतिसाद देईन.
आर्च, अगदी ह्याच प्रतिक्रिया
आर्च, अगदी ह्याच प्रतिक्रिया अपेक्षीत आहेत. पण हे राहिलं ग..
पुणेकर असला वेंधळेपणा करुच शकत नाहीत.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आली गाडी पुन्हा पुण्यावर?
आमचं नशिब थोर बिर असावं
आमचं नशिब थोर बिर असावं बहुतेक पण आजवर १५ वर्षाच्या प्रवासात बॅग न मिळाल्याचा, हरवल्याचा, दुसर्यांकडे गेल्याचा अनुभव मला आलेला नाही.( टचवुड) आणि कधीही घ्यायचा ही नाही. यावेळी काँटी.वाले म्हणते होते की तुमच्या बॅग्ज नेक्स्ट फ्लाईटने सिंगापूरला पाठवतो कारण दोन फ्लाईटसमध्ये वेळ कमी होता नी इथून जाणारी फ्लाईट ऑलरेडी लेट झालेली.
'या रांगेतुन बाहेर व जा निघुन
'या रांगेतुन बाहेर व जा निघुन जा साईडने'
हा चांगुलपणा फक्त भारतातच दिसेल.
अमेरिकेत अनेSक वर्षांपूर्वी (म्हणजे जेंव्हा तुमचे बाबा कॉलेजात टवाळक्या करत हिंडत होते, तेंव्हा) सौ., दोन वर्षांची मुलगी, सात वर्षाचा मुलगा नि सहा बॅगा घेऊन भारतातून, वाटेत विमान बदलून अनेक तासांचा प्रवास करून न्यू यॉर्कला आली. मुलगी रडत होती, तिच्या हातात आजीने प्रेमाने दिलेला आंबा होता. कस्टमवाल्याने ते पाहिले, नि पहिले तो आंबा फेकून दिला. मुलगी अजूनच रडू लागली. नि तो कस्टमवाला वर म्हणतो, आता मला सगळ्या बॅगा चेक कराव्या लागतील. सौ. म्हणली घे या किल्ल्या नि बघत बस, काही सापडणार नाही. पण हा हटवादी म्हणतो, बॅगा तुम्हीच उघडायला पाहिजेत!
शेवटी कशी बशी सौ. रडत, मुलगी रडत, नि मुलगा जाम भांबावून सगळे बाहेर आले. सौ. म्हणाली एक अक्षर बोलू नकोस, बॅगा गाडीत ठेव, ए. सी. लाव फुल स्पीड नि आधी आम्हाला घरी ने!! मी डोळे मिटून स्वस्थ बसणार आहे. सुदैवाने 'आपल्या' अमेरिकेत आल्यावर मुलाला नि मुलीला पण जरा बरे वाटले. नि मी एकदाचा घरी पोचलो.
झक्की, त्याच्या पुढच्यावेळी
झक्की, त्याच्या पुढच्यावेळी मुलीच्या हातात आंब्याऐवजी आंबावडी दिलीत का?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
'या रांगेतुन बाहेर व जा निघुन
'या रांगेतुन बाहेर व जा निघुन जा साईडने'
हा अनुभव मलाहि गतवर्षी आला होता. मी व सौ. हातात भाच्यासाठी लॅपटॉप व दोन मोठ्या बॅगा घेऊन उतरलो. आम्हाला काही अडचण नव्हती, पण गर्दी खूप होती, नि मी बराच म्हातारा दिसतो, म्हणून त्याने मला हेच सांगितले.
भारतात वयाला मान असतो. काही लोकांच्या मते वय झाले म्हणून अक्कल आलीच असे नाही. तरीपण सभ्य लोक मान ठेवतात.
मी मायबोलीवर पुणेकरांबद्दल का
मी मायबोलीवर पुणेकरांबद्दल का भारताबद्दल काहीतरी लिहीले. दुर्दैवाने मला एकाएकी भारतात जाण्याची वेळ आली (दु:खद घटना घडली नात्यात म्हणून).
मी विमानातून बाहेर पडतो न पडतो तोच एक गणवेशातील गृहस्थाने विचारले, आपण आनंद म्हसकर का? मी हो म्हंटल्या बरोबर त्याने म्हंटले, तुमचा पासपोर्ट नि बॅगेज क्लेम माझ्या जवळ द्या, नि बरोबरच्या शिपायाला म्हणाला त्यांच्या हातातल्या बॅगा घे.
मला वाटले मी मायबोलीवर लिहीलेले यांनी वाचले नि आता मला अटक केली आहे. मी गप्प. सौ पण गप्प. आम्ही त्या गृहस्थाबरोबर थेट बाहेर एका पोलीस चौकीवर. तिथे ते म्हणाले, बसा. अरे पंखा सोड, चहा सांग लवकर. तरी मी घाबरतच. मग एक बराच मोठा अधिकारी आत शिरला. लगेच सगळे जण खाडकन उठून सलाम करते झाले. सौ. मात्र म्हणते, अरे संजय, बरे झाले तूच आलास घ्यायला. नि तो आम्हाला म्हणाला चला काका मी तुम्हाला घरी सोडतो. पासपोर्ट बॅगा घेऊन येईन मी नंतर.
तर ते संजय परांडे, माझ्या सौ. च्या चुलत बहिणीचे मामे का आते भाऊ का कुणितरी हे त्यावेळी मुंबई कस्टमचे प्रमुख अधिकारी होते!
मग काय विचारता राव!!!
टीएसए प्रमाणित कुलुप मिळते.
टीएसए प्रमाणित कुलुप मिळते. ते लावल्यास चालते.
भारतात सुध्धा, सामान तुमच्याबरोबर न आल्यास नंतर घरी आणून देतात
तोपर्यंत गरजेच्या वस्तू विकत घेतल्या तर प्रत्येक व्यक्तीसाठी रु ३,००० पर्यंत (पावती ची गरज नाही) रक्कमही देतात.
डेल्टा आणि उडता हंस, दोघांनीही (अर्थात वेगवेगळ्या वेळेला) हे केलेले आहे.
आज बॅटिंग करायला तुमचा बीबी
'या रांगेतुन बाहेर व जा निघुन
'या रांगेतुन बाहेर व जा निघुन जा साईडने'
हा चांगुलपणा फक्त भारतातच दिसेल >> ८ महीन्यापुर्वी मला (आणी माझी लेक (३.५ वर्षे) नेवार्कला बॅगा चेक न करता असे जाऊ दिले
विमान भलत्या रात्री पोहोचलेले आणी जाम गर्दी होती विमानतळावर.
नशीबवान आहात असे लिहिणार
नशीबवान आहात असे लिहिणार होतो, पण या वेळी अमेरिकेतले कुणितरी म्हणतील tangent!
कदाचित 'हा चांगुलपणा भारतात दिसेलच ' असे लिहायला पाहिजे होते.
त्या बाईंचे नाव मला नक्की
त्या बाईंचे नाव मला नक्की आठवत नाहीये पण मला वाटते तिला 'लक्ष्मी'मॅडम का काहीतरी तिचे सहकारी म्हणत होते. त्या साऊथच्या असाव्यात. त्याचबरोबर ज्याने आमची बॅग प्रथम उघडून पाहिली (पण काहीही त्रास न देता सोडले) त्याचे काहीतरी मराठी आडनाव होते.
ह्या सगळ्यात केवळ कस्टमच नव्हे तर एअर इन्डियाच्या स्टाफची सुद्धा खुप सहकार्य आणि मदत झाली.
म्हणजे खरेतर कस्टम सुद्धा क्लिअर होऊन आलेली अशी ती बेवारस बॅग होती, जी नियमाप्रमाणे डिस्पोज ऑफ झाली असती. पण त्या अधिकार्यांनी ती नियमात बसवणासाठी ती बॅग त्या प्लेन मधून न येता मागाहून आली अशा धर्तीच्या रुटीन मध्ये ती घालून सुरक्षित ठेवली. त्या बाईंनी आतमध्ये किमती सामान आहे हे पाहून लगेचच ती सील केली.
मला आत कोणत्याही रेफरन्सशिवाय आत येण्यासाठी त्यांनी एक माणूस बाहेर पाठवून माझा पासपोर्ट आत नेऊन माझ्यासाठी आयत्या वेळी गेटपास बनवून आणला. नंतर त्यानेच मला अनेक रजिस्टर्स वर सह्या करवून आतल्या लॉकप मध्ये ठेवलेली बॅग बाहेर आणण्यापासून हातात मिळेपर्यंत मदत केली.
मी इतका भांबावून गेलो होतो की मला ह्यापैकी कोणाचेच नाव विचारायचे देखील सुचले नाही.
फक्त रेफरंस साठी २० जूनला भारतात पोचलेली AI 140 ला रिसिव्ह केलेली टीम एवढाच रेफर्न्स शिल्लक आहे.
कोणाला असे वाटेल की केले तर त्यात काय एवढे, आपल्याला सापडले असते तर आपणही नसते का केले. इ. पण मी म्हणतो की असे जण आणि अशी निरपेक्ष परोपकारी वृत्ती फार कमी होत चालली आहे, त्यामुळे अशा गोष्टी हायलाईट होणे फार महत्वाचे आहे.
किरण आणि अमृता, एक प्रश्न
किरण आणि अमृता, एक प्रश्न विचारायचाय ..
त्या बाईंनी आतमध्ये किमती सामान आहे हे पाहून लगेचच ती सील केली >> तुमचं सामान कॅमकॉर्डर वगैरे सगळं नविन विकत घेतलेलं होतं की तुमचं स्वतःचं होतं?
नविन नव्हत सशल. आमचं स्वतःचं
नविन नव्हत सशल. आमचं स्वतःचं होतं. पण का ग?
अगं माझा विचारायचा उद्देश असा
अगं माझा विचारायचा उद्देश असा होता की त्यांनीं जी काही courtesy दाखवली ते करताना नियमांचं पालन केलं का? नियम धाब्यावर बसवून काही केलं असेल तर मग त्यातून वेगळे मुद्दे निघतील .. पण तसं नाही तेव्हा खरंच परत एकदा कौतुक ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चांगला अनुभव आहे... इथे आणि
चांगला अनुभव आहे...
इथे आणि इथे फिडबॅक देता येईल
चांगला अनुभव.
चांगला अनुभव.
मन कवडा धन्यवाद. air india
मन कवडा धन्यवाद. air india च्या साईट वर compliment नोन्दवली. airport चा फोर्म मोठा आहे, तो नन्तर भरेन.
Pages